bhar pavsat panhala vishalgad karaychay, 12 te 15 august mumbai to mumbai
|
youth hostel unit malad mumbai ne 12 te 15 august 2001 chya darmyan panhala te vishalgad treck ayojit kelay. yaaychay tumhala tar contact kara deven purandare 8631295 mumbai cha number ahe.
|
dovaona caa e-mail id kaya AahoÆ maI baMgalaÜr maQao Aaho. Aamhalaa hI pnhaLa ivaXaalagaD krayacaI cCa Aaho. pNa 12 to 15 mhNajao week days Aahot. anyway e-mail do %yaacaa.
|
jawadekar contact him at devenp@bom7.vsnl.net.in
|
pnhaLa ivaXaalagaD pdBa`maNa maÜhImaÊ 2004.
|
excellent pics Indradh.. brought back great memories of Kop treks.
|
आषाढी पौर्णिमेची रात्र...... घाटमाथ्यावरचा धो धो पाउस........ एकाचवेळेला होत असलेले दुहेरी आक्रमण..... बाहेर जाण्याचाही मार्ग वेढला गेलेला....... अशा परिस्थितीत स्वभाषा स्वधर्म आणि स्वदेश याच्या अभिमानाने भरलेल्या विजिगिषु व्रुत्तीच्या मनानी एक वाट शोधली आणि संपुर्ण जगाला हतबुद्ध करणार्या आणि दंतकथा वाटाव्या अशा एका इतिहासाचा जन्म झाला....... होय तिच ती पन्हाळ्यावरची साडेतीनशे वर्षांपुर्वीची आषाढी पौर्णिमेची रात्र जेव्हा छत्रपती निवडक लोकानिशी पन्हाळ्यावरुन निसटले आणि अविश्रांतपणे पायी मार्ग कापत विशाळगडावर पोहोचले....... त्याच मार्गे जाण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला त्याचाच हा एक व्रुत्तांत
|
जेव्हापसुन या ट्रेक बद्दल एइकले होते तेव्हापसुन प्रचंड उत्कंठा लागुन राहिली होती. कलनिर्णय बघ्ताना यावेर्षी समजले की १५ ओगस्टला जोडुन रविवार येतोय. त्यावेळि ठरले की हच ट्रेक मारयच.आम्च्या ओळ्खिच्या बर्याच जणानी हा केलेला होता आणि परत करायला तयार असलेलेहि ५ जण तयार होते. त्यामुले नवे आणि जुने असे मिळुन साधारनपणे १० जणंची नवे निघाली. पण हाय रे मुकद्दर जाण्याच्या आटह्वडाभर आधी त्यातिळ सहाज़ण कार्याल्यीन कामाने गळाले तरीही ४ जण उरले होते १२ तारखेला रात्री निघायचे असे ठरले होते. साधारणपने ३ दिवस लागणारे सामान आणि इतर साहित्या याची यादि तयार झाली. प्रत्येकाला आवश्यक शारीरीक तयारीही करायला संगितली होती. अर्थात सर्वात जस्त ही स्चना आम्हालच लागू होति. १२ तारखेचा दिवस उजाड्ला नंतर सलग सुट्टी अस्ल्यामुले कार्यालयात जाणे भाग होते. अर्थात संपुर्न चित्त बाहेर्च होते. ज्यानी आधी हा ट्रेक केला होता त्यानी बर्यापईकी पैजेवर सांगायला सुरुवत केली की आम्हि हा ट्रेक संपुर्न करने अवघड आहे. तरीही स्वता: ला प्रोत्साहिटठेवने चालु होते. साधारणपणे सकाली ११ वजता चोउघांपैकी एकाचा दुरद्वनी आला की काही अपरिहार्य कारनामुळे दोघे जण येउ शकणार नहीत........... झले आधीच होते चर त्यतुन दोघे गळाले......... काय करावे असा यक्षप्रह्ण उभा राहीला पण शेवटिअ आम्हि दोघानी तह्रवले कही झले तरी आता दोघानीच हा ट्रेक मारायचच. अर्थात त्यामधे निसर्ग आणि नशिब याची साथ मिलने आवश्यक होते. कारण आम्ही त्यावेळेला जेवढी बातमी काढली होती त्या प्रमाने कोल्हापुर परिसरात महापुर परिस्थिती होती.आणि पन्हाळ्याला जानारा रस्ता बंद होता. दुसरा पर्यायी रस्त्याचीही आम्ही माहीती करुन घेतली. अखेर १२ तारखेला रत्री ८.३० वाजता आम्ही जय भवानी म्हणुन घरातुन प्रस्थान ठेवलेर्आत्री ११ वजता स्वरगेटवर्य्न "महामंडळाची " कोल्हाओउर्ला जाणारी GREEN LIMOZENE अर्थात निमाअराम गाडी पकडली. पाउस पुण्यात थांबल होता. आणि हिच परिस्थीती कोल्हापुरातही असावी अशी आशा करत गाडित पाय ठेवला. गाडितल्या लोकंकद्डे चोउकशी केल्यावर बार्यापैख़ि खाछी करणार्या बातम्या कळल्या . प्रवासाला सुरुवात झली. मजल दरमजल अतिशय वेगत करत आcम्ह्या अपेक्षेपेक्षाही लवकर म्हणजे पहाटे ३.३० ला गाडी कोल्हापुआत दखल झाली. कोल्हपुरात प्रवेश करताना आणि थोडे अलिकडे दिसलेल्या पंचगंगा आणि वारणेच्या पतळिवरुन तर आशा मावळायला सुरुवात झाली होती.कोल्हाउर स्थानकात चौकशी केली तर अखेर कळले की पन्हाळ्याला जाणारा नेहमीचा रस्ता बंद आहे गड्या वार्अणानगर मर्गे जातील अधिक चित्र थोदी पहट झाल्यवर समजु शकेल एवढी माहीती स्थानकावर मिळाल्यवर अस्णार्या वेळेच सदुपयोग करण्यासाठी कोल्हापुर स्थानकावर जोतीबाचा जो फोटो आहे त्याखाली पथारी पसरली. अजुन किमान २ तस होते. पण तणावाने झोपही येइना. मग अचानक एक कापना सुचली की आप्ण कोल्हापुर जिल्ह्याचा नकाशा घेउ. तसा आमच्याकडे ट्रेक मार्गाचा नकाशा आणि होकायंत्र होते पण त्याचा इथे उपयोग नव्हता नकाशात बघितल्यावर समजले की नाकी पाण्याने रता कुठे बंद झाला आहे. नकाशात दुसरा मर्गही दिसला पण त्या मर्गाने पन्हाळ्याल जाणरी गाडि सकाळि ९ वजता होती.मग आम्ही नकाशवर विशाळगडापर्यंत फिरलो. मग असे ठरले की पन्हाळ्याला जयचे आणी नंतरचा एक दिवस जमेल तितके पुढे जाउन मागे फिरायचे किंवा दुसरा पर्याय म्हणजे विशाळगड ला जौन हा ट्रेक उल्टा मारायचा. कारण विशाळगडची गाडी चालु आहे का नही हे हि सकाळी६.३० ल नक्की कळणार होते. अखेरिस सकाळी ताजेतवा होउअन आम्ही गाड्ची वाट पाहु लागलो. विशाळ्गडाची गाडी लागली तेव्हा आम्ही ठवले की आता हा ट्रेक उलटा मारायचा. त्याप्रमाणे आम्ही तिकीट काढले. गाडी परत महामार्गाला येउअन वारणा नगर कडे मर्गथ झाली. आत सधारण पणे ३ तासाच प्रवास होता त्यामुळे झोई गेलो. वारणानगरनंतर गाडिला अचानक लगलेल्या ब्र्कने जाग आली सहज आणी डावीकडे पाटी दिसली "पन्हाळ २० क्म" आता कळॅना की गाडी पन्हाळ्याम्र्गे तर जाणार नाहीये तर मग हा किठुन आल. शेवटी वाक महोदयान आम्चा उद्देश संगितला तर त्यानी संगितले की मधे एका फाट्यावर उतरल्यास पन्हाळ्याला तासाभरात जाल. मग त्यानी आम्हला नवली या गावाच्या फाट्यावर उतरवले आणी टेकला अनपेक्षितपणॅ अगदि वेगळी सुरुवात झाली. हे गव तर माच्या नियोजनातही नव्हते. दंबरी सडकेवर चलत चाल्त आम्ही निघालो. अर्धा तास चल्यावर कळले की हा रस्ता हि बराच फिरत फिरत पन्हाळ्यावर जातो. मग रस्त्यात एका स्थानिकाल पर्याय विचारला. त्याने आम्हला परत एक फाटा दखवला त्या रस्त्याने आम्ही पन्हाळ्याच्या सजाकोठी खाळी अस्णार्या आपटी गवात पोहोचलो. समोर पन्हाळ दिसल्यामुळे सहजिकच अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद झाला. आता हे नाकी माहिती होते की विशाळगडाहुन कोल्हापुरला यायला गडी आहे आणि आपण पन्हाळ्याच्या पायथ्याशी आहोत. त्यामुळे अंगत उत्साह आला. अर्धा तासात सज्जकोठीच्या उजव्या बाजुने पन्हाळ्यावर पोहोचलो. सजजा कोठी हे कडेलोटाचे ठीकाण आहे असे संअतात. संभाजी महराजान इथे छत्रपतिनी नजर कैदेत ठेवल्याचे ही संगितले जाते. तिथुन खाली दिसणार्या विहंगम द्रुश्यांचे फोटो काढले. भरभरुन मोकळी हवा घेतली. अर्थात ही हवा आता ३ दिवस मिळणार होती. आता आम्हाला आतापर्यंत गोळा केलेल्या माहीती प्रमाणे घड्याळाशी स्पर्धा करायची होती.पन्हाळ्यावर गावच बसले ले अस्ल्याकरणाने सगळ्या गोश्टी पोहोचल्या आहेत. तिथे एका ठिकाणी पोट पुजा केली. आम्ही मिळवलेल्या माहिटिप्रमाने जर पुढच्या अंतराचा विचार करता उशिरात उशिरा ११ ल पन्हाळा सोडावा लागनार होता. . अम्हाल पोटपुजा केलेल्य घरगुती होटेलातासे समजले होते की तो बाजींचा पुतळा हा भालजी पेंढारकरांच्या एका चित्रपटात बजी प्रभुचे कम केलेल्या माणसावरुन अबनवलेला आहे. त्या कलावंताचे नाव वसंतराव असे समजले. आता आम्ही जिथे खाले तिथल्या एक व्रुद्ध ग्रुहस्थानी आम्ही चोउकशी करताना अचानक ओळख निघाली आणि ते माझ्या काकांबरोबर १९६७ साली सांगलीत एक्त्र नोकरिस होते असे कळले. धरती गोल आहे ह्यावर विश्वस बसला.आम्ही अंधारबाव, बाजीप्रभुंचा पुतळा तिन दरवाजा, अशा निवडक टइकाणना भेटी दिल्या सिद्दि जोहर चा तळ हा तिन दरवाजाच्या खाली होता. आणि इंग्रजानी आणलेल्या तोफेतुन इथेच गोळा डाग्ण्यात आला होता. दरवजाचे बांधकाम अप्रतिम आहे. पायत शिसे वितळवुन दरवाजा बंधला आहे. तसा हा किला १२०० वर्शे जुना आहे. छत्रपतीनी अफझल वधानंतर १८ दिवसात पान्हाळा घेतला होता तेव्हा त्यनी तिन दरवाजावर एक सिंह हत्तीला मारत आहे असे चिन्ह कोरुन अघेतले आहे. त्या दरवाजवरच शिलाहार आणि चालुक्या यंची चिन्हे आहेत. अशीही माहीती आम्हाल तिथे एका गाइडने दिली. आता वेळ फार पळत होता. अखेर आम्ही विशाळ्गडाल जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. पुसाटी बुरुजा शेजरी अस्णार्या भग्नावस्थेतील नंदी शेजारुन जाणारी वाट आम्हाल शोधयची होती. त्यासठी आधी तो नंदी शोधायचा होत. आम्ही चालत चल्त पार पुसाटी बुरुजाच्या टोकाला आलो. पुढे सरळ दरी होती. आता समजे न. म्हणुन परत आम्च्या एका मित्राला फोन लावला. त्यने संगितले की नम्दी तिथेच आहे.तेवध्यात फोने कत झाल आम्ही १० मिनिटे शोधले पण नम्दी काही दिसेना. एव्ढ्यात एक माणुअस दिसला त्याल विचारले अस्ता त्याने तो भग्नावस्थेतील नंदी आणी शेजारील वाट दाखवली. एव्हाना ११.३० झाले होते. म्हनजे आम्ही साधारणपणे तास भर उशिरा पन्हाळा सोडला.त्या दिसणार्या वाटेने आम्ही निघालो. ती वाट खाली तुरुक वाडि या गावात उतरली. गावातिल बैल गाडीच्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो. थोड्यावेळानंतर दंबरी सडक लागली. अर्थात त्याव्रुन चालण्याचा कंटाळा आणि काहीही झाले तरी हा संपुर्न त्रेक पायीच करायचा हा पण यासाठी एका भातशेतीतुन रस्ता शोधला शेतीच्या बांधावरुन चालायला सुरुवत केली. अर्थात आता ही आमह्cःइ निवड होती. आणि नंतरच्या २ दिवाअत तोच एक पर्यय होणार होता.आमइ भातशेजारी असनारा दोंगर चढला तिथे फिरुन आलेला डांबरी रस्ता मिळाला आता त्याव्रुन थोडे चालावेच लागले. ५ मिनिटात म्हाळुंगे वडि हे गाव आले. गावात एका दुकानात आम्ही तंबाखूची आणि चुन्याची पुडी घेतली...... ती खाण्यासाठी नव्हे तर जळु या प्रकारापासुन संरक्षन म्हाणुन घेतली होती. म्हाळुंगेवाडि गवातुनचा रस्ता पुढे जातो. थोडी चाढण चढल्यावर आम्ही मान वर करुन पाहतो तो काय आमचा आ वासला गेला. हेच ते म्हसै पठार बगेह्ल तिथेपर्यंत सपाट आणीअ भणाण वारा. यातुनच एक पायवट जाते. हाली लोक गाड्यही आणतात. आम्च्या सुदैवने गडि न दिसल्यामुळे त्याच्या नैसर्गिक सौदर्य बघताना बधा आली नाही. आपन जेवढे बघु तेवढे सगळ्या दिशेला सपाट असे ते पठार आहे. आणी सुदैवाने तिथे अगदी श्रावणातले उन पडले होते. अतिशय अधशासरखे फोटो काढाले. अर्थात म्हसै पठारावर जर दुके असेल आणि आपण पायवाट सोडुन जर बाजुला भरकतलो तर प्रकरण अवघद आहे याची कल्पन अस्ल्यामुळे वाटेला ध्रुन चाललो परंतु निसर्गने मेहेर्बानी केली. आणी आम्हाल ते सौंदर्या पुर्ण नजरेत सथवता आले. आप्ल्या फुतबोलच्या मैदानालाही तोंडात बोटे घालायला लावेल अशी सपाटी आणि अभियंत्रीकीच्या भाशेत संगायचे तर 0=0.5 flatness असा तो प्रकार आहे.सलग तंगडत्प्ड चलू ठेवली. आनंद पाळंदे यांच्या पुस्तकाप्रमाणे म्हसै मंदिरपासुन पातेवाडि या गावात मुकामाला जायला ७ तास लागतत. अर्थात पठाराला सुरुवात झाल्यावर साधारण ११ क्म वर म्हसै देवीचे मंदीर आहे. अखेर आम्ही दुपारी २ च्या सुमारास म्हणजे म्हसै पठाराला लाल्यापासुन अदिड तासाने मंदिराच्या इथे येउन पोहोचलो. मंदिराच जिर्णोधार झालेला आहे. मंदीर छोतेज्खानीच आहे. तिथे काहि गुराखी भेटले. आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. आता भुकेची जाणिव झाली होती.मंदिराच्य इथे परत पोटपुजा केली.३ दिवस पुरेल इतके कोरडे खाद्य आम्ही घेतले होते. पण त्याचा कंटाळा येणर होता.पोतपुजा झाल्यावर आम्च्या कडे २ मर्ग पुढे जाण्यासाठी होते. मगाशी भेटलेल्या गुराख्यानाही खाली गवात जायचेअस्ल्यमुले त्यानी आम्हाला थोदा मर्ग दखवतो म्हणुन संगितले. आणि आम्ही देवळाच्या डाव्या बाजुने निघालो. दुसर्या मार्गाने जायचे असेल तर. देवळाच्या दरवाजाकडे पाठ करायची आणि चालू लागयचे. आमइ अर्ध्या तासात पठाराचीस्पाटी संपवुन उतरंडीला लागलो. दुरवर खाली गव दिसले. त्या गावच्या इथुन सधारनपणे अर्धा तास आधी आम्ही त्यांच निरोप घेतला. त्यानी आम्हाल लांबवर एक डोंगर दाखवला आणि संगितले की तुमच्या मुकामाचे गाव तिथे आहे. आम्ही झपाझप पावले टाकयला सुरुवात केली. पण १० मिनिटतच चालण्यवर मर्यादा येउ लागल्या. कारण आतापर्यंत फक्त वाचलेला गुडघाभर चिखल अनुभवु लागलो होतो साधारणपणे १.५ तास भर याच प्रकारतुन चलत होतो. नंतर तोडी चांगळी जमीम्न लागली बरेच चलयावर डाव्या बाजुला डोंगरावर अनेक दुळके दिसले पुढील वडित चोउकशी केल्यावर त्याची एक कथा कळली ति अशी. एक लग्नाची वरात जात होती. त्यामधिअल वधुने देविचा अपमान केला आणी शापामुळे ते सगले वराती दगड बनले. एइकुन नवल वातले. गुढघाभर चिखल हा प्रकार साधारण पणे दिड तास चालु होता. त्यात पावसाने अर्धा तास धु धु धुतले. ४ वेळेला पायतील बुट बाहेर काढण्याच्या नादाता पाय लचकला गेला. आता प्रकाराची तिव्रता समजु लागली होती. अहेर बर्याच वेळानंतर जरा बरी पायWआट लागली. म्हसिपठार उतर्ल्यानंतर म्हणजे साधारणपने दुपारी ३ नंतर ३ तसानंतर हीदुसरी वाडी लगई. तिथे चौकशी केल्यावर त्यानी अजुन एक लांबचा डोंगर दाखवला आणि पाटेवाडि हे तिथे आहे हे संगितले संध्याकाळचे ६ वाजले होते. आता भतशेतीच्या बंधवरुन प्र्वास सुरु झाला होता. आणी अंधार पडायच्य आत मुकामासाठी गव गाठायची घाई चलु झली होतींअंतर चालण्याचा वेग वाढवला. रस्त्यात एक ओढा आदवा आला.त्यालाही. गुढघाभर पाणि होते. दुसर्यादिवसई याह्यापेक्षाही मोठ्या ओढ्यातुन जावे लागणार होते. अखेर आम्ही चालत चालत एका गावात पोहोचलो तेव्ह संध्याकाळ्चे ७ वजले होते. आम्ही पन्हाळा ११.३० ला सोडला होता. आणिअ तसे चालत सकाळी ८.३० पासुन होतो आअम्च्या अपेक्षेप्रमाणे असलेले मुकामाचे पातेवाडि हे गाव किमान २ तास लांब होते. पाण आंधारात जाणे धोक्याचे अस्ल्यने आम्ही त्याच गवात राहणयाचा निर्ण्य घेतला. आम्ही शाळा शोधू लागलो. असे कळले की शाळ पुर्ण गळत आहे. तेवढ्यात एका गववाल्यानेच चौकशी केली. आणि आम्ही दोघेच आहोते म्हटल्यावर तो माझ्या घरत रहा म्हणाला.म्हणजे घरुन निघता ज्या च कदाहीत त्रास होइल असे वाटत होते त्याचा असा फयद झाला. त्याने आम्हाला थेट मगच्या खोलित जायला संगितले. तिथे दोन पायर्य उतरल्या की २ रेडे आणि २ शेळ्य बांधाल्य होत्या. शेजारी चुल पेटवली होती. आमइ रत्र ही तुथे घाल्वणारव होतो. ओले कपडे बदल्यवर अर्धा तास आम्ही चुलीसमोर स्वत्:ह्ला शेकुन घेतले. अंगत जिव आल होता. मग त्या मालकाशी गपाना सुरुवाअत झाली. तो वनखत्यातच नोकरीला आहे हे कळले आणि ३ माणसंमधे मिळुन २० क्म परिसराची रखवाली आहे हे ही कळले. एव्हाना जेवायची वेळ झाली होती.घरच्यच शेततल्या तांदळाचा भात आणि डाळ आणि लसणिची चटणी असा मेनू होता. आम्हीच भाकरी नको म्हणुन संगितले होते. पोतभर भोजन करुन लगेच आडवाझालो. तो मालाक दुसर्यादिवशी आम्च्यबरोबर काही अंतर येतो म्हणाला. त्यामुले वेदनाशमक गोळी घेतळी. आणि लगेच घोरु ही लागलो........... आता रत्र झाली आहे उर्वरीत भाग उद्या........ अजुन २ दिवसाचे चालने आहे तेव्हा ताजा तवना होउन येतो
|
Gs1
| |
| Sunday, August 27, 2006 - 5:54 am: |
| 
|
मस्त रे ! डांबरी रस्त्याने फार चालावे लागते म्हणून हा ट्रेक टाळत आलो आम्ही. आता तुमच्या अनूभवाचा फायदा होईल.
|
Dineshvs
| |
| Sunday, August 27, 2006 - 6:02 am: |
| 
|
माझे आजोळ याच परिसरातले मलकापुर. लहानपणापासुन तिथे जाऊनहि कधी या मार्गावरच काय, या गडांवरदेखील जाणे झाले नाही. स्थानिक लोकाना तसा काहि जिव्हाळाहि नाही या मार्गाबद्दल. तिथे सोयीसुविधा, म्हणजे डांबरी सडका, एस्टी वैगरे आत्ता आत्ता म्हणजे गेल्या ५० / ६० वर्षात झाल्या. त्यामुळे त्या सोयी टाळुन मुद्दाम तंगडतोड करायची हौसहि नाहि कुणाला. राहुनच गेलेय ते. तसे तिथे आता रिसॉर्ट्स वैगरे आहेत. पावानखिंडीत जाताहि येते. पण योग येत नाहिये अजुन.
|
हं तर आम्ही राहिलो त्या वाडीचे नाव होते मांगलाई वाडी.आम्ही झोपलो त्याच्या खालीच्या बजुला २ रेडे बांधले होते. त्यातिल एक रेडा मला अस्वस्थ वाटला कदाचीत त्याच्यापेक्षा जास्त ताकतीची माणसे आल्यामुळे अस्वस्थ झाला असावा गपा मारताना असे समजले होते की म्हसाइ पठारापेक्षा मोठे पठार मांगलाईवाडीवर आहे. रात्री ४.३० च्या सुमारास मला जाग आली. आणी एका कुशीवर वळण्यासाठी वळलो तर पायातुन एक सणक उठली. प्रकरण गंभीर आहे असे जाणवले. थोड्या वेळाने उठुन हलका व्यायाम केला आणि माफक प्रमाणात शरीराची हालचाल केली सकाळी ताजे तवाने झाल्यानंतर आम्हाला घरातल्या आज्जीनी गरमागरम भाकरी आणि भाजी करुन दिळी.त्यावर ताव मरला. सकाळी ८.१५ च्या सुमारास आम्ही घर सोडले. काल आम्ही नियोजनापेक्षा २ तास मागे पडलो होतो.त्यामुळे आज ते अंतर ही तोडायचे होते. आम्हाला सांगण्यात आले होते त्याप्रमाणे पुढे लागणार्या करपेवाडीनंतर च्या निलगिरीच्या जंगलाला डावीकडे ठेउन चालायचे होते. पण आम्च्या बरोबर जंगल खात्यातलाच माणुस असल्यामुळे आम्ही आता चुकण्याची शक्यता नव्हती. आम्ही आता करपेवाडी गाव खाल्च्या अंगाला ठेवले आणि सरळ जम्गलात घुसलो होतो. उंच च्या उंच निलिगिरी ची झाडे आणि मधुन मधुन डोकावणारा पाउस अशा प्रकारचे वातावरण होते एक फरक जाणवला की झाडांची पाने गळुन खाली जमलेल्या थरामुळे जंगलात चिखल अजिबात नव्हता.. पुढे जाताना त्या माणसाने आम्हला एक शेत दाखवले जिथे दर वर्षी रेड्यांच्या शर्यती होतात. करपेवादी सोडल्यानंतर तासाभरनंतर कळके वाडि आली.आता पर्यंत ऐकलेली गोष्ट अनुभवाला आली. ते म्हणजे लहान मुलांचे गोळ्या मागणे. त्याना थोड्या गोळ्या मित्राने दिल्या. परत आता रस्ता भातशेतीच्या बंधावरुन चालू झला होता. मधेच जर बंध कमकुवत असेल तर पाय थेट शेतात जात होता.परत सुमारे तासभर चलल्यानंतर आम्ही आंबे वाडीत पोहोचलो. आता आम्ही ज्याच्याबरोबर आलो तो माणुस तिथुन दुसरीकडे जाणार होता. त्याचे आभार मानले. त्याने जंगलातुन पण थोड्या जवळच्या रस्त्याने आणल्यामुळे आम्चा साधारण तास वाचला होता. अर्थात त्याने जंगलात रस्त कसा शोधला हे मला अजुन कळले नाही.आणि २० एकर जंगलात पहारेकरी ३ हे वाचुनही नवल वटले. जंगल व्यवस्थ्त मोठे आहे. नंतर थोड्या वेळ साध्या पायवातेने चालल्यानंतर आम्ही परत एका छोट्या जंगलात शिरलो. थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी रस्त्याला २ फाटे फुटले होते. एक वाट थोड्या चढाकडे जात होती. आणि एक खालच्या बाजुला जात होती. आम्ही अर्थात चढाकडे जाणारी वाट निवडली. कारण जर रस्ता चुकलो तर वर चढण्यापेक्षा खालि उतरणे सोपे वाटते. आणि थोडे पुढे गेल्यावर आमच्या लक्षात आले की आपले "कल्याणमस्तु" झालय आपण चुकलोय. त्यामुळे आता आम्ही खालच्या बाजुला जायला सुरुवात केली. पायखली आता पायवाट नव्हती.झाडतुनच वाट काधुन जात होतो. पण १० मिनिटतच आम्हला मगशी आम्ही सोडलेली वाट दिसली. आता ही सोडायची नही असे तह्रवुन आम्ही चालू लागलो. सकाली आम्ही ८.१५ ला निघालो होतो. एव्हाना १२ वाजले होते. त्यामुळे एका ठिकाणी थांबुन थोडी पोटपुजा केली. आता आम्चे लक्ष होते पाटेवाडी. आता रस्ता बर्यापिकी मुर्माड जमिनीचा होता. साधारण पैकी अजुअन तासभर चालल्यवर एक छोटे घर लागले तिथे समजले की पाटेवाडि जवळ आहे. आत बर्यापैकी मोठा मुरुमाच रस्ता होता. त्यामुळे आमचा चालण्याचा वेग वाढला. पण बरेच चाल्यनंतर्ही गाव दिसेना साधारण अर्धा तास आम्ही चाल्यवर आम्हाला एक पती पत्नी दिसले त्याना विचारले तेव्हा कळले की आपन परत रस्ता चुकलो आहोत. आम्ही मधे एका ठिकाणी उजविकडे न वळता सरळ चालत राहिल्यामुळे हा प्रकार जाला होता.आम्ही २.५ किलोमीटर पुढे आलो होतो. रस्ता मुरुमाड आणि चांगला मोठा असल्याच परिणाम हा रस्ता पुढे भुगाव नावाच्या गावात जातो असे त्यांछ्याकडुन समजले. आणी आम्ही जर तिकडॅ गेलो असतो तर आम्हाला विशाळगडाचा नाद सोडुन द्यावा लगला असता. आता आम्ही परत मागे फिरलो. त्या मानसने एका ठिकाणी खाल्च्या बाजुला एक वस्ती दाखवली. तो पाटेवाडीचा धनगरवाडा होत. आणि थोडी मागे पाटेवाडी होती. याच थीकाणी आम्हि मगाशी फोटो काढले होते. जरा आम्ही मागच्या बाजुला बघितले असते तर हेलपाटा झाला नसता. आम्ही त्या दोंगरावरुन पायवाटेने खाली उतरलो. आणि पाटेवाडी मगे ठेउअन भतशेतीच्या बांधावरुन आणी लाईटच्या खांबाची दिशा पकदुन चालु लागलो. आम्हाला त्या माणसाने एक दोंगर दखावला होता त्यच्या पलीकडे आम्हाला जायचे होते. आज आम्चे मुकामचे लक्ष्य होते भाततळी गाव. चाल्ता चालता मधे एक ओढा लागला. ओढ्याला उतार शोधण्यासठी काठीचा खुप उप्योउग झाला. साधारण पणे ४ फुट एवढिच त्याची रुंदी होती. पण पाणि मात्र मांडीएवढे होते. पण आम्ही पार झालो. वर डोंगरावर शेतात काम करणारी माणसे दिसली. त्यांच्याकडे विचारले अस्ता कळले की पांढरPआणि अजुन ४ तासाच्या अंतरावर आहे.आणि त्याच्यापुढे भाततळी आता दुपारचे २ वजले होते.आणि मधे परत एक जंगल होते. त्यातील एका माणसाला आम्ही रस्ता दाखवण्यासाठी घेतले. त्याला आम्ही एक दिवसाची मजुरी एवढे पैसे देतो म्हणुन सांगितले. पण त्यच्या एका व्रुद्ध नातेवाइकानी मोठी मागणी केली. शेवटि १०० रुपये द्यायचे ठरले. पुढे निघालो. तिथे त्याचे गाव लागले. आम्ही तिथे उभ्या उभ्याच खाले आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात जंगलाला सुरुवत झाली होती. हे जंगल मला करपेवाडिच्या जंगलापेक्षा घनदाट वाटले. कारण इथे काही ठिकाणी आम्हाला अंधार वाटावा एवढ्या झाडीतुन जावे लागले. आणि हो एकुणात मिळुन ४ मोठे ओढे लागले. पाण्याला धारही व्यवस्थीत होतीऽखेर आम्ही थोड्या उजेडाच्या प्रदेशात आलो. एका भातशेतीच्या बांधावरुन जाताना त्या माणसाने आम्हाला गव्याने खराब केलेले पीक दाखवले. तिथे शेतात एका बंबुला ताट आणि काठी लावलेली दिसली. विचारले असत कळले की वार्यामुळे काठी ताटावर बडवते. आणि गवा घाबरुन पळुन जातो. पण मला जरा त्या च्या उपयुक्ततेविष्यी शंका वाटली. कारण एवढा मोठा गवा एवढ्याशा आवजाला घाबरेल क असो... आता एव्हाना म्हसलैवाडिचे जंगल पार झाले होते.पांढरपाणिला लवकर पोहोचण्यासाठी आम्ही थोदे दोंगराकडे सरकलो. जाताना माण म्हणुन गाव दिसले. आता संध्याकाळचे ५.१५ वजले होते. नंतर परत जरा चांगली पायवाट लागली. साधारण अर्धा तास चालल्यवर लंबुनच रस्ता दिसला. रस्ता दिसल्यावर आम्ही मोठ्याने ओरडलो डोक्यावरची टोपी काढुन हवेत उडवली. १० मिनिटात आम्ही रस्त्याल जाउन पोहोचलो. बास. आम्च्या मोहिमेतला खडतर टप्पा संपला होता.आणि जवळपास ६-७ तास चालल्यनंतर मनुश्यवस्तिचे अस्तित्व जणवले होते. माझ्या मताप्रमाणे म्हसलैवाडिचे जंगल हे अधिक भितिदायक आहे.तो माणुस इथुनच माघारी फिरला. आता आम्हाल रस्त्यानेच पायपिट करायची होती. साधाराण अर्धा किलोमीटर चालयवर पाटी दिसली विशाळगड २१ किलोमिटर. आम्ही पंढरपाणि गावत पोहोचलो होतो. तिथे एका होटेलात विचारले की गरम खायला काही मिळेल का? पण त्यानी अशी समस्या संगितली की त्यांचा श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि त्यान आता जेवयचे आहे. मग आम्ही निदान चाह तरी देण्यची विनंती केली. आणि चह आणि बिस्किटे असा नाश्ता केला. parley-G या बिस्किटाची चव त्यादिवशी समजली. कारण दुसरे काहीही नव्हते तिथे. आणि आच्याकडच्या कोरड्या खाण्याचा आणि पुर्यांचाही कंटाळा आला होता. आम्ही सहा वजता तजे होउन पांढरपाणी सोडले इथुन आमच मुकाम भाततळी हा ६ किलोमीटरवर होता. आज तुलनेने आम्हाला कमी चिंता वाटत होती. कारण काही झाले तरी आम्ही विशाळगडला जाउन पोहोचणार होतो. . आम्हाला चालताना कळले की आम्ही ताशी फ़रतर 6km या वेगाने चालु शकतो. अर्थात पाठिवर साधारण 10Kg वजन होते. आम्ही भाततळिपासुन 2km वर असताना परत पावसाने झोडपायला सुरुवात केली. हा ऐन घाटमाथ्यावरचा पाउस होता. आणि एक त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य जाणवले म्हणजे भणाण वारा जो पन्हाळ्यावर एवढा नव्हता. मगाशी पांढरपाणी मधे चहा पित अस्ताना कलले की पाउस गेले ३ महिने सलग चालु आहे. आणि वारे एवढे आहे की घराची कौले ही उडुन जात आहेत. आणि हे ही समजले की भाततळि पांढरपाणी गजापुर याना सर्वात जवळचे मोठे गाव म्हणजे मलकापुर जे साधारण 40 km वर आहे. या तिनही गावात दवाखानाही नाही. शाळा मत्र आहे. आम्ही संध्याकळि ७.३० च्या सुमारास भाततळील पोहोचलो. तिथे चुकशी केली तेव्हा एक घरात शाळेतले शिक्ष्क एकटेच राहतत असे कळले त्यानी आम्हाला राहण्याची परवानगी दिली. त्यांचे मुळ्गाव पुणे जिल्ल्ह्यातील राजगुरुनगर होते. त्यामुळे गप्पा बर्यच चालु झाल्या.इथे आठवाले की कलच्या आम्च्य मुक्कामाच्या गावातले शिक्षक हे विदर्भातील होते. अकोला त्यांचे गाव होते. आणि नोकरीसाठी एवढ्या दुर्गम भागात आले होते. अर्थात जिल्हा परिषदेविषयीचा आदरहि वाढला कारण ३० उंबरे असलेल्या गवात शाळा चालवायची याला थोडी तरी इछाशक्ती लागत असेल ना.... असो त्यानी आम्हाला शेकोटी करुअन दिली. शेकोटी हा एक मोठा आधार आहे. संध्याकळी त्यानीच आम्च्यासाठी भात आणि आमठी केली.तबियत खुश झाहली.दुसरे दिवशी १५ ओगस्ट होता त्यामुळे अजुन एक शिक्षक ही मुक्कामाल आले होते. बर्याच गप्पा झाल्यवर साधारणापणे १० च्या सुमारास आम्ही निद्राधीन झालो. उद्या सकाळी उठुन पावनखिंड करायची आणि मग विशाळ्गडला जायचे असे ठरले. पावन खिंड ही भाततळि गावातच आहे.
|
Dhumketu
| |
| Monday, August 28, 2006 - 4:39 am: |
| 
|
मस्तच रे. अरे ईथे एकदा पोस्ट टाकले असते तर मीही आलो असतो.. मी ट्रेकसाठी शोधतच होतो... गिरिदर्शन चा पन्हाळा-विशाळगडही तेव्हाच होतो... तिथे फ़ुल झाले म्हणुन मी दुसर्या मित्रांबरोबर अजनेरी आणी रतनगड केला.. श्रावणी सोमवारला चुकुनही ब्रह्मगिरी वा अंजनेरी ला ट्रेक म्हणून जाऊ नये... जाम गर्दी (त्रिंबकेश्वरला).. पोलिसांनी १२ कि.मी. आधीच थांबऊन बस ने पाठवले...
|
अरे धुमकेतु तु अमोल वाणी याच्याबरोबर केलास का? कारण आम्ही एकत्र पन्हाळा विशाळगड करणार होतो. पण सुट्टीच्या समस्येमुळे तो अंजनेरी आणि रतनगड ला गेला
|
हां तर मांगलाईवाडीतल्या अनुभवावरुन शहाणे होउन आम्ही झोपण्याआधी थोडा हलका व्यायाम करुन झोपलो होतो. कारण नंतर शरीर आखडते. सकाळी उठल्यावर त्या शिक्षकानी आम्हाला चहा करुन दिला. ताजे तवाने होउन पावनखिंडिचा रस्ता धरला. त्या शिक्षकानी आम्च्या कडुन पैसेही न घेतल्यामुळे आम्हाला संकोचल्यासारखे झाले होते.पण काय करनार. शेवटी त्यांcएहाभार मानले. आणि आम्ही बाहेर पडलो.आम्ही ज्या घरात राहिलो होतो त्याच्यासमोरचा पावनखिंडिकडे जाणारी कमान होती. २० मिनिटाच्या चालण्यानंतर आम्ही दाट जंगल अस्णार्या जागे कडे जाउ लागलो. थोडा वळसा मारल्यावर एका खांबाला ढालतलावाअर्र लावलेल्या दिसतात. हिच आणि त्याच्या शेजारुन एका ओढ्याचा जोरदार प्रवाह वहत अस्तो. हिच ति सध्या ओळखली जाणारी पावनखींड. आता सध्या ओळखली जाणारी असे म्हणन्याचे कारण हे की त्यच्या बद्दल मतभेद आहेत. कारण तो ओढा जो खाली पडतो ती उंची साधारण २० फुट आहे. आणि महाराअजंचा पाठलाग हा घोड्यावरुन झाला होता आणि घोडे चढाण्याइतपत तिथे जागा नाहीये. काहीजणांच्या मते लढाई थोडी खालच्या बाजुला झाली आणि बाजी प्रभुंचे अंतिम संकार येथे झाले. तर काही जणांच्या मते खरी पावन खिंड ही कासारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रमधे गेली. ही शक्यता असु शकते कारण पुरंदर्यानी त्यांच्या पुस्त्कात दिल्याप्रमाणे पावन्खिंड ही विशाळगडाच्या अलिकडे ३ कोस म्हणाजे साधारण ९ किलोमीटेर वर होती. ते पटु शकते. काअरण पुढे विशाळ्गडाकडे जाणारा रस्ता ह त्या धरणाच्या पाण्याच्या कडेकडेनेच जातो. बरेच लोक त्याच्यावर अभ्यास अकरताहेत.कळेल तेव्हा कळेल. पण आपण बाजीप्रभुअंच्या स्म्रुतीला त्यांच्या अफाट निष्ठेला आणी अफाट ताकती ला प्रणाम करुन पुढे निघायचे. कारण त्यानी हे अंतर २१ तासात कापले होते. आणि त्याम्धे ६ तासची लढाई होती. एवढे अंतर सलग पळल्यावर लढने आणी ३०० लोकांनिशी २००० संख्यला थोपवुन धरणे हे केवळा कल्पनातीत आहे. आणि आपण विषेश्करुन हा प्रदेश पाहिला आणि त्याकळि असलेली दुरगमता लक्षात घेतली तर खरच केवळ त्या व्यक्तीमत्वांपुढे झुकावेच लगेल.आम्ही दुसार्या वाटेने म्हसाइ पठार उतरलो म्हणुन आम्हाला दिसल्या नहीत पण दुसर्या रस्त्याने उतरताना बर्याच मावळ्यांचया समाध्या दिसतात. पालखी खांद्यावर घेउन पळताना झालेल्या अतिश्रमाने मावळे शहिद झाले होते ती परिस्थिती बघुन्ही पतते की " लाख मेले तरी चालतील पण लाखंचा पोशिंदा जगला पाहीजे" तिथे फलकांवर इतिहास ही लिहिलेला आहे. आता विशाळ्गडला जाण्यासाठी परतरस्त्याला येउन मिळालो. विशाळगड अजुन १४ किलोमीटेर होता. डांबरी सडकेने चालने ज्ववर येते.आता पावसाल सुरुवात झाली होई. मी शज निरीक्षन केले की अर्ध्या तासात साधारन ६ सेंटिंइटेर पाउस पडल होता. माझ्या जाकीटाच खिसा पाण्याने पुर्ण भरला होता. आम्च्या पाउस आणि चिखळाच्या संकल्पनाच या ट्रेक मुले बदलुन गेल्या आहेत. आता एक अजुन एक समजले होते की भाततळि हे गाव आणि विशाळ्गद हे एकाच उंची वार आहेत. त्यामुळे जो घाट आहे तो बराच खाली उतरुन मग थोडा वर चढतो. त्यामुले घातातल्या रस्त्याने उतर्तन्याऐवजी आम्ही रस्त सोडला आणि कडेच्या डोंगरावरुन उतरायला सुरौवात केली ते बरेच आनंददायि अस्ते रस्त्याने चालण्यापेक्षा!! असाच चालत राहील्यवर टेम्भुर्णीवाडिचा फाटा लागतो. तिथुन एक रस्ता आम्बा घाटाला जाउन मिलतो हा रस्ता पर्यायी म्हणुन वापरतात. पुढे आपल रस्ता हा कासारीप्रकल्पाच्या पाण्याच्या कडेकडॅने जातो. इथे निसर्गाने आम्च्यावर परत थोडि मेहेर्बानी केली आणि थोडे उअन पडले. तेवढ्यात फोटॉ काढुन घेतले. पुढे गेले की गजापुर गाव लागते. आणि पावनखिंड ही इतिहासत आधी माहिटी होती की गजापुरची खिम्ड म्हनुनच. त्यामुळे तिसरा तर्क पटुअ शकतो. की खिंड पाण्यात गेली असावी. गजापुरच्य पुढे सैनाथपेठ इथे शाळेत १५ ओगस्टचा कार्यक्रम चालु दिसला. आम्ही झेंद्याल वंदन करुन पुढे निघालो. इथेही आम्ही परत चोटी पाय वात पकडली त्यामुळे रस्त्यावरचे चालने वचले. पण विशाळगडा कडे जातान शेवटचे ३-४ किलोमीटर रस्त्यावरुनच चालवे लागते. आम्ही चालत होतो वळणवळणाचा रस्त होत. असाच एक वळणावरचा चढ पार करुन आम्ही वर आलो. आणि तेवध्यात ढग बाजुला झाले. आणी एक कडाअ आणि विशाळ्गड दिसला. बास!!!!!!!!!!!!!!!! याच साठिई ३ दिवस चालत होतो. चढत येताना एका अनपेक्षित क्षणी जेव्हा किला दिसतो तेव्हा अतिशय आनंद होतो. की जो वर्णता येत नाही. त्यासाठि ३ दिवसाच्या पायपिटीनंतरचाच तो अनुभव घेतला पाहिजे. आम्ही अक्षरश उड्य मारल्या वातावरण कधी बदलेल संगतायेत नाही म्हनून फोटो खढले. थोडे पुढे गेल्यावर किला पुर्न दिसला . मल परत पुरंदराच्या पुस्तकातिळ ओळ आठवली. "विशाळगड सह्याद्रीच्या ऐन कण्यावर बसलेला आहे. त्याच्या एका बाजुला देश अहे आणि दुसरीकडे खोलवर कोकण. " त्याचा प्रत्यय येतो. ताशीव कडे डोले फिरवणारे आहेत. किल्याच्या पायथ्याजवळ गेलो. आत विशाळगडा वर बरीच वस्ती झाली आहे. आणि बहुधर्मीय वस्ती आहे. त्यमुले त्यांच्या सोयी साठी एक लोखंडि सेतु बांधला आहे. नही तर आधी थोडे खाली उतरुन पायर्या चढुन जावे लागे. पण आता सेतु आहे. पण त्यामुले खालचे गणेश मंदीर दुर्लक्षित झाले आहे.आणि किल्यावर वस्ती मुळे येनार्या अस्वछ्ह्ता वगिरे गोष्टि आल्या आहेत. आता तुफान पावसाला सुरुवत झाली होती. पायर्यांवरुअन घोट्याएवढे पाणि वाहत होते. किल्यावर एक मोठा दर्गा. आहे बरेच लोक तिथे जातात. आम्ही वेळेच्या कमतरतेमुळे अशंकर आणी विठ्ठल मंदिर बघितले. छत्रपतीनी बाजीप्रभु आणि त्यांच्या बंधुंची जी समधी बंधली आहे ती दुरवर पावसात दुर्लक्षीत आहे. आणि आम्हाल टकमक टोकाकडे न जाण्याचा सल्ला मिलाला. पाउस हा अतिशय मारत होता. इक्दे तिकडे फिरुन अम्ही परत निघालो. येताना जीपने मलकापुर पर्यंत आलो. तिथुन एस टी ने कोल्हापुर ला आलो.महालक्षमीचे दर्शन घेतले. आणि परतीच्या मार्गला लागलो. अशातर्हेनी जवळ जवळ रद्द झालेला ट्रेक पुर्ण झाला आणि तोही दोघानिच मारला. यावरही लोकाम्चा आधी विश्वास बसला नाहीच. पण हा आयुष्यातील एक अतिशय अविस्मरणिय अनुभव होता.सर्वानी जरुर करावा. ३ दिवसात फक्ता ४ रंग दिसले. एक कालपट पांढरा ढगांचा, दुसरा पाण्याचा लाल, तिसरा पाण्याचा शुभ्र पांढरा, आणि चौथा म्हणजे हिरवा अत्यंत कस पाहणार ट्रेक आहे.पुरेशी शारीरीक आणी मानसिक तयारी करुनच जावे. नविन जाणार्यानी टाळावा. साधारण पणॅ ६० इलोमीटरचे चालणॅ आहे पन्हाळ्यवरुन निघाल्यवर. पन आम्ही पन्हालाही चढलो आणि मधे चुकलो त्यामुले जवळपास ७२ ते ७५ किलोमीटरचे चालणे झाले. पण एक अत्यंत दर्जेदार अनुभव
|
Dhumketu
| |
| Tuesday, August 29, 2006 - 4:27 am: |
| 
|
अरे हो... अमोल वाणी बरोबरच केला.. मला रुपेश ने रेफ़रंस दिला.. आणी पर्वाच रुपेश मला माझ्या आत्याकडे भेटला.. रुपेश आणी सागर मेहता मित्र (तुला माहीत आहे का सागर?).. म्हणून आला होता... दुनिया छोटी है... कुठूनतरी कुठेतरी लिंक लागतेच... अमोल आणी ऋषीकेश म्हणत होते की त्यांचा गण्या नावाचा मित्र आणी त्याचा मित्र पन्हाळा विशाळगड करणार होते... ते लोक म्हणजे तुम्हीच होय... पुढच्या ट्रेक ला सांग... मी येईन...
|
महेश, सही. खरच एक दर्जेदार अनुभव.
|
Abhay
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:49 pm: |
| 
|
Mahesh: chaan varnan, agdi amhi keleya trek (10yrs back!) chi aathvan zhali, amhala pan teen diwas lagle tari shevti pavankhindichya pudhe bus pakdun gelo hoto! photos astil tar link de na ithe...
|
http://pg.photos.yahoo.com/ph/mjwatharkar/album?.dir=/e1d3scd&.src=ph&.tok=phT6BhFBZhVLPmZb लोकहो मोहिमेचे काही फोटो
|
Dineshvs
| |
| Monday, September 18, 2006 - 5:01 pm: |
| 
|
ते खड्या सैन्यासारखे दगड आहेत ते कुठले ? आणि तेच मलकापुर माझे आजोळ कि.
|
Gs1
| |
| Tuesday, September 19, 2006 - 6:12 am: |
| 
|
मस्त फोटो, वर्हाडी सुळके तर खासच
|
http://pg.photos.yahoo.com/ph/mjwatharkar/album?.dir=5278scd&.src=ph&store=&prodid=&.done=http%3a//www.photos.yahoo.com/ph//my_photos हे ही फोटो पहा
|
दिनेश ते दगड म्हणजे त्याच गोष्टीतले की ज्यात सांगितले आहे की देवीच्या शापामुळे वर्हाडी दगड झाले
|