Zakki
| |
| Tuesday, March 07, 2006 - 3:09 pm: |
| 
|
अग पण ते मला हवे असलेल्या भेटीचे काय झाले? ते मिळते ना महाराष्ट्रात. मला माहित आहे.
|
Bee
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:03 pm: |
| 
|
दरवेळी भारतातून येताना मलाही नेमका हाच प्रश्न पडतो की भारतातून ह्या लोकांना खायला प्यायला आणावे तरी काय? ह्या लोकांना आपले गोड आवडत नाही. चिमुकल्या भेटवस्तू द्यायची कल्पना छान आहे. हवाहवाई तुला जर छोटे छोटे ताजमहल मिळाले तर दे एकेकांना भेट माझ्या एका french colleague ने मला लाखाच्या बांगड्या जरूर आण असे सांगितले.
|
Ajay
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:07 pm: |
| 
|
मी चामड्याची पाकीटे आणि पर्सेस दिले होते ते खूप लोकप्रिय झाले होते. चामडे देशाबाहेर बरेच महाग आहे. पायात घालायला आजकाल खोट्या चांदीचे नाजूक पैंजण मिळतात ते परदेशी मुली, स्त्रीयांना खूप आवडतात. भारतात जोडी मिळते पण इथे १ च घालायची फॅशन आहे, तेंव्हा दुप्पट फायदा. फक्त कूठलाही दागिना दिल्यामूळे त्या तरूणीचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. ( मला ते आणायला २-३ जणींनी स्वत: सांगितले होते आणि आणि आमच्या सौ. ना पूर्ण disclosure केले होते )
|
Maanus
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:31 pm: |
| 
|
हवे.. ५० लोकांसाठी एकदम सोपा उपाय सांगु.
वरन भात, पुरनाची पोळी त्यावर साजुक तुप, ती आमटी, पापड आणि शेजारी तुपाची लोटी... अस्सल मराठी जेवन.
|
Moodi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:34 pm: |
| 
|
जिथे तिथे चांगल्या खाण्याचे फोटो टाकुन हा सगळ्याना जळवतो, हाणा याला पुरणपोळ्या..  
|
Ammi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 6:35 pm: |
| 
|
असलं काही टाकू नको बाबा इथे..त्रास होतो.. 
|
thanx again guyz!! khup kalpana dilya anekanni!! eetaranna pan upayogi padel. tasach mala pan pudhe kahi suchle tar lihin je eetar kunala kami yeu shakel.
|
Chinnu
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:22 pm: |
| 
|
परदेशीयांना ताजमहालचे वेड असते. मी मागे की चैन दिल्या होत्या, त्याला ईवलेसे ताजमहाल होते. एक कलिग बरोबर छोटे छोटे bells, onsite team ला पाठविले होते. त्याच्या घंट्या फ़ार नाजुक होत्या. त्यांना वेगळे बो विकत आणुन छानपैकी जोडीने बांधल्या. टीम मधे सर्वांना ही भेट खुप आवडली. माणसा फ़ोटो नी आयडिया मस्त!
|
Karadkar
| |
| Tuesday, March 07, 2006 - 8:57 pm: |
| 
|
अग हवे खणाच्या कापडाचे बटवे, शिवुन देवु शकतेस. तसेच पुना cotton च्या ओढण्या मिळतात का पहा. त्या खणाप्रमाणे घडी घालुन दे. महाबळेश्वरची काठी, महाबळेश्वर च्या माला jam च्या बाटल्या, त्याच कपनीच्या jelly candies packet . कुणाकडून जमले तर छोटी मडकी संक्रांतीची) घेउन त्यावर वारली पेंटिंग करुन घेउ शकतेस. नाकातली नथ, कोल्हापुरी साज हे तर अगदी मराठीच.
|
कराडकर नाकतळी नठ म्हणजे काय?
|
Karadkar
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:29 pm: |
| 
|
prajakta - i changed it Thanks for noticing.
|
Mita
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:22 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20060309/viva13.htm हे बघा काहि उपयोग झाला तर..
|
Moodi
| |
| Monday, April 03, 2006 - 1:53 pm: |
| 
|
ह ह मला माहीत आहे की फार उशिरा इथे माहिती देतेय. त्याबद्दल खरच सॉरी. इथे आजच्या लोकसत्तात विवा मध्ये जी माहिती आलीय, तू कदाचीत ती आधीच वाचली असशील तरी देते. तुला आता तिथे जाणे शक्य नसले तरी इतराना सांगुन तु हवे असेल ते घेऊन ठेवु शकतेस. http://www.loksatta.com/daily/20060403/viva10.htm .
|
Dineshvs
| |
| Monday, April 03, 2006 - 4:29 pm: |
| 
|
कुणी बिदरी वर्क च्या वस्तु बघितल्या आहेत का ? हैदराबादला मिळतात. काळ्या गनमेटलच्या वस्तुवर चांदीचे नाजुक काम असते. लेटर ओपनर वैगरे मिळतात त्या प्रकारात. वीस एकवीस वर्षांपुर्वी घेतलेल्या या वस्तु मी अजुनहि वापरतोय.
|
Prady
| |
| Monday, April 03, 2006 - 5:43 pm: |
| 
|
ह्या बी बी वर काही ठिकाणी fabindia च्या कुर्त्यांचा उल्लेख़ आहे. fabindia मधे एकूणच बर्याच आकर्षक गोष्टी मिळतात पण नीट बघून घ्या.तिथे मिळणार्या बहुतेक आकर्षक tops चे रन्ग जातात. पहिल्या धुण्या नंतर सुंदर दिसनार्या top ची अवस्था इतकी वाईट होते कि परत घालवत नाही. हल्ली synthetic कापडात लख़न्वी कुर्ते मिळतात.ते खरच खूप अवडतात इथल्या लोकांना मागे हा सल्ला कुणीतरि देऊन झालाय पण मी त्याचा अनुभव पण घेतला आहे. तसच लाकडात कोरलेले हत्ती पण बर्याच जणांना अवडतात. patchwork केलेले कापडाचे waalhangings दादरला आगरबाजार रोड वर संस्क्रुती, ठाण्याला राम मारुती रोड वर culture अशा काही दुकानांमधे खूप छान handikraft च्या वस्तू मिळतात.
|
Prady
| |
| Monday, April 03, 2006 - 5:47 pm: |
| 
|
पोस्ट जरा मराठी सन्स्क्रुती पासून दूर गेलय पण तरी उपयोगि पडेल अशी आशा.
|
Rimzim
| |
| Monday, April 03, 2006 - 6:49 pm: |
| 
|
Dinesh Bhavu Bidari work chya vastu Bidar madhe tayar hotat. Ani as u said khup tikatat. tyachya photo frame, ear rings/tops, murtya , pen khup prakar milatat.
|
मी माझ्या lab मधल्या अमेरिकन/, non अमेरिकन मैत्रिणिंसाठी अगदी नाजुक मण्यांच्या ( mostly ) हिरव्या दुडी घेतल्या. सग़ळ्यांना आवडल्या. एकीनी सिल्कच, जरीकाम केलेल top मागवल. मी सांगयला विसरले की skirt किव्वा pant बरोबर घाल. ही येडी दिवाळीच्या function ला फ़क्त top घालून आली
|
Junnu
| |
| Monday, April 03, 2006 - 8:46 pm: |
| 
|
हे दुडी म्हणजे काय?
|
जुन्नु, अगदी बारिक मण्यांच्या माळेला (सर) मराठीत दूड म्हणतात. अख्ख्या महाराष्ट्रात!!! हा कुठल्याही 'भागातला' शब्द नाही traditionally , हिरव्या रंगात मिळतात.
|
मूडी thanx . btw माझे काम झाले पण मला नाही तरी यापुढे पण दुसर्या कुणाला उपयोगी पडेलच की. आजच वाचले की दिल्ली हाट सारखा एक handicraft bazaar मुंबईत पण सुरू करायचे चालले आहे म्हणून. दिल्ली हाट मधे कलाकार / कारागीर स्वतहाच direct त्या stalls इथे बसून वस्तू विकतात त्यामुळे हे handicraft stuff बर्यापैकी रिझनेबल किमतीत मिळते.
|
Junnu
| |
| Tuesday, April 04, 2006 - 8:12 pm: |
| 
|
मुम्बई मधे exactly कुठे??
|
Moodi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 2:27 pm: |
| 
|
हो दिल्लीत हरयाणातील पण लोक बर्याचशा छान वस्तु कायम स्टॉल लावुन विकत असतात. पण भावांच्या बाबतीत आपणच ती चढाओढ केलेली बरे असते. मला वाटत हरयाणा बझार असेच नाव आहे त्या ठिकाणचे. दिलीत बर्याच ठिकाणी वस्तुंची किंमत आधी ४०० ते ५०० दरम्यान सांगतात पण आपण टिकुन राहिलो की तीच वस्तु १०० च्या आत पदरात पडते.
|