|
Ek_mulagi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 7:31 pm: |
| 
|
सहा महिन्यांनी भारतात दोन मुलांसोबत्- वय ३ आणि ९- परत जातोय( for good )., जून-आॅगस्ट २००७. USA मधून काय्-काय घेवून जायला पाहिजे? कुठल्या गोष्टी भारतात मिळतात? कुणाचे काय अनुभव आहेत? Please मदत करा.
|
EM, Google आणि MSN वर R2I चे groups आहेत, ते पाहीले का? त्याच्यावर बरीच माहीती मिळेल.
|
EM अभीनंदन. खरच सांगतो काहीही घेऊन जायची गरज नाही. तिथे सर्व मिळते. फक्त मनाची(च) तयारी जास्त महत्वाची आहे नी तुलना करायची नाही असे ठरव.
|
Sherpa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:13 am: |
| 
|
मी ३ वर्षापुर्वी परत आलो आहे माझे काही अनुभव असे तुम्ही सामान Ship ने पठवणार का नाही त्यावर बरेच depend करेल जर तुम्ही ship करणार असाल तर १. NO electronics except selected few items like Plasma TV or Bose system. हे इकडे अजुन खुप महाग आहेत. NO microwave no cost advantage plus service issues २. few toys from fischer price or learing games हे इकडे मिळतात पण थोडे महाग आहेत. पण शेवटी किती आणणार हा पण एक भाग आहे असो.. ३. Cotton Socks, Light winter Jackets for kids ४. केशर ५. branded sport shoes मला वटणारी list प्रत्येकाचे मत वगळे असेल चु.भु. समजुन घ्या... अजुन काही specific info हवी असेल तर जरुर कळवा.. भारतात परत येण्यासाठी Good Luck
|
वरची तिन्ही उत्तरे वेगवेगळ्या अर्थाने परिपूर्ण आहेत .. अजून काही मदत लागली तर तुम्ही इमेलने किंवा इथे विचारू शकता. आम्हीही USA मधे सव्वापाच वर्षे राहून स्वेच्छेने ( !!! ) परत आलो मागच्या वर्षी. तुम्हाला शुभेच्छा !
|
Shonoo
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:47 pm: |
| 
|
माझ्या माहितीत US मधे दहा बारा वर्षे राहून दोन मुलींना घेऊन फक्त आठ बॅगा घेऊन गेलेले कुटुम्ब आहे. आणि ३-४ वर्षे राहून सर्व घराला लागणारं सामान washing machine, dryer, air conditioner, furniture etc एक कंटेनर मधून शिप केलेला एकटा ( तेंव्हा) मुलगा आहे. दोघेही ही आता जवळपास ५-६ वर्षे भारतात आहेत आणि मजेत आहेत. काय न्यावं आणि नेऊ नये हे व्यक्ति, स्थल आणि काल सापेक्ष आहे. वर नमूद केलेल्या आणि तसल्या इतर ग्रूप मधे वाचून स्वत: ठरवावे.
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 3:57 pm: |
| 
|
Kalandar,Sherpa,Shonoo,Rahul,Kedar धन्यवाद. आम्ही पुण्याला परत जातोय. पुढच्या आठवड्यात US ला येवून आठ वर्ष होतील. येताना ५ बग घेवून आलो होतो. आता अख्ख घर भरून सामान झालय:-)) Furniture /kitchen appliances नेण्याचा विचार नाही. मागच्या आठ वर्षात भारतातल market बदलल. पुणे आमच्यासाठी नवीन आहे. मनाची तयारी झालीय, बस्स सामानाची आवराआवर चाललीय.
|
Sherpa
| |
| Thursday, December 21, 2006 - 4:40 am: |
| 
|
अजुन एक गोष्ट लक्षात आली एकडे परत आल्यावर forigneres registration करायला विसरु नका ( If your kids are US Citizens). Green Card साठी काय नियम आहे मला माहित नाही.
|
एक मुलगी, पुण्यात तुझ स्वागत हे!
|
मला अनुभव नाही पण...... परदेशातुन परत भारतात येताना गाठीशी बक्कळ पैका बान्धुन घेवुन यावा! इकडच्या (माझ्यासारख्या) लहानग्यान्ना वाटायला म्हणुन तिकडुन चॉकलेट्स आणायचे कष्ट करु नयेत, ती इथल्या इथे कुठेही सुपर मार्केट मधे सहजी उपलब्ध असतात! कीचन मधिल आणि अन्य रोजच्या वापरातील अनेकानेक वस्तुन्वर जीव जडलेला असतो, टाकू म्हणुन टाकवत नाही की कुणाला विकत किन्वा फुकट देववतही नाही, तरीही त्यान्चा मोह सोडुन केवळ कपडे, नैमित्तीक दैनन्दीन गरजेच्या वस्तु केवळ बरोबर घ्याव्यात अन्य वस्तुन्ची योग्य विल्हेवाट लावावी कारण कीचन मधिल किन्वा अन्य इलेक्ट्रिकल गोष्टी परदेशातील व्होल्टेज आणि इकडिल यात तफावत असल्याने एकतर कुचकामी ठरतात किन्वा त्यान्च्याकरता पीन सॉकेटपासुन स्वतन्त्र व्यवस्था करावी लागते, त्याशिवाय त्यावर किती जबर ड्युटी भरावी लागेल ते देव आणि कस्टम जाणे! त्यापेक्षा इकडे तुलनेत कमी किमतीत भरपुर नविन वस्तु घेणे जास्त परवडेल व नविन वापरल्याचे समाधानही मात्र यायच्या आधी जिथे राहिलात त्या जागेच्या कानाकोपर्याचे फोटो काढण्यास विसरु नका! तसेच तेथिल जागेची आठवण म्हणुन एखादी तुमच्या पसन्दीची वस्तु जरुर इकडे आणा! आणिक काय? निघताना, ज्या वास्तुत राहिलात ती सोडताना तेथिल शेवटचा स्वयम्पाक करुन दहिभाताचा नैवेद्य तेथिल वास्तुदेवतेस जरुर दाखवुन मग ती वास्तु सोडावी 
|
Gurudasb
| |
| Friday, December 22, 2006 - 4:08 am: |
| 
|
लिम्बुभाव , तुझ्या मनमोकळ्या सुचना मोलाच्या वाटल्या , पण शेवटच्या चार ओळीने भारावून गेलो . खरंच .
|
गुरुदास, खोटा नाय बोलत पण लहानपणी वडिलान्बरोबर खुप फिरलो तेव्हा धर्मशाळेत उतरायचो, एखाद दोन दिवस राहीलेली धर्मशाळा देखिल आपली आणि हविहविशी वाटायची, कदाचित लहानपणि नाविन्याबद्दलची उत्सुकता आणि जवळिक कारणिभूत असेल, पण ती ती प्रत्येक धर्मशाळा आजही नजरेसमोर उभी रहाते, तेथिल वास्तव्य आठवते, ती सोडताना तेव्हाही जीव हळवा झालेला, आज नुस्त्या आठवणीनेही तसच होत, तर मग आठ आठ वर्षे जिथे काढली ते ठिकाण, त्या वस्तू सोडताना काय बरे वाटत असेल? वन कॅन इमॅजिन!
|
Ek_mulagi
| |
| Friday, December 22, 2006 - 1:13 pm: |
| 
|
LT अगदी खर बोललात. काॅलेज संपल्यावर होस्टेल सोडताना शेवटच्या रात्री मी वेड्यासारखी होस्टेलभर फ़िरले, त्या भिंतींशी बोलत बोलत त्यांचा निरोप घेत रात्र कधी संपली कळल नाही. सकाळी जागरणाने (अन रडून ) लाल डोळ्यानी मी त्या वास्तूचा निरोप घेतला. या घरात राहुन ५ वर्ष होतील. हे आमच पहिल मालकीच घर. बघायला आलो पहिल्यांदा तेव्हा पाय टाकल्याबरोबर प्रसन्न वाटल. घराने, त्या वास्तुने " या, बसा" म्हटल्यासारख. ५ वर्षातल्या ५ लाख आठवणी! विकायचा बोर्ड लावताना कंठ दाटून आला होता. त्याही रात्री मी असच घराशी बोलत बसले होते. आता प्रत्यक्ष सोडून जाताना परत "जागरण" आहेच:-)) असच नात घरातल्या प्रत्येक गोष्टीशीही आहे. ती वस्तू सोडताना,टाकताना म्हणून जड जात.
|
Zakki
| |
| Friday, December 22, 2006 - 4:30 pm: |
| 
|
शिवाय माझ्या मित्राचा सल्ला विचारात घ्या. त्याच्या मते माणसाला सर्वत्रच काही काही प्रॉब्लेम्स असतात. तेंव्हा भारतात हे असे, नि अमेरिकेत तसे असले विचार करत बसू नका. जिथले प्रॉब्लेम्स सोडवणे जमेल तिथेच रहा. उगाच काही वाईट वाटून घेऊ नका नि दुसर्याला वाईट वाटेल असे बोलू नका. भारत काय नि अमेरिका काय, स्वतंत्र देश, त्यांना जसे वागायचे तसे ते वागणार. नशीब तुमचे, तुम्हाला पण स्वातंत्र्य आहे.
|
Gondhali
| |
| Saturday, December 23, 2006 - 7:26 pm: |
| 
|
एक्_मुलगी, पुण्यात स्वागत काही माहिती पाहिजे असेल तर सांग
|
L T अगदि खरे बोललास.... ज्या वास्तुत आपन राहतो.. त्या वास्तुवर खरचच खुप जिव जडतो मी डोंबिवलीला घर घेतले..३ वर्शानी काही कारनानी ते विकले पन त्या घरातुन जायचे या मुळे दोन दिवस झोपलो नव्हतो.. आजही जेव्हा मी त्या सोसायटी समोरुन जातो.. पटकन आत जाउन यावेसे वाटते अजुनही कोनाला पत्ता सांगताना पटकन जुनाच पत्ता सांगितला जातो आम्ही त्या घरातुन निघ्ताना एक नारळ दही भाताचा नैवद्य.. आनी पान्याची लोटी भरुन ठेवली होती.... ज्याना वीकली त्यानाही पेढ्याचा पुडा दिला होता... एक्_मुलगी तुम्हीही तसेच करा
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:03 pm: |
| 
|
Dear Friends, We are planning to go back to Pune(I am from Mumbai but studied in Pune just love it too much!). I am looking for settling in Pune. baner area. How is that area w.r.t schools, shopping malls, theatres, good neighborhood etc. I am looking for a decent place there. any opinions/help will be greatly appreciated. Thanks so much in advance
|
Radhe
| |
| Tuesday, May 08, 2007 - 4:49 am: |
| 
|
lt अगदी साध्या पण किती भारदार शब्दात मांड्तोस रे बाबा. मी औरंगाबाद्चे होस्टेल सोडले तेव्हाही मन असच भरुन आलं होतं.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|