|
Bee
| |
| Friday, December 09, 2005 - 7:34 am: |
| 
|
मनुस्विनी, हे फ़ार फ़ार तर मोठ्या शहरात होत असेल. पण लहान सहान गावा शहरात हे असे होत नाही. पटके की नाही तुला?
|
Manuswini
| |
| Friday, December 09, 2005 - 6:10 pm: |
| 
|
असेल असेल होत असेल पटते बाबा
|
Mrinmayee
| |
| Thursday, March 30, 2006 - 1:16 am: |
| 
|
बरेच दिवसात कोणी ह्या कडे फ़िरकलेल दिसत नाही, पण मला एक किस्सा सांगावासा वाटतोय. ताईच्या जिवलग मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला. मुलीकडले भरपूर सधन पाहून मुलाकडले लोक बरच मागु लागले. मुलीच्या वडिलांनी सांगीतल, "आम्ही लग्न उत्तम करु, तुम्हाला नाव ठेवायला जागा राहु देणार नाही". पण यांचा लोभिपणा सम्पेना. कार, घर, भांडी आणि अडाणिपणाचा कळस म्हणजे घड्याळ आणि ray-ban चा goggle सुद्धा मागीतला. मुलगी खूप शिकलेली, सुन्दर आणि अतिशय soft spoken . हे सगळ पाहून शेवटी ती देखिल न रहवून बोलली, "वारभर कापड आणि मणभर लाकूड देखिल आत्ताच मागुन ठेवा!" ते लग्न ज़मल नाही हे संगणे न लगे.
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:34 am: |
| 
|
बरे झाले मुलगी असे बोलली ते कुठल्या काळातले आहे हे? नाही म्हणजे अजुन हि लोक अश्या मागण्या पुर्या करतात मुलाच्या? हाकलवुन लावयचे ऽश्या लोकाना. शिकलेली, सुंदर मुलगी असुन सुद्धा सहन का करावे? ह्या वरुन मला माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा आठवला शिकलेली होती पण तरिपण घरचे जरा जुन्या वळणाचे होते. औंरंगबादचे होते घरी मुलगा बघायला आला तो काका,काकु,मामा,मामी,वडिल,बहिणी आणि तो एक मोठी जीप घेवुन. सगळ्यानी आपल्या मनाला येतील तसे प्रश्ण विचारले जेवण करता येते?? शेण्याचे काय ते थापता येते का हे सुद्धा विचारले.(मी तो शब्द विसरले) आमच्याकडे मान द्यावा लागतो, ही कशी आहे जवळपास सर्व फालतु प्रश्ण. जसे काय वस्तु घ्यायला आलेले. ते होते आणखी internal part of Beed from maharashtra , शेवटचा प्रश्ण नवर्याच्या आत्याने विचारला पाणी आणायची सवय आहे का कळशीतुन विहिरितुन? हिचे डोके आता बर्यापैकि सटकले होते.. एवढ्या वेळ गप्पपणे सर्व प्रश्णांआ उत्तर दिले होते. सरळ उभी राहिली आणी म्हणाली, हे पहा आमच्याकडे विहिर नाही आणी नाही मी कधी डोक्यावरुन पाणी आणले. पाया पडली आणी आली आत. मुद्दा हा कि मुलाकडील लोकांना माहिति होते कि हि शहरात वाढलेली मुलगी आहे, नोकरी करते, संम्पन्न घरातील आहे. वर्ताण म्हणजे ह्याला शहरात राहिलेली मुलगी पाहिजे असे त्याच्या वडिलांचा मोठेपणा bottomline झेपत नाही तर विचार कशाला करतात शहरातल्या मुलिंचा हे लोकं?
|
Maanus
| |
| Thursday, March 30, 2006 - 2:46 pm: |
| 
|
शेण्याचे काय ते थापता येते का हे सुद्धा विचारले.(मी तो शब्द विसरले) >>>> गवर्या म्हणतात त्याला. सही प्रश्न आहे, मी note करुन ठेवतो . तो आधी विचारलेला अमुक्-तमुक समाजाचे प्रथम समाजसुधारक कोण तो पन भारी होता.
|
Milindaa
| |
| Thursday, March 30, 2006 - 3:33 pm: |
| 
|
शिकलेली, सुंदर मुलगी असुन सुद्धा सहन का करावे? <<< मनुस्विनी, म्हणजे शिकलेली नसेल किंवा सुंदर नसेल तर अशा गोष्टी सहन कराव्यात असं सांगते आहेस का ?
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:22 pm: |
| 
|
मिंलिंदा नको तो अर्थ काढता हो तुम्ही गावात वाढलेल्या पण शिकण्यास न मिळालेल्या आणी काहिच exposure न मिळालेल्या मुलिना ईलाज नसतो त्यांना शरण जावे लागते they cant have rights to express their opinions in front of elders in such situations तिथे हे समजु शकतो की त्यांना वाव नाही म्हणुन हे होवु शकते पण तुम्ही एखादी शिकुन सवरुन मुलगी असल्या रुढींना आणी वागणुकिला सहन करते म्हणजे अतीच. सुंदर हा फक्त adidtional शब्द होता सांगायचा हा प्रयत्न होता की मुलिने confidence असले पाहिजे स्वःताबद्दल आणी असल्या फालतु गोष्टिचा जाच सहन करु नये. हुश्श.ऽ.ऽ
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:29 pm: |
| 
|
माणुस, शहरातील मुलिला हा प्रश्ण विचारशील तर तुला तो दिवस note करायला लागेल वेगळ्या कारणासाठी कळले ना आणी एथे नविन thread उघडशील my exp मधे नाव काय ठेवायचे ते तुच ठरव दिवे घे
|
Polis
| |
| Thursday, March 30, 2006 - 9:53 pm: |
| 
|
च्यामारी, काय ते नखरे यान्चे.. आम्च्या वेळी बापान येकच प्रश्ण टाकला.. पोरगी नुसती शिकलेली सुन्दर शोभेची बाहुली आहे का मनाची कणखर आहे..? नाही पोराला कधीपण दिवस रात्र ड्युटीवर जाव लागत अन कधी काय बर वाईट होईल माहित नाही.. तेव्हा नुसते टिप गाळणारी किव्वा शहरी माज असलेली बाई नको. काय..?
|
Mbhure
| |
| Thursday, March 30, 2006 - 10:12 pm: |
| 
|
मनुस्विनी, दुसरा मुद्दा हा की मुलीकडच्याना माहित नव्हते का की मुलीला internal part of Beed from Maharashtraa मध्ये रहावे लागणर आहे ते. मला प्रश्न विचारण्यात काय चुक आहे हे कधीच कलले नाही. समजा उद्या मुलाने एकही प्रश्न न विचारता होकार कळवला तर मुलीकडच्यांना आनंदापेक्षा संशय जास्त वाटेल. टिपः कोकणात २१ वर्ष राहिलेली माझी आई शहरात वाढलेल्या माझ्या बहिणी किंवा बायकोपेक्षा जास्त फॉरवर्ड आहे हे मी त्यांना नेहमी सांगतो आणि त्यांना ते कधी कधी पटतेही.
|
Polis
| |
| Thursday, March 30, 2006 - 10:19 pm: |
| 
|
mbhure येकदम perfect! अता जीथ विहरीतून पानि आनाव लागत तिथे काय नळाला वॉशर बसवता येतोय का?असला प्रश्न इचार्नार व्हय?या असल्या उलट्या खोपडीच्या लोकान्मुळच गोन्धळ होतोया.
|
Moodi
| |
| Thursday, March 30, 2006 - 10:23 pm: |
| 
|
मनु कदाचीत तुला हे माहीत नसेल की मराठवाडा म्हणजे औरंगाबाद, बीड, परभणी, आंबेजोगाई, खानदेश मध्ये जळगाव, रावेर अन विदर्भातील काही भाग येथे कायम पाण्याची टंचाई असते. तुझा विश्वास बसणार नाही पण येथील लोकाना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. जिथे प्यायलाच पाणी मिळत नाही तिथे विहीर, तळे, कुपनलिका हीच एकमेव साधने असतात, जिथे पाण्यासाठी मोठी लाईन लागते. मग त्या मुलीला त्या मुलाने तसा प्रश्न विचारला तर काहीच नवल नाही. लग्ना आधीच ठरवले की शहरात जायचे की गावात, मग तडजोडीला प्रश्नच येत नाही. इथे v&c करायचा नाही, किंवा तुला दुखावण्याचा पण हेतू नाही. फक्त वस्तुस्थिती सांगीतली. 
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 11:24 pm: |
| 
|
as usual अरे तुम्ही विषय कुठल्या कुठे उगाच वाढवतात हे arranged marriage होते मुलिच्या आईवडिलांना काही महिती न्हवती की एवढे विचित्र लोक आहेत. एथे जर ते सर्व प्रश्ण लिहिले तर म्हणाल काय गहु, तांदुळ घ्यायला आले होते का आणी तुम्ही लोक उगाच काय अर्थ काढताय की प्रश्ण विचारणे म्हणजे वाईट असे माझे म्हणणे आहे वगैरे आणी शहरी माज मुलिंना असतो तर गावठी बाज का माज घेवुन ही गावातील लोक शहरी मुलिंना मागणी घालतात कशाला आणी फालतु अपेक्षा का बाळगतात मग. तुम्हाला तुमची आवड का गरज नाही का माहिती लग्नाला उभे रहाताना, डोकी काय गहाण आहेत का? हा त्यातला प्रकार आहे मग बैला एवजी गाईला आणायचे आणी नांगर जुपायचे आणी बैल दूध देत नाही म्हणुन बोंबलायचे अक्काल वापरा ना अग मूडी, राहता राहिला पाण्याचा प्रश्ण त्याचा संबध परत एथे येतच नाही तुम्हाला तुमच्या जिवनास आणी रहाणीमानास साजेशी मुलगी हवी आहे मग तशी कराना तुमचा हात कोणी धरला आहे एथे. आता गावठी कोंबड्याला सांगितले कर michael jackson सारखा dance कारण आम्हाला हवा आहे two in one गावठी तुर्रेबाज कोंबडा आणी english man चालेल का? पाय तोडुन घ्याल ना तुम्ही तुमचा... ठरवा आधी की बहिणाबाई हवी का J. Lo? मभुरे एथे forward का backward चा प्रश्ण येतोच नाही मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला जे झेपेल ते करा पोलिस तुम्ही जिकडे तिकडे फुकट हातात बंदुक आहे म्हणुन गोळ्या झाडणे हा प्रकार का करताय? तुमचे जरा डोक तपासुन घ्या पाहु जरा पोलिसात काम करुन ज्यास्तच corrupt का भ्रमिष्ट झालेले आहे असे वाटते.. बरे मंडळी हे personally कोणाला उद्देशुन नाही तेव्हा मुद्दा लक्षात घ्या बरे आणी राग नसावा आला तरी आम्ही काहीही करु शकत नाही
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 11:25 pm: |
| 
|
मूडी मी कशाला रागवु ग मला नाही हं राग आलेला
|
>>>>मुलिच्या आईवडिलांना काही महिती न्हवती की एवढे विचित्र लोक आहेत मग मुलाच्या आईवडीलांना ही माहीत नसेल शहरात गवर्या थापत नाहीत आणि नळाला पाणी येतं म्हणून हंगामा मधला परेश रावल नाही का?
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 11:39 pm: |
| 
|
अमेया आता तु पण ना तु कधीपासुन असे joke मारायला लागलास दिवे घे रे
|
ameya/ अमेय म्हणा रे...
|
Maanus
| |
| Friday, March 31, 2006 - 12:02 am: |
| 
|
आता गावठी कोंबड्याला सांगितले कर michael jackson सारखा dance कारण आम्हाला हवा आहे two in one गावठी तुर्रेबाज कोंबडा आणी english man>>> अहो शोधले तर जगात काय मिळत नाही, असे combination पन जगात आहेत. एकाला मी ओळखतो. पाहीजेल असेल तर सांगा.
|
माणूस तुझ्या ओळखीचा कोण आहे कोंबड्या सारखा english man की english man सारखा कोंबडा
|
बरीच मुल मुलीला भेटायला जाताना आपल्या मित्रालादेखिल बरोबर घेऊन जातात. मुलीला मित्रच आवडला तर काय करा?
|
Tulip
| |
| Friday, March 31, 2006 - 8:00 am: |
| 
|
माणुस अमेय rofl पण मनस्विनीचा मुद्दा थोडा बरोबर आहे. पहायला जाताना मुला आणि मुलीकडच्या दोघांनी वास्तव अपेक्षा आधीच clear करुन जावे. नाकापेक्षा मोती जड असे प्रकार नंतर मग होत नाहीत. .. .. .. ..
|
Milindaa
| |
| Friday, March 31, 2006 - 9:11 am: |
| 
|
अजिबात नाही, मनुस्विनी चा मुद्दा एकदम एकतर्फी आहे. arranged marriage होते ना, मग मुलीच्या आईवडिलांनी अजिबात चौकशी न करता मुलगी दाखवली ? त्यांना माहिती नव्हतं की मंडळी कोणत्या भागातली आहेत ? माझा विश्वास बसत नाही. असो. विषय भरकटण्याच्या आधी मी थांबतो.
|
Pinaz
| |
| Friday, March 31, 2006 - 11:12 am: |
| 
|
आयला मिलिंदभाऊ, हे लईच भारी हाये की राव तुमचे.. विषय भरकटवायला काडी टाकायची आन मन्ग म्हनायचे की म्या न्हाय ब्वॉ जबाबदार!! हाय की नाय माझा मुद्द्याचा प्वाईंट?
दिवा घ्यायाचा बघा राव, मघाशी घेतला न्हाईत म्हनं. 
|
Tulip
| |
| Friday, March 31, 2006 - 1:14 pm: |
| 
|
मिलिंद हो. तिच ते specific उदाहरण मलाही नाही पटल. पण तिने नंतर मांडलेला मुद्दा तितकासा एकतर्फ़ी नाही वाटला. तिच्या त्या शब्दजंजाळात कोंबड्यांच्या तुर्या आणि गव्हा तांदळांत तो सुटून जातोय मात्र ~D ह्या संदर्भात मला एक माझ्या भावाच्या मित्राच्या बहिणीचे उदाहरण आठवले. तीने DMLT केले होते आणि तिला पॅथॉलॉजिस्ट म्हणून नोकरी न करता स्वत्:ची लॅब टाकायची होती. तिला एक स्थळ आल सांगून, त्यात मुलगा अकोल्या जवळच्या एका छोट्या गावातला होता. सांताक्रुझच्या ह्या मुलीने विचार केला की इथे स्वत:ची लॅब टाकणे इतक्यात तरी शक्यच नाही कदाचित त्या गावात शक्य होईल आणि तिथे स्कोपही मिळेल. घरच्यांनी सांगून सुद्धा तिने त्या स्थळाला होकार दिला आणि मुलीने दोन वर्षांतच डीवोर्स घेतला. तिथली hardship , उन्हाळा, पाण्याचे प्रॉब्लेम्स, अगदी जेवण सुद्धा झेपले नाही वगैरे कारणे कदाचित इतरांना हास्यास्पद वाटू शकतील पण शहरातल्या त्या मुलीला नाही शक्य झाले तिथे adjust होणे. आता जर तिने आधीच विचार केला असता तर, किंवा त्यामुलाने पण शहरातली शिकलेली मुलगी येतेय खरी आपल्या गावात पण तिला व आपल्याला झेपेल का हा विचार केला असता तर मला वाटत हे टाळता आलं असत. खुपवेळा अपेक्षा आणि वास्तव ह्यांचा मेळ मुले मुली arranged marriages मधे घालतातच असे नाही. घरच्यांनी ह्या बाबत जरा ठामच भूमिका घ्यायला पाहीजे i think बघण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वीच. किंवा मग प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात अगदी साधेसुधे रोजच्या आयुष्यातले पण प्रश्न विचारुन matter clear करुन घेण्यात काहीच हरकत नसावी. मग तो प्रश्न भाकर्या थापता येतात का पासून पाणी शेंदता येत का पर्यंत कोणताही असला तरी काय हरकत आहे? मुलाने किंवा मुलीने त्यात काही कमीपणा का वाटून घ्यावा? कलमी फ़ुलांना वाढायला नर्सरी लागते, रानोमाळात ही फ़ुले तग नाही धरत हे साध logic आहे नाही का? arranged marriages मधे बघण्याच्या कार्यक्रमातच ह्या गोष्टी clear करता येतात ना पुढे जायच्या आधी.
|
Upas
| |
| Friday, March 31, 2006 - 2:57 pm: |
| 
|
कमाल आहे.. मुलाने विचार करायला हवा तिला गावात जमेल की नाही याचा?? आणि मुलीने फक्त lab टाकायला मिळेल का हे बघायचं होय... लग्न आहे की सोय.. काही आश्चर्य नाही divorse झाला तर!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|