Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रंग दे बसंतीच्या निमित्ताने ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » रंग दे बसंतीच्या निमित्ताने « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 14, 200625 02-15-06  2:06 am
Archive through February 22, 200625 02-22-06  4:10 pm

Dineshvs
Wednesday, February 22, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी खुप पुर्वी, आम्हा काय त्याचे, या नावाची एक रुपक कथा लिहिली होती, मायबोलिवर, जुन्या लोकाना आठवत असेलच ती.
असो वरच्या लेखातील पुढची विधाने जास्त महत्वाची आहेत.

या सर्व गोष्टींमधले सत्य जे असेल ते असो. ह्या छोट्या सोनमांजरीचा दोन दिवसात आम्ही मांडलेला लेखा जोखा. गावात ईतके कमी लोक ( लोकसंख्या ५५० ) असुनसुद्धा छोट्या छोट्या कारणांवरुन होणारी भांडणं, प्रत्येकाचा स्वार्थ साधायचा प्रयत्न आणि त्यामुळे बुडणारे सामुहिक हित. अन्याय दडपशाहि करणारे गावातले बहुतांश लोक. असं वाटलं या गावाला स्वताचं हित कळत नाही का ? काय करावं हे माहित नाही ? एकत्र येऊन काहि करण्याचं सामर्थ्यच यांच्यात नाही ?
असाच जर कुणी पुणे शहराचा लेखा जोखा मांडला तर ? शहर मोठं तसं व्यवहार मोठे, भानगडी मोठ्या. मग कमाल जमीन कायद्याखाली सुटलेल्या जमीनी गैरव्यवहार करुन, ताब्यात घेऊन त्यावर मोठ्या स्कीम्स राबवुन कोट्यावधि कमावणारी बडी मंडळी असोत किंवा लोकांच्या पैश्याच्या मोटारी विकत घेऊन फ़िरणारे लोक प्रतिनिधी असोत. आपल्या शहरात आपण हे गैरव्यवहार सहन करतोच ना ? समजलं तरी गप्प बसतोच ना ? मग सोनमांजरीत आणि पुण्यात काय फ़रक आहे ? सोनमांजरीकरांच्यात आणि पुणेकरांत काय फ़रक आहे ?

हे सगळे ऊतारे वरच्या लेखातले आहेत. अधिक माहितीसाठी हि साईट बघा.

www.greenearthconsulting.org/padayatraprogress.htm

Dineshvs
Sunday, February 26, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच विषयावरचा, हा हि लेख वाचण्याजोगा. काहि जण जात्यात असलो, तर बाकिचे सुपात आहेत.
http://www.loksatta.com/daily/20060226/sun01.htm

Nalini
Friday, March 10, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक नागरीक म्हणुन कोणी कर्तव्ये माझी सांगाल का?
सामन्य नागरिक राहुन देशाचे भवितव्य घडविता येईल का?
राजकारणही करिन म्हणाल तर, पण राजकारण शिकवाल का?
भल्याभल्यांशी गाठ पडेल, काही डावपेच सांगाल का?
कटकारस्थान जर कळलेच नाही, तर वेळीच सावध कराल का?
खुर्चीला जर भुलले तर, ध्येयाची आठवण करुन द्याल का?
निस्वार्थ देशसेवा करण्याचे बाळकडु मला पाजाल का?
भ्रष्टाचार उखडुन काढण्यास ताकद आपली लावाल का?
मार्गदर्शन हवे मला, नवनविन दिशा दाखवाल का?
भाकर गरजेची की शिक्षण, प्रश्न माझा सोडवाल का?
अन्नावाचुन मरणार्‍यांना एका घासाचे दान मिळवुन द्याल का?
आयुष्यातला एक दिवस समाजासाठी अर्पाल का?
सणासुदीतला एक दिवस अनाथाश्रमात साजरा कराल का?
वृद्धाश्रमे मोडित काढुन वृद्धांना घरात स्थान देताल का?
देशोन्नत्तिचे स्वप्न माझे तुम्हीही उराशी बाळगाल का?
प्रदुषणविरहीत पर्यावरण असावे, संदेश घरोघरी पोहचवाल का?
शेतकर्‍यांचा माल माझ्या, दलालांपासुन सोडवाल का?
कष्टांचे मोल त्यांच्या, पदरी त्यांच्या घालाल का?
'जय जवान जय किसान' नारा कोणाचा हे सांगाल का?
हाच नारा आज माझा, कोरस मला द्याल का?

-- नलिनी


Soha
Friday, March 10, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर दिलेला लोकसत्ता मधील लेख वाचून एका पुस्तकाची आठवण झाली. पुस्तकाचे नाव: समुद्रापारचे समाज. लेखक: मिलिन्द बोकील. या लेखातले विचारच जरा विस्त्रुतपणे, जास्त ऊदाहरणे देवून मान्डले आहेत. कोणी वाचलय का हे पुस्तक?

Dineshvs
Friday, March 10, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. तुझ्यासारखे विचार करणारे तरुण, माझे मित्र आहेत, म्हणुन माझ्या हयातीत या देशाचे काहितरी भले होईल, अशी आशा आहे.

Aschig
Friday, March 10, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nalini, is that a poem, or are those genuine questions?

Many times poets are identified with their material in an assumedly autobiagraphical sense though most of the times it need not be so (for instance, someone who writes excellent love poems need not be a good lover or even have a good love life). So, in case it is just a poem, I would say it is a good contribution. Hopefully others will like it and ask themselves those questions.

But, if those are genuine questions, I would say the fact that the questions occured to you would mean that you are already, at least partially, on the other side (IMHO the correct one). In that sense too it is a good contribution - making people think what kind of questions they could be asking. It is up to people to ask these of themselves and list the people they know and figure out for themselves who they can and should trust in such matters.

Indeed if many such people come together, that will already be a good thing. I am sure many of you must have seen the news posted on one of the other BBs about lokparitran.org. That seems to be a good initiative.

Bee
Saturday, March 11, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष ती कविताच आहे सभोवतालच्या जिवंत प्रश्नांची.. खरच मनापासून आवडली मला. धन्यवाद नलू.. चला आपण कोरस देऊया..

Mbhure
Friday, April 07, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वीकएण्डलाअ रंग दे बसंती पाहिला. मला स्वतःला एक उत्तम सिनेमा बघितल्याचे समाधान मिळाले, एव्हढेच मी त्याबद्दल म्हणु शकतो. Eye Opener म्हणुन त्याचा जो उदोउदो झाला तसा तो आहेही पण हा काही असला पहिलाच चित्रपट नव्हे.

निवडून आलेल्या नेत्यांच्या संदर्भातील भाष्य ही हल्ली बहुतेक चित्रपटात असतात. उदाः गंगाजल चित्रपटातही नायक जमावाला हेच ऐकवतो की, ’ जैसा समाज होता है, वैसे ही उसको नेता मिलता है ’ (चू. भू.द्या. घ्या.) ह्या प्रकारचे अनेक चित्रपट येतात. दर २ - ४ वर्षानी एखादा गाजतो. बस ईतकेच. युवा चित्रपटात फक्त बर्‍यापैकी Solution दिले होते. लोकशाहीत निवडणुका हा एकच मार्ग आहे. पण परत Power corrupts हेही तेव्हढेच खरे. राजीव गांधीच्यावेळी लोकांना अशाच आशा होत्या.विरोधी पक्षाच्या ३ सीट निवडुन आल्या होत्या. त्यावेळी नुसते खरे जरी कोणी पडले तरी त्याला ’ कमळ झाले ’ असे म्हणायचे. त्याने सॅम पित्रोडासारखी माणसेही चांगली जमवली होती पण असे सर्वच नसतात. त्यामुळे हळूहळू कंट्रोल सुटत जातो, काही तडजोडी कराव्या लागतात आणि मग सगळेच हाताबाहेर जाते. सिंहसनमध्ये मुख्यमंत्री दिगू टिपणीसला सांगतो तसे, ’ पुर्वी असा नव्हतो रे मी, चांगले कार्य करावे म्हणुन निघालो आणि चोरांच्या पंढीरीला आलो. ’

खरे म्हणजे समाज बदलणे हे एका पिढीत होत नाही त्यासाठी दोन तीन पिढ्या जाव्या लागतात. एकाधिकारशाही (Dictatorship) किंवा लष्करशाही हा एक उत्तम उपाय आहे. पण तुर्कस्तान आणि सिंगापुर सोडुन कुठेही तो यशस्वी झाला नाही. कारण परत Power Corrupts. त्यामुळे आगीतुन फोफाट्यात हे बहुतेक वेळा होते. शिवाजीसारखा राजा एखादाच असतो.

हे (भरकटलेले) विचार रंग दे बसंतीच्या निमीत्तने सुचले. Nothing Much. फक्त शिळ्या कढीला....



Harshu007
Saturday, April 08, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tumhala sarwana mahit ahe kaa iityan mulani ek naviun parti kadhali ahe lokparitran navachi

Lopamudraa
Saturday, April 08, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे विचार खरे... आहेत भरकटलेले नाहीत, तडजोडी कराव्या लागतात, जीथे वडील आणि मुलांचे विचार जुळत नाही तीथे बरोबरीच्या प्रत्येकाचे विचार आपल्याशी कसे जुळतील... इतरही जे लिहिले आहे ते बरोबर आहे.

Moodi
Sunday, April 23, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख तर माझ्याच मनातला..

http://www.loksatta.com/daily/20060423/rv01.htm .

Moodi
Thursday, July 20, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातील शेतकर्‍यांची ही खरी परीस्थिती. मला खरे तर चीड येते ती मुलीच्या लग्नात गावजेवण मागणार्‍यांची. मुलीच्या बापाचा कुणी विचारच करत नाही. आणि तरीही लोकांना वास्तवापेक्षा आवड असते ती रंगसंगतीची.
पण काही माणसे खरेच देवरुपात भेटु शकतात.

http://www.esakal.com/esakal/07202006/NT001F4DAE.htm

Dineshvs
Thursday, July 20, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई गोवा मार्गावर झाराप म्हणुन एक गाव आहे. तिथे डॉ प्रसाद देवधर यानी एक भगीरथ नावची संस्था उभारली आहे.
शेतकर्‍याला प्रतिष्ठा मिळवुन देण्याचा त्यानी चंग बांधला आहे. नाहीतर कोकणात ऊस आणि शेंगदाणे पिकलेला कधी बघितला होता का ?

ईथे सहकार वैगरे काहि नाही, प्रत्येकाने आपल्या पोटापुरते कमावायचे असा साधा सरळ हिशेब आहे.
असे प्रकल्प केवळ खाजगी प्रयत्नातुनच घडु शकतात. सरकारी योजना आला कि तिथे वेगळ्या अर्थाने, अडवा आणि जिरवा, असे सुरु होते.


Laalbhai
Thursday, July 20, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मी ऐकले आहे भगीरथबद्दल. पण कधी तिथे जाण्याचा योग आला नाही.

तुम्हाला माहिती असेल तर सविस्तर लिहाल का भगीरथबद्दल?


Dineshvs
Friday, July 21, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झारापला पर्यटक म्हणुन जाणे हाच भगीरथला जाणुन घेण्याचा मार्ग आहे. अवश्य जा. त्याना तीच अपेक्षा आहे.

Laalbhai
Saturday, July 22, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. पुढच्या सहा महिन्यात तर अनेक कामांमुळे शक्य नाही पण मार्चच्या सुमारास काही दौरे काढण्याचा विचार चलला आहे. तेंव्हा तुमच्याकडून प्रवासाची आणखी माहिती अवश्य घेऊ.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators