Pama
| |
| Saturday, December 24, 2005 - 12:11 am: |
| 
|
अरे हो, या पण आठवल्या.. एक stone boy नावाची होती. त्यात एक डायलॉग होता(का गाण होत) कोणतरी आणि कोणतरी के लिये जो भूत, वो हम दोनो का दोस्त.. दिवसभर म्हणत बसायचे ते मी.. famous five पण लागायची ना? चित्रहार आणि छायागीत तर बेस्ट असायच. आमची माती आमची माणस अजून लागत का? प्रतिभा आणि प्रतिमा पण छान असायच.
|
Supriyaj
| |
| Saturday, December 24, 2005 - 1:04 am: |
| 
|
मन एक सिपी है आशा मोती है,हर पल जीवनका एक चुनौती है! सोने न दे आग सीनेकी..कर ले लगन से तु प्यार आवाज दे कर बुलाले तु तेरे लिये है बहार जो बन जाता है धुल राहोंकी उसकी दिवाने मंज़िल होती है हर पल जीवनका एक चुनौती है! आव्हान्: आव्हान खुले आव्हान, झुंज नसे एकाकी आता एक्य उभे बलवान नारीला समजुन अबला छळ आजवरी जो झाला नाव न त्याचे उरेल आता उठले धुंद तुफान!! मी तर अनेक title songs पाठ केली होती आणी बरिचशी अजुनही लक्षात आहेत पूर्ण!! एथे एक सुरु करुन तो संग्रह करायला हरकत नाही!!
|
अहो ऐकलत का म्हणून पण एक सीरीयल होती. मी आजच मालगुडी डेज ची DVD बघीतली इथे. कोणी बघीतली आहे क ती?
|
Sami
| |
| Saturday, December 24, 2005 - 4:49 am: |
| 
|
ती serial आठवते का कुणाला? त्यात तीन की चार बहिणी असतात. त्यातली एक किट्टु गिडवानी होती. सर्वात मोठी असते ती रेखा सारखी दिसायची. आणि एक हीरो होता त्याचं काही तरी तरूण धनराजगीर असं नाव असतं. रविवारी दुपारी असायची ती serial . दुसरी एक comedy serial होती जबान संभालके'. पंकज कपूर होता त्यात. ती पण छान होती.
|
Sami
| |
| Saturday, December 24, 2005 - 4:51 am: |
| 
|
आठवलं. मी वर म्हणत होते त्या serial चं नाव तृष्णा असं होतं. मस्त होती ती.
|
Phdixit
| |
| Saturday, December 24, 2005 - 5:03 am: |
| 
|
मालगुडी डेज आजुनही कोणत्यातरी Channel वर चालु आहे ना आजुन एक सिरीयल होती तेनाली रामन गोट्या सिरीयल आठवते आहे का कोणाला
|
पर्फ़ेक्ट किटु गिडवानीची सिरियल खुप छान होती अस्मिता
|
ती तृष्णा Pride & Prejudice वर होती. गोट्या आठवते ना. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत..
|
Pama
| |
| Saturday, December 24, 2005 - 3:43 pm: |
| 
|
अरे, स्वाभिमान आठवते का? शांतिच्या अधी लागायची. cooking shows आठवतात का कुठले. एक कपिल देव चा होता, आणि of course संजीव कपूरचा खाना खजाना. दुपारी पण लागायचे बरेच. हेमा मालिनी ची कुठली होती ती? ती dancer असते, तंजावूर मधे शिकायला जाते, मला वाटत कबीर भेदी होता का त्यात? पायल का असच काही नाव होत.
|
Parijat30
| |
| Saturday, December 24, 2005 - 3:57 pm: |
| 
|
हेमा मालिनीची सिरीअल नुपूर होती.
|
पमा आमची माती आमची माणस आता लागत नाही त्यातला तो रवी पटवर्धन आनि गजरा आक्का मात्र आठवल्या चित्रहार अजुन सुरु आहे रंगोली साठी रविवारी लवकर उठावे लागायचे बाकी स्वामी म्रुणाल वाव बंदीनी द्विधाता १०० असे पाहुने येती अजुन ही लक्षात आहेत आभाळमाया प्रपंच टिपरे सहीच
|
Sahilshah
| |
| Sunday, December 25, 2005 - 2:13 pm: |
| 
|
खरच जुन्या सिरियलस खुपच एनजॉय केल्या. बरयाच वर्षानी केबल घेतला पण हल्लीच्या सिरियल बघायला मजाच येत नाही. पण सारे ग मा सारखे प्रोग्रम नव्हते पुर्वी
|
Milya
| |
| Monday, December 26, 2005 - 8:50 am: |
| 
|
ये जो हैं जिंदगी शफ़ी, स्वरुप आणि सतिश शाह व राकेश बेदी सहीच होती एकदम सुप्रिया : चुनौती चे गाणे टाकल्याबद्दल धन्यवाद!!!
|
Jo_s
| |
| Monday, December 26, 2005 - 9:31 am: |
| 
|
अगदी पुर्वी चिमणराव, चार्ली चॅप्लीन, टेले मॅच लागायच्या कुणी ब्घितल्या आहेत का? फार मजा यायची.
|
उजालेकी ओर आठवते का कुणाला? मला त्याचं फक्त title songच आठवतंय. आणि तेही एवढंच......
|
Sami
| |
| Tuesday, December 27, 2005 - 4:46 am: |
| 
|
चिमणरावच्या vcds मिळतात का आपल्या इथे?
|
Sarang23
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:10 am: |
| 
|
मालगुडी डेज अजुनही पोगो वर दाखवतात. बोक्या सातबंडे पण होती पुर्वी पण तेंव्हा मी बराच मोठा झालो होतो
|
Dakshina
| |
| Tuesday, December 27, 2005 - 6:08 am: |
| 
|
चतुराई नावाची पण एक सिरीयल लागायची पुर्वी.. अगदी २० मिनिटांचीच होती.. ती पण छान असायची.. शिवाय असे पाहुणे येती.. मला सगळ्यात जास्त अवडणारी मालिका म्हणजे पोटली बाबा की त्यात ही अलिबाबा चालिस चोर ही कथा विशेष आवडली होती..
|
Lalu
| |
| Wednesday, December 28, 2005 - 3:32 am: |
| 
|
'Satyajeet Ray Presents' म्हणून एक मालिका होती. अर्ध्या तासाचा एक भाग असायचा. वेगवेगळ्या कथा. त्यातली एक 'Studio' आठवते, अमोल पालेकर आणि श्रीराम लागू होते, भीतीने झोप आली नाही रात्री... त्यातलीच दुसरी अभिनेत्री' नावाची कथा. स्मिता पाटीलने अप्रतिम अभिनय केला होता.
|
लालु, मला नाही आठवत ही सीरियल....... सत्यजित रेंची होती, मग फारच छान असणार... आणि त्यात एव्हढे चांगले कलाकार म्हंटल्यावर काय....... पण मला अजिबातच आठवत नाहिये, खुप जुनी होती का?
|
Jo_s
| |
| Wednesday, December 28, 2005 - 7:18 am: |
| 
|
फटिचर आठवत्येका, क्लसीक होती आणि लाईफ लाईन ही छान होती. एक मुन्शी प्रेमचन्दच्या कथेवर केलेली सिरीयल, गोष्टही आठवत्ये पण नाव आठवत नाही.
|
Amrutabh
| |
| Wednesday, December 28, 2005 - 6:06 pm: |
| 
|
मराठीत सन्स्कार नावाची मालिका होती...शारदाश्रम शाळेत त्याचे शुटीन्ग झाले होते ती फार छान होती आणि मागे कुणी तरी म्हटल होत एका जपानी मुलीची मालिका ...माझ्या मते त्याच नाव ओशेन कि काहीतरी होत.
|
Lalu
| |
| Wednesday, December 28, 2005 - 6:43 pm: |
| 
|
शुभा, ती ८६-८७ सालची असेल. 'लोहित किनारे' नावाची आसामी जीवनावरची एक होती. 'दौड' नावाची मराठी सिरियल पहायचं का कुणी? बन्द पडलेली ती पहिलीच सिरियल असेल.
|
Supriyaj
| |
| Wednesday, December 28, 2005 - 11:29 pm: |
| 
|
लालु, तु ज्या कथेबद्दल बोलते आहेस त्यात Dr. लागू एक लेखक असतात आणि त्याना एक मुलगी असते जी बरेच वर्षांपूर्वी गेलेली असतेऽमोल पालेकर त्यांच्या घरी either paying guest or as a reporter म्हणून आलेला असतो.. असं काहिस मला आठवताय.. and at the end he even understands about Dr.lagu's reality, right?
|
Milya
| |
| Thursday, December 29, 2005 - 6:06 am: |
| 
|
आणि कुणाला जाॅकी आठवते का? ती बहुतेक टी. व्ही वरची पहिली बंडल सिरियल असावी... 
|
Supriyaj
| |
| Thursday, December 29, 2005 - 4:33 pm: |
| 
|
जाॅकी बंडल!!.... ती तर भिकार, टूकार मालिका होती.. आणि कोण धन्य लोक भरले होते त्याच्यात.. एकालाही मराठी बोलता येत नव्हते.. एक काला जल' नावाची मालिका पण आठवते.त्यात सुधीर पांडे आणि संगीता नाईक (nukkaD fem raadhaa) होते.त्याचा title song अनुप जलोटा ने म्हटला होता.
|
Pama
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:03 pm: |
| 
|
ती एक detective serial होती नां, ब्योमाकेश कि व्योमकेश बक्षी होत ते? एक पुनर्जन्मावर होती, बहुतेक, होनी अनहोनी नाव होत
|
Dineshvs
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:06 pm: |
| 
|
वर लालुने उल्लेख केलेल्या अभिनेत्रीची कथा द्यायचा मोह होतोय. स्मिताचा नवरा आजारी असतो. घरात पैश्याची चणचण असते. त्यांचा एक मित्र तिला सिनेमात एक्स्ट्रा चे काम द्यायला तयार होतो. तीपण नाईलाजाने तयार होते. तिथे गेल्यावर तिथले लाईट्स वैगरे बघुन खुप घाबरते आणि पळुन येते. आपल्याला अभिनय कधीच जमणार नाही असे म्हणते. घरी येते तर त्यान्चा घर मालक पैश्याचा तगादा लावायला आलेला असतो. त्यावेळी ती अशी काय बतावणी करते कि तोच शेवटी तिला पैसे देवुन जातो. आणि तिचा हा अस्सल अभिनय बघायला, तो मित्र हजर असतो. यात्रा नावाची एक रेल्वेने स्पॉन्सर केलेली आणि श्याम बेनेगलने दिग्दर्शित केलेली सिरियल होती. त्यात काश्मिर ते कन्याकुमारी आणि गुजराथ ते आसाम असा रेल्वेचा प्रवास दाखवला होता. फ़ार छान होती ती. मराठीतली पहिली सिरियल होती श्वेतान्बरा, विजया धुमाळे ची मुलगी, विक्रम गोखले, वृशाली गोखले, मोहन गोखले होते त्यात. आजहि न विसरलेली सिरियल भारत एक खोज, त्यातला प्रत्येक एपीसोड छान होता. हिन्दीत हमलोग, बुनियाद या पहिल्या मालिका. मग खानदान, ईदर ऊधर, बनते बिगडते, करमचन्द अश्या मालिका एकदम सुरु झाल्या.
|
Lalu
| |
| Thursday, December 29, 2005 - 6:17 pm: |
| 
|
दिनेश, बरोबर. मलाही मोह झाला होता ती कथा लिहायचा. अभिनयाची कला प्रत्येकाजवळ असते मग ती स्टेज किंवा कॅमेर्यासमोर दाखवता येवो न येवो. सुप्रिया, लागू त्यामधे अर्टिस्ट असतात. portraits वगैरे बनवत असतात. नेहमी त्यांच्या स्टुडिओत रात्री काम चालू असते, रात्री लाईट चालू असलेला समोर राहणारा अमोल पालेकर बघत असतो. एकदा तो तिथे जातोही. स्वतःच portrait काढून घ्यायला जातो तेव्हा मात्र तो त्यांच्यातलाच एक झालेला असतो...
|
Shyamli
| |
| Friday, December 30, 2005 - 10:18 am: |
| 
|
उदान सिरिअल आथवते का कुनाला? आनि अजुन एक एअर होस्तेस च्य जीवनावर आधारित होति आनि जुगल हन्स्रज बाल कलाकर होता
|
Shyamli
| |
| Friday, December 30, 2005 - 10:32 am: |
| 
|
are, buniyad, hum log , tamas hya serial visrat ka ani ek, niv serial cha title song sangu shkel ka?
|
Dineshvs
| |
| Friday, December 30, 2005 - 4:48 pm: |
| 
|
ऊडान मधुन कविता चौधरी आणि उत्तरा बावकर पहिल्यांदा दिसल्या. कविता चौधरी त्यापुर्वी सर्फ़च्या जाहिरातीत दिसली होती. एअर होस्टेस मधे किट्टु गिडवानी होती.
|
Chafa
| |
| Friday, December 30, 2005 - 7:28 pm: |
| 
|
रचना, भक्ती बर्वेची भूमिका असलेल्या त्या मालिकेचे नाव ' सावल्या' असेच होते. त्याचे शीर्षकगीतही छान होते. ' मन म्हणे जग जरी दाखवी वाकुल्या तुझ्या माझ्यासाठी अजून थांबल्या सावल्या' असे काहीसे होते.
|
Lalu
| |
| Friday, December 30, 2005 - 7:39 pm: |
| 
|
मिल्या, सुप्रिया आपण एकाच सिरियल बद्दल बोलतोय वाटतं. मी जी ' दौड ' म्हणतेय तीच ' जॉकी ' सिरियल. घोड्यांबद्दल होती. ती बाबा कदमांच्या (cbdg) दौड कादम्बरीवर आधारीत होती. कोल्हापूरच्या गजवानी बंधूनी बनवलेली. त्यात किट्टू गिडवानी होती सुरवातीला. नन्तर तिचे काय झाले कळले नाही..
|
Prajaktad
| |
| Friday, December 30, 2005 - 8:30 pm: |
| 
|
" सांझा चुल्हा " नावाचि पण एक मालिका होति..त्यात पंजाबकडचे शुटिंग होते.
|