|
नमस्कार मन्डळी, बरेच दिवस मी ह्या साइटवर येते आहे. एकमेकाना इथे जी मदत मिळ्ते ती पाहुन मल खरच खूप कौतुक वाटते आणि म्हणूनच माझा उडालेला विचारान्चा गोन्धळ इकडे मान्डायचे मी धाडस करत आहे. मला खरच मदत हवी आहे. प्लीज टिन्गल न करता मलाही थोडी मदत कराल का? इन्जीनीअर होवून मला आत ३ वर्षे होतील. सहजिकच घरुन आता लग्नाचे बघत आहेत. सध्या मी अमेरिकेत आहे. २ महिन्यात घरी जाईन. घरुन जोरदार वरसन्शोधन चालु आहे. पण साथीदर कसा असवा या बद्दल माझा खूप गोन्धळ उडाला आहे. चारचौघी मुली म्हणतात त्या प्रमाणे मला पण कर्तबगार, समजुतदार, प्रेमळ वगैरे साथिदार हवा आहे. पण शक्यतो मला भारतात स्थायिक होवु इच्छिणारा जोडीदार आवडेल. पण, बरेच कर्तब्गार मुलगे इकडेच रहण्याच्या विचरात दिसतात...काही अपेक्षाना मुरड घालावी लागते हे मला मान्यच आहे. पण वय, समाज, कर्तबगारी, भारतात स्थायिक होणे, मराठी असणे अथवा नसणे या पैकि कोणत्या गोष्टीन्वर अडजस्ट करु ते मला समजजत नाहीये. इकडे पन हल्लीच यातून गेलेली, आता जाणारी मन्डळी असतीलच ना? तुमचा कुणाचा असा गोन्धळ उडाला का? मला थोडी दिसा दखव्नार का? हा विषय सहज खूप चेष्टेचा होवु शकतो याची मला कल्पना आहे, पण मी अतिशय गम्भिरपणे तुमच्या सल्ल्यान्ची अथवा मतान्ची वाट पहात आहे. अग्निशिखा
|
Ajjuka
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:31 am: |
| 
|
थोडे विचित्र वाटेल पण तुला नक्की कसे आयुष्य हवे आहे याबद्दल तू डोक्यात येतील ते विचार तसेच्या तसे कागदावर उतरवून काढायचा प्रयत्न कर. म्हणजे अगदी मला रात्री कितीही उशिरापर्यंत काम करायला चालेल पण सकाळी लवकर उठणे नको, मला नवर्याची मधेच गमतीत खेचता पण आली पाहीजे मला गरम मसाला घातलेले पदार्थ सहन होत नाहीत असे काहीही.. असे सगळे लिहून काढशील तेव्हा तुझे तुलाच समजत जाईल की आपल्या priorities काय आहेत ते. भारतात रहाणे म्हणजे नवर्याच्या बाबतीत तडजोड करणे हे समीकरण मुळातच खूप चुकीचे आहे. तेव्हा ते मनातून काढून टाक. नवर्याच्या profession, education याबरोबरच त्याच्या विचार आणि संवेदनशीलतेच्या पातळीबाबतही स्वतःच्या अपेक्षा शोधायचा प्रयत्न कर. या दुसर्या दोन गोष्टीतल्या अपेक्षांबद्दल जास्त आग्रही रहा. बघ पटतेय का ते..
|
अगगी खरे आहे तुमचे म्हणणे, पण, कधी कधी मलाच नाही समजत मला काय हवय ते... भौतिक बाबतीत, कधी वाटते अड्जस्ट करता येइल कधी वाटते नाही येणार.. भारतात रहाण्याच्या विषयी मला अमेरिका आवडते, पण काही वर्ष रहाण्यापुरतीच. ३ ते ५ वर्षे राहुन परत जाय्ला मल आवडेल... पण हे बर्याच जणाना चमत्करिक वाटते. विचार जुळणे महत्वाचे हे खरे, पण आपल्या लग्न ठरवायच्या पद्धती मध्ये ते शोधण्याएव्हढा वेळ बहुदा मिळत नाही.. या मुळे तर गोन्धळ वाढीसच लागला आहे. पण चेष्टा न करता सान्गितल्याबद्दल अगदी मनापासून आभार. तुमची विचार लिहुन काढण्याची कल्पना मला खरच पटली. अगदी आजपासुनच सुरुवात करते. अग्निशिखा
|
Ajjuka
| |
| Thursday, March 16, 2006 - 6:13 am: |
| 
|
all I can say is give yourself some time first before seeing any 'sthal'.लिहिण्याचा उपक्रम चालू ठेव. महिन्या दोन महिन्याने वाचशील तेव्हा तुझे तुलाच खूप काही मिळून जाईल.
|
Manuswini
| |
| Thursday, March 16, 2006 - 6:36 am: |
| 
|
अग्निशिखा, माझे हे personal मत आहे ते शेवटी किती उपयोगी तुला आहे हे तु ठरवयचे. १. स्वःता तु काय स्वःभावची आहेस याचा अंदाज तुला थोडाफार असेलच ना मग पहिले हे तु नक्की कर अज्जुकाचा उपाय छान आहे जर तुला selfdiscover करायचे असेल तर लिहुन काढ. दुसरे तुला life मधे काय सर्वात मह्तवाचे आहे आणी शेवटी how comfortable you feel in 'that' persons company in those short meetings, how well you too can communicate, I know time is too short looking at the way marriage takes place still.(not blaming)but you do get some sense in 1-2 meetings. lastly, give yourself some time to get into it mentally and then be sure about your decision too हे अनुभवाचे बोल आहेत सध्या आम्ही ही पोहतोय ना तुझा प्रश्ण एथे लिहुन तुझी टिंगल करण्याच्या बाबतीत एवढेच म्हणेने अग एथे सर्व चालत ग.. टिंगल करणारे आहेत आणी मनापासुन माझ्यासारखे sugggestion करणारे सुद्धा सवय होईल तुला बर लोक हो कोणाला उद्देशुन नाही हा हे नाहीतर तलवार काढाल बाहेर
|
Psg
| |
| Thursday, March 16, 2006 - 8:26 am: |
| 
|
लग्न ही एक adjustment आहे तेव्हा तू कोणत्या बाबतीत थोडी बदलू शकतेस, कोणत्या बाबतीत अजिबात नाही, हे आधी ठरव. मुलाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा मुलाच्या qualities कोणत्या असाव्यात, तूझ्या ज्या अपेक्षा आहेत/ असतील त्या justifiable आहेत का, याचा नीट विचार कर. एका conclusion ला ये, की हे चालेल, हे चालणार नाही, हे नंतर ठरवता येइल.. अस झाल की तू स्थळं बघायची background तरी तयार करू शकशील. तसच समोरच्या व्यक्तीच्या पण आपल्याकडून काही अपेक्षा असतील ही पण जाणीव ठेव. कारण as I said earlier, its an adjustment both ways!
|
Chioo
| |
| Thursday, March 16, 2006 - 8:57 am: |
| 
|
Nakkich, lagn hi ek adjustment aahe. Aani 'arranged marriage'chya babatit tumhi poornpane andharat asata. dusari vyakti kashi aahe yacha poornpane andaj yet nahi. yasathi aapalya priorities tharavane aani tya yogy tarhene communicate karane khoop mahattvache tharate. Ajjuka, Manuswini aani Psg yani baryach important goshti sangitalya aahet. Mi anakahi kahi add karate. Adjustment karayachi asali tari ti konatya babtit tu karu shakates he mahattvache. tuzya firm aavadi aani navadi pratham aathav. Ajjuka mhanate tase lihun kadh. kahi examples: 1. tu aatta sangitales ki, tula bharatat settle vhayahe aahe. 2. tuza job / careerbaddalcha kay attitude aahe. tu job sodu shakates ki nahi. (mulinsathi ha mudda critical tharato. ) 3. tuzya careerbaddal mala kahi kalpana nahi. pan mi s/wmadhe aahe mhanun thodefar relate karun sangate. mala swatala manager levelmadhe interest nahi. tyapeksha salary kami asali tari technical levelvar kam karayala aavadate. tuzya asha kahi feelings aahet ka ki, tula kashat satisfaction vatate. ha mudda khoop vague zala aahe. 3. tuzya ideal enjoymentchya kalpana kay aahet? jevha tumhala free time milel tevha tumachya ya idea baryach pramanat match hone aavashyak aahe. agadi tokachya aavadi-nivadi asalya tar adjustment jast karavi lagel. jasa ekala discomadhe jane aavdate tar dusaryala te pasand nahi. ekala baher bhatakayala aavdate tar dusaryala shantpane ghari basayala. 4. familybaddalachya kalpana kay aahet. 5. khanyachya aavadi-nivadi 6. swayampak karane(parat mulinsathi ha prashn vicharalach jato. ) etc tula kiti aavdate. tuzya priorities tharav aani konatya goshtimadhe kiti adjustment tu karu shakates tepan tharav. mi var lihilelya kahi muddyanpaiki kahi tula agadi binmahattvachya vatatil. anai kahi vegalya tuzyasathi imp asu shakatil. brain storming matr khoop karave lagel. mi var kahi pointsmadhe 'mulinsathi' mhanun lihile aahe. mala mulaga-mulagi ha vad suru karayacha nahiye. pan yababtit pratyekachi mate vegali asatat aani lagn tharavatana donhikadachya familieschya matancha vichar karava lagato mhanun mi specify kele. mandali, mala navin jobchya thikani marathit lihayala thoda problem yeto ahae mhanun maza menglish thoda sahan kara. ithe browsercha kahitari problem aahe.
|
Arjun0306
| |
| Thursday, March 16, 2006 - 1:49 pm: |
| 
|
लग्न म्हणजे adjustment , तडजोड आलीच. पण ज्याला आपण आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले (निदान लग्न करताना तरी!) त्यासाठी काही तडजोड करायची वेळ आली तर? नाहीतर घटस्फोट घेता येतोच!! जेंव्हा तुम्ही मी, माझी मते, माझे करियर एव्हढाच विचार करता, तेंव्हा लग्न म्हणजे नुसतीच एक गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. आता जर लग्न, नि ते टिकवणे हे जर सर्वात जास्त महत्वाचे असेल आयुष्यात, तरच प्रश्न पडतो, की तडजोड तरी किती करायची? तर मला असे वाटते, की माझी मते, माझे करियर विरुद्ध जोडिदाराची मते यातली जी सीमा रेषा असते, ती बरीचशी 'जाड' असते, म्हणजे, मला अमेरिका आवडत नसली तरी, लग्न झाल्यावर जोडीदाराला अमेरिकेत, सुवर्णसंधि प्राप्त झाली, तर 'अमेरिकेत रहाणे' या मताला कितपत चिकटून बसायचे ते ठरवले पाहिजे. जोडीदाराला सुद्धा तसाच विचार करावा लागेल, की आत्ता तर संधि मिळते आहे, पण जोडीदाराची साथ नसेल, तर त्याची सीमारेषा कितपत 'जाड' आहे, थोडेफार इकडे तिकडे करायला जागा आहे, की अगदीच नाही, नि मग पुढचा विचार! अर्थात यासाठी वर सुचविलेला मार्ग, म्हणजे आपल्याला काय करायचे ते लिहून काढून त्याची priority प्रमाणे यादी करून पुन्हा त्यातली सीमारेषा कितपत 'जाड' आहे हे पण नमूद करावे. लक्षात ठेवा, यात प्रेम, लग्न महत्वाचे या गोष्टींचा फार मोठा वाटा आहे. प्रेमापायी, priorities नि सीमारेषांची 'जाडी' मोठ्ठ्या प्रमाणावर बदलते!!
|
Chioo
| |
| Thursday, March 16, 2006 - 2:49 pm: |
| 
|
Arjun, mala tumachya postcha dusara part aavdala pan pahila patala nahi. tumhala ghatasfot ghene ha agadi tokacha vichar nahi vatat? lagn tharavatana swatachi mate anai swatala imp vatanarya goshtina mahattv dile tar kay bighadale? doghanche vichar aani mate julane jast mahattvache asate. tumhi swatala kay vatate he neet vichar karun nahi sangitale tar te dusaryala ekdam kase kalel? aani tumachi mate julatat ki nahi he tari kase tharavata yeil? jar ithech farak padat asel tar nantar jastch tadjodi karavya lagatat. tyasathi swatachi mate aani career yabaddal vichar kelach pahije. aata kon kashala jast mahattv dete ha jyacha-tyacha prashn. tumhi mhanata tyapramane hi 'jadi' badalata yete he matr ekdam many. kadhi kadhi ji gosht lagnachya aadhi kadhich keli nasati ti lagn zalyavar sahajpane keli jate. evadhi space doghanchyat asatech. sthal-kalapramane mate aani aavadi yana murad ghalavi lagate. ase kadhich ghadat nahi ki, lagnachya aadhi mi amuk amuk ek gosht nahi mhatale hote, mag mi mulich karanar nahi. tula tase karayache asale tar 'ghatasfot' asa aadamuthepana kadhi kela jat nahi.
|
Arjun0306
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:23 pm: |
| 
|
chi00, घटस्फोट हा टोकाचाच विचार हे खरे आहे. आणि मी असे पण म्हणत नाही की जरा मतभेद झाला की लग्गेच घटस्फोट! पण तोहि मार्ग आजकाल समाजात पूर्वी इतका असंभव समजला जात नाही, म्हणून ज्या प्रमाणात आपले स्वत्व टिकवून ठेवण्याचा आग्रह असेल, त्या प्रमाणे वेळ आली तर घटस्फोट काही अशक्य नाही, असे मला सुचवायचे होते. कदाचित् 'जाडी' म्हणण्यापेक्षा, ती रेषा अस्पष्ट नि लवचिक असते असे म्हंटले तर बरोबर होईल. शिवाय मतांचा आग्रह हे एकच कारण कुठे असते घटस्फोटा साठी? इतर कित्येक क्षुल्लक कारणांमुळे सुद्धा घटस्फोट होऊ शकतोच. अगदी प्रेम विवाह झाल्यानंतर सुद्धा काही वर्षांनी घटस्फोट झाल्याचे माझ्या माहितीत आहे. मग स्वत्वाचा अभिमान म्हणून घटस्फोट घेणे यात मला तर काहीच गैर वाटत नाही.
|
Manuswini
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:42 pm: |
| 
|
अहो त्या घटस्पोट वगैरे एथे discuss करून त्या अग्निशिखाला घाबरुन सोडता आहात हो अग्नी तु छानसा नीट विचार कर आणी लग्न कर हो
|
Manuswini
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:50 pm: |
| 
|
तुला सांगते अग्नी, मला अगदी basic प्रश्ण सुद्धा विचारले आहेत की स्वैपाक येतो का? एकटीच का राहते? माणसे आवडत नाही का? जेवण रोज का नाही करत? रोज असेच कपडे का घालतेस का traditonal का नाही? अगदी वर वरुन modern in thinking वाटणार्या आणि so called social, educated, settled in US family ने सुद्धा स्वःताचा बाळ्या दिव्य का दिवा असताना .. हे प्रश्ण विचारले तर हे सर्व प्रश्णांची वही ठेव मग तु ठरव की तुला रोज अश्या exam ला जायचे आहे का?
|
Aschig
| |
| Thursday, March 16, 2006 - 10:01 pm: |
| 
|
all Arjun is trying to say (IMHO) is that marriage is not a one-way ticket. It can be painful to get separated, but that is a way out of a marriage gone sour. Knowing ones priorities beforehand will help you realize them later. If a conflict of priorities between partners arises, you will know what you can give up and what you should not. That can also of course change with time.
|
Chioo
| |
| Thursday, March 16, 2006 - 10:24 pm: |
| 
|
मनु, एकदम मान्य. इथे आपण फ़क्त लग्नाची चर्चा करायची. अर्जुन, आपण एकच गोष्ट सांगत होतो पण वेगळ्या प्रकारे. आणि मी 'चि(शून्य)( शून्य)' नाही, चिऊ आहे. अरेच्चा, पण ही अग्निशिखा कुठे गायब झाली?
|
परत नमस्कार! २३ दिवस जरा गडबड आहे कामाची आणि त्यात भरपूर ताप आलाय. त्यामुळे इकडे येता नाही आले. रागावु नका. तुमच्या सगळ्यान्च्या सूचना खरच खूप छान आहेत. अज्जुका, मी लिस्ट करायला सुरुवात पण केली. लग्न करायच्या आधीच विचार केला तर नन्तरचा मनस्ताप वाचेल का असेच मला म्हणायचे आहे अर्जुन. चिउ, मला घरातल्या माणसान्बरोबर जुळवुन घ्यायल त्रास होणार नाही फ़ार, कारण मला कुटुम्बाची, माणसान्ची स्वयम्पाक करण्याची आवड आहे, आणि चुकिचे असेल, पण लग्नानन्तर मी किती अड्जस्ट करते तो किती करतो अशी तुलना कराया मल आवडणार नाही. प्रत्येकाला आपलीच अड्जस्ट्मेन्ट जास्त वाटेल... मला हे समजत नाही की, या घरातली माणसे माझा माणूस म्हणून विचार करतील की नाही हे मी कसे ओळखणार? जेव्हा मी अमेरिकेत रहायचे नाही म्हणते, तेव्हा, आपल्या देशाशी पार नाते तोडलेला जोडीदार मला नकोय एव्हढेच मला म्हणायचे असते. प्रत्यक्ष आयुष्यात त्या वेळेला अनुसरून निर्णय घ्यावे लागतील याचे मला भान आहे मनस्विनी, यातुन जायची माझे अजिबात इच्छा नाही, पण मी एक बुजरी मुलगी आहे. लग्न जमवण्याचा दुसरा काय मार्ग? माझी मते जुनाट वाटतील, पण लग्न, सन्सार, मुले, अड्जस्टमेन्ट, भान्डणे आणि अडचणी हे सगळे अनुभवल्याशिवाय आयुष्य पूर्ण होईल असे मला वाटत नाही. पण खरच टिन्गल न कराअ तुम्ही सगळे मनापासून लिहिताय हे पहून खूप बरे वाटले. डोके जड झालेय... थोड्या वेळाने किम्वा उद्या परत भेटू अग्निशिखा
|
Saavni
| |
| Tuesday, March 21, 2006 - 8:19 am: |
| 
|
Saglyannich mhantla aahe ki lagna nantar khup adjustment karavya laagtat. Aani he atishay khara suddha aahe. Pan mala asa vaatata ki saglya priorities tharavlya aani tasa baghun lagna kela tari adjustment chukat nahit. Tya karavyach laagtat. Lagnacha basech muli to aahe. Pan hya barobarch ti vyakti aavadli pahije haa hi criteria rahu det haan. Mhanje nustach sagla practical vichar karun jau nako. Samorchi vyakti kharach manapasun aavadli suddha pahije tarach adjustments jaast sukar hotat. Aani arranged marriage madhe suddha ashi vyakti ekdum aavdun geli asa kshan yeto he anubhavache bol aahet. So...he sagle practical mudde atishay mahatvache aahetach pan tya barobar aavadila suddha mahatva de.
|
अग्निशीखा, आता ताप कसा आहे? hope you are feeling better ! arranged marriage मधे (आणि बरेचदा love marriage मधेही) एकत्र रहायला लागल्यावर एकमेकांचा खरा स्वभाव कळतो, पण engagement नंतर लग्नाची फ़ार घाई न करता मधला काळ ओळख करून घ्यायला आवश्यक असतो अस मला वाटत. शेवटी तडजोड तर करायची असते. ती कुठे आणि किती हे आपणच ठरवायच, नाही का?
|
म्रिन्मयी अग love marriage असो अथवा arrange marriage, engagement मधे आणि लग्ना मधे जरि मधे वेळ असला तरी बरोबर राहणे हा पुर्ण वेगळा अनुभव असतो. अग आपण एखाद्या मणसाला काहि तास भेटल्यावर चान्गलि बाजु दिसते (आपलि आणि त्याचि पण).
|
Maudee
| |
| Friday, March 31, 2006 - 1:38 pm: |
| 
|
अग्नि, adjustment ही करावीच लागते हे बरोबर आहे. पण कुठल्या गोष्टीत adjust करायचे अणि कुठे नाही हे clear असले की सोपे जाते. त्यासाठि तेहि आधी ठरवुन ठेव.त्यासाठि अज्जुकाने सान्गितलेला उपाय best आहे.
|
अग्निशिखा तु एक काम कर कुथेतरि ३ ४ तास ज़ाउन बस आनि तुज़्ह्या लग्नाबद्दल विचार कर.
|
Mahesh
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:58 am: |
| 
|
सौरभराव, चांगले सुचवले, पण ३ / ४ तासच का ? तिने एखादा चित्रपट पहाता पहाता विचार करावा असा सुक्ष्म हेतू तर नाही ना ? सहज गंमतीने लिहिले आहे. सिरिअसली घेऊ नका... 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|