Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 21, 2007

Hitguj » Looking for » General » भरतकाम » Archive through December 21, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Wednesday, December 12, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरतकामाबद्दल माहिती देऊ शकेल आणि काही नमुने वैगरे पहायला मिळतील अशी साईट कोणीतरी सुचवु शकेल का?

Divya
Wednesday, December 12, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, नक्कि काय करायचे आहे?
या खालच्या दोन साइटवर बेसिक माहीती आहे स्टिचेस आणि नॉट्सची.
ह्त्त्प्://व्व्व.फ़िदेल्लॅओम्वेब्स्तित्च्नीद्ले_स्तित्च्त्म्ल
ह्त्त्प्://व्व्व.वेबिन्दिअ१२३ॅओम्/cरफ़्त्नीद्लेएम्ब्रोइएम्ब्रो्त्म्ल
आणि हे येत असेल तर पॅटर्न साठी खालच्या वेब्साइट चेक कर.
ह्त्त्प्://व्व्व.सुब्लिमेस्तित्चिन्गओम्त्रन्स्फ़ेर्प्रेविएव्त्म्ल
ह्त्त्प्://इनमिनुतेअगोॅओम्स्तित्चिन्देक्ष्त्म्ल
ह्त्त्प्://व्व्वरोस्स्-स्तित्च्-पत्तेर्न्स.उस

आपले indian कच्छी टाका वैगरे नाही येत तिथे पण ठिक आहे तुला तुझ्या स्वताच्या ideas वापरता येतील.
नाहीतर joann आणि Micheal म्हणुन शॉप आहेत तिथे सगळे paaterns with materials and instructions मिळतात, ते पण सही असतात.

Karadkar
Wednesday, December 12, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की काय हवेय? जरा डिटेल मधे सांगीतले तर जास्त मदत करु शकेन.

आणि जास्त लोकाना ह्यात interest असेल तर मी थोडेफार टाके शिकवायचा प्रयत्न करु शकेन.


Divya
Wednesday, December 12, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर, मग नेक काममे देर किस बात कि... तुझ लिखाण वाचुन कितीतरी जणी प्रयत्न पण करतील शिकायचा.

Sakhi_d
Thursday, December 13, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या आणि कराडकर धन्यवाद.... :-)

मी खुप वर्षापुर्वी शिकायला सुरवात केली होती पण नंतर वेळेमुळे नाहि जमले. :-( तसे एक - दोनच टाके शिकले होते, आता थोडा वेळ आहे तर म्हटंले शिकावे..... :-)

कराडकर तुम्ही शिकवणार असाल तर मी तयार आहे. कधी सुरवात करायची?? :-)


Mvrushali
Friday, December 14, 2007 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार चांगला आहे मुहूर्त म्हणून:-)
आजच कर सुरुवात,खूप जणींना आहे आवड!नसली तर बघून बघून निर्माण होईल.


Karadkar
Sunday, December 16, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांची इच्छा पाहुन मी एक ब्लॉग सुरु केलाय.

http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/



Itgirl
Sunday, December 16, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही!! :-) आता हा ब्लॉग नियमित वाचून काही शिकता आले तर शिकेन :-)

Panna
Sunday, December 16, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, thank u so much !!
लगेच जाऊन मायकेल्स मधून सामान घेऊन येते! :-)


Karadkar
Monday, December 17, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचा भाग लिहिलाय. समजतो आहे का पहा. पुढे लिहिले की जमेल तशा लिन्क्स देईनच इथे.

Sakhi_d
Thursday, December 20, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज खुप दिवसांनी यायला मिळाले. मिनोती खुप छान माहिती देते आहेस. आता आजच जाताना सगळे सामान घेवुन जाते. आता पुढचा भाग लवकर टाक. येत्या आठवड्यात खुप सुट्ट्या आहेत. त्यांचा सदुपयोग करता येईल...... :-)

Swati_rajesh
Thursday, December 20, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sundar suravat kelit.
Blog mahitipurn aahe. ashich mahiti liha manhanaje tyacha upayog hoil amchyasarkhya navshikhyana.

Grihini
Thursday, December 20, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर अतिशय छान आयडिया आहे तुमची ब्लौग वरुन शिकवायची. (खूप परिश्रमानन्तर ब्लौग जमले बरेका.) तुम्हाला सिन्धी टाका येतो का?

Prajaktad
Thursday, December 20, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर एकदम मस्त आहे ब्लॉग... अगदि सोप्प करुन लिहलयस.. उलट्या टिपेवर पिळाची आईडिया लै भारी!...
चला सुई-दोरे शोधायला पाहिजे..


Karadkar
Friday, December 21, 2007 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पुढचा भाग टाकलाय तो बघायला विसरु नका :-)

गृहीणी, हो येतो सिन्धी टाका. शिकवेन :-)


Grihini
Friday, December 21, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच सिन्धी टाका बर्याच दिवसापासुन शिकायचा आहे. जर अवघड आहे ना लवकर जमत नाही असे ऐकुन आहे.

Vrushs
Friday, December 21, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे ब्लाॅग.ज़मला तर काश्मिरी टाका पण शिकवा ना.

Shonoo
Friday, December 21, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती
मी पण माझ्या सुयारेशीम ठेवायच्या डब्यावरची धूळ झटकलीय आता. काल लायब्ररीतून एक दोन पुस्तकं पण आणलियेत. येत्या आठवड्यात लेकीसाठी काहीतरी करायला घेईन म्हणतेय. छान लिहिलाय ब्लॉग.


Sakhi_d
Saturday, December 22, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती,

परवा घरी जाताना सगळे सामान घेवून गेले आणि लगेच करुन बघितले. तु इतके सोप्पे करुन सांगितले आहेस कि काहिहि अडचण न येता पटकन जमले. आता लवकर लवकर शिकव.
thanx पुन्हा एकदा..... :-)


Itgirl
Saturday, December 22, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिळ घालत उलटी टीप... सहीच :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators