Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 13, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पगार किती म्हन्ता...? » Archive through April 13, 2006 « Previous Next »

Polis
Tuesday, April 11, 2006 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता बारक्याने नीट तपास केला तेव्हा एक गहन प्रश्न उभा राहिला. अस बघा आजकाल ते IIT/IIM/B School अन त्यातून मिळणारी नोकरी अन पगार यावर काय चढाओढ असतीया. त्या पगारातील शून्य बघून आम्चा बा असता तर बेशुध्धच पडला असता. पन अस वाटतय की एव्हड करून आम्च्या देशाची बेरीज शून्यच. नुसतीच शून्याची चढाओढ! आता याला काय म्हनावं? समाज अन पिढी घडवनारे शिक्षक अनेक महिने बिन्पगारी काम करतात. त्यान्चा पगार म्हन्जे एक विटम्बनाच हाये. हवाल्दार, पोलिस, कन्श्टेबल सगळे गुरागत राबतात(काही वाईट असतील पन ते सगळ्याच धन्द्यात आहेत) अन त्यान्च्या तोन्डाला महिना पाच हजाराचा चारा पुसत हे सरकार. आपला घर गाव स्वच्छ ठेवायचा तर त्या साफ़ सफ़ाई कामगार भन्ग्याला जास्त पैसा द्यायला नको? दिवालीच पोस्ट मागून अजून बी बिचारे पोट भरू बघतात. या सर्वान्चा एका महिन्याचा पगार एकत्र केला तरी बी त्या लठ्ठ iit/iim/mba इतका होत नाही...
मग जर आर्थिक विकास अन सम्रुध्धीला ह्ये mba वाले इतके पैसे घेत असतील तर या बाकीच्या लोकान्साठी चान्गल्या पगाराच्या नोकर्या नकोत? त्याशिवाय त्यान्न तरी motivation कुठून मिळेल? घरची चिन्ता असेल तर कोन बी मनुष्य कामात लक्ष नाही घालू शकत.
आम्च राहू द्या, बुध्धीच कमी म्हना की आम्हाला पगार बी कमी, पन इमान राखून जीव मूठीत घेवून आमी बी चाकरी करतोच की. आमी बी तुमच्यातलेच एक मग इतका भेदभाव का..? तुम्ही म्हनाल आमी दुसर्‍याचा पैशास जळतो. तस नव्ह, अहो जीवावर उदार होवून बाने नोकरी केली आमी बी करतो ते काय पैशासाठी? गुन्हे दरोडे बन्द झाले तर सर्वान्चच भल हाये की. अन गम्मत बघा तिकडे foreign मदी कसे कामगार अन इतर लोकासभी कामानुसार व्यवस्थित पगार देतात. अन भारतात मात्र दहा टक्के गन्गेत अन उरलेले नव्वद गटारात असला न्याय!

तेवा तुमास काय वाटत हे जाणून घ्यायच होत. म्हन्जे आम्च पटतय का? अन यात सुधारणा कशी घडून येईल..?


Maanus
Wednesday, April 12, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलीस दादा सरकारला, US सारखा कायदा करायला सांगा. दोन bedroom चे घर असल्याशिवाय मुल नाही. मंग बघा कस सगळ सुरळीत होतया.

Dakshina
Wednesday, April 12, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पोलिस,
त्या भंगी, Postman लोकांचा पगारच हे IIM /IIT वाले ओढतायत. म्हणून तर आपला देश मागे आहे. एक तर खूप गरीब किंवा भयंकर श्रीमंत... हेच समीकरण आज सगळीकडे दिसतंय आजकल.

आता हे बघा... तुम्ही जितकं वर चढता... तितका तुमचं आयुष्य सुरळीत, विनातक्रार, Supported with all facilities असतं. IT Company तलं उदा. घ्यायचं म्हणलं तर..
Trainees, Employees लांबपर्यंत Company च्या बस ने प्रवास करतात. चुकली तर.. स्वतःच्या खर्चाने जातात.

उलट Presidents, VPs ह्या लोकांना स्वःतचे Vehicle परवडत असूनही, कंपन्या त्यांना भरमसाठ पगाराबरोबर... गाड्या तर देतातच..शिवाय त्यांची सेल ची बिलं पण भरतात, Out of India Travel च्या वेळेला Airport ल Drop .. आणी सामान्य Employee मात्रं खपतो... दिवसभर पळतो... Forex साठी Clearance साठी आणी शेवटी मरत मरत Taxi बूक करतो आणि कसाबसा Airport वर पोहोचतो... पण हे बडे लोक...? Forex यांच्या घरी जातो, गाडी घरी जाते... Clearance तर यांना कधी करावाच लागत नाही...
हे जे Discrimination आहे ना.. त्याच्याबद्दल खरं तर काहीतरी कायदा हवा.. एक तर सगळ्यांना सगळ्या Facilities किंवा कोणालाच नाही. मग तो VP असो किंवा कोणीही.. मग त्याने पण Company च्या बसनेच प्रवास करायला हवा...

अशाने सामान्यं माणूस हा सामान्यंच रहातो.... आणि मोठे लोक हे फ़क्त पैशाने मोठे होत रहातात...




Champak
Wednesday, April 12, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दैनिक सकाळ मध्ये शेतकरी आत्महत्या करतो, मी आत्महत्या का करित नाही, असा एक लेख आलेला आहे. तेथिल नुतनीकरणामुळे लिंक देता येत नाही.

तुम्ही जितकं वर चढता... तितका तुमचं आयुष्य सुरळीत, विनातक्रार, Supported with all facilities असतं.
ह्या वर व. पुं. च एक वाक्य आठवते ..... आयुष्यात एका ठराविक उंचीवर पोचलो कि बाकीचे प्रश्न ती उंची च सोडवते!

अन पोलीसांचे पगार न वाढवण्या मागे अर्थशास्त्राचे काही नियम आहे असे म्हणतात. केवळ पगार जास्त असल्यानी भागले असते तर वरिष्ठ पोलीस अधिकारी इतक्या संख्येने तुरुंगात का गेले?

सत्ता अन संपत्ती ची भुक कधीही संपत नसते. कुठे थांबायचे हे ज्याचे त्याला कळले पाहीजे. आपल्या गरजा किमान ठेवणे. पण केवळ भौतीक सुखाच्या मागे लागलेले लोक असतील तर ते कठीण आहे. असो.


Maitreyee
Wednesday, April 12, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिस या चर्चेत काही तथ्य नाहिये. तुम्ही सरकारी नोकरीतले पगार आणि बहुराष्ट्रिय कंपन्यांमधील पगार यांची तुलना का करताय? आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या salaries revise होतात की. ५ व्या वेतन आयोगानुसार revise केलेले पगार काही अगदी वाईट नाहियेत. अर्थात सरकारी नोकरी मधे सुद्धा श्रेणीप्रमाणे आणि Skills प्रमाणे विषमता असणारच, हवालदार, भंगी यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना पगार जास्त असणार च. याला जास्त पगार आणि सुखसोयी आणि आम्हाला नाही हे दुःख तर IT MBA वगैरे पण लोकांना आहे बघा वर! :-)
प्राथमिक शिक्षकांचे पगार काही हास्यास्पद वगैरे नाहियेत. कामानुसार च आहेत. माझी जाऊ अगदी लहान गावाच्या ठिकाणे प्राथमिक शिक्षिका आहे, तिला १२ की तेरा अहजार म्हणजे चांगला च आहे की. प्राध्यापकांना पाचव्या वेतन आयोगानुसार २५ ह्cया आस पास मिळतो! हा काही वाईट नाही. आता multinationals शी तुलना करू नका. तिथे पेन्शन नसते. काम खरच करावे लागते, सरकारी सुट्ट्या नसतात आणि कामात कसूर = नोकरीतून हकालपट्टी हे ठरलेले. सरकारी नोकरीसारखे केवळ seniority वर पगार आपोआप वाढत नाही!उगाच उपयुक्ताता सिद्ध झाल्याखेरिज फ़ुकटचे कुणाला काहीही मिळत नाही..


Divya
Wednesday, April 12, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good points champak and maitreyee.

Manish2703
Wednesday, April 12, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dakshina... कंपनीचे Presidents, VPs करतात ती कामे आणि Trainees करतात ती कामे / जबाबदार्‍या यात खूप फरक आहे असे तुला वाटत नाही का? आणि आज काल तर HR Executives ना पण कंपनी कडून Cell Phone मिळतो.. Out of India travell चं म्हणायचे तर प्रत्येक कंपनीची policy वेगळी असते.. माझ्या कंपनी मधे Forex, tickets, Airport drop पासून.. destination ला पण pick up facility आहे

Storvi
Wednesday, April 12, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी तुझ्या जावेला चांगला पगार आहे. माझी वहिनी आपले कोथरुडचे थोर पुढरी आहेत ना त्यांच्या शाळेत काम करित होती तेंव्हा तिला ३ का ४ हजार पगार होता पैकी ते हातात तेवढा पगार न देता पगार दिलाअ म्हणुन सही करून घ्यायचे. सोडली तिने ती नोकरी पण आताही तिला पगार चांगला नाहिये. पण तुझे बाकीचे मुद्दे पटले. it's like comparing apples with oragnes, to compare Govt. jobs salaries with pvt multinationals. आणि इतरही क्षेत्रात कोणीही कुणालाही वाट्टेल तेवढा पगार देउ शकत नाही. It is controlled by market economics among other things आणि सरकारी नोकर्या, शिक्षक यांना जगात सगळी कडे कमीच पगार असतात. असं असायला नको पण असंच आहे. मीही माझा lay-off नंतर शिक्षक होण्याच्या द्रुष्टीने कुठले course हवे आहेत किती पगार मिळेल याची चौकशी केली होती. पण त्या क्षेत्रात पगार फ़ारच कमी आहेत. बाकी तर बाकी, काही वर्षांपुर्वी california मधला एक शराचा महपौर नोकरी सोडुन बाहेर गावी निघुन गेला होता कारण इथे त्याच्या पगारत त्याला रहणे महाग पडत होते....

Maitreyee
Wednesday, April 12, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा ती सरकारी शाळा नव्हती का? कारण जिल्हापरिषदेच्या सगळ्याच शाळाट शिक्षकांना तेवढाच पगार असणार ना? आश्रम शाळा, छोट्या खाजगी शाळा वगैरे मधे कमी असतात पगार. पण तसे मग इंजिनियर पण छोट्या कंपन्यांमधे अजूनही २ हजारावर काम करतात च.
basically सरकारी पगार काही अगदी वाईट नाहियेत असे माझ्या पोस्ट मधे सांगायचा उद्देश होता.



Prajaktad
Wednesday, April 12, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरकारी शाळा असली तरी बर्‍याच शाळांना अनुदान grant असली तरच पुर्ण पगार देतात. नाहितर अर्धे किंवा नाममात्र (वेतन??)मिळते.म्हणजे प्रत्यक्श पगार काग़दोपत्री 8000 रु. असेल तरी हातात मात्र, (500-1500 ) रु. च मिळतात..
एखादी नविन शाळा ओपन झाल्यावर सरकारी अनुदान मिळायला काही वर्ष जावु शकतात.


Dineshvs
Wednesday, April 12, 2006 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कावळा एका झाडाच्या शेंड्यावर काहि न करता निष्क्रिय बसला होता. एका सश्याला पण वाटले आपणहि त्याच्यासारखे बिनघोर बसावे. तोहि त्याला जमेल तितक्या ऊंचीवर जाऊन बसला.
एक कोल्हा आला आणि त्याने ऊडी मारुन त्या सश्याला पकडले.
तात्पर्य : निष्क्रिय बसुन राहण्यासाठी, तुम्हाला फार ऊंचावर जावे लागते.


Polis
Wednesday, April 12, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चेत काही तथ्य नाही कस म्हन्ता..? कदाचित तुम्हाला बरा पगार असेल म्हनून. आम्चा मुद्दा असा होता की जसे इतर क्षेत्रात नोकरी वा भरती साठी बक्कळ incentives हायेत तसे शिक्षक,पोलिस,शेतकी क्षेत्रात केले तर त्याही व्यवसायात अधिक अधिक चान्गली शिकलेली लोक शिरतील अन मग जसे तिथले talent वाढेल तसेच पगारही अपोआप वाढेल. आम्चा रोख सरकारच्या एकन्दर धोरनान्कडे आहे अन ती कशी त्रोटक अन short gained तत्वावर चालतात हेच बोलाय्चे आहे. बरोबर आहे सरकारी नोकर्या अन खाजगी यात तुलना होवू शकत नाही पण कामाचा व्याप दोन्हीकडे तितकाच आहे, अन दोन्ही बाजू या सम्पूर्णा देश विकासासाठी अवलम्बून हायेत मग तरिही incentives/salary/benefits इत्यादी मधे इतकी तफ़ावत का..? प्रत्त्येकाला वाटते तो किव्वा ती खूप काम करते, तवा काम कुठे किती हा अगदी वरवरचा अन सापेक्ष मुद्दा होतोय. तरिही एकन्दरीत या बाबतीत मध्यम वर्ग बी उदासीन आहे, कारन येकच, प्रत्त्येक मध्यम वर्गीय घरातील एकतरी मनुष्य आज IT मधे आहे किव्वा परदेशात, तेव्हा त्यान्ना बी झळ कमीच बसते...
आठवते का " जय जवान जय किसान " ? देशाचा मुलभूत पाया होता तो. पन आजकाल काय दिसते? ही आर्थिक अन सामाजिक विषमता बी अनेक गुन्हे अन अस्थिरपनास कारणिभूत ठरत असते. राहिला सवाल पैशाचा तर दहा बाय दहा मधे जगनारे भी हायेत अन पेन्ट हाऊस असून बी रडनारे हायेत, तवा तो मुद्दाच नाही. प्रत्त्येक व्यवसायाकडे मान आदर अन तितक्याच आस्थेने बघण्याचा दृष्टीकोन अजून बी आपल्याकड नाही... तुम्हाला तसे वाटते का? नसेल तर राहू द्या. वाटत असेल तर उपाय सुचवू शकता..


Savani
Wednesday, April 12, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता जे नवीन शिक्षक घेतले जातात त्याना शिक्षण सेवक असे म्हणतात आणि हो त्यान्चे सुरवातीचे वेतन हे ३५०० आहे. ज्या अनुदानीत शाळा आहेत त्यात हाच नियम आहे. १०-१२ हजार वेतन हे पुर्वी लागलेल्या शिक्षकाना आहे. पण आत्ता नवीन लागलेल्याना नाही.

Sms
Wednesday, April 12, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Why should IIM grads get high salaries?
http://www.samachar.com/showurl.htm?rurl=http://sify.com/finance/fullstory.php?id=14182838&;headline=Why~should~IIM~grads~get~high~salaries?

Maanus
Wednesday, April 12, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

population control करन्यावर कोणीच का काही बोलत नाहीय.

few days back I had this discussion with some people in office, they were shocked to hear that I have maid at home in India and more shocked to know that we get maid for minimal fee of 20 $ / p.m. for her services.

I personally think it is because of population. If there are not many people to work, everyone'll get paid more, but certainly not as good as IT people. That'll never happen. We are not in russia .


Sanghamitra
Thursday, April 13, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, चंपक, माणूस पटले तुमचे.
माणसा अगदी मोलाचा मुद्दा. लोकसंख्या...
पोलीस, सरळ समीकरण मांडायचे म्हटले तर मागणी आणि पुरवठा यांच्या प्रमाणावर अवलंबून आहे त्या कामगारांना किती सुबत्ता असेल ते. म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर पैसा जास्त आणि vice versa .
आता सोने आणि प्लॅटीनम दोन्ही मौल्यवान धातू आहेत मग प्लॅटीनमचा भाव सोन्याच्या चौपट का? तर ते सोन्याइतके मुबलक नाही म्हणून.
शिवाय जे काम करायला फारशा skill ची effieciency ची गरज भासत नाही त्याला पैसा कमी मिळणार.
उगीच इथं कोण लाड करायला बसलंय कुणाचे? उलट नोकरी देऊन उपकार केल्याचीच भावना असते.
IT मधे सुद्धा सगळ्याच कंपन्या खूप पगार देतात असेही नाही. आणि freshers ना तर कितीतरी कंपन्या अतिशय कमी पगारावर राबवतात.
शिक्षकांची मात्र खरंच वाईट परिस्थिती आहे.


Lopamudraa
Thursday, April 13, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षकांची वाईट परिस्थीती नाहीये.., आज १२वि नंतर Ded झाले कि ३५०० रुपयाची नोकरी मिळु शकते. पन engineer झालात तर १००० रु. start मिळतो.. ग्रामिण भागात जर बघीतले तर खेड्यात शिक्षक आणि मारवाड्याचे घर हेच सुखवस्तु म्हणता येइल. बाकि घरात(शेतकर्‍याच्या ) बिनदुधाचा चहा होतो. आज तर काहीही झाले तर ded ला जायचे असते, मुलाला मुलगी सुध्दा ded हवी म्हनजे नंतर नवरा बायको दोघेहि ७ ते १२ नोकरी आणि मोकळे, प्रोफ़्सरांचे तर पुढच्या १० वर्शाच्या जागा शिल्लक नाहियेत, आणि आहेत ते बर्‍याचदा २ पेरिओड घेउन घरी जाउन bussiness करातात. शेवटी college ला नियम करावा लागला कमित कमितकमी दुपारच्या प्रोफ़ंनी ४ वाजेपर्यंत थांबलेच पाहिजे म्हणुन!
दिनेश तुमचा मुद्दा पटला!!! वरच्या जागा मिळवायला कष्ट आणि त्या जागेची responsibility असतेच. आज private . नोकरी म्हणजे कष्ट आहेत, सरकारी नोकरीत ही कष्ट आहेत सरकारी नोकरीत फ़क्त शिपाई किंवा काही clark च्या जागा सोडल्यातर लोक काम करत नाही म्हणुन अथवा त्या जागेत ही केले तर काम भरपुर आहे. पण नोकरी जायची भिती नसल्याने असे होते.बाकी वरचे officer तर कायद्यने २४ तास बांधील असतात,तेच पोलीस खात्यात पोलिस कडुन आपन २४ तास नोकरीची अपेक्षा करतो आणि त्याला काय देतो? , deputy collect चा पगार किती तर वरिष्ठ शिक्षकापेक्ष कमि. गाडीचे म्हणाल तर ईतक्या खटारा गाड्या डिझेल ला सरकार कडे पैसा नाही मग खिषातला पैसा टाका, साधे report लिहायचे कागद सुध्दा clark . स्वताच्या खिशातुन टाकतो.. मग त्याचा परीणाम वेगळाच होतो.
आज नोकर्‍या नाहि, म्हटले जाते पण quaality. of people जर बघीतली तर वाइट आहे.. सैनीक भरतीला १०० जागांना हजारोने गर्दी होते, पण तीथल्याच वरच्या जागांना उमेदवार मिळत नाही आज कितितरी वरच्या जागा रिकाम्या आहेत, तसेच MA झालेल्या मुलाला शिपायाची नोकरी चालते पन दुसरी कष्टाची नोकरी चालत नाही. आणि प्रोफ़ च्या interview ला गेलेल्या मुलाला त्याचे विषय सुध्दा निट सांगता येत नाही,
आज बारबालांना पाठवा बर शेतकयाच्या बायकोसारखे शेतात कामाला... जातील का? नाही.. जिथे कष्ट न करता पैसा मिळेल तीथे गर्दी अशी आजची परीस्थीती आहे
वरच्या जागा मिळणार नाहीत. किंवा जर सगळ्यांना सारखे पगार असे केले तर रशिया चे जे झाले ते होइल.. मानसाच्या मुख्य गुणधर्मालाच विसरुन चालणार नाही.
विषमता दुर करायला मुळापासुन सुरवात करायला हवी म्हणजे शेतकयापासुन.. आज जि विषमता दिसते ना ती यामुळेच...आअपण मुळालाच विसरतोय!!!


Aschig
Thursday, April 13, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Each occupation has to be considered separately.
Police and teachers too can not be put in one pan.
In schools where the least priviledged students go (very poor/untouchables etc.) the teachers often do not show up at all and yet get paid fully. Teachers unions save the day for them.

Though people in all occupations may be working "hard" you can not say that the amount of work they do is equal. A lot depends on the skillset you have and how much time needs to be expended in acquiring it. I would have been very appreciative of the policemen if I had not seen many of them with overgrown ponches. An IT person (as some one already pointed out) will be thrown out if she does not work well. Will a policeperson be throw out if she is not fit?

Population is indeed a big problem and the root cause of many of these issues.

Bee
Thursday, April 13, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेंव्हा फ़्रेशर होतो त्यावेळी पहिला पगार वर्षभर सतराशे इतकाच होता. मग त्यात दोनशे वाढले. तरी पण मला काम मिळाले ह्याचेच समाधान अधिक होते. मी जरी शिकलेला असलो तरी मला आपल्या देशातील बेरोजगारी खूप चांगल्या प्रकारे माहिती होती. शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी महान अभियंते खस्ता खात आहेत मग आपण तरी कोण ही भावना मनात चांगलीच रुजली होती. एक IT सोडले तर इतर कुठल्या अभियनंत्याला दमदार पगार मिळतो भारतात?

भारतात पगार जरी चांगले देत असेल कुणी पण deduction करुन खूप काही हातात येत नाही.

मला वाटत एक सुरक्षित नोकरी मिळणे हे महत्त्वाचे आहे.


Maudee
Thursday, April 13, 2006 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षकान्ची खरेच वाईट परिस्थिती आहे.....याना तुटपुन्ज्या पगारात शीकवावे तर लगतेच....शिवाय मधूनमधून होणार्या जनगणना, नेहमीच होणार्या निवडनुका, पोलिओ लस सगळ्याच ठिकाणी त्याना राबवून घेतात....तेही without additional मानधन.
पण पोलिसाचा एक मुद्दा पटला.....पोलिसाना खरेच त्यान्च्या कामापेक्शा कमी पगार असतात.....सगळ्या ठिकाणचे बन्दोबस्त, सारख्या कुठे कुठे होणार्या सभा, यात्रा, riots , मोर्चे,मिरवणूक. मुम्बईत पाणी वाढले तरी त्यान्च्याकडून अपेक्शा होत्याच कि मदतीच्या. but still they do good



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators