|
डान्स बार च्या बाजुने निकाल..... लगेच स्टार प्लस्वर कोण ती वर्शा काळे आणि मटकनारी बारबाला हजर... वर्शा काळे चे विचार ऐकुन धन्य तीचे आई वडील आणि तीचे संस्कार असे म्हणावे का निवेदिका इतकी खुश होती कि जणु ती सुध्दा बारबाला आहे असेच वाटले, तीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सगळा प्रकारच चिड आणणारारा होता.. तुम्हि जिंकलात तुम्हाला काय वाटते? असे विचारण्याऐवजी एकही व्रूत्तनिवेदकाला असा प्रश्न सुचला नसेल का? कि आज पोट भरण्याचे साधन म्हणुन का होइना पण तुम्हि ज्याचे सम्रथन करताय त्यंचि पुढची पिढी...... ... worker शिवाय दुसरे काही ही बनणार नाही.. कमाल आहे त्या वाहिन्यांची आणि वर्षा काळे सारख्या बाईची..
|
Maudee
| |
| Thursday, April 13, 2006 - 7:03 am: |
| 
|
exactly ......आबान्ची सगळी मेहनत वाया घालवली.......
|
Chingutai
| |
| Thursday, April 13, 2006 - 8:51 am: |
| 
|
लोपामुद्रा- माउडी १००% खरं आहे तुमचं. हे पहा- http://www.loksatta.com/daily/20060413/opd01.htm चिंगी
|
Zakki
| |
| Thursday, April 13, 2006 - 2:32 pm: |
| 
|
चिंगुताई, भारतात काय नि कुठेहि काय, जिथे जिथे वकील असतात तिथे तिथे ते 'वकिली' करतात, नि कायदा वाकवतात. म्हणून तर एक ग्रीक वक्ता आपल्या भाषणांची सुरुवात नेहेमी ' First of all, we must kill all the lawyers ' अशी करत असे. अमेरिकेत सुद्धा वकिली शिकलेले माझे मित्र सांगतात की 'पुरेसा पैसा दिलास तर तुला काय हवे ते सिद्ध करून दाखवता येईल.' मुळात कायदा करणार्यांना तरी कुठल्या प्रकारे लोक कायदा मोडतील हे आधीच कसे कळणार? त्यांच्याहूनहि हुषार वकील बाहेर असतातच. शिवाय कायद्याचे पालन होईल याची जबाबदारी पोलिसांवर असते नि अमेरिकेत सुद्धा कायदा केला पण अंमलबजावणी कशी करायची, Training , त्यासाठी पैसे कसे आणायचे, या गोष्टींचा पुरेसा उहापोह होत नाही. जसे No child shall be left behind! पण त्यासाठी आता बर्याच शाळांजवळ पुरेसे पैसे नाहीत, म्हणून कायदा धड पाळल्या जात नाही. पुन: कायदे केल्यावर काही काळानंतर त्यांच्या अंमलबजावणीत येणार्या अडचणी, कायद्याचा अपेक्षित फायदा कितपत झाला, ही माहिती कदाचित् फक्त संख्याशास्त्राप्रमाणे होत असावी, त्यात सुद्धा वकिली करणारे असतातच. त्यामुळे वरील प्रमाणे हे सर्व कसे कायदेशीर आहे हे दाखवले जाते. कायद्याची भाषा पण अशी हवी की त्यातून पळवाटा काढणे कठिण व्हावे. तसे मुळात माझे कायद्याचे ज्ञान, नि भाषेचे ज्ञान जवळपास शून्य आहे, पण उदाहरणादाखल (हे उदाहरण आहे, हे असेच असले तर बरे, असे मला म्हणायचे नाही, ) शाळा मंदिरे, प्रार्थनागृहे यांच्या ७५ मीटरच्या परिघात बार असू नये, असे म्हंटले असते तर!
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 5:06 pm: |
| 
|
मी काहि कधी कुठल्या बारमधे गेलो नाही, पण ज्या मुद्द्यांवरुन हि बंदी ऊठवली ते वाचलेत का ? जर हॉटेल्समधे ईतर कामे स्त्रीया करु शकतात, तर केवळ नाचावर बंदी का ? त्यामुळे स्त्री पुरुष समानता या मुद्द्याची गळचेपी होते. दुसरा म्हणजे जे आक्षेप सरकारने घेतले होते, त्याबद्दल कुठलाहि ठोस पुरावा सरकारला देता आला नाही. म्हणजे आबांची मेहनत हा पब्लीसिटी स्टंटच होता. त्या ऐवजी नीट तपास करुन, अश्या शोषित स्त्रीयाना साक्षीदार म्हणुन ऊभे केले असते तर !!! नुसती बंदी घालुन काय होणार होते ? त्या स्त्रीयांच्या रोजगाराची काय पर्यायी व्यवस्था सरकारने केली होती ? नर्मदेच्या प्रकल्पात विस्थापित होणार्याना पर्यायी जमीन ज्या सरकारला देता येत नाही, रस्ते बांधताना जे विस्थापित होतील त्याना पर्यायी जागा दिलीच पाहिजे हि जागतिक बॅंकेची अट ज्या सरकारला " जाचक " वाटते, ते काय करणार हो ? आणि सरकारने / पोलिसानी न्यायालयाच्या निकषांवर टिकतील असे पुरावे सादर करत, नीट तपास करुन दाखल केलेली शेवटची केस कुठली, ते आठवतय का कुणाला ? जन्मल्यापासुन तपासच करताहेत ना, मग पुरावे कसे गोळा करायचे, याचे भान का नाही हो पोलिसाना. आता यातुन वेगळेच अर्थ निघु शकतात, हा मुद्दा तसा गौणच नाही का ?
|
पुरावे देता आले नाही हे खरे आहे पण तो आबांचा publisity stunt होता असे कस तुम्हि म्हणु शकता??????? stunt ला काय वेगळे विषय नव्हते. तुम्हि या बाब्तीत त्यंचे विचार ऐकलेले दिसत नाही, बार्बालांचे ईतके भयानक परीणाम आज दिसताहेत..(मल ईथे लिहिता येणार नाही, लिहायला हात कापतो... अशा केसेस ऐकल्या off मध्ये बघितल्या) आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा सरकार्चा नाही... ज्या बार्मध्ये त्या काम करतात त्यांनी करावे ते.. आज शेतकर्यांच्या एव्ह्ढ्या आत्म्हत्या होतात त्यांची बायकामुले उघड्यावर पडतात, त्यांचे कोण करते पुनर्वसन? हा झक्किंनी म्हटल्याप्रमाणे वकिलि डावपेचांचा खेळ आहे. सरकार उद्या तयारी करेलच..परत लढेल आणि हि नैतीक अनैतीक्तेची लढाई एकदिवस जिंकेलच..!!! एका बारबालेचे उद्गार आठवतात," मला महिना ५०००० कमितकमि मिलतो सरकारकडे आहे का एव्हढा पैसा आमचे पुनर्वसन करायला तर dancebar बंद करा. " यावरुन लक्षात येते....
|
Moodi
| |
| Thursday, April 13, 2006 - 7:27 pm: |
| 
|
दिनेश सॉरी मला पण हा मुद्दा पटला नाही. वकिली मुद्दे वेगळे आहेत पण या बायकांचे कसले शोषण झालेय? शोषण झालेय ते उलट त्या मुर्ख लोकांच्या बायका अन मुलांचे, ज्यांचा तोंडचा घास हिरावला गेलाय या बारबालांमुळे. अन पैसा कमवायचा तर काय इतर कष्टाची कामे नव्हती का यांना? लॉटरीत जसा पटकन पैसा मिळतो तसा पैसा हवाय या मुलींना. सरकार जेवढे चांगले काही करायला जाते तेवढेच ही बडी धेंडे मध्ये येऊन घोळ घालतात. सकाळमधील लेख वाचलात का सप्तरंग पुरवणीतला? लेखाचे नाव आहे " शेतकरी आत्महत्या का करतो " सरकार तयारी करत हो, पण यांच्याच पक्षातील किंवा लागे बांध्यातील लोक मध्ये येऊन ती केस कशी कमजोर करता येईल ते बघतात, मग ते तेलगीचे असो वा इतर काही. कायदा राबवणेच कठिण झालेय कारण पळवाटा भरपूर.
|
दिनेश... तुमचे मुद्दे काही पटले नाहीत अश्या शोषित स्त्रीयाना साक्षीदार म्हणुन ऊभे केले असते तर !!! >> या स्त्रियांना पैशांची आणि असल्या आयुष्याची चटकच लगलेली असते... तर त्या का म्हणून साक्ष द्यायला येतील? http://in.rediff.com/news/2004/nov/30spec.htm या डान्स बार मुळे किती जण वाया गेले आणि किती जण आयुष्याला मुकले याची गिणतीच नसेल. डान्स बार चालू होते तेव्हा पनवेल जवळ Express Way वर बरेच अपघात होउन बरीच तरणीताठी मुले हकनाक गेली त्या स्त्रीयांच्या रोजगाराची काय पर्यायी व्यवस्था सरकारने केली होती ? >> उद्या एखादा खरोखरचा pick up joint बंद केला तर त्या स्त्रियांना पण पर्यायी रोजगार द्यावा का सरकारनी? कोणा-कोणाला पोसेल हे सरकार? शिवाय डान्स बार चालू व्हायच्या आधी यांना काही रोजगार नव्हता काय? आणखी एक म्हणजे.. नर्मदा प्रकल्पाचे विस्थापित आणि या बार-बाला यांच्यात खूप फरक आहे हो
|
दिनेश शी पुर्णपणे सहमत. बरेचदा नेते publicity साठी असे निर्णय घेतात. पण त्यामुळे खरेच dance bar गुठखा, online लॉटरी बंद झाल्या आहेत का? उलट पोलिस आणी एतर सरकारी मडळीना पैसे मिळण्याचे साधन ज़ाले आहे मुम्बईत नटराज हॉटेल वर एकाच आठवड्यात दोन वेळा धाड पडते. पहिल्या धाडी मध्ये बार का नाही बंद झाला? कदाचीत हा dance बार आजुनही चालु असेल. कुठल्याही पानवाल्याकडे गुठखा मिळतो. फ़क्त थोडे जास्त पैसे द्यावे लागतात. cricket match वर करोडो रुपयाचा सट्टा लागतो. हे सगळे चालु असताना बंद चा कायदा म्हणजे publicity stunt नाहीतर काय आहे
|
Dineshvs
| |
| Friday, April 14, 2006 - 6:10 am: |
| 
|
याच मुद्द्यान्वर तर ती बंदी ऊठवली. जर एकेक केस कोर्टासमोर आणली असती, तर असे नसते झाले. कायद्यासमोर फक्त साक्षीपुरावेच लागतात. तिथे भावनेला थारा नाही. प्रगतीशील राज्यात, स्त्रीयाना दुसरा सन्माननीय रोजगार का मिळत नाही ? त्याना पैश्याची चटक लागली होती हे खरे, पण त्यांचा प्रवेश खचितच स्वखुशीने झाला नसावा. रोजगारांच्या संधी ऊपलब्ध करुन देणं, शिक्षणाची व्यवस्था करणं हे सरकारचे काम आहे, असे सरकारच तर सांगत असते. एखादा सामाजिक प्रश्ण सोडवताना, त्याच्या सर्व बाजुंचा विचार नको का करायला ? घाईगर्दीने निर्णय घेतले कि असेच होणार. साधे प्लॅश्टिक पिशव्यांचे ऊदाहरण घ्या. झाल्या बंद त्या ? मिठी नदी साफ झाली ? स्वताचे राजकिय हेतु बाजुला ठेवुन, दिर्घकालिन सुधारणा केल्या तरच हे साध्य होईल. नाहितर एका सरकारने बुडवायचे आणि दुसर्याने तारायचे, असा खेळखंडोबा होणारच. आता एनरॉनचे काय झाले ?
|
खुन करणार्याला फ़ाशिची शिक्षा होते... तरी खुन थांबलेय का? चोरी, इतर गुन्हे या साठी हजारो police stations अहेत, न्यायालये आहेत.. म्हणुन सगळे गुन्हे थांबलेत का? रहदारी सुरळीत व्हावी म्हणुन पायलीचे पन्नास नियम आहेत, म्हणु न कोणि सिग्नल तोडत नाही का? गुटका बंदी होउनही यांच्यासारखे जास्त पैसे देउन घेणारेही आहेतच...!!! पण कायद्याने चांगली कामे पार पडायला मदत होते, आंबट्शौकीनांना नैतीक बंधने नेहमीच जाचक वाटतात. जर आपण असे म्हटले की अतीरेकी सगळेच वाईट नसतात, काहीजण त्यात मज्बूरीने ओढले गेलेले असतात म्हणुन अतीरेकी कारवाया समर्थनीय ठरतात का? अतीरेकी तरी दोन चार म्हणा किंवा दोन्चारशे लोकांना मारतात पण या dance मुळे जो परीणाम होतोय ना तो पिढ्यान्पिढ्या आपल्याला भोगावा लागेल. दिनेश तुम्हि विचार करा एख्द्या भिकारणिचा किंवा रोजंदारीने कामावर जानार्या बाईचा मुलगा काहितरी भविश्यात बनु तरी शकतो पण बारबालांच्या पुढच्या पिढीला " धंद्याशिवाय " काही पर्याय उरेल का? पुढची पिढी जन्मा आधीपासुन बिघडविण्याचा त्यांच्या जन्मदात्रीला सुध्दा अधीकार नाही. जर कायदा काही कामाचा नाही तर सगली न्यायालये बंद करुन टाकावी even signals बंद करुन टाकावे रहदारी नैतीकतेने सुरु राहील का????
|
Gs1
| |
| Friday, April 14, 2006 - 10:15 am: |
| 
|
मॉड, शक्य असल्यास डान्सबार चा वेगळा बीबी सुरू करावा, व ही काही पोस्ट्स तिथे हलवावी ही विनंती. डान्सबार बंद का झाले ? डान्सबारचा परवाना, त्यासाठी मोठी लाच, नंतर पोलिसांना मोठे हप्ते, रोज सरबराई आणि एवढे सगळे करूनही हप्ते वाढवण्यासाठी वारंवार छापे या परिस्थितीला कंटाळून, बारचालकांच्या असोशिएशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. परवाना घेउन आणि हप्ते देउनही त्रास देणे बंद करा नाहीतर सरळ परवानेच देउ नका असे जाहीर आव्हान सेठी यांनी दिले होते. यातली संबंधितांना होणारी एकुण प्रचंड प्राप्ती लक्षात घेता गृहखाते असे करणे अशक्या आहे हे सेठींना माहित होते. पण आबा या आव्हानात्मक भाषेने संतापले आणि त्यांनी बारचालकांना धडा शिकवण्यासाठी सरळ बंदीच घातली. त्यांचे पुरेसे नुकसान झाले आणि मग मनासारखे ' सेटलमेंट ' झाले की बंदी उठेल असे सुरूवातीपासूनच बोलले जात होते. तेंव्हा सरकारच्या निर्णयामागे नैतिकता वगैरे कारण नक्कीच नसावे असे वाटते. अर्थात, सरकारने बंदी का घातली हा माझा मुख्य मुद्दा नाही, तर... बंदी नकोच बंदी नक्की कशासाठी ? डान्सबारमुळे समाजाची नैतिकता धोक्यात येते असे म्हणणे म्हणजे दांभिकता आहे. काही मुद्दे असे.. (1) लोक बारमध्ये येउन पैसे उधळतात आणि बरबाद होतात ??? याला बारबाला जबाबदार कशा ? डान्सबारला जाण्याची कोणावरही सक्ती नाही. लॉटरी, रेस दारू, तंबाखू, हॉटेलिंग, रमी, वेश्या वा ठेवलेली बाई, कोर्टबाजी, शेअर मार्केट अशा असंख्य सरकारमान्य नैतिक वा अनैतिक गोष्टींवर पैसे उडवून घरादाराची वाताहत करणारे लोक आहेत. कुठे आणि किती पैसे खर्च करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याची त्याची चूक आहे. उगाच केवळ बारबालेला दोष कशाला ? (2) डान्सबार अनैतिक आहे ? नक्की काय अनैतिक आहे ? बाईने नाचणे, दारू सर्व्ह करणे, आपल्या सहवासाचा लाभ देणे हे ? की तिला एवढा इझी मनी मिळतो हे खुपते आहे ? जे काही चालते ते बंद दाराआड चालते. जे स्वेच्छेने आत येतात त्यांच्यासाठी चालते. चॅनेल्सनी घातलेल्या जाहीर नंग्या नाचापेक्षा हे सर्वसाधारण समाजासाठी काहीच धोकादायक नाही. असे करण्याने स्त्री जमातीचा सन्मान वागिरे धोक्यात येत नाही, त्या स्त्रीचा येतो की नाही हे तिला ठरवू द्यावे. (3) डान्स्बारच्या आड वेश्याव्यवसाय चालतो !!! तो कितीतरी रस्त्यांवरही चालतो, ते रस्ते बंद का करत नाहीत ? तिथे पोलिस पहारा का बसवत नाहीत ? डान्सबारच्या आड कुणी ब्रॉथेल चालवत असेल तर ते कायद्याने बंद करता येईलच. सगळे डान्सबार बंद करण्याचा काहीच संबंध नाही. उघड उघड वेश्याव्यवसाय चालत नाही असे मुंबईमध्ये एक तरी पंचतारांकित हॉटेल आहे का ? मॉडेल को ऑर्डिनेशन एजेंसी, एस्कॉर्ट एजंसी या नक्की कोणाला काय पुरवतात हे माहित नाही काय ? तेंव्हा वेश्याव्यवसायाची सबब लंगडी आहे. (4) बारबालांचे शोषण वगैरे.. महिलांचे, बालकांचे वा कामगारांचे शोषण होते असे शेकडो उद्योग आहेत. त्या घटकांना तिथे संरक्षण पुरवणार की उद्योगच बंद करणार ? हे सर्व मनात आलेले प्रश्न आहेत. ठाम मते नाहित. कुणी उत्तरे दिल्यास पुडेह चर्चा करता येईल.
|
Dineshvs
| |
| Friday, April 14, 2006 - 12:13 pm: |
| 
|
लोपामुद्रा, डान्स बार मधे १०० टक्के छुपा वैश्या व्यवसाय चालतो हे बरोबर नाही. त्यातहि केवळ नाच करुन पोट भरणार्या बायका आहेत. त्याना रात्री घरी पोहोचवायची व्यवस्था केलेली असतेच. या अश्या स्त्रीया समाजात असल्यामुळेच, बाकि स्त्रीयाना सुरक्षित राहता येते, हा मुद्दा अनेक थोर लेखिकानी मांडला आहे. या बायका मुलाना नादी लावतात असा ओरडा करण्यापेक्षा, त्या मुलांचे पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत असे म्हणणे जास्त योग्य आहे. हि मुले रात्री कुठे असतात, कोणाबरोबर असतात, याची चौकशी का केली जात नाही ? आणि GS1 तुझ्याशी पुर्ण सहमत.
|
dinesh tumachyashee sahamat, pan gs che kahi mudde ajeebaat patat naahii,patat naahee..!!! teelaa easy paisaa milato he khupate aahe...????? mhanaje kaay...???? sagale prashn jyaache tyaache asalyavar sarkaarchee hi garaj naahee aani kaaydyancheehi naahi, sagal jyache tyaane tharavaave.. sagale itake naiteek asate tar ha prasangch aalaa nasataa.
|
gs म्हातारी मेल्याचे दुख नाही काळ सोकावतो... .. .. .. .. .. .. ...
|
सिगापुर मध्ये dance bar (bat top dancing) वेश्या व्यवसाय, football betting ह्या सगळ्या गोष्टी कायद्याने वैध आहेत. इकडे दारु सुध्धा कुठल्याही दुकानात मिळते. हे सर्व १८ वर्षावरील व्यक्तीला allowed आहेत याचा अर्थ असा नाही की इकडची पिढी बरबाद झाली आहे. इथली मुले पण doctor/engineer होतातच. शिक्षणाचे प्रमाण पण भारतापेक्षा जास्तच आहे. उलट ह्या गोष्टी legal असल्यनी सरकारचा control चागला राहातो तसेच उत्पन्न पण मिळते. for example इथे सरकारच football betting चालवते ते income charity करता वापरते.
|
Asami
| |
| Friday, April 14, 2006 - 3:12 pm: |
| 
|
वरील जवळजवळ प्रत्य्के मुद्द्यांमधे अमुक तमूक चालते किंवा नाही चालत , तर तसेच dance bar चालवून किंवा न चालवून घेतला का जाउ नये असा सूर आहे. comparison न करता Gs1 च्या post मधील दोन्ही बाजूंसाठी मांडलेले मुद्दे check करून बघा. येणारे उत्तर समाजमान्य आहे ? भारतीय समाजाच्या सामाजिक चौकटींमधे बसणारे आहे ? भारती राज्यघटनेने दिलेल्या हक्कांशी सुसंगत आहे ? तुमच्या मते उत्तर काय अहे ?
|
समाज बदलत चालला आहे. माझ्या आजीच्या लहानपणी स्त्रिया घराच्या बाहेर पण जात नसत. अगदी साड्या पण घेउन दुकान्दार घरी येत होता. आता त्याची नात नौकरी पण करते. त्याकाळात परदेशात जाउन आलेल्या लोकाना खेडेगावात वाळीत टकत होते. आज परदेशात जाउन आलेल्या माणसाला डोक्यावर बसवतात. राज्य घटना ही बदलता येत. अब्मेडकरानी तसी सोय पण करुन ठेवली आहे.
|
Aschig
| |
| Saturday, April 15, 2006 - 4:46 am: |
| 
|
GS1, well said! ... ...
|
Dineshvs
| |
| Saturday, April 15, 2006 - 12:21 pm: |
| 
|
आता आणखी एक मुद्दा, हे डान्स बार्स खरोखरच ईतके वाईट आहेत का ? तर उत्तर नाही असे आहे. ईच्छेविरुद्ध कुणाहि मुलीवर शरिर विक्रयाची सक्ति केली जात नाही. सिनेमातले डान्स बार्स आठवुन बघा. ( बाकि या असल्या जागा ते कसे छान ऊभ्या करतात, रोजच्या ऊठण्या बसण्याच्या जागा ना ? कॉलेजचे कधी तोंडहि बघितलेले नसते, म्हणुन तिथे आचरटपणा दाखवतात. ) तर या बायका चेहरा, आणि पोट सोडुन सर्व शरिर व्यवस्थित झाकुन घेतात. त्यांचा नाचाचा एरिया वेगळा असतो. त्या शक्यतो अंगाला हात लावु देत नाहीत. पण त्यापेक्षा वेगळे ऊच्चभ्रुंच्या क्षेत्रात चालते. मधुर भंडारकरच्या पेज थ्री सिनेमातला, कुवा मे डुब जाऊंगी वरचा हिडीस नाच आठवुन बघा, किंवा शोभा डे ने केलेली ऑर्गीज ची वर्णने वाचुन बघा. आणि हे अजुनहि सर्रास चालते. मढ मार्वे भागात, मेल स्ट्रीप टीज पण चालते. आता सरकारलाच हे दिसत नसेल तर काय करावे ? म्हणजे ईथेहि हल्ला झालाय तो तुलनेने गरिब व पोटार्थी लोकांवर, खर्या गुन्हेगारांवर नाही.
|
Moodi
| |
| Saturday, April 15, 2006 - 4:53 pm: |
| 
|
दिनेश अन जी एस जवळ जवळ ७५ टक्के मुद्दे पटलेत, पण तुम्हीच लोक अगदी मनापासुन सांगा की हे सर्व जरूरी आहे का? याने समाजाचा कोणता फायदा झालाय? वाद नको किंवा वेगळा बीबी पण नको, फक्त एक मत म्हणुन विचारतेय. साहिल तुमचे म्हणणे बरोबर आहे हो पण परदेशातील परिस्थिती अन भारतातली परिस्थिती फार वेगळी आहे. परदेशात निदान व्यसनाला आयुष्य बनवुन घरादाराची इतकी तरी राख रांगोळी करीत नाहीत पण भारतात आजकाल व्यसन हेच आयुष्य बनलय. पुढचा विचार न करता आंधळेपणाने आपल्या कष्टाची कमाई, जिच्यावर फक्त कमावणारा अन आपल्याला लहानपणापासुन सर्व इच्छा पुर्ण करणार्या आई वडील अन पुढे सांभाळणारे बायका मुले यांचाच हक्क असतो, अशी कमाई या बार अन बायकांवर उधळली जाते. परदेशात निदान आपले शिक्षण हे आपल्याच पायावर उभे राहुन केलेले असते, भारतातल्यासारखे नाही की जिथे तहहयात आई वडिलच मुलगा असो वा मुलगी, तिच्या वा त्याच्या शिक्षण, नोकरी, लग्न या सर्वांसाठी आयुष्याची कमाई पणाला लावतात, पुरवतात. अन पुढे जाऊन हेच मुले आपल्या आई वडिल अन बायका मुलाना अशा बारमध्ये पैसे उधळुन देशोधडीला लावतात. स्वतचे तर नुकसान करतातच पण इतरांचे ही करतात. बाकी सर्वांची मते काहीही असो, रामराज्य येणे शक्य नाही हे सर्वांनाच माहीत आहे, पण माझे वैयक्तीक मत हे या बार विरुद्धच आहे. युरोपात अन अमेरीकेत दिवसा ऑफिसमध्ये वा इतर ठिकाणी चांगली नोकरी करुन संधाकाळी व रात्री बार / पब्ज मध्ये नोकरी करुन शिकणारे मुले अन मुली आहेत. ते आपला पैसा निदान आपल्या चांगल्या भवितव्यासाठी साठवतात. या बायांचे काय? यांची मुले मुली याच मार्गावर जाणार का?
|
मूडी, अग समाजाचा फ़ायदा काय असे कसे विचारते.. बघ किती फ़ायदाय मी सुध्दा आधी तुझ्या सारखाच दांभीक विचार करत होते.. १) जे इथे तु रस्त्यावर बघत होती ना ते आतापर्यन्त आपण आपल्या सिनेमात सुध्दा कधी बघीतले नव्हते.. ते आता बघायला मिळेल. २)अग, डान्सबार ही शेवटी संस्क्रूती आहे तीचे अभीसरण होणार कसे आज वडील जातात बार मध्ये म्हणजे मुलगा पण जाउ शकतो.. मुलगी नाचाअयला जाईल.. कारण बार मध्यी अनैतीक असे काहीच नाहीये हे तीच्या वडीलांना अनुभवाने कळले असेल.... मी तर ठरवलीय त्या R R Patalaanaa सान्गायचे तुमची बायको बहीण अजुनही शेतात कामाला जातात शेतकयान्च्या बायका शेतात जाउन आपली त्वचा रापवुन घेतात. कशाकरर्ता हा खटाटोप.. शेतकर्यांनी आपल्या बायका मुलींना बार मध्ये नाचवावे.. आपाला सहवास देणे हे काही अनैतीक नाही.. शिवाय.. makeup वर रोज हजारो रुपये उधळता येतील त्वचा किती छान राहील, आणि रीकशावाले.. दुकान्दार यांचा धंदा वाढुन पैसा खेळता राहील... मला तर आता१००% खत्री झाली rr patalachyaa पोटात दुखत असणार तो पैसा पाहुन.. आणि उद्या डन्सबार बंद झाले तरी पाहुन घेउ.. पुनर्वसनाचे हो... ३) शेजारचा उघडा फ़िरतो म्हणुन आपणही तसे फ़िरल्य्यने बिघडत नाही, आज chaneel ne नंगानाच घातला उद्या बारबालांनी तसे केले तर काही बिघडत नाही. ४)शोषणाचा मुद्दा तर अगदीच फ़ुसका आहे ग एका तरी बार्बालेने तक्रार केली का मल कमि पैसे मिळाले तरी चालतील मला बार्मध्ये नाचायचे नाही.. गृह्खात्याला काय पडली ये मधे पडायची, सगळ काही करण्याचा परवाना द्यावा म्हणजे कसे कायदे करुन आपण त्यांची सद्सद्विवेक बुध्दी मारुन टाकतो.. तो धोका टळतो.. ५)बाबा आमटे म्हणाले होते " मला एकदा मरण्याआधी त्या R.R.Patalala बघायचे आहे.. " त्यांच्या ज्या ज्या योजना यशस्वी झाल्या न गावच्या गावे स्वच्छ झाली सगळा स्टंट होता हे बाबाना कळलेच नाही. आज काल पांढर्या रंगाला महत्व आहे कसे... तर आबांच्या पाढर्या प्रतीमेवर त्यांच्या काही चुकांचा काळा डाग लगेच दिसतो.. (कारण इथे तर देव सुध्दा चुकतो), बाकिच्यांच्या काळ्या प्रतीमेवर सहानुभुतीचा पांढरा डाग लगेच उठुन दिसतो. ६) पंचतारांकीत होॅटेलात डान्स चालतो, तर मनोरंजनाचा हक्क मध्यमवर्गीयांना नको का, हा प्रश्न श्रीमती वर्शा काळे यांनी उपस्थीत केला होता..( sorry मी आदरणिय म्हणायला पाहिजे होते ना..!!!! चुकले कि क्षमा असावि) ७) आज हे आंदोलन तर उद्या तीथे जाणार्या सुशिक्षीत आणि अधीकारी लोकांविरुध्दही आवाज उठेल, सुरवात तर झाली ना कुठुन ना कुठुन... असे वाटुन गेले पण हाय रे मला माझ्या संस्कृतीचाच विसर पडला इथे तर राजामहाराजांच्या काळापसुन नाच गाने चालते. एक शिवाजी महाराज होते त्यांनी या गोष्टीत वेळ घालवला नाही कधी (हे औरंगजेब त्याच्या सरदारांआना उदाहरणात सांगायचा) माझ्या तर असुयेची कमालच झाली मला पगार किती कमी म्हणुन मी बारबालांची असुया करावी... दांभिक मी ८)समाज बदलतो आहे आता लोकांकडे पैसा आहे म्हणुन रस्त्यावरची चालत नाही, मोडेल लागते.. ९) मला असे उगाचच वाटत होते " एक R. R. Patil " हरल्याने काही बिघडत नाही पण एक " सेठी " हिरो बनल्याने फ़ार नुकसान होते.. खुप मोठी चुक होती ती माझी मी मान्य करते.. उद्या माझ्या लहान बहीणीला जर नोकरी मिळाली नाही ना तर मी तीला नक्की सांगु शकते " कुठे धुणेभांडी करुन रक्त आटवु नको " फ़क्त.......... ............
|
Dineshvs
| |
| Sunday, April 16, 2006 - 8:46 am: |
| 
|
मूडि, डान्स बार्स आवश्यक आहेत असे नाहीत. पण त्यात गुंतलेले लोक किती टक्के आहेत. जर ते नग्ण्य आहेत, तर त्यापेक्षा मह्त्वाचे मुद्दे नाहीत का ? प्लॅस्टिक मुळे, पुरामुळे मुंबईत किती नुकसान झाले ? त्याबद्दल कोण काय करतय ? पावसाळा तोंडावर आलासुद्धा, आजच पहिली सर पडली सुद्धा. मग ज्या क्षेत्रात प्रसिद्धि आहे तिथेच का जातात हे लोक. कालच प्रतिभा जोशी आणि प्रमोद नवलकर यानीसुद्धा माझ्यासारखेच मुद्दे मांडलेत. आता फ़क्त डान्स बार्स हा दोन्हीबाजुने प्रतिष्ठेचा प्रश्ण केला जाणार, आणि बाकिचे मुद्दे दुर्लक्षित राहणार.
|
Dineshvs
| |
| Sunday, April 16, 2006 - 8:53 am: |
| 
|
लोपामुद्रा, तुम्ही ऊगाच दुखवुन घेत आहात स्वताला. आज या स्त्रीया, विषयासक्त पुरुषांच्या नजरा झेलताहेत, म्हणुन तुम्ही घरात, मोकळेपणी मंगळागौर खेळु शकता. नाहीतर ऊद्या त्या बुभुक्षित नजरा, कुठेहि वळतील. निदान एक स्त्री म्हणुन तरी त्याना समजुन घ्या. त्यांच्यापैकी कुणेहि हौस म्हणुन नाचत नाही. आणि मनाविरुद्ध त्यांच्यावर सक्तीहि केली जात नाही. शिवाय हे तर तुम्हा आम्हाला माहित असलेले, हिमनगाचे टोक आहे. जर असेच शोषण तुम्हाला नकोसे असेल तर या स्त्रीयाच नव्हेत, तर लहान मुले, तरुण जोडपी हेसुद्धा, याला बळि पडताहेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|