Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 25, 2007

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » भाषा » मराठी शब्द » Archive through February 25, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Saturday, February 04, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळेवर येत नाही आणि वाट बघायला लावते म्हणून......(दिवे घ्याच नाहीतर माझे काही खरे नाही)

इंग्रजी शब्दांचे मराठीत लिंग ठरवायला Competent Authority नाही म्हणून ती विमान, तो विमान काहीही म्हटलं तरी...


Moodi
Saturday, February 04, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय धन्यवाद. वाट बघायला लावते ते खरेच हो, त्या गाडीलाच दिव्याची आरती कराविशी वाटते त्या वेळी.

Bee
Wednesday, February 15, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राने त्याच्या बायकोचे नाव सांगितले आणि पूर्वाश्रमीची नंतर तिचे आडनाव लिहिले. खूप श्रवणीय शब्द आहे हा!

पूर्वाश्रमीची ह्याचा अर्थ लग्ना अगोदरची असा होता का? पण हा शब्द मी इतर ठीकाणीही वाचला आहे.

ह्या पूर्वीची, ह्या आधीची असा अर्थ मी काढला आहे.

दुसरा शब्द, दृक श्राव्य ह्याचा अर्थ काय?

मदतीबद्दल धन्यवाद!


Maitreyee
Wednesday, February 15, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वाश्रमीची या शब्दात लग्ना आधीची असा अर्थ अभिप्रेत आहे. हा शब्द प्रयोग बहुधा पूर्वी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम अशी ४ आश्रमांवर आधारित जीवन पद्धती होती त्यातून आला असावा..


आणि काय रे बी, दृक श्राव्य चा अर्थ माहित नाही? काहीच्या काहीच सांगू नकोस, अन्दाज कर पाहू तूच
:-O ~D

Bee
Thursday, February 16, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, ब्रह्मचर्याश्रम, गुहस्थाश्रम ही फ़क्त दोनच नावे झालीत, ४ पैके दोन नावे विसरलीस का?

पण मी आपल्याच एका मायबोलिकरणीच्या लेखात असे वाचले आहे की आता जिथे आमची घरे आहेत तिथे पुर्वाश्रमीची शेती होती. म्हणून मला काही कळले नाही. म्हणजे पुर्वी तिथे शेती होती हे कळले पण पुर्वाश्रमीची ह्या शब्दाचा अर्थ फ़क्त ह्या पुर्वी, ह्या आधी ऐवढाच होतो असे वाटते मात्र ह्या शब्दाची फ़ोड अगदी भारी आहे. पूर्वा अधिक श्रमीची बरोबर पुर्वाश्रमीची अर्थात ह्या पुर्वीची. पटत नाही ना? मला तरी नाही पटत.

दृक श्राव्य हा शब्द मला नविन नाही, काल अजुक्काच्या शून्य प्रयोगोबद्दल वाचले तेंव्हा अर्थ लक्षात घ्यावासा वाटला. श्राव्य म्हणजे ऐकणे, श्रवण करणे. दृक म्हणजे काय हे मला माहिती नाही. अंदाज कर म्हणतेस तर तेंव्हा... मला वाटते दूरून, नजरेस न येणार्‍या अशा ठिकाणाहून कुणीतरी गात असेल, काहीतरी म्हणत असेल आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या हालचाली होत असतील. दृक, अर्थात दृष्टीक्षेपास न पडणारे, दूरवरचे.. खूप दूरवचे.

जाउ दे.. मी खूप कच्चा आहे ना, तुच सांग आता नेहमीप्रमाणे.


Milindaa
Thursday, February 16, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. ..

Limbutimbu
Thursday, February 16, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होऽऽऽऽ, ( मला तरी ) आरशात बघितल की उदाहरण दिस्त! DDD
जोक्स अपार्ट बी,
१) टीव्ही, चित्रपट ही दृकश्राव्य माध्यमान्ची उदाहरणे ज्यात दृक म्हन्जे बघणे श्राव्य म्हन्जे ऐकणे दोन्हीही अन्तर्भुत असतात
२) वर्तमानपत्रे, पुस्तके वगैरे केवळ दृक माध्यमे तर
३) रेडिओ, टेप रेकाॅर्डर ही केवळ श्राव्य माध्यमे
मला वाटल आता तुला कळू शकेल!
बायदीवे हितगुजच्या या माध्यमाला कसले नाव देता येइल?
:-)

Gajanandesai
Thursday, February 16, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e -दृक .. .. ..

Psg
Thursday, February 16, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगूज हे मूक-दृक होऊ शकेल :-) कारण आपण बोलत नाही, टाइप करतो म्हणून मूक आणि बघतो, किंवा वाचतो म्हणून दृक!!! :-) :-)

Maitreyee
Thursday, February 16, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पूर्वाश्रमी ची फ़ोड तू पूर्वा आणि श्रम म्हणत आहेस ते चूक वाटत आहे. :-)
पूर्व + आश्रम असे असावे ते.
आणि ४ आश्रम कोणते ती नावे देण्याचा मला इथे संबन्ध वाटला नाही म्हणून लिहिली नाहीत:-O


Chandya
Friday, February 17, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, फार फार वर्षापुर्वीची गोष्ट आहे ही. हिंदू पुरुषाच्या जीवनातील चार प्रमुख टप्पे ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटी सन्यासाश्रम. स्त्री साठी फक्त पहिले दोनच टप्पे मानले जात. त्यात लग्नानंतर आडनाव ( क्वचित नाव देखिल ) बदलले जाई. म्हणून विवाहित स्त्री पुर्वाश्रमीचे नाव अमके नि तमके असे म्हणते. ती गम्मत पुरूषांच्या नशिबी नाही.

सध्या फक्त शिक्षणासाठी ' शारदाश्रम ' आणि पोट भरण्यासाठी गोविंदाश्रम ' आहेत.


Bee
Friday, February 17, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, छानच माहिती मिळाली. बघ मिलिंदा दुसर्‍यांच्या अज्ञानावर न हसता इथली सर्व मंडळी भरभरून माहिती देतात. ह्यांच्याकडून काहीतरी शिक!

चन्द्या, मैत्रेयी, लिंबुटिंबु सर्वाचे आभार.

अजून बरेच शब्द आहेत पण जाऊ द्या.. उद्या परवा विचारीन. तोवर तुम्ही आराम करा :-)


Savyasachi
Friday, February 17, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा, e दृक जबरदस्त :-)
चन्द्या गोविंदाश्रम खास
बी, उद्या परवा नको रे, आता सोमवारीच विचार. weekend जरा निवांत जाउ दे ! गडबडा लोळायला ( बघ मिलींदकडे) पण श्रम ( सद्याश्रमीच) पडतात रे ! :-)


Pratap_sanji
Tuesday, April 25, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Purvashramicha:- mhanaje ya purvi jyachhi olakh vegalya arthane, navane kiva vegalya rupane hot hoti. pan aata tyachhi olakh badalli aahe. jase ekhadya muliche lagna jhalyavar tichhe nav, adnav badalte. tasech kumarichya jagi sao lavale jate.


Rakhee
Monday, May 01, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे हा प्रश्ण विचरणे योग्य आहे का माहित नाही. पण तरीहि विचारते. मी माज्या मुलिसाठी मराठि मुळाक्शरे ट्रेस करण्या साठी शोधत आहे. कोणाला एखादि वेबसाइट माहिती आहे का

Robeenhood
Monday, May 01, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी दृक श्राव्य हे Audio Visual या शब्दाचे भाषान्तर आहे....
Audio Visual Aids म्हणजे बघण्याची ऐकण्याची अथवा दोन्ही एकत्र सोय असलेली साधने शिक्षण शास्त्रात याला फार महत्व आहे. रेडिओ, टेप ही audio साधने आहेत तर पहाता येनारी चार्ट्स, नकाशे, चित्रे, फ़िल्म्स, फोटो,प्रिन्टेड मॅटर ही visual मध्यमे आहेत कधी कधी ती कम्बाईनही असतात. उदा. व्हिडिओ फिल्म, चित्रपट, टीव्ही.वगैरे


Milindpadalkar
Wednesday, May 17, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Marathi madhe 'TABLE' la kaay shabda aahe?

Milindaa
Wednesday, May 17, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेबल = मेज
Context बदलला तर
टेबल = तक्ता, मांडणी इ.


Avdhut
Monday, November 13, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी,
जुणे मराठी ग्रंथ जसे दासबोध वाचण्याचा प्रयत्न केला की बरेच शब्द अडतात. या जुन्या शब्दांची dictionary कुठे आहे का?


Meghdhara
Sunday, February 25, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी

निवाळा या शब्दाचा अर्थ मला प्रूफ़ की हमी हे कनफ्युजन आहे. आणि अजुन विचार केला तेव्हा हा शब्दच आहे की नाही असं वाटतय..

वाट बघते.

मेघा


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators