Dhumketu
| |
| Wednesday, January 11, 2006 - 2:31 pm: |
| 
|
त्याच्या आत माहीती देणे अवघड आहे.. कारण मी भारतात नाही... असो... तुम्हाला शुभेच्छा... आम्हाला किती वेळ लागला होता ते सांगतो म्हणजे कदाचीत तुम्हाला वेळेचा अंदाज येईल. पण आम्ही अंमळ जरा जास्तच जोरात चललो. आम्ही ढाक ते भिमाशकर संध्याकाळी ४ वाजता ढाकवरुन सुरु करुन दुसर्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता भिमाशकरला पोचलो. ४ ला चालायला सुरुवात केल्यावर रात्री १० वाजता मुक्कामाला पोचलो ( बहुतेक खांडी ) आणी सकाळी ८:३०-९ ला परत सुरुवात केली होती. दुपारचे जेवण मिस केले होते. गाईड घेतले होते त्यामुळे कुठेही चुकलो नाही. काहीजण शेवटच्या टप्प्यात पेठला पोचतात. त्यामुळे परत वरती चढावे लागते. शेवटच्या टप्प्यात पेठचा सुळका दिसतो. मी लोणावळा ते भिमाशकर हे अंतर ६० किमी आहे असे वाचले होते. त्यातले १८-२० वजा करा की अंदाजे ४०-४५ किमी तरी चालावे लागेल. भिमाशकरची शेवटची एस.टी ची चौकशी करा कारण पुण्याला यायला शेवटची बहुतेक ४ च्या सुमारास आहे. नाहीतर पुणे नाशीक रोड पर्यंत वगळ्या मार्गाने यावे लागेल. ट्रेक झाल्यावर माहीती दिलीत तर उत्तमच.. मला हा ट्रेक परत करायचा आहे.. तेव्हढीच ताजी माहीती.... btw मी geometric चा...
|
Bahirjee
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:31 am: |
| 
|
धूमकेतू, माहितीबद्दल धन्यवाद! हा मार्ग कुसुरच्या पठारावरुनच जातो ना? वाटेत आन्ध्र तळे लागते ना? ही माहिती गूगल अर्थवर मिळालेली आहे. खान्डी शिवाय इतर कुठे मुक्काम करता येईल? -बहिर्जी
|
Ntush
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:38 am: |
| 
|
या मौलिक माहितिबद्दल धन्यवाद. ट्रेक ज़ाल्यावर सविस्तर माहिति देइन. ज़मल्यास फोटो पाठवेन. भारतात आल्यावर जमल्यास एक ट्रेक करु. धुमकेतु हे नाव जरा रहस्यमय आहे.
|
Dhumketu
| |
| Thursday, January 12, 2006 - 2:04 pm: |
| 
|
कुसुरच्याच पठारावरून जातो. तिथे पेशव्यांनी बांधलेली वाट आहे.. ( दगडी चिरांनी बांधलेली वाट आहे....ती पेशव्यांनी बांधली होती असे कुठेतरी वाचले होते... खरे खोटे माहीत नाही) आंध्रे तळे वाटेत लागते. तिथून बस ही घेता येते पुढच्या गावासाठी...पण चालत शॉर्टकट होता. गुगल अर्थवर कुठे आहे ईतकी माहीती? लिंक वा kmz फ़ाईल देऊ शकशील का? खांडी शिवाय वांद्रे कुसूर ह्या गावात मुक्कम ठोकता येतो. तसे सह्याद्रीत मुक्काम कुठेही ठोकता येतो. खांडी गावात शाळेत राहता येते.. धुमकेतू हे नाव असेच टाईमपास म्हणून घेतले. कुठल्याही bb वर मधेच घुसता येते आणी निघता येते
|
Maetrin
| |
| Thursday, January 12, 2006 - 3:06 pm: |
| 
|
फोटो भारी आहेत.सही आलेत!माझा एक प्रॉब्लेम,मला गडान्ची नावे पटकन आठ्वत नाहीत,अणि कायम दोन्-तीन नावानमधे घोळ होतो..........
|
Bahirjee
| |
| Friday, January 13, 2006 - 6:21 am: |
| 
|
धूमकेतू, फाईल जोडलेली आहे. आल्यावर इतर माहिती टाकतो. -बहिर्जी
|
Ntush
| |
| Friday, January 13, 2006 - 6:52 am: |
| 
|
हो माजाही घोळ बर्याचवेळा होतो. पण गूगल वर सही माहीती आहे. त्यावर अन्तरहि मोजता येते.
|
Dhumketu
| |
| Friday, January 13, 2006 - 2:01 pm: |
| 
|
अरेच्या हि तर ( http://www.amitkulkarni.info/pics/ ) ह्या साईटवरचीच फ़ाईल आहे... काही दिवसांपुर्वी मी मायबोलीवर ह्याचीच लिंक दिली होती.. त्यात कुसुरचेही पठार आहे हे माहीत नव्हते.. मी फ़क्त जरासेच पाहीले होते. असो. धन्यवाद..
|
Bahirjee
| |
| Monday, January 16, 2006 - 5:44 am: |
| 
|
ढाकचा बहिरी ते- भीमाशन्कर धूमकेतू, ट्रेक छानच झाला. आपल्या माहितीचा उपयोग झाला. ढाक वरुन दुपारी २ वाजता निघून रात्री ८:३० ला पहिला मुक्काम सावेळे खान्डीच्या पुढे)गावी केला. तिथून सकाळी ८ ला निघून दुपारी ४ वाजता भीमाशन्करला पोहचलो लोकान्च्या माहितीकरता साधारण मार्ग्: पुणे-कामशेत-जाम्भिवलि(बस आहे)-कोन्डेश्वरावरुन सुरुवात्-ढाकच्या वाटेवर घळीच्या अलिकडे उजव्या हातला एक वाट कुसुरच्या पठारवरुन भीमाशन्कर ला जाते ढाकच्या बहिरीला जाऊनही परत येताना ही वाट धरता येते. येथे एक पिवळी पाटीपण आहे)-कुसुरचे पठार्-कुसुर गाव ४ तास्-खान्डी १ तास-सावेळे मुक्काम १ तास्(मेठलवाडीत डाव्याबजूला शाळेत राहण्याची सोय)- दुसरा दिवस्-वान्द्रे खिन्डीतून पठारवाडी ३:३०-४ तास(वान्द्र्याला जाऊ नये लाम्ब पडते)-इथून सरळ घाट माथ्या वरून डोन्गर रान्ग भीमाशन्करला जाते ४ तास. सूचना: वाटेत काही ठिकाणी फासेपारध्यान कडून धोका सम्भवतो आम्हाला सशस्त्र टोळी दिसली होती). कालच पुन्हा खान्डस ते भीमाशन्कर दरम्यान लूटीचा प्रकार झाला आहे. वाटेत पाणी मधल्या गावातून मिळते. -बहिर्जी
|
Dhumketu
| |
| Monday, January 16, 2006 - 1:46 pm: |
| 
|
धन्यवाद. आत भारतात परत आलो की हा ट्रेक करीनच. मागच्या वेळेला भर पावसाळ्यात केला त्यामुळे आजुबाजूचे काहीच दिसले नाही.. फ़ोटो काढले असतील तर पाहायला आवडेल.
|
Ntush
| |
| Wednesday, January 18, 2006 - 7:07 am: |
| 
|
बहिर्जि, पुढचा ट्रेक कुठे आहे? लवकर ठरवा.
|
Bahirjee
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:27 am: |
| 
|
आपण अनुभवी आहात. आपणच ठरवा. -बहिर्जी
|
Ntush
| |
| Monday, March 27, 2006 - 10:06 am: |
| 
|
काय बहिर्जि सध्या निवान्त दिसता. काहि विचार आहे कि नाहि ट्रेकचा?
|