|
Zakki
| |
| Monday, February 27, 2006 - 5:55 pm: |
| 
|
बायको ची दादागीरी आणि माझ्या नवर्याला, हा घरात कामं करतो.. म्हणजे बायको च्या ताटाखालचं मांजर असणार, अरे बापरे, या अमेरिकेत कोण कुणाला असे म्हणते? बायकोची दादागिरी म्हणजे त्यात काय नवल? तसेच तर असते की सगळीकडे. नि घरात कामे करणे म्हणजे ताटाखालचे मांजर! अहो ते मांजर बरे की हो. कधी पाहिले आहे का तुम्ही मांजरांचे काय लाड असतात इथे!
बाकी यात भारतीयच काय, सगळीकडेच असे लोक असतात. त्यांना इतरांना ' शिकवल्या ' शिवाय रहावत नाही! नि काही जण त्यांचे ऐकतातहि. म्हणूनच ते तसे करत रहातात. ते काय बदलणार नाहीत हो.
|
Moodi
| |
| Monday, February 27, 2006 - 6:59 pm: |
| 
|
दिव्या, कराडकर, सीमा, शिल्पा अन माणुस धन्यवाद मनापासुन प्रतिसादाबद्दल. हे खरे आहे की काहीजणाना हे सल्ले पटत नाहीत, मलाही पेंटींग आवडते अन मी केलेय मात्र आता क्रोशा साठी पुस्तक आणलय शिकायला. परदेशी नमुने असले तरी चांगले आहे, रीडर्स डायजेस्टचे आहे हे पुस्तक. जर शक्य असले की याचे फोटो काढुन ते मायबोलीवर अपलोड करीन तुमच्या साठी. फारच सुंदर आहेत. मी जेव्हा इथे आयुर्वेदावर लिहीले तेव्हा इथल्या एका मुलीने त्याच्यावर खुप कॉमेंट्स केल्या, मी दुर्लक्ष केले पण अजुनही ती तेच करते विशेषता भारतातल्या वेळेत आल्यावर. पण खरच तुमचा सल्ला मनापासुन पटलाय, माझ्या चांगल्या परिचयातील एका मायबोलीकरांनी हाच सल्ला दिलाय. मला २ वर्षापुर्वी इथे अल्सरसारखा पोट दुखुन खुप त्रास झाला, अगदी कितीही आधुनीक म्हटले तरी या देशात सुद्धा मला महिनाभर औषधे मिळाली नाहीत, कारण टेस्टकरता लागणारे साहित्य हॉस्पिटलला ऑर्डर देवुन करावे लागत होते. काय माहीत कदाचीत भारतात असते तर लवकर निदान झाले असते अन रात्री अपरात्री सुद्धा डॉक्टरशी संवाद साधता आला असता जो इथे नाही. म्हणुन माझ्यासारखे इतरांचे होवु नये म्हणुन मी इथे घरगुती औषधांवर ज्या रोजच्या वापरातील वस्तु आहेत अशावर लिहीते, पण त्यावर ही चेष्टा झाली की वाईट वाटते. पण तुमचा प्रतिसाद बघुन चांगले वाटले. माणुस मी नाही पाहिला रे तो सिनेमा पाहीन जरुर, अन ती मुलगी तामिळ आहे पण तिला जे इतरांकडुन अनुभव आले त्याने ती बदलली पुर्ण. होत काही वेळा असे. तिची आई मात्र खुपच छान आहे स्वभावाने.
|
Shyamli
| |
| Monday, February 27, 2006 - 7:14 pm: |
| 
|
मूडी अग टिंगल टवाळी काय.. काही केल तरी करतात नाही केल तरी करतात पण आपल्याला एखाद्या गोष्टीतुन आनद मीळतोय समाधान मीळतय ना मग ती गोष्ट करायाचीच अस माझ मत आहे.....काय बरोबर आहे ना?
|
Supermom
| |
| Monday, February 27, 2006 - 7:46 pm: |
| 
|
श्यामली, अगदी बरोबर. लोकांना दुसर्याच्या आयुष्यात आपली नाके लांब करून खुपसायला का आवडतात कोण जाणे. मी मध्यंतरी दीड वर्षे भारतात जाऊन राहिले होते.माझी जुळी मुले झाल्यावर माझी तब्येत खूपच खराब झाली होती.बाळंतपण खूपच कठीण झाले. तिकडे गेल्यावर मी स्वैपाक, इतर कामे या सर्वांसाठी बाया लावल्या.दोन्ही मुले लहान,माझ्या तब्येतीच्या तक्रारी यामुळे तसे करणे मला बरे वाटले.पण यावर मी बरेच काही ऐकले. नोकरी करत नाही मग कशाला हवी बाई स्वैपाकाला?आणखीही बरेच. आणि गंमत म्हणजे मी नोकरी करत होते तेव्हा पोळ्यांना बाई लावायचा विचार केला तेव्हा दोन माणसांच्या पोळ्याच अशा किती असतात हे खवचटपणे विचारले गेले. तसेच माझ्या नवर्याचा आणि माझा स्वभाव बहुतेक बाबतीत जुळतो. त्यामुळे सहसा मतभेद होत नाहीत. पण याचा सोयीस्कर अर्थ घरात माझेच वर्चस्व आहे असा, स्टोरवी म्हणते तसा काढला जातो नि यावर सुद्धा खूप टोमणे मिळतात. ह्या टोमण्यांवर तर मला एक वेगळा बी बी उघडावासा वाटतो.लोकांना सरळ का बोलावेसे वाटत नाही?टोमणे मारून काय आसुरी आनन्द मिळतो?
|
Zakki
| |
| Monday, February 27, 2006 - 9:05 pm: |
| 
|
आत्ता. ( अतिशय आर्श्चर्यचकित ) सुपरमॉम, लग्नानंतर खरे तर बायकोचेच वर्चस्व असते, नि असायला पाहिजे. सर्वसाधारणपणे बायको कितीहि कर्तबगार नि कामसू असली नि नवरा रिकामटेकडा असला तरी नव्या नवलाई नंतर पुरुषाचे घरातील लक्ष उडते हे सत्य आहे. ( असे असायला नको असे म्हणून उपयोग नाही. कट्रिना व्हायला नको होते असेहि बरेच जण म्हणाले होते ) कधी कधी बायकोचे वर्चस्व जाचक वाटते म्हणून तर कधी कधी उगीचच सगळे नवरे करतात तशी आपणपण तक्रार करावी म्हणून नवरे तसे करतात. जरा जास्त वर्षे गेली की, बायको काय म्हणते आहे याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत सुखासमाधानाने आयुष्य व्यतीत करण्याची विद्या पुरुषांना कळते.

|
Pinkikavi
| |
| Monday, February 27, 2006 - 9:14 pm: |
| 
|
मलाही असेच अनुभव बरेचदा आलेत. आम्ही मागे भारतात गेलो असताना हिंदीभाषिक शेजारीण मिळालेली....आअता लग्नानंतर लगेच आम्हाला US ला जावे लागलेले....मग तिथे आमचे सामान ते काय असणार? त्यावरुन मी टोमणे ऐक्लेत.....तुम्हारे घर में तो कुछ भी सामान नही,हमारे घर में सामान रखने की जगह नही देखो..... portable 14''TV होता माझ्याकडे तेव्हा ये लग्ता नही १४'' का असे शेरे मिळाले होते...आअता काय बोलाय्चे त्यांना......आअणि ते स्वत्: २ bhk मधे ६ जण राहात होते.... एथे US मधेही मला एक येडी तेलुगु भेटलेली.....पहिल्याच भेटीत तिने माझ्या मुलाच्या शाळेची चोउकशी केली आणि मी गेली २ वर्षे us मधे आहे ना,त्यामुळे मला INDIA बद्दल काहिही माहीत नाही' असे ऐकवले..... आता अशांवर हसाय्चे की रडायचे? मूडी,या अज्ञानांना आपणच मोठ्या मनाने माफ़ करुन टाकावे नाही का?
|
Lalitas
| |
| Monday, February 27, 2006 - 9:25 pm: |
| 
|
सुपरमॉम, अग तुला जे अनुभव आपल्याकडे आलेत ना ते दु:स्वासामधून. तुझी प्रकृती चांगली नाही शिवाय जुळ्या मुलांना सांभाळणे कठीण काम आहे वगैरे कुणी लक्षांत घेत नाहीत. तुला सर्व प्रकारच्या सुविधा सहज उपलब्ध होतात याची असूया वाटते म्हणुन त्यांचं बोलणं तिरकस असतं. तुझं व नवर्याचं पटतं याचा आनंद मानणारी माणसे या जगात विरळच! इथे कुठेतरी त्या लोकांचं स्वत्:च्या बाबतीतलं फ्रस्ट्रेशन असतं. तुमची भांडणं झाली असती तरीही बोलले असतेच! आपल्या मनाला जे पटतं तेच करीत जावं... कुणीही आपल्यापैकी जगरहाटीच्या विरुध्द अजिबात वागत नाही. कुंकू न लावणं, बांगड्या न घालणं या अगदी वैयक्तिक गोष्टी आहेत. हे बाह्य उपचार काळाच्या ओघात बदलत जातात. आपण कुठल्या पध्दतीचा पेहराव करावा हे ठरवण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. तात्पर्य: कशाला लक्ष द्यायचं टोमण्यांकडे, चक्क दुर्लक्ष करुन आपलं आयुष्य मजेत जगावं, आनंदात रहावं.... हे जग या बाबतीत कधीही बदलणे शक्य नाही!
|
Supermom
| |
| Monday, February 27, 2006 - 9:47 pm: |
| 
|
ललिताताई, इतकं छान लिहिलत न, खरेच सांगते अगदी डोळे भरून आले. पण हे टोमणे परक्यांचे असले तर दुर्लक्ष करणे सोपे, पण आपलेच लोक जेव्हा असे वागतात तेव्हा फ़ार वाईट वाटते. आपल्याला जे मिळाले नाही ते दुसर्याला मिळाले तर त्याचा दुस्वास का करावा? आपल्याला बाकी काही गोष्टी अशा मिळाल्या असतील ज्या दुसर्याजवळ नसतील हे या तुलना करणार्या,हेवा करणार्यांना का नाही कळत? अर्थात हे कळले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता म्हणा. पण खरेच,साधे सरळ बोलून बरेच काही साधता येते आयुष्यात.दुसर्याला घायाळ करणारे,चिमटे काढणारे टोमणे मारून उलट व्यक्तीव्यक्तींमधली तेढ जन्मभर टिकून राहते. नाही का?
|
Storvi
| |
| Monday, February 27, 2006 - 9:58 pm: |
| 
|
ललिता ताई तुम्ही म्हणता ते पटलं पण आपली जास्तीची मेजॉरीटी इथे HG वर हो. बाकी ठिकाणी हे काय विपरीत असंच समजतात. आणी सुपरमॉम म्हणते तसं कुर्हाडीचा दांडा घाव घालत असेल तर काय करावं?
|
Lalitas
| |
| Monday, February 27, 2006 - 10:19 pm: |
| 
|
खरं सांगू सुपरमॉम, अगं तेढ ठेवायचीच नाही. मनातली बोच काढून टाकायची कारण ती आपलीच माणसं असतात. मनुष्य दुबळ्या क्षणी काहितरी बोलून जातो. आपली माणसं वाईट नसतात ग पण चुका सर्वांच्याच हातून होतात तेव्हा विसरून जायचं व आपल्या वागण्यांत चूक होऊ द्यायची नाही. एक उदाहरण सांगते... माझ्या ओळखीच्या एक बाई खंत करत आणि आपल्या सुनेचा दुस्वास करत असत कारण सुनेला अमेरिकेतील सर्व सुखसोयी उपभोगायला मिळताहेत. मुलाला आम्ही शिक्षण दिलं, पोटाला चिमटा घेऊन अमेरिकेला शिकायला पाठवला त्याची फळं आता सुनेला मिळताहेत. त्या बाईंना मग समजावून सांगितलं की असं होणारच.. पुढची पिढी सुबत्तेला पोचावी म्हणुनच आपण शिक्षण देतो. मुलाची व पर्यायाने सुनेची भरभराट होते याचा आनंद मानावा, असा जगावेगळा विचार करुन स्वत:चे मानसिक समाधान गमवण्यात काय अर्थ आहे हे तुम्हीच ठरवा. त्या मनाने खरंच वाईट नव्हत्या पण दृष्टीकोन पूर्ण चुकीचा होता. असं होऊ शकतं... तेव्हां ठरव तुझं तूच कसं वागायचं ते!
|
Pinkikavi
| |
| Tuesday, February 28, 2006 - 12:22 am: |
| 
|
ललिताताई, तुम्ही म्हणता अगदी तसेच माझ्याबाबतीतही घडलेले आहे......म्हणजे अगदी माझ्यावर होणारा अगदी खाण्यापिन्याचाही खर्चाचा हिशेब ऐकवण्यात आलाय.....सुरुवातीला मला समजाय्चे नाही माझे नक्की कुठे चुकले......त्यान्च्या मुलाशी लग्न झाले ह्यात आपले काय चुकले? नवरा शहाणा म्हणुन चालवुन घेता आले हो......तरी आम्ही दोघेही त्यांना कही कमी पडू नये याही कळजी घेत असतो......पण मी तुम्ही म्हणता तसे दुर्लक्ष करायला शिकले आहे.....जमते ते सवयीने आपोआप.... नि मग आपणच सुखी होतो......
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:05 am: |
| 
|
माझा एक गमतीशीर अनुभव... नुकत्याच सहजीवन किंवा couples working together अश्या विषयाला धरून आमच्या दोघांच्या एकदोन मुलाखती झाल्या. त्यात एका मुलाखतीत घरामधे संदीप सावंतांचा किती सहभाग असतो? त्यांना वेळ मिळतो का? असे प्रश्न विचारले.. खरंतर आम्ही दोघही तेवढेच काम करत असतो आणि तेवढाच वेळ घराच्या बाहेर असतो पण त्यांच्या मनाशी हे पक्के होते की घर मीच बघत असणार. आणि मग जर चुकून संदीप सावंत काही बघत असतील घरात तर मग ते वेगळेपण म्हणून छापणे सोपे... पण वस्तुस्थिती अजूनच वेगळी आहे... खरे ते सांगून मी बॉम्बच टाकला त्यांच्यावर. अस आहे की मी पुण्यात आणि मुंबईत दोन्हीकडे काम करते त्यामुळे अर्धावेळ आम्ही वेगवेगळ्या शहरात असतो. पुण्यात असलो की आम्ही माझ्या माहेरी रहातो आणि मुंबईत असलो की त्याच्या. अजून आमचे दोघांचे घर, दोघांचा संसार सुरू झाला नाहीये. यामुळे घरची जबाबदारी त्याच्यावरच काय माझ्यावरही फारशी नाहीये कारण सध्या तरी ते शक्य नाहीये आणि आमच्या दोघांच्याही आईवडिलांनी ते समजून घेतले आहे. हे सांगितल्यावर त्यांचा जो काही मूड गेला.... काय ही विचित्र बाई घराकडे बघत नाही, नवर्याला जेवायला करून घालत नाही मग हिच करीअर strong असेल तर काय झालं!! असं सगळ त्यांच्या चेहर्यावर झळकायला लागलं आणि मला मुलाखतीचाही कंटाळा आला. वरती जी परिस्थिती सांगितली ती खरी असली तरी ती तशी असण्यासाठी आमची काही कारण आहेत, ते आमचे आयुष्य आहे हे लक्षात न घेता माझ्याबद्दल judgement करण्याचा यांचा संबंध काय? बर संदीप सावंत घरात स्वतः उठून पाणी घेतात असे सांगितले असते तर ते कौतुकास्पद म्हणून छापले असते किंवा नाही ना हो त्यांना घरात लक्ष द्यायला अज्जिबात वेळ मिळत नाही काय करणार... असे मी म्हणाले असते तर मग नीरजा म्हणजे संदीप ला मिळालेली एक समजुतदार साथ वगैरे वर्णन त्यांना करता आले असते. पण ही बाई backseat घ्यायला तयार नाही म्हणल्यावर त्यांचा सगळा पायाच ढासळला. आता छापून काय येणारे देव जाणे... मी थोडी irritate झाले होते पण नंतर संदीप आणि मी त्यावर आमच्याआमच्यातच त्यावर इतके हसलो की माझे irritation तिथून धन्यवाद झाले.
|
Shyamli
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:16 am: |
| 
|
नीरजा मस्त अनुभव आहे तुझा..... अशा गोष्टी पचनी पडत नाहीत लोकांच्या लवकर... त्यांना वाटत करीअर करणार्या बाईनी घर बघुन मगच कामाकडे लक्ष द्याव.... भलेही मग तो आपला आपसातल समन्वय असला तरी लोकांना आवडत नाही.....
|
Jayavi
| |
| Tuesday, February 28, 2006 - 9:47 am: |
| 
|
इथले एकेक अनुभव ऐकुन मज्जा वाटली. ललिताताईंसारखं माझंही मत आहे. आपल्याशी वाईट वागणार्या लोकांशी सुद्धा आपण चांगलंच वागावं. त्यांना आज ना उद्या नक्कीच त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल. छोटंसं आयुष्य आपणच चांगलं बनवायचं असतं. मला इथे माझीच एक कविता आठवतेय.......बघा तुम्हाला पटतेय का ? आयुष्य आयुष्य म्हणजे काय असतं ? देवानी जन्माला घातलं म्हणुन काय जगायचं असतं ? खरं तर आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं आणि तरुणपण टिकवायचं असतं माणूसपण जोपासायचं असतं दुसर्यांना हसवत स्वत ही फ़ुलायचं असतं पहाटेच्या दवबिंदूत नहायचं असतं प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं रातराणीच्या झुळुकींनी मोहरायचं असतं चंद्राच्या साक्षीनं बहरायचं असतं निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं स्वत चं राजेपण स्वत च घडवायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदुखात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफिलीत बेधुंद गायचं असतं प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
|
Tanya
| |
| Wednesday, March 01, 2006 - 6:41 am: |
| 
|
मुडी... खरतर आजच मी इथल्या पोस्ट्स वाचल्या. माझ्या मते तुम्ही जे इथे मायबोलीकरांना आणि मायबोलीकरींना जे मनापासुन मार्गदर्शन करता, ते खर तर खुप कौतुकस्पद आहे. कोणाच्याही चेष्टा असल्या तरी तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. या चेष्टा करणार्या टोमणे मारणार्या लोकांचे अनेक drawbacks असतात, आणि ते झाकाले जावे म्हणुन दुसर्याच एखाद्याला नावे ठेवुन ते मोकळे होतात. ललिताताईंचे म्हणणे अगदी correct आहे. पटल.. आपल्याकडे एक म्हण आहे. 'ऐकावे जनांचे, परि करावे मनाचे.' माझ्या आई(सासुबाई), जेव्हा प्रथम इथे आल्या होत्या, तेव्हा माझ्या नवर्याने मला घरकामात केलेली मदत त्यांना खटकत असणार, तसे त्यांनी कधीही बोलुन दाखवले नाही, परतु त्या स्वतःहुन त्याची काम करायच्या. पण त्यांच्या नंतरच्या खेपेस त्यांना समजुन चुकले की हे तर ह्यांचे routine आहे, त्यामुळे त्या शांत बसुन रहायच्या. शेवटी मला एकदा त्या न रहावुन म्हणाल्या की, दादा(माझे सासरे) नाही का मला बिर्ड सोलायला मदत करतात. नवर्याने मदत केली तर बिघडत कुठे? स्वतःच्या घरातलेच तर काम करतो ना. मला वाटत, की हे असे बदल व्हायला थोडा काळ जाऊ द्यावा, हे उत्तम. कारण काळाशिवाय दुसरे उत्तम औषध कुठेही नाही.
|
Storvi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:04 pm: |
| 
|
BTW मूडी सांगायचे राहिले, की मी पण तुला काकूबाई म्हटले असते, पण जेवायला नक्की आले असते मूडी, गंमत करतेय गं हा घे भला मोठ्ठा 
|
Moodi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:16 pm: |
| 
|
तुला शक्य झाले तर मग भारतातच ये जेवायला, मला UK तुन पळायची घाई आहे.
|
Moodi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:17 pm: |
| 
|
तान्या अहो नको ग म्हणुस ए म्हण. 
|
Storvi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:45 pm: |
| 
|
नको भारतात मला सगळे ultra mod म्हणतात 
|
Zakki
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:01 pm: |
| 
|
storvi, तुला मायबोलीवर काय ( काय ) म्हणतात ते पण सांग ना सगळ्यांना!

|
आता हे कधी बदलणार चाललय म्हणून माहीत नाही आधी कुठे discuss झाले आहे का bb वर असेल तर mod delete करा हो आपल्याकडे अजुही कितीही शिकलेली, फिरलेली माणसे असु देत ते लग्न आले की नवर्याच्या माणसाचा वरचढ पणा हा दिसतोच, तुम्ही काहीही म्हणा. मग ते अगदी पत्रिका मुलिची जाणे, मुलिच्या आईनेच सतत दहा पंधरा वेळा फोन करून विचारयचे, की तुमचा बाळ्याची माहिती देता का? .. शी हे कधी बदलणार डोक्यात सणक जाते हे असे वागणे बघून...
|
Moodi
| |
| Friday, March 03, 2006 - 1:52 pm: |
| 
|
मला वाटत सध्या हे आपले स्त्रीयांचे प्रॉब्लेम बघुन मिल्याच इथे येऊन पुरुषमुक्ती संघंटना, बायकांचे नवर्यावर अत्याचार असे नवीन सदर चालू करेल.. मिल्या जिथे कुठे असशील तिकडे दिवे घे.. 
|
Moodi
| |
| Friday, March 03, 2006 - 1:54 pm: |
| 
|
लोकप्रभाने नवीन अंक काढलाय बघा. http://www.loksatta.com/lokprabha/20060310/mahila01.htm . स्त्री ईस्पेशल.
|
Bavlat
| |
| Friday, March 03, 2006 - 3:37 pm: |
| 
|
पण ते बायकाना ' नर ' का म्हणतात. हे कधी बदलले. ' फ़्रंटर ' म्हणजे काय.
|
Milindaa
| |
| Friday, March 03, 2006 - 5:20 pm: |
| 
|
आधी कुठे discuss झाले आहे का << Manuswini, पुढील बीबी त्यासाठी जास्त योग्य आहे V&C <== ही लिंक आहे असेल तर mod delete करा हो <<< या हिशोबाने येथील निम्मे बीबी रिकामे होतील
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|