|
Bee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 7:46 am: |
|
|
मला तातडीने एक माहिती हवी आहे. जर ११ वी विदर्भात केलेली असेल आणि आता १२ वी साठी पुण्याला जायचे असेल तर पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल का? ती विज्ञान शाखेत आहे. विदर्भात खूप शिकवण्या असतात १२ वीला. बहुतेक विद्यार्थी शिकवणी लावूनच विषय समजवून घेतात. तसेच पुण्यात आहे का? सध्या तिचा १२चा अर्धा syllabus संपला देखील. दिवाळी पर्यंत पुर्ण syllabus शिकवून होईल. पण जर मधेच पुण्यात जायचे नक्की ठरले तर तिची सर्व लिंक तुटेल अशी एक भिती आहे. आता ११ वीची परिक्षा संपली आहे. महिनाभरात निकाल लागेल. म्हणून माहिती काढतो आहे.. कृपया जाणकारांनी मदत करावी..
|
Bee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 7:50 am: |
|
|
विज्ञान शाखेसाठी चांगली महाविद्यालये कोणकोणती आहेत आणि कुठे आहेत..
|
Suyog
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:05 pm: |
|
|
modern college aahe thode donation dile tar houn jail i think baki ferguson S.P.college or junior college vidyabhawan modern ganesh khind aahe
|
Runi
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:10 pm: |
|
|
बी, तु जे म्हणतोयस ते बहुतेक सगळी कडेच चालते, म्हणजे ११ वी मधेच १२ वी चे शिकवायला सुरुवात करतात आणि १२ वीच्या वर्षात दिवाळी पर्यन्त सगळे शिकवुन संपलेले असते. आणि १२ वी साठी private classes तर संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. पुण्यातील नावे हवे असतील तर, मी स्वत (स.प.) सर परशुरामभाउ ला होते. ते चांगले आहे. फ़र्ग्युसन, गरवारे, माॅडर्न, वाडीया ही सगळी नावजलेली महाविद्यालये आहेत. पण तिथे ११ नंतर कसा प्रवेश मिळतो याची मला माहिती नाही. माझ्या वेळी तरी असेच लोक १२ वीत प्रवेश घेवु शकत होते ज्यांच्या पालकांची बदली पुण्यात झाली आहे किंवा काहितरी सबळ कारण आहे. आणि माझ्या मते तु हा पण विचार करावास कि ती पुण्यात नविन असेल तेव्हा नविन ठिकाणी जुळवुन घेणे, नविन मित्र-मैत्रीणी मिळवणे या सगळ्याची पण तिला (अभ्यासा व्यतिरीक्त) तयारी ठेवावी लागेल. रुनि
|
विज्ञान शाखेसाठी चांगली महाविद्यालये कोणकोणती आहेत आणि कुठे आहेत.. >>>>>> कळविण्यास अत्यन्त खेद वाटतो की कोणतेही महाविद्यालय धड नाही किम्बहुना कोणत्याही महाविद्यालयात मुळी काही शिकवीतच नाहीत. जे काही'शिकवितात' ते मोले घातले रडाया ना आसू ना माया अशा प्रकारातले असते. कारण बहुसंख्य मुले ही खाजगी क्लासेसला जातात. वर तुम्हीच सांगितल्याप्रमाणे सिलॅबस खूप आधीच शिकवून झालेला असतो. त्यामुळे वर्गात बसले म्हणजे अठराव्या शतकात वावरतो असे मुलाना वाटते त्यामुळे त्यांचे लक्ष नसते व गोंधळ घालणे चित्रविचित्र आवाज काढून वर्गात अशान्तता करणे असे उद्योग चालू असतात. हुशार मुले मग इथे वेळ'घालविण्या'पेक्षा घरीच अभ्यास करतात व टवाळ मंडळी बागेत, कॅन्टीनम्ध्ये, थेटरात, रस्त्यावर,कट्ट्यावर आयुष्याचे सार्थक करतात. त्यामुळे शाळा कॉलेजेसचा उपयोग आता फक्त' उरलो बोर्डाच्या रजिस्ट्रेशनपुरता' एवढाच आहे. मुले येत नाहीत म्हणू आलेले'गुरुजन' पाट्या टाकणार्या ख्रिस्ती पाद्र्याच्या तन्मयतेने पुढ्यातील'अल्पसंख्याकाना' विद्यादान" करत असतात. बर्याचदा पुरेशी मुले नाहीत म्हणून तेही वर्गावर येण्याचे कष्ट टाळतात. एस. पी. , फर्ग्युसन,गरवारे ही नावे आता द्रविड, तेन्डुलकर, धोनी, अशी प्रभावहीन झाली आहेत.वर रुपालीने म्हटलेच आहे ही नावाजलेली महाविद्यालये आहेत. पण ती दर्जेदार आहेत असा दावा तिनेही केलेला नाही... त्यामुळी मिळेल तिथे admission घ्यावे व खाजगी क्लास लावून अभ्यास करावा.. तशी आर्थिक कुवत नसेल तर केवळ वर्गाच्या अध्यापनावर विसम्बून शिकणार्या गोरगरीब विद्यार्थ्याना पुण्याच्या शिक्षण व्यवस्थेत काहीही स्थान नाही हे कटू वास्तव लवकरात लवकर स्वीकारावे हे उत्तम..(खरे तर असे विद्यार्थी don't deserve to be survive )त्याना जगण्याचा अधिकारच नाही.
|
Bee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 2:57 am: |
|
|
बरी माहिती मिळाली. मला वाटले होते पुण्यात खूप छान शिकवतात. गेले ते दीन गेले असेच आता म्हणायला हवे. कारण माझ्या वेळी सकाळी ७ वाजता पासून दुपारी १ पर्यंत लागून तास असायचे. वर्गात भरपूर शिकवले जात असे. मी तर जीवशास्त्राची शिकवणी लावली होती पण नोट्स मात्र वर्गातल्याच वापरल्या होत्या. ईंग्रजीच्या बाई एक एक कविता दोन दोन तास शिकवायच्या. असो.. धन्यवाद सगळ्यांना..
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|