|
Nirnay
| |
| Tuesday, March 07, 2006 - 8:45 pm: |
| 
|
नमस्कार बाळाच्या आगमनाची तयारी कशि करावी य विषयी मला थ्रेड दिसला नाही म्हणुन इथे सुरु करत आहेत मला सध्या या बद्दल माहिती अगदि जरुरि आहे येत्या जुलै मधे माझी ड्यु डेट आहे. तसे बरेच प्रश्न आहेत कि बाळाचि खरेदी कितव्या महिन्यात करावी आणि काय काय करावी? अगदी आवश्यक गोष्टी कोणत्या? इथे अमेरिकेत खरेदी कुठुन करावी कोणती दुकान या खरेदी साठि चान्गली तुम्हा सर्वान्चे अनुभव माहित करुन घ्यायला अगदी आवडेल. निर्णय
|
Asami
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:31 pm: |
| 
|
babybargains नावाचे एक पुस्तक आहे $10-12 ला मिळते. ते पहा. library मधेही असते बहुतेक वेळा
|
Bee
| |
| Friday, March 10, 2006 - 3:53 am: |
| 
|
नाळ गळून पडेपर्यंत बाळाला झबले घालावे का? झबले जरी नाही घातले तरी अंगावर मुलायम पांघरून जरी असले तरी त्याचे एक ओझे म्हणा किंवा रुतणे म्हणा बाळाला होत असावे का? मला मुंबईतून ताईसाठी feeding gowns विकत घ्यायचे आहेत. जर कुणाला चांगली दुकाणे माहिती असतील सांगा. निर्णय, जुलै अजून बराच लांब आहे तरीपण तू दुकाणे शोधून ठेवू शकते. खूप बरे वाटते बाळाचे कपडे विकत घेण्यासाठी आपण जेंव्हा बाहेर पडतो. store मध्ये गेल्यानंतर ऐवड्या छोट्या मुलांचा किती विचार करून कपडे शिवलेले असतात आणि आयांचाही त्यात विचार केलेला असतो. मी कमरेला आवळून घेणारी एक गोल उशी विकत घेतली आहे. त्यावर बाळ ठेवले तर nursing सोपे जाते. कपडे विकत घेतला, बटन कुठले आहेत, ते टोचतील का, मानेखाली जाड रुतेल असा भाग येईल का, शिवण कशी आहे, कशे अडकतील का, जाड आहे की मुलायम आहे, धुवायला, वाळवायला, पाणी शोषायला कसे आहे ह्या सगळ्यांचा विचार करून विकत घे. शिवाय बाळाला उचलून त्याला कपडे घालणे थोडे कठीण आहे. कारण ती खूप नाजूक असतात, मान सांभाळू शकत नाहीत, हात मागे पुढे करू शकत नाहीत. ताठ झोपू शकत नाहीत. म्हणून जरा comfortable कपडेच विकत घे. तुलाही नीट जमेल आणि बाळालाही बरे होईल असे. तू भारताबाहेर असल्यामुळे कुठे एखादे सहान मिळते का ते बघ, घुटी उगाळायला लागेल नंतर. तसेच वेखंड, जायफ़ळ, भारशिंग, आंबेहळद, खोबरेल तेल, घरचे बेसेन, साधी हळद, तुझ्यासाठी साजूक तूप हे सगळे वेळेवर तुला अगदी fresh stock मिळू शकेल अशी व्यवस्था करून ठेव. हे सर्व करेपर्यंत तुझी due date जवळ येईल. सध्या baby kicks enjoy कर
|
Bee
| |
| Friday, March 10, 2006 - 5:33 am: |
| 
|
Pl read back to sleep part: is it really true that newborn should put to sleep on their backs? aapalyaakaDe aapaN asech karato kaa? http://www.gerber.com/promos/prodact?actid=bed&promoid=314
|
Storvi
| |
| Friday, March 10, 2006 - 4:44 pm: |
| 
|
Bee, newborns should be made to sleep on their backs. Sleeping on thier tummies can put them at an increased risk of SIDS Sudden Infant Death Syndrome. This is a situation where a child suffocates to death, because the child is too young to realize it is running iut of breath and remedy the situation. It therefore does not happen in older children. my freinds are now putting their babies to sleep on their tummies(a trend that was present here in the US and has now been reversed) It is certainly not advisable to do that.
|
Bee
| |
| Saturday, March 11, 2006 - 3:11 am: |
| 
|
Thank u very very much.
|
Supermom
| |
| Saturday, March 11, 2006 - 1:51 pm: |
| 
|
nirnay,tase deals tar khoop thikani milataat pan ekaach thikani sagali kharedi karayachi asel tar babys r us khoop bare padate kharedila.an car seat nako visaroos.
|
Aarti
| |
| Monday, April 24, 2006 - 11:01 am: |
| 
|
इथे छान माहिती मीळाली... माझेही काही प्रश्न आहेत... अगदी सुरवातीला काय काळजी घ्यावी ते कोणी सांगु शकेल का? सध्या माझा १.५वा महीना चालु आहे... पहिली वेळ.. आई वडीलां पासुन लांब... काय करावे.. काय करु नये... काय खावे,काय खाउ नये... काही कळत नाही... कोणी मदत करेल का?
|
Moodi
| |
| Monday, April 24, 2006 - 11:08 am: |
| 
|
आरती अग आत्तच भारतात जाऊन आलीस न? गर्भसंस्कार नावाचे पुस्तक आहे, ते जमल्यास तुझ्या बहिण किंवा भावामार्फत भारतातुन मागवुन घे. अतिशय चांगली माहिती आहे. www.rasik.com या साईटवर पण ते असेल उपलब्ध तर मग तसे त्यांच्याकडुन मागवुन घे. साईट चांगली आहेच. पण जर भारतातुन कुणी पोस्ट वा कुरिअरने पाठवत असेल तर चांगलेच.
|
Aarti
| |
| Monday, April 24, 2006 - 11:24 am: |
| 
|
होय मुडीताई.. आताच जाउन आले... पण काही घ्यायच लक्शातच आले नाही... बघते कोणी येत असेल तर.. नाहीतर साईट वर ओर्डर करीन...
|
Moodi
| |
| Monday, April 24, 2006 - 11:36 am: |
| 
|
आरती इथे आहेत काही उपाय, जर आणखी सापडले तर देते लिंक. /hitguj/messages/103387/106540.html?1144931321 . आणी या लिंकमध्ये बघ, एकदम शेवटी काही उपाय आहे. अर्थात वेळ मिळाला की पुर्ण माहिती वाचुन काढ. /hitguj/messages/103383/101985.html?1137195022 .
|
Aarti
| |
| Monday, April 24, 2006 - 11:44 am: |
| 
|
Thanks मुडीताई.... वाचुन काढ्ते सगळे... पण मला काही त्रास होत नाही.. मला काय कराव काय करु नये.. काय खावे काय खाउनये ही माहीती हवी आहे
|
Aarti
| |
| Monday, April 24, 2006 - 12:43 pm: |
| 
|
वाचली माहीती... खुपच छान आहे... मला उपयोग नक्किच होईल... Thanks once again...
|
Swati
| |
| Wednesday, April 25, 2007 - 8:57 pm: |
| 
|
माला क्रिब मत्रेस्स विशयी कोणी माहिती देइल का? कुणाचे काही बरे वाइट अनुभाव? म्हण्जे posture pedic/ spring loaded etc
|
Saket
| |
| Friday, April 27, 2007 - 7:50 pm: |
| 
|
मला कार सिटबद्दल कोणी गाईड करु शकेल का? नवजात बाळासाठी infant car seat घेणे चांगले की convertible car seat? कंपनी कुठली चांगली? travel system चे तुमचे अनुभव कसे आहेत? ऑनलाईन खरेदी करतांना काय काय बघुन घ्यावे? थॅंक्स इन ऍडव्हांस.
|
Saket
| |
| Tuesday, May 01, 2007 - 1:54 am: |
| 
|
हेलो, कोणीच नाही का इथे कार सिटबद्दल माहिती देणारे?
|
Farend
| |
| Tuesday, May 01, 2007 - 4:02 pm: |
| 
|
Saket ऑनलाईन पेक्षा दुकानात जाऊन घेणे कधीही चांगले (कार सीट. ही जनरल कॉमेंट नाही). Graco चे आम्ही वापरलेय, चांगले आहे. Eddie Bauer वगैरे आणखी बर्याच कंपन्या आहेत. मध्यंतरी या सगळ्यांचे safety rating बद्दल consumer reports मधे बरीच माहिती आली होती, त्यांच्या वेबसाईट वर कदाचित मिळेल. travel system म्हणजे सीट आणि स्ट्रोलर एकत्र ना? शक्यतो तसेच घेणे चांगले. पण घडी किती छोटी होते आणि गाडीच्या ट्रंक मधे बसेल का वगैरे बघावे लागते. US मधे तुम्ही जेथे राहत असाल तेथील बीबीवर तुम्हाला जवळच्या चांगल्या दुकानांची नावे मिळतील Toys/Babies R Us वगैरे. Babies R Us मधे सर्वात जास्त variety असते त्यामुळे सगळे अगदे एकाशेजारी एक ठेउन बघता येतात. त्याखालोखाल बहुधा Target मधे असेल.
|
Graco Snugride Infant Car Seat चांगले आहे
|
Shonoo
| |
| Tuesday, May 01, 2007 - 5:02 pm: |
| 
|
साकेत लहान बाळांसाठी छोट्या कार सीटस असतात. त्याचा बेस गाडीतच रहातो आणि बाळाची सीट एखाद्या परडी सारखी असते ती बाळासकट काढता घालता येते. बाळे गाडीत झोपून पडतात अशा वेळी त्या सीट सकट उचलुन नेवून घरात ठेवणे सोपे पडते. ती सीट उचलायचे handle किती सोयीचे आहे हे प्रत्यक्ष सीट उचलून पाहून ठरवावे. साधारण पणे बाळ वीस ते पंचवीस पाउंड होईपर्यन्त या सीट वापरता येतात. ती सीट स्ट्रोलर वर पण बसवता येते. त्यामुळे बाळाला सारखे सीट मधून काढ्घाल करावे लागत नाही. घरात दोन गाड्या असतील तर एक जास्तीचा बेस वेगळा विकत घ्यावा. म्हणजे सीट कुठल्याही गाडीत लावता येते. बेस सुद्धा सारखा काढ्घाल करून नये. अगदी तान्ही बाळे त्या सीटमधे नीट रहात नाहीत. त्याकरता त्यांच्या डोक्याच्या बाजूने आधार देणारी horse shoe च्या आकाराच्या उश्या मिळतात त्या घ्याव्यात. लहान बाळांची सीट Back facing ठेवायची असते. अशा वेळी गाडी एकट्याने चालवावी लागली, बाळाच्या शेजारी कोणी नसेल तर बाळ काय करतंय ते दिसावं म्हणून मागच्या काचेला लावायचा आरसा मिळतो तो घ्यावा. BabiesRus सारख्या दुकानात बाळाकरता लागणार्या वस्तुंची बरीच लाम्बलचक यादी देतात. त्यातील सर्वच गोष्टी लागतात्/ वापरल्या जातात असं नाही. चार चौघांशी बोलून, स्वत: विचार करून मगच वस्तू घ्याव्यात.
|
Asami
| |
| Tuesday, May 01, 2007 - 5:31 pm: |
| 
|
babybargains नावाचे एक पुस्तक आहे , ते check करा. त्यात सध्याच्या car seats ची माहिती आणी ratings etc मिळतील. हे पुस्तक public libarry मधेही सहज मिळते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|