|
कणाद, क्षितीज . आणि पुढचे चार शब्दांसाठी
|
कणाद ह्या नावाचा अर्थ काय आहे?
|
कणाद हे एका ऋषिंचे नाव आहे. मझ्या माहितीप्रमाणे ते गणितज्ञ होते.
|
कणाद : अणूसिद्धांत सर्वात प्रथम मांडणारे ऋषी. मूलद्रव्ये ही अणू ( तेच गुणधर्म दाखवणारे अतिसूक्ष्म कण) यांची बनलेली असतात असा सिद्धांत.
|
Ajay
| |
| Friday, May 02, 2008 - 5:13 am: |
| 
|
सुरेश मथुरे यांनी लिहिलेल्या ज्ञानवृक्षांच्या पारंब्या (भाग १, २) यात कणाद ऋषींचे चरित्र आहे. प्राचीन भारतीय ऋषींची माहिती गोष्टीरूपाने माहिती देणारा अतिशय सुंदर आणि संग्रही ठेवण्यासारखा संग्रह. कणाद, आर्यभट, पाणिनी, भास्कर, गार्गी, चार्वाक, सुषृत, चरक (आणि इतर)यांच्याबद्दल किशोर मासिकात आलेली चरित्रे एकत्र प्रकाशित केली आहे. ज्याना किशोरवयातल्या मुलांसाठी लिहायचंय त्यानीही गोष्टिरुपाने माहितीपर लेखन करण्याचं तंत्र शिकण्यासाठी म्हणून अभ्यास करावा अशी ही दोन छोटी पुस्तके आहेत. साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी प्रथम प्रकाशित झाली होती.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|