Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी एकांकिका ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » रंगभूमी / चित्रपट » मराठी एकांकिका « Previous Next »

Vaatsaru
Friday, January 27, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या ग्रुप तर्फ़े मराठी एकांकिका करावी असे चालले आहे. त्याकरता चांगल्या एकांकिका कोणी सुचवू शकेल का
त्यांची scripts वगैरे उपलब्ध असल्यास( किंवा उपलब्ध करुन दिल्यास वा मदत केल्यास) फ़ारच उत्तम


Lalu
Saturday, January 28, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकांकिकेचा विषय काय असावा, विनोदी हवी का, वेळमर्यादा साधारण काय हवी, पात्रांची संख्या किती असावी ... इत्यादी माहिती दिलीत तर सुचवता येतील. आम्ही केलेल्या काहींची स्क्रिप्ट्स मिळण्याची शक्यता आहे. बघते.

Bee
Saturday, January 28, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बर script ला संहीता म्हणतात मराठीत :-), इतके भारदस्त शब्द वाचले आणि script वाचून रहावले नाही मला..

well मला वाटत दिनूची सासूबाई राधाबाईला तीन अंकी ऐवजी एकांकीका करून टाकावी.. कारण farse खूप आहे त्यात..

audition कुठे आहे?


Vaatsaru
Saturday, January 28, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, आत्ता तशी काही फ़ारशी कल्पना नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मला एकांकिकांबद्दल फ़ारसे काही माहितीही नाही, तेन्व्हा नुसती नावे आणि ती कुठल्या प्रकारात मोडते(गंभिर, विनोदी वगैरे) एवढे समजले तरी चालेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे " संहिता " उपलब्ध झाल्या तर उत्तमच



Lalu
Sunday, January 29, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठीक आहे. मी काही माहिती देते ती उपयोगी पडते का पहा.

आमच्या ग्रुप तर्फे आम्ही काही एकांकिका केल्या होत्या. त्यातली एक म्हणजे ' कथा दिनूच्या मृत्युपत्राची '( विनोदी ) आणि ' ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र '( विनोदी, ही पु.लं च्या उरलंसुरलं मधे आहे ) . 'चार दिवस प्रेमाचे' केले होते पण ते २ अन्की नाटक आहे.
रसिक च्या वेबसाईट वर बरीच नाटके, एकांकिका उपलब्ध आहेत. वर लिहिलेलीही आहेत तिथे. ४-५ आठवड्यात मिळतील अशी आहेत.
http://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi skip=0&lang=marathi&category=nATaka

यामधे प्रभावळकर ( एकांकिका भाग १-३ ) आणि रमेश पवार ( विनोदी.'कथा दिनूच्या.. यान्चीच. ) , रत्नाकर मतकरी, दिलीप परदेशी इत्यादी पहा. बाकी सगळी लिस्ट नजरेखालून घातली तरी साधारण अन्दाज येईल.

एकांकिका साधारण ४५ ते ७५ मिनिटाची असू शकते. आमच्या इथे काम करण्यासाठी उत्सुक मंडळी बरीच आहेत त्यामुळे सहसा जास्त पात्रे घेता येतील अशा आम्ही निवडल्या. आम्ही आत्तापर्यन्त गंभीर विषय घेतलेला नाही. एकतर विनोदी किंवा इतर हलकाफुलका. आमची नाटके नेहमी इथल्या मंडळाच्या कार्यक्रमात होतात. त्याचे औचित्य राखणे पुन्हा लोकाना काय बघायला आवडेल, rehearsal साठी किती वेळ द्यावा लागेल या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नाटक निवडले. ( तसं आता आम्ही बस्तान बसवलं आहे. यापुढे जे करु ते लोक बघायला येतील असं वाटतं. :-) )

यातले काही माहित नाही म्हणता पण तुम्ही सुरुवात बरोबर केली आहे.:-)
या माहीतीचा काही उपयोग होईल अशी आशा. अजून काही हवे असल्यास विचारा. गुड लक!

Vaatsaru
Sunday, January 29, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लालू, मनापासून धन्यवाद ह्या सगळ्या माहितीबद्दल.

मराठी विश्व तर्फ़े जी एकांकिका स्पर्धा आहे त्यासाठी आम्ही विचार करत होतो.

आम्हालाही विनोदी च करायला आवडेल आणि आमचाही ग्रुप आता बर्यापैकी मोठा झाला आहे तेव्हा जास्ती पात्रे आणि प्रत्येकाला कमी लोड येइल अशी एकांकिका उत्तम. आम्ही गेल्या वर्षी " तरुण तुर्क म्हातारे अर्क " हे नाटक केले होते तेव्हा पासून थोडा आत्मविश्वास आला आहे(अस वाटतय्) ;)

तुमच्याकडे काही scripts उपलब्ध असतील तर त्या मिळू शकतील का


Lalu
Monday, January 30, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे मिळाल्या तर पाठवू शकेन. ' कथा दिनूच्या.. ' माझ्याकडे नाही, ती रसिक वर उपलब्ध आहे. 'ध्वन्य ध्वन्य...' मिळते का पाहते. आणखी काही असल्यास बघून कळवेन.

Vaatsaru
Monday, January 30, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

laalaU Qanyavaad
" Qvanya Qvanya " Aaho maaJyaakDcyaa ' ]rla saurla ' maQaoÊ
risak vaÉna Gyaayalaa kahIca hrkt naahI pNa 4 - 5 AazvaD\yaaMnaI yaoNaarÊ evaZa vaoL naahIyao... AsaÜ

madtIba_la punha ekda AaBaar


Pramod
Tuesday, February 14, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

punyaat PARESH AGENCY naawaachyaa dukaanaat shekaDo ekaankikaa miLataat. maalak aahet shree. bhaaTe aaNi ph. no. aahe 020 24459190

Jiten
Thursday, March 16, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar Mitrano, Mi jitu from pune.. I'm aapalaya paiki punyat kon kon asate te kalava jara..

Jitendra
www.jitendramore.com

Abhishruti
Monday, December 11, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात २३ डिसेंबरपासुन २९ डिसेंबरपर्यंत विनीता पिंपळखरे लिखित ५१ एकांकिकांचा महोत्सव आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच असा महोत्सव होत आहे.
स्थळ : भरत नाट्य मंदिर
तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा
Admin कृपया हा मेसेज योग्य ठिकाणी पोस्ट करण्यास मदत करावी.


Admin
Tuesday, December 12, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


jahirati / आगामी कार्यक्रम / नाटक/चित्रपट
इथे तो प्रसिद्ध केला आहे.

http://jahirati.maayboli.com/detail.php?id=183

Vrush_007
Tuesday, January 09, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all!
mala changlya vinodi ekankikanchi nava,lekhak ani mumbai madhe kuthe milu shaktil hyabaddal koni sangu shakel ka?
free download sathi kuthli site ahe ka?

Karadkar
Monday, February 05, 2007 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषोत्तम बेर्डे लिखित ३ अंकी नाटक 'टुरटुर' कोणाकडे US मध्ये असेल तर मिळु शकेल का? पोस्टाचा / फोटोकॉपीचा खर्च देण्याची तयारी आहे.

Sandu
Friday, April 13, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, मला आणि माझ्या बायकोला मिळून करण्यासारखी एखादी २-पात्री एकांकीका माहीत आहे का?

Lalu
Friday, April 13, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांडू, हो. त्याला 'संसार' म्हणतात. :-) ते एक अंकी 'नाटक'च हो... वर्षानुवर्षे चालू राहणारा अंक.. ~D~D :-)

बरं, २ पात्री एकांकिका आत्ता लगेच नाही लक्षात येत. कोणाला माहित असेल तर सांगतील. पण थोडी पात्रे असलेल्या काही एकांकिका दोनच व्यक्ती करु शकतात. न्यूजर्सी ची 'पत्रावली' तशीच होती. सगळ्या भूमिका दोघांनीच केल्या होत्या.
काही माहिती मिळाल्यास लिहीन.


Sandu
Monday, April 16, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, मी पत्रावळी पहीली. छान होती. अश्या प्रकारच्या एकांकीकेच्या शोधात आहे

Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकांकिका विनोदी करायची आहे की गंभीर ?
अलिकडेच शिकागोला जाणे झाले. तिथे दोन दिवसात ९ एकांकिका पाहायल्या मिळाल्या. बहुतेक एकांकिका ३ किंवा ४ पात्रांच्या होत्या. एक दोन विनोदी होत्या, त्यातली एक ह्युस्टनच्या एका इंजिनियरने लिहिली होती. बे एरिया मधून दोन एकांकिका आल्या होत्या. दोन्हीमध्ये फक्त दोनच पात्रे होती.

सांडू, तू जर या स्पर्धेसाठीच एकांकिका शोधत असशील तर कदाचित माझे उत्तर तुला उशीरा मिळाले असेल. पण नाहीतर मला एक दोन एकांकिका माहिती आहेत पत्रावळी सारख्या. नू जर्सी मध्ये गेल्या वर्षी झालेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये पत्रावळी ला बक्षिस मिळाले होते. शिकागोमध्ये झालेल्या स्पर्धेत ’मनोमीलन’ नामक एकांकिकेला बक्षिस मिळाले. त्यात सुमारे ४ पात्रे होती. मला असे समजले की अशोक सराफ़ सध्या भारतात ’मनोमीलन’ चे नाटक करतो आहे. मनोमीलन डॉ. मनोज शहाणेचे नाटक होते. कॅलिफोर्नियामधून आलेले ’साठ्याचं काय करायचं’ या एकांकिकेला दुसरे बक्षिस मिळाले. त्यात वर लिहिल्याप्रमाणे दोनच पात्रे होती.

तुमचा नाटक करण्यामागे कोणता हेतू आहे ? स्पर्धा की हौस ?



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators