|
Maanus
| |
| Tuesday, March 21, 2006 - 7:19 pm: |
| 
|
तुम्हाला ती जिभेवर दोन बोट ठेउन शिट्टी कशी वाजवता येते माहीत आहे का. असल्यास कृपया ईथे explain करा. अजुन कोणते प्रकार माहीत असतील तर ते पन सांगावे.
|
लहानपणी चूक झाल्यावर आपण जीभ टाळ्याला लावायचो, ती तशीच ठेवून दोन्ही हातांच्या तरजनी आणि मध्यमा या बोटांची बंदूक करून टाळ्याला लावलेल्या जिभेच्या खालच्या भागात खोचावीत. यामुळे तोंडात तयार झालेल्या चक्रव्युहातून बेंबीच्या देठापासून वारा बाहेर सोडावा. खणखणीत शिट्टी वाजेल !
|
Maanus
| |
| Monday, February 25, 2008 - 7:21 pm: |
| 
|
अजुन काही प्रकार माहीत आहेत का?
|
Sonalisl
| |
| Monday, February 25, 2008 - 8:38 pm: |
| 
|
मला येते शिट्टी वाजवता. अंगठा आणि तर्जनी वापरुन, मध्यमा आणि तर्जनी वापरुन(वर सांगितल्याप्रमाणे), हाताचा शंख करुन सुद्धा. मी (शाळेत असताना) माझ्या भावाकडुन म्हणजे तो कसा शिट्टी वाजवतो ते बघुन बघुन शिकले. क्रिकेट बघताना, चित्रपट बघताना, नाटक बघताना, स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यालापण शिट्टी वाजवता यायला पाहीजे असं तेव्हा वाटलं म्हणून शिकले. कशी वाजवतात ते आता लिहून कसं explain करायचे तो विचार करते.
|
Runi
| |
| Monday, February 25, 2008 - 9:52 pm: |
| 
|
सोनाली मला पण दोन बोटांनी येते शिट्टी वाजवता . अगदी सेम कारणासाठी मी हट्ट करुन मित्राकडुन शिकले. माणसा तु तर youtube चा चाहता आहेस त्यामुळे या लिंक्स बघीतल्या नाहीत असे वाटत नाही तरीही हे घे लिंक १, लिंक २, लिंक ३
|
Maanus
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:11 am: |
| 
|
धन्यवाद रियाज चालु आहे, बघु जमतेय का.
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:15 am: |
| 
|
माणुस मला तोंडात बोट न घालता जीभ मागे वळवुन शिट्टी वाजवता येते. आधी तोंडात दोन बोटे घालुन, एक बोट घालुन वाजवता यायची पण आता तस जमत नाहिये. सवय सुटली आणि बोट जाड झाली आहेत. वर उल्लेख केलेल्या मार्गानेच मला हायजेनिक शिट्टी वाजवता येते म्हणुन आता तोंडात बोट घालुन शिटीचा मी सराव करत नाही. शिवाय ही शिटी कानठळ्या बसवेल इतक्या जोरात वाजु शकते. सराव हवा. प्रथम जिभ मागे वळवुन घे. (ती कशी वळवायची हे बेसिक तुला माहित आहे अस मी गृहित धरतोय) वळवलेली जीभ वरती चिकटव. आणि हवा बाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजुनी थोडी जागा राहिली पाहिजे हे लक्षात ठेव. आणि हवा जोरात बाहेर सोड. सुरवातीला जमणार नाही पण सरावाने जमेल. मला साधारण तीन दिवस लागले हे शिकायला. पोटात खड्डा पडल्यासारखे होते सारखे हवा बाहेर सोडुन हे ही लक्षात ठेव बरं
|
Kiran
| |
| Tuesday, February 26, 2008 - 8:20 pm: |
| 
|
माणसा office मध्ये कोण नवीन join झाली रे? 
|
Zakki
| |
| Tuesday, February 26, 2008 - 8:52 pm: |
| 
|
अर्रेच्या माणसा. इकडे तिकडे निरनिराळ्या विषयांवरील www. ... असे संदर्भ देतोस, तू 'शिट्टि' असे गूगलवर लिहून का बघत नाहीस? कदाचित् चलत् चित्रे ( video ) पण असतील.
|
Pooh
| |
| Tuesday, February 26, 2008 - 10:23 pm: |
| 
|
हा विषय बघितला आणि Humphrey Bogart आणि Lauren Bacall च्या To have and have Not या चित्रपटातल्या सुप्रसिद्ध ओळीची आठवण झाली. “You know how to whistle, don't you, Steve? You just put your lips together and blow.” http://video.google.com/videoplay?docid=-4499602278137479933
|
Cleo
| |
| Wednesday, February 27, 2008 - 4:12 am: |
| 
|
Interesting.. Some people make whistling sound when they snore. That comes from nasal passage though. Is it possible while you are awake? Pooh, thanks for the clip.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|