Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 16, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » He kadhi badalnaar » Archive through March 16, 2006 « Previous Next »

Psg
Saturday, March 04, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मिलिंदाला मिल्या म्हणू नकोस ह! :-)
स्वगत: नावाची abbreviations करण- हे कधी बदलणार?


Sharmila_72
Saturday, March 04, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीकधी उलट ही होत. मुलीचे आई वडील मुलिच्या सासरी जाउन सहा सहा महिने राह्तात आणि वर आपली अरेरावी गाजवतात. बायकोचे आई वडील म्हणुन नवरा काही बोलू शकत नाही. आता त्या बाईचे आई वडील गेले त्यांच्या घरी. आता सध्या घरी नवरा,बायको, दोन मुलं
मोठा मुलगा ६ वर्षाचा आणि छोटा पावणेदोन. घरात संपूर्ण दिवस वरकामाला तसेच मुलं संभाळायला बाई आहे. नवरा एका मोठ्या मल्टीनॅशनल मध्ये मोठ्या हुद्द्यावर. साहजिकच त्याला घरी येइपर्यन्त साडेआठ, नऊ वाजतात. त्याने घरात प्रवेश केल्या केल्या ही बाई त्याच्यावर शेरे मारायला सुरुवात करते. हे काय रोजचा उशीर, तुला माझी काळजीच नाही, मला किती कंटाळा येतो मुलांच करुन घरात. तुला ऑफिस मध्ये काम आहे म्हणुन मी का suffer व्हायच वगैरे, वगैरे. आता नवरा काही सिनेमा बघुन येत नाही आहे ना, काम करुन दमून येतो तेव्हा घरी आल्यावर तो comfortable कसा होईल हे बघायला नको का तिने? मोठ्या पगाराच्या नोकरीबरोबर येणार्‍या सर्व सुखसोयी हव्यात तर मग नवर्‍याच उशीरा घरी येण हे ही सहन करायला नको का, घरातल्या जबाबदार्‍या शक्य तितक्या स्वत: पार पाडुन उदा: भाजी आणणे, मुलांना vaccination साठी नेऊन आणणे स्वत्:ला गाडी चालवता येत असताना) नवर्‍याला पाठिंबा नको का द्यायला? सकाळचा चहा नवयाने करायचा, भाजी पण त्यानेच आणायची, हे बरोबर आहे का? जर ही बाई नोकरी करत असती तर गोष्ट वेगळी होती. पण घरात पुर्ण वेळ कामवाली असताना, हे अस वागण मला तरी पटत नाही. इथे मला ही बाई स्वार्थी वाटते. नवरा बायकोनी एकमेकांच्या कामांबद्दल concerns दाखवायला हवीत. बाहेरुन दमून एखादी व्यक्ती येते तेव्हा " दमलास ना? बस जरा पंख्यात, पाणि पी' या एका प्रेमळ वाक्याने माणसाचा थकवा पळुन जातो. जर तो अर्थाजर्नाची जबाबदारी एकट्याने व्यवस्थित पार पाडतोय तर हिने हिची गृहिणीची काम नीट करायलाच हवीत. निदान घरच्या कामात त्याच्याकडुन अपेक्षा ठेवू नये

आता कदाचित मला तुम्ही सर्व जण म्हणाल की काय ही स्वत: स्त्री असून पुरुषांची बाजू घेते. स्त्रीयांवर होणार्‍या अन्यायाच्या विरुध्द मी ही आहे. पण या अशा बाबतीत मात्र पुरुषांवर अन्याय होतो अस मला तरी मनापासून वाटत.


Sharmila_72
Saturday, March 04, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Its her life या बीबी वरचे पोस्ट्स वाचले. म्हणुन इथे आणखी स्पष्ट करत आहे की, माझ म्हणण अस अजिबात नाही की पुरषांनी घरातली कामे करु नयेत. संसाराची जबाबदारी दोघांनी उचलावी. यात जर स्त्री अर्थार्जन करत असेल आणि पुरुष घरी असेल तर त्याने गृहिणीची सर्व कामे करावीत. दोघे नोकरी करत असतील तर दोघांनी घरची कामे विभागुन करावीत. In short, responsibility should be equally divided between husband and wife . आजकाल नोकरी करणे म्हणजे सोप नाही whether its man or woman . ऑफिस मध्ये चाललेल राजकारण, सतत असणारा कामाचा ताण, उशीरापर्यन्त चालणार्‍या मीटिंग्ज,अवेळी होणार जेवण या सर्वाचा मनावर आणि शरिरावर निश्चीतच परिणाम होतो. अशा वेळेस घरी आल्यावर जर एखाद्याला वाटल की थोडा वेळ जरा निवांत बसाव तर यात चूक नाही अस मला वाटत. लगेच यावर कोणी बायकोला सती सावित्री आणि नवर्‍याला हुकुमत गाजवणारा असे शिक्के मारुन मोकळ होउ नये.

तसेच घरी काम करण आणि ऑफिसमध्ये काम करण यात फरक आहे. घरी काम करुन आपण जरूर दमतो, पण त्यात मानसिक त्रास कमी असतो. ऑफिस मध्ये तस होत नाही. लोक भले म्हणतील की ऑफिसमध्ये एसी मध्ये काय त्रास होतो? पण ते सुध्दा किती तणावाखाली काम करतात हे ज्याच त्यालाच माहीत असत.

जर एखादा पुरुष घरी काम करतो याच स्तोम माजवल जाऊ नये तर मग एखादी स्त्री नोकरी करते याच तरी स्तोम का माजवल जाव?

"sharing" doesnt mean की मी आता पोळ्या केल्या मग तु भात कर. नसेल एखाद्याला भात करण्यात इंटरेस्ट ! घरातला fuse उडाला तर बायका पटकन नवर्‍यालाच हाक मारतात ना?,प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, गाडी दुरुस्त करुन आणणे या सर्व अपेक्षा पुरषांकडुनच ठेवल्या जातात बर्‍याचदा. अस कोणी म्हणत का नवयाला तु पोळ्या लाट, मी fuse लावते किंवा स्पॅनर घेऊन नळ टाईट करते. अशा बायका असल्या तरी त्यांच प्रमाण कमी आहे तुलनेत.

आता प्लीज कोणी असा गैरसमज करुन घेऊ नकात की मी स्त्री मुक्ती च्या विरुध्द आहे.
(मिलिंदा, मी चुकीच्या ठिकाणी तर टाकला नाही ना हा पोस्ट?)


Ajjuka
Saturday, March 04, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> अशा वेळेस घरी आल्यावर जर एखाद्याला वाटल की थोडा वेळ जरा निवांत बसाव तर यात चूक नाही....
जर एखादा पुरुष घरी काम करतो याच स्तोम माजवल जाऊ नये तर मग एखादी स्त्री नोकरी करते याच तरी स्तोम का माजवल जाव?...
बाहेरुन दमून एखादी व्यक्ती येते तेव्हा " दमलास ना? बस जरा पंख्यात, पाणि पी' या एका प्रेमळ वाक्याने माणसाचा थकवा पळुन जातो......<<
खरेय... बाईलाही वाटतं घरी आल्यावर जरा निवांत बसावं.. स्वैपाकाची धांदल लगेच नको.. हे किती बायकांच्या नशिबात असतं? किती बायकांना बाहेरून दमून आल्यावर हातात पाणी आणि दमलीस न हे शब्द ऐकायला मिळतात? प्रमाण फारच थोडे! असं का?

बाईच्या नोकरी करण्याचं कौतुक नको हे ती नुसतीच नोकरी करत असेल तर ठीक पण नोकरी, घरातलं सगळ, मुलांचं सगळ, घरातले सणवार आणि रूढी - पद्धती इत्यादी सर्व हाताळूनही stress दिसू न देणार्‍या कैक superwomen आहेत त्यांचं निश्चितच कौतुक करायला हवं. अर्थात मला त्यांच्याबद्दल जितकं कौतुक वाटतं तितकीच कीवही आणि त्यांच्या फक्त अर्थार्जन करून दमणार्‍या नवर्‍यांविषयी मनस्वी संतापही.


Sharmila_72
Saturday, March 04, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस अजुका, मलाही नक्कीच कौतुक आहे अशा बायकांबद्दल. मी मुंबईत राहते. विरार सारख्या ठिकाणी लग्नानंतर काही वर्षे होते. सकाळी ७ वाजता घर सोडुन ट्रेन गाठून ऑफिस मध्ये वेळेवर पोचायच. बर्‍याचदा ६ नतर ऑफिस सुटल्यावर पण थांबाव लागत असे. वरची post असल्यामुळे जबाबदारी पण असायची कामाची, घरी येइपर्यन्त ९ कधीकधी जास्त उशीर पण होत असे. कमासाठी बाई मिळायची नाही कारण वेळ जमायची नाही. त्यावेळेस माझा नवरा मला मदत करत असे घरच्या कामात. But neither I boasted anytime that see I am working nor my husband that I am helping my wife in the kitchen .
माझ्याही पेक्षा पालघर, डहाणु या ठिकाणी रहाणार्‍या बायकांची परिस्थिती केविलवाणी होती, आहे. या बायकांबद्दल मला काहीच म्हणायच नाही मी नंतर जॉब सोडल्यानंतर नवर्‍याकडुन घरकामात मदत घेण स्वत्:हुन थांबवल. कारण मला ते justified वाटल नाही. not because its घरचं काम but just to divide responsibility . नोकरी सोडल्यानंतर माझी एक जबाबदारी कमी झाली आणि जी मी सर्व काम एकटीने करुन भरुन काढली परिणामी मला आणि माझ्या नवर्‍याला ही आराम मिळतो आता. आता आम्ही विरार सोडल असल तरी अजुन उपनगरात राह्तो ट्रेन शिवाय पर्याय नाही. मुंबईत प्रवास करुनच माणुस अर्धा थकुन जातो,मी कितीही दमले तरी घरात असते. whenever i want I can lie down for sometime आणि आता जर मी परत नोकरी करायला सुरुवात केली तर पूर्वीप्रमाणेच मी नवर्‍याची मदत घेणार घरकामात.

Anyway, मी वर जे काही म्हटले आही, ते काही विशिष्ट स्त्रीयांबद्दल म्हटले आहे. कृपया संपूर्ण वाचून मला काय म्हणायच आहे हे समजून घ्यावे ही विनंती.


Arch
Saturday, March 04, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, तुझ्या मताशी संपूर्ण सहमत. एकमेकांना समजून घेणं हे संसारात सगळ्यात महत्वाच आहे.

Jaideep
Saturday, March 04, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण पुरुषाने घरात काम केल किंवा बाईने बाहेर काम केल तर कौतुक करायला काय हरकत आहे? मी सहा महीने बाहेर असतो तेंव्हा माझी बायको घरच्या कामाबरोबर बाहेरचे सगळे व्यवहार बघते आणि मी रजेवर असलो की घरातल्या प्रत्येक कामात तिला मदत करतो आणि त्या बद्दल एकमेकांच कौतुकही करतो. बरं वाटतं आपल कौतुक ऐकुन.

Zakki
Saturday, March 04, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्याच बरोबर, स्त्री घरी रहाते म्हणून तिला काहीच कामे नसतात असे समजणे चूक आहे, विशेषत्: घरात लहान मुले असतील तर. आता एखादा दिवस कुणाला वाईट जातो, तेंव्हा सहानुभूती अपेक्षित असते, ते जर ओळखता आले नाही, तर तुमचे लग्न झाले तरी तुमची मने जुळली नाहीत असे समजायला हवे. प्रेम म्हणजे हेच की स्वत्:ची दुख्खे बाजूला ठेवून दुसर्‍याचा विचार करणे!

Moodi
Saturday, March 04, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अगदी मनातल अचुक ओळखलत हो.
शर्मिला मस्त समतोल साधतेस नेहेमी.
पुनम मला पण नाही ग आवडत असा कुणाच्याही नावाचा शॉर्टकट मारायला, पण आता तुच तुझ्या नवर्‍याला रागव बघु, असा आयडी घेतल्याबद्दल. मी आता मग मिलिंद १ म्हणेन. आधीच १७६० मिलिंद आहेत इथे.

आता अनुक्रमे माझा, कांदापोहे अन वाकड्याचा आयडी बदलला पाहिजे. श्या!! आपल्याहुन मोठ्या सरळ माणसाला वाकड्या म्हणणे विचित्रच वाटते.


Zakki
Sunday, March 05, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, माझे हे आपले करून सवरून भागले नि परमार्थाला लागले, बैल गेला झोपा केला, म्हैस मेली नि अक्कल आली अश्या प्रकारचे आहे. आता माझ्या मनात मला हे सर्व कळले, पण फार उशीर झाला. इतरांचे म्हणजे ( फक्त माझी बायको नि मुले ) यांचे मत बदलवणे अपार कठिण! त्यांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत. माझ्या बायकोला दोन मिनिटापूर्वी रिमोट कुठे ठेवला आथवत नाही, पण पस्तीस वर्षापूर्वी मी केंव्हा काय बोललो होतो ते पक्के आठवते!

मग आता जग नश्वर आहे, प्रेम म्हणजे काय इ. स्वतला योग्य वेळी न समजलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या. म्हणून मायबोली वर इतरांची खिल्ली उडवणे, उपनिषदे, काळ नि अवकाश यावरील Carl Sagan, Stephen Hawkings यांची पुस्तके वाचणे असे चालू आहे.

हटकेश्वर, हटकेश्वर!


Ninavi
Monday, March 06, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> स्वतला योग्य वेळी न समजलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या.

वेळीच मला विचारलं असतंत तर..!!

Storvi
Monday, March 06, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>वेळीच मला विचारलं असतंत तर..!!>> बोबडे उच्चार ऐकायला लागले असते त्यांना :-O

Manuswini
Monday, March 06, 2006 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी असे वाटते की two people's understanding(husband & wife) is sufficient here)

I have seen in my childhood,my dad helping my mother in the morning as both were working. he would get us ready meantime mom would cook breakfast ,luch, he used to be late in the night ,if mom is early ,she would finish. dad would help in the night cutting vegetables while chatting. and in mumbai anytime servant was/is big issue. this is sometime 20 years back. so the point is love and understnading works i guess. and here also in USA dad continues to do though both are retired now


Manuswini
Wednesday, March 15, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक वाचनात आले

बघा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1422929.cms

Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/46/104369.html?1141406440
या ठिकाणी मी माझा एक गमतीशीर अनुभव लिहिला होता. त्याच माणसाने माझी मधुरासाठीही मुलाखत घेतली होती. त्याची ही लिन्क..
http://www.esakal.com/static/maiVishesh1.html
महान विनोदी..
आजच्या सदरात आपण वाचणार आहोत एका व्यक्तिविशयी ज्या मुळात संदीप सावन्तांच्या सुविद्य पत्नि आहेत पण एवढिच त्यांचि ओळख नाही हं! संदीप सावन्तांच्या पत्नि असण्याबरोबरच त्या अजुन १,२,३,४ ह्याहि गोष्टि करत असतत. आणि सध्या त्यांनि ५ पण केलेय. आणि यात त्यांना सावंतांचे आणि घरच्यांचे खुपच प्रोत्साहन असते हो...
कसली बकवास मुलाखत..
माझी आहे हा मुद्द बाजूला ठेवला तरी दरवेळेस करीअरीस्ट स्त्रीची मुलाखत कुणाची तरी पत्नी असणं आणि घरच्या जबाबदार्‍या, प्रोत्साहन असल्या गोष्टींनाच धरून का असते? ती काय करते, कसं करते, तिचे views , तिची कामाची पद्धत, तिचे घडणे याच्याशी का संबंध नसतो? संदीप सावंत जेव्हा the संदीप सावंत नव्हता तेव्हाही मी काम करत होतेच की आणि माझे शिक्शण, माझे struggle याला काहीच अर्थ नाही? माझे म्हणून नाही कुणाही बाईचे म्हणून समजा पण कधीही कुठलीही स्त्री घरच्या जबाबदार्‍या, नवर्‍याला साथ आणि नवर्‍याचे प्रोत्साहन यातच का तोलली जाते? अर्थात मधुराच्या वाचकांना असलंच काहीसं आवडत असणार म्हणा एकंदरीत मधुराचा दर्जा बघता.


Arch
Thursday, March 16, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मला आवडली ग मुलाखत. तुझे सगळे पैलू छान शब्दबध्द केले आहेत. मला नाही वाटल संदीपच्या कर्तृत्वापुढे तुला कुठे secondary दाखवल गेल आहे. cbdg

Bee
Thursday, March 16, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी मिळाली वाचायला मुलाखत. अज्जुक्का खरच मुलाखतीमध्ये कुठेही तुला कमी लेखले नाही. संदीप सावंतची तुझ्याशी तुलणा केलेली नाही. तुझ्याबद्दल खरच चांगलच लिहिलेलं आहे. आम्ही तुला इथे भेटतो, बोलतो, तू लिहिलेले वाचतो, विचार करतो त्यावरून एक वाटते ही मुलाखत अगदी बरोबर आहे. वर तू जे लिहिले आहेस ते एकदम चुकीचे वाटते आहे.

Manuswini
Thursday, March 16, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुअका मला font दिसत नाही काही माहिती आहे कुथला font install करायचा ते?

Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुलना म्हणून म्हणत नाहीये. कमी लेखण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि तुलना केली तर मी खूप मागे आहे हे मला पूर्ण माहिती आहे. त्यांनी माहितीही बरी दिलिये. मला एवढच म्हणायचंय की अमक्या तमक्याची पत्नी हा शिक्का लावल्याशिवाय मुलाखत होऊ शकत नाही का? कदाचित माझे कर्तुत्व तेवढे नसेल.. शिक्क्याशिवाय मुलाखत येण्याइतके. हे अगदीच मान्य आहे पण मग घेऊ नका मुलाखत. शिक्क्याशिवाय जमेल तेव्हाच घ्या माझी तोपर्यंत थांबायची तयारी आहे. हे झालं माझ्याबद्दल.
तसेच कुठल्याही पुरूषाची मुलाखत असते तेव्हा घरच्या जबाबदार्‍या आणि कोण किती प्रोत्साहन देतं याचे उल्लेख नसतात तर मग एखाद्या स्त्रीच्या मुलाखतीत का असावेत. पुरूष जेव्हा काही कर्तुत्व गाजवतो तेव्हा बर्‍याच अंशी त्याचे घराकडे दुर्लक्ष होतेच की पण ते गृहीत आहे. कुणालाही खूप मोठी भरारी घ्यायची असेल तर घर हा मुद्दा बाजूला ठेवावाच लागतो पण स्त्रीच्या बाबतीत ती कधी घर सांभाळायला आहेत ना इतर लोक मग काय जातंय करीअर करायला अश्या कुत्सित टोल्यापासून सासूसासर्‍यांची आणि नवर्‍याची साथ आहे अश्या कौतुकमिश्रित उदगारांपर्यंत प्रतिक्रिया असते तर पुरूषाच्या बबतीत एवढा मोठा माणूस का आता घरातली कामं करणारे? आता त्यांना एवढ काम करायचंय म्हणजे घरात पाय नाहीच टिकणार त्यांचा अशी प्रतिक्रिया असते. मला या विसंगतीकडे बोट दाखवायचे आहे. नुकत्याच जरा काही मुलाखतींच्या सत्रातून गेल्याने हे जास्त प्रकर्षाने जाणवते.


Manuswini
Thursday, March 16, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग अज्जुका

हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा influence आहे
कारण स्त्री ही रुढी रिवाजतुन आजच्या काळात establish करते आहे मग ते पुर्विचे 'काटे' मार्गात अडकु शकतात पण ते 'काटे'च जर काटे राहिले तर अजुनही सर्वसामान्य स्त्रीला झुंज द्यावी लागते म्हणुन ते असे भुवया उंचावुन लोक म्हणतात नशिबवान आहेस नवरा वगैरे वगैरे साथ देतो मग स्त्रीची ability कितीही काही झाली तरी ही (नवरा वगैरे वगैरे)नशिबावर असते हेच ग्रुहित धरायचे.


आता कित्येक स्त्रीया सांगतात माझ्या नवर्याच्या साथिशिवय मी एथे नसते.
वाईट काही नाही असे सांगण्यात पण it is the fact that even if you have ability a woman cant deny or ignore 'home' or her certain responsibility नाहीतर त्या स्त्री कडे काय ही career oriented आहे, बिचारा नवरा घर सांभळतो.

thinking ग दुसरे काय त्याला वेळ हा लागणारच
CDDG


Bee
Thursday, March 16, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मनु तुमची मते पटलीत, ही एक वेगळी विचारसरणी झाली. पण मुलाखत घेणार्‍याला हा विचार देखील शिवला नसेल म्हणून त्याने भाबडेपणाने तसे लिहिले आहे. तुझे हे पोष्ट जर त्याने वाचले तर तो कपाळाला हात लावून हेच म्हणेल मी ह्या पोरीचे कौतूक करतो आहे तरीही ही मला दोषी ठरविते. हरेकाची विचारपातळी इतकी खोल, परिपक्व आणि गहन नसते अज्जुक्का. कधी कळणार हे तुला :-)

ह्याबाबतीत तू इतर स्त्रि मुलाखतींशी तुलना कर पुरुष मुलाखतींशी नाही. म्हणजे विसंगती जाणवणार नाही. स्त्रि पुरुष भेदभाव कधी बदलणार त्यांनाच ठावूक.

बाकी विचार करण्याची वेगळी बाजू दाखवलीस त्याबद्दल तुझे कौतूक :-)


Lopamudraa
Thursday, March 16, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुझे विचार १००% पटलेत...

तुझी मुलाखत मात्र वाचता आली नाही ग!


Bee
Thursday, March 16, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा, वरतमानपत्राच्या पहिल्याच पानावर Font बद्दल माहिती दिली असेल तर तुला तो Font install करावा लागेल. फ़ार कठीण नाही ते काम. हे बघ -

First download the font, then go to start->settings->control panel->Font->File menu->install new fonts.

Its as simple as it is. But I wonder how come e-sakal needs fonts to be installed since it has got dynamic font facility.

Lopamudraa
Thursday, March 16, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aale vaachata, thanks ha!!!

Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly मनु,
ही विचारसरणी.. इथेच मेख आहे. आपल्याला ही विचारसरणी चुकीची वाटते? मला वाटते. घोळ काय आहे की काही गोष्टी इतक्या आतमधे मुरलेल्या आहेत आणि अंगवळणी पडलेल्या आहेत की त्यात चूक काय हे पटकन लक्षातच येत नाही. पण समाजाचा एकुणात दृष्टीकोन बदलायचा असेल तर इतक्या micro level वर किंवा इथपासूनच बदल होणे गरजेचे आहे.. नाही का?
बी,
त्या पत्रकाराने कौतुक केले म्हणून मी त्याची ऋणी राहू का? नसते केले तरी चालले असते ना मला. आणि पत्रकाराच्या लिखाणावर बरेवाईट मत असायला हरकत काय? तेही स्वतःवर लिहून आलेले..
तसेच इथे इतर स्त्रीयांच्या मुलाखतीशी तुलना करायचा प्रश्न तरी येतो का रे? ही मुलाखत माझी किंवा कुठल्याही इतर स्त्रीची असू शकते असे बघ ना त्याकडे. विसंगते नजरेआड केल्याने नाहीशी होत नाही ना रे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators