Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2006

Hitguj » Looking for » General » पुण्यात जागा घेणे » Archive through November 08, 2006 « Previous Next »

Prajaktad
Sunday, November 05, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोधुनही सबंधित बीबी मिळाला नाही..म्हणुन नविन बीबी उघडत आहे..
ही माहिती मी आधि विचारलिय तरि परत विचारतेय..
पुण्यात सध्या जागेचे आणि flats चे भाव काय आहेत?तसच investement च्या द्रुष्टिने चांगला area कोणता?


Kedarjoshi
Sunday, November 05, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ओंध ते बायपास मधला कुठलाही नविन flat, row house मगर पट्टा, खराडी, NIBM, कोथरुड, कोथरुड हिंजवडी ला जानार्या बायपास वर च्या जागा जसे पाषान ईकडे भरपुर फायदा होउ शकतो पण सध्या भरपुर महाग आहेत.


Bee
Monday, November 06, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, माझाही असाच प्रश्न आहे की सध्या पुण्यात घर घेणे उचित आहे का? कारण तिथले भाव प्रचंड महाग आहेत.

पुण्यात जागा घेणे मी विचारही करू शकत नाही. हल्ली individual घर असतात कुठे मोठ्या शहरात. असतील पण मध्यमवर्गीयांना नाही शक्य असे बंगले विकत घेणे.


Prajaktad
Monday, November 06, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार साधारण भाव सांगु शकाल का?

Prady
Monday, November 06, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या constructions मधे साधारण २९००-३००० किंवा जास्त असे रेट आहेत. मला असं वाटतं बी की जर तू तिथे राहाणार नसशील तर केदारने ज्या जागा सांगितल्या ते IT co. मोठ्या प्रमाणावर असलेल्या जागा आहेत. तू rent वर जागा देऊ शकतोस. पण खरं तर तुझ्या मर्जीतलं कुणी (नातेवाईक वगैरे) हे सगळे कारभार बघायला असेल तर बरं पडतं. नाहीतर तू कुठे तरी दुसर्या देशात राहून हे कारभार नाही बघू शकत.

Bee
Tuesday, November 07, 2006 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, अगदी बरोबर आहे. पण ओळखिचे मला म्हणालेत की आत्ता जर तुम्ही पुण्यात घर घेतले नाही तर मग चांगले locations राहणार देखील नाहीत. त्यांनी कोथरुडला परांजपे बील्डर्स कडून टेरेस असलेले घर घेतले जिथून पर्वतीचा म्हणे खूप छान देखावाही दिसतो. आत्ता सध्या कोथरुडला घर विकत मिळणे मुश्कील काम आहे. चार वर्षांपुर्वी त्यांनी जे घर विकत घेतले होते त्याची किम्मत आज २४ लाखाहून ३४ लाखावर गेली.

हे परांजपे बील्डर्स खरच खूप छान आहेत का? मी जेंव्हा पुण्यात होतो त्यावेळी DSK चे खूप नाव होते.


Kedarjoshi
Tuesday, November 07, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, रेट तु काय व कोणाचे घेनार यावर अवलंबुन आहेत.

परांजपे चा एक प्रोजेक्ट गेल्या वर्षी भांडारकर रोड वर होता. तिथे साधारण ३००० रेट होता. त्यांच्याच प्रोजेक्ट चा ऑंध ला २७०० होता.

रो हाउस से रेट २ वर्षापुर्वी १००० ते १२०० होते ते आता २००० ते २३०० आहेत. u wont believe ६० लाखाचे घर विकत घेनारे लोक खुप आहेत सध्या. pune next चे रो हाउस ६० ते ७० लाख व बंगला १ करोड रुपायाला मिळतो. सर्व बुक झाले आहेत.

बी २ वर्षापुर्वी मी ओंध मध्ये रो हाऊस घेतले २५ लाखाला आज ५५ लाखाला आहे ते.
परांजपे म्हण्जे top quality म्हणले जाते पण माझ्या बहिनीच्या घरी पण प्रॉब्लेमस होते.

आणी pradny ने म्हणल्या प्रमाणे मी सर्व जागा IT वाल्या सांगीतल्या कारण ईथेच जास्त भाव वाढ आहे व पर्यायाने नफा.


Prajaktad
Tuesday, November 07, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार!बाप रे काय भाव वाढलेत सध्या....
परांजपेच्या वेबसाईट वर गेले होते तिथे तर काहिच कळत नाही की कुठला प्रोजेक्ट चालु आहे,ओपन आहे..मेल केलेय अजुन तरि रिप्लाय नाही..
याशिवाय अजुन काही builders ची नाव सुचवता येतिल का?


Prady
Tuesday, November 07, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहिती मधे Amit construction पण चांगले builders आहेत. त्यांच्या साईटवर पण जाऊन बघ.

Kedarjoshi
Tuesday, November 07, 2006 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Check this out.

www.punerealestate.com/abc.htm
ईथे बहुतेक सर्व builders आहेत.

www.kumarbuilders.com
www.rohanbuilders.com
www.goelganga.com

Prajaktad
Wednesday, November 08, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,प्रज्ञा वरच्या सर्व माहितीसाठी धन्यवाद!
गुंतवणुक सल्लागारांपैकी कुणी सल्ला द्यावा...पुण्यात जागेच्या मागिल १-२ वर्षात वाढलेल्या किमती स्थिर राहतिल कि अजुन वाढतिल कि २ एक वर्शात परत ( rollercoaster )प्रमाणे एकदम कमि होतिल??


Bee
Wednesday, November 08, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं पुण्यात जावून थोडा वेळ survey करुन मगच हाताशी factful माहिती येईल. net वर खूप जास्त भाव सांगतात. माझ्या मते घर घेणे ही देखील एक bargaining deal आहे. त्यासाठी आधी वेगवेगळे locations & builders गाठायला पाहिजे. मग काहीतरी निर्णय घेता येईल. इथे जर असा survey केला असेल तर त्यांची माहिती कामी येईल.

Kedarjoshi
Wednesday, November 08, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हे मात्र बरोबर आहे. पैसे cash portion हातात ठेवुन बार्गेन करायला एक वेग्ळीच मजा असते. मला माझ्या बिल्डर ने १२५० भाव सांगीतला. मी त्याला विचारले शेवटचा रेट काय. तो म्हणाला ११७५. म्हणले विचार करुन सांग तो पर्यंत मी चक्कर मारुन येतो. तो म्हण्ला ते फायन्ल आहे. नेमका त्या दिवशी त्यांचा चिफ मार्केटर तिथे होता. मी त्याला म्हणाला मी सध्या भारतात राहत नाही २ दिवसात डिल फिक्स करेण व माझ्या प्रमाने भाव असेल तर अर्ध्या तासात घर घेईन. त्याने विचारले काय भाव. त्याला ९५० सांगीतला व म्हणालो की आत्ता मी तुला ५ लाख देईन चेक द्वारे. त्याने अर्धा तास घेतला व शेवटी मी १०१६ रु प्रमाने घर घेतले. त्याच दिवशीचे त्याने बुकींग दाखवले ते ११२५ प्रमाने होते.

पण डिल करायचा आधी सर्व भाग, घर फिरुन पाहीली पाहीज्ते व जेव्हा वाटेल की हेच आपले घर तेव्हाच रेट बद्दल बोलायचे तो पर्यंत नाही व डिल करताना शक्यतो त्या बिल्डर च्या छोट्या माणसाशी बोलायचे नाही.




Maitreyee
Wednesday, November 08, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते परांजपे स्कीम वाले लोक अगदी पुणेरी नमुने शोभावे असे आहेत! घर घेताना पूर्ण व्यवहार white असतो. black वगैरे मागत नाहीत अजिबात. घरे बहुधा छान एरियामधे चांगली luxurious असतात. आणि NRI च्या दृष्टीने चांगल्या सोयी म्हणजे आपण इथे असताना ते लोक (अर्थातच काही पैसे घेऊन) तिकडे घर व्यवस्थित maintain करतात, airport पासून घरापर्यन्त transport ची पण त्यांचीच सोय आहे म्हणे!! पण हे सर्व कितीही attractive वाटले तरी हे लोक अजिबात professional वाटले नाहीत मला. emails ना उत्तरे देत नाहीत, एखाद्या स्कीम मधे आपण interest दाखवला तरी follow up वगैरे मुळीच नाही! आणि सगळ्या स्कीम्स जाहीर व्हायच्या आधीच book झाल्या अशी उत्तरे मिळतात! काय तर म्हणे लोक कुठेही स्कीम चालू नसल्या तरी advance देऊन ठेवतात म्हणे! मग एखादी नवी स्कीम सुरू होते तेव्हा आधी या लोकांना preference देतात! अशा पद्धतीने काम चालते त्यामुळे जाहिरात पाहिली, आवडले आणि बुकिन्ग केले असली साधी सुधी procedure काही work होत नाही त्यांच्याकडे!!

Deshi
Wednesday, November 08, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत पण नसेल एवढ्या अद्यावत सोयी बरेच बिल्डर्स देतात. जसे व्हिडीओ फोन, CC मॉनीटरींग, मल्टीप्लेक्स ई. फक्त पैसे मोजायचे.

तसे आता कोणीही ब्लक मध्ये पैसे मागत नाही.

चेक धिस.

http://www.punerealestate.com/parkstreet/apartments_rowhouses_wakad.htm


Seema_
Wednesday, November 08, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंमती कमी होण्याचे chances तसे कमी आहेत . कारण जागेचा प्रश्न . पण आता स्थिर होतील अस वाटतय . बरोबर ना केदार ?
आणि आजकाल पुण्यात It is seller's market.
त्यामुळ मला नाही वाटत फ़ार bargain होत असेल अस . ३ वर्षापुर्वीची परिस्थिती फ़ारच वेगळी होती . आम्ही कोथरुडला घर घेतल तेव्हा माझाही अनुभव केदार प्रमानेच आहे . थोडेफ़ार भाव कमी केले होते builder न .


Kaviash
Wednesday, November 08, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आणि माझ्या दिरानी पण ह्याच वर्षी घर बुक केल. एकंदर अनुभव असा आहे कि बर्‍याच बिल्डर नी ब्लॅक पैसे मागितले. अगदी, रेडी पसेशन मधे फ़्लॅट शिल्लक आहेत अशा काही बिल्डर नी पण.
हल्ली हे लोक फ़ाॅलो अप पण करत नाहीत कारण मी अशा हि स्कीम पाहिल्या की जिथे १ आठवड्यात सगळे फ़्लॅट बुक झाले. आज फ़्लॅट बुक नाही झाला तर उद्या जास्त रेट नी होईल असा
attitude.

Kaviash
Wednesday, November 08, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी "आज फ़्लट बुक नाही केला तर उद्या हाच रेट राहील असा नाही." अस सांगणारे नमुने पण भेटले. जणु काही भाजी खरेदि आहे...स्कीम पहायला जा आणि बुक करुन या.
बिबवेवाडी मधल्या १ स्कीम मधे तर प्रत्येक वेळी नविन रेट ऐकायला मिळाला. पहिल्यांदा गेलो तर नुकतच भुमीपुजन झाल होत (जुलै २००५ मधे)...११०० रेट होता. म्हंट्ल जरा काम सुरु होवु दे...मग विचार करु....तर २ महिन्यांनी १४०० झाला. आणि त्यानंतर वाढत वाढत दिवाळी पर्यंत २२०० झाला...

तिथेच दुसर्‍या एका सोसाएटी मधे १ फ़्लट (जुलै २००५ मधे) १३ लाख ला माझ्या नातेवाईकानी घेतला..जुलै २००६ मधे त्याच बिल्डिंग मधे दुसरा फ़्लट २२ लाख ला विकला गेला.


Kedarjoshi
Wednesday, November 08, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिमा बरोबर. आता भाव वाढ एवढी होनार नाही. थोडी स्थिरता येईल शिवाय ज्या वेगाने लोक गेल्या ३ वर्षात जागा घेत होते त्या वेगाने आता घेत नाहीत कारण ईंटरेस्ट मधे वाढ. स्पेशली गेल्या एका वर्षात २ टक्के वाढ.

आता बार्गेन पण मिळनार नाही पण ट्राय करायला हरकत नाही.

गेल्या वर्षी मी परत एकदा घर शोधत होतो. माझ्या भावाचा साला बिल्डर आहे तो म्हणत होता की बिल्डर नी भाव वर नेऊन ठेवल्या मुळे काही स्कीम्स मध्ये अजुनही जागा शिल्लक आहेत कारण लोक ४० लाख वैगरे द्यायला तयार नाहीत. त्या जागा जातील पण मग बाहेरच आपल्यासारखे लोक घेत असतील तरच. evan मी जिथे रो हाउस घेतले तिथे अजुनही १२० पैकी ४ रो हाउस गेले नाहीत कारण किंमत ५० लाखाच्या वर आहे.

भांडारकर रोड, प्रभात रोड किंवा एरंडवने ईथे नविन स्किमस असतील तर मला ही सांगा मी परत एकदा घराचा विचार करत आहे.



Prajaktad
Wednesday, November 08, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा , कविश , केदार सगळ्यांचे आभार..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators