Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आत्मविश्वासाचा अभाव असलेला मुलगा. ...

Hitguj » Looking for » Health » आत्मविश्वासाचा अभाव असलेला मुलगा. « Previous Next »

Ashbaby
Saturday, April 05, 2008 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्मविश्वासाचा अभाव असलेला मुलगा.

माझ्या भावाचा मुलगा आता ६ वर्षांचा आहे आणि पहिलीत जायच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी त्याला शाळेने सिनीयर केज़ी वर्ष रिपीट करायला लावले. ह्या वर्षीही तसेच सांगितले पण शेवटी पहिलीत प्रवेशाचे मान्य केले.

हा घरी अगदी सामान्य मुलांसारखा वागतो, अभ्यासात पण गती बरी आहे. गेल्या वर्षी काहीच येत नव्हते पण आईने ह्या वर्षी तयारी करुन घेतलीय. क्लासटिचरचेही मत चांगले होते.

शाळेचा अनुभव चांगला नाही म्हणून भावाने शाळा बदलायचे ठरवले. काल परिक्षा झाली. गेले कित्येक दिवस मुलगा शाळेमुळे मानसीक तणावाखाली आहे. काल तर तो खुपच ढेपाळला. खुप गोंधळुन गेला. वाचलेले काहीच आठवेना. अगदी रडण्याची वेळ आली.

सगळे येत असुन्ही केवळ आत्मविश्वास कमी पडल्यामुळे तो मागे पडतोय. शाळेत सगळ्या मुलांना पुढे जायला देईल आणि स्वत्: मागे राहील. वर्गात हात वर करुन उत्तरे कधीच नाही देणार. सतत सगळ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत राहतो.

अशा मुलासाठी कुठे काऊन्सेलींग उपलब्ध असेल काय? आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावे? हा प्रॉब्लेम फ़क्त शाळेतच येतोय. इतरत्र वागणे अगदी नॉर्मल मुलासारखे आहे. राहायला मुंबईत आहे.


Ajjuka
Sunday, April 06, 2008 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो मुलगा घरात सांगितलेलं सगळं ऐकतो का?
स्वतःने विचार केलेला चालतो हे त्याला शिकवलंय का? की आईबाबांचं ऐकायचं एवढंच शिकवलंय?
घरातले सगळे जण त्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत की क्षणभरही त्याला एकटं सोडत नाहीत. असं काही आहे का?
जेव्हा त्याला एक वर्ष रिपीट करायला सांगितलं होतं तेव्हा घरातली प्रतिक्रिया काय होती?
'काय हे? माझ्या मुलाने असे करावे!'
'माझा मुलगा असून असं होऊच कसं शकतं?'
'कार्ट्या चांगले पांग फेडलेस. आम्ही इथे मर मर राबतोय आणि तू दिवे लाव!'
'एक वर्ष वाया गेलं आता कसं होणार या मुलाचं अशीच वर्ष वाया जायला लागली तर?'
'हा डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याच्या लायकीचा नाहीच तर!'

यापैकी काहीही प्रतिक्रिया असेल आणि ती जर त्याच्यासमोर वेळोवेळी व्यक्त झालेली असेल तर त्याचा आत्मविश्वास ढळणं हे साहजिक आहे.

खरंतर इतक्या लहानपणी एक वर्ष वाया जाणं हे फार काही मोठे नाहीये.
नको इतका अभ्यासाचा बाउ, आलेल्या अपयशाची सत्रांदा उजळणी, त्याबद्दल सतत काळजी, नाहीत्या अपेक्षांचं ओझं या सगळ्या गोष्टी आत्मविश्वास कमी व्हायला कारणीभूत होऊ शकतात.

लहान वय बघता मूल घरातल्यांच्यावर जास्त depend असते emotionally बाहेरच्यांबद्दल कुतूहल आणी आवड असली तरी. तेव्हा समस्येचं मूळ घरातच असण्याची शक्यता जास्त.

Counsellor कडे जाल तेव्हा कदाचित आइवडिलांनाही सेशन्स ना सामोरे जावे लागेल. आपल्या काही चुका असल्यास त्या स्वीकाराव्या लागतील आणि सुधाराव्याही लागतील हे सगळं लक्षात घेऊन मगच जावे. नाहीतर नंतर ego problems सुरू होऊन त्यात मुलाचे अजून नुकसान आणि counsellor वर फुकट ठपक.

वरील परिस्थिती तुमच्याकडे असेल असं नाही. असली तरी ती उघड करायचे तुमच्यावर बंधन नाही. मी केवळ एक शक्यता वर्तवली.


Shonoo
Sunday, April 06, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बै मधे अंधेरीत डॉ. मनोज भाटवडेकर मुलांना आणि पालकांना काउंसीलिंग करतात. त्यांचे लेख व पुस्तकं ही आहेत. माझ्या कडे फोन वगैरे नाहीये. पण अंधेरी, पार्ल्यात चौकशी केल्यास सहज माहिती मिळावी.

Runi
Sunday, April 06, 2008 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर शनिवारच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत डॉ. संदीप केळकर लेख लिहितात मुलांच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल. त्यात त्यांची ही साईट होती
equipkids.net , कदाचीत याचा तुम्हाला उपयोग होवु शकेल.
त्या साईट वर त्यांचा मुंबईतला पत्ता वगैरे सगळी माहिती आहे.

Ashbaby
Tuesday, April 08, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,

दुर्दैवाने, त्याच्या आईची प्रतिक्रिया जरा तीव्र होती. त्याच्या वडीलांनी समजुतीने घेतले. पण त्याचा परीणाम आईवडीलांची भांडणे असा होऊ लागला.

मुला समोरच हा प्रश्न सतत चर्चिला गेल्यामुळे तो तेव्हासुद्धा जरा खचला होता. हे सगळे केवळ आपल्यामुळे होतय, आणि आपण ढ आहोत हेच कारण आहे हे त्याने पक्के मनात ठसवले.

खरेतर त्याला आधीपासुनच शाळेबद्दल अप्रिती होती. पालकांनी कारणे शोधली नाहीत. क्रेशच्या बाईंची तो अगदी गयावया करायचा मला पाठवू नका म्हणून. पण पालकांनी तितकेसे सिरियसली घेतले नाही. मुले आणि पालक संवाद असायला पाहीजे हे पालकांच्या गावीही नसते बहुतेकवेळा. गोड बोलुन मुलांच्या मनातले काढुन घ्यायला कुठे वेळ आहे आजकाल?

पार्ल्यातली नावाजलेली शाळा आहे, पण त्यांचेही मुलांकडे फारसे लक्ष नाही. (अर्थात हा वेगळा विषय आहे.) गेल्या वर्षी वर्ष रिपीट करायला सांगितले तेव्हा पालकांनी जास्त खळखळ न करता संमती दिली. आईलाही मुलाची तयारी किती आहे ते माहीत होते. पण या वर्षी बरेच वाद झाले शाळेबरोबर, मुलाची परत परीक्षा घेतली पण पेपर दाखवायला नकार दिला. ही सगळी चर्चा मुलासमोरच, शिवाय आईबाबांची वादावादी ह्या मुळे बिचारा भांबावुन गेला.

जराही आत्मविश्वास नसल्याचे आता सरळ सरळ दिसुन यायला लागल्यावर पालकांनी आत्मपरिक्षण सुरु केलेय. नशीब हेच की उशीर झालाय पण अजुन वेळ गेलेली नाही.


शोनु, धन्यवाद, नेटवरुन मी डॉ. भातवडेकरांचा पत्ता मिळवला.


साधना.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators