Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 23, 2008

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » पृथ्वी थिएटर - २० जानेवारी २००८ » Archive through January 23, 2008 « Previous Next »

Zakasrao
Monday, January 21, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्द्रा कसला शॉर्ट मध्ये लिहिला आहेस रे??? जरा डिटेल हवा होता :-)
ऑलंपिक
दिनेशदानी दिलेले मुद्दे पाहुन भलतच इन्टरेस्टिंग वाटतय. लिहा बघु कोणीतरी पटकन.
अज्जुके उचल तुझे हात आणि बडव कीबोर्ड :-)
BTW मला ये अस आमंत्रण देवुन काही लोकानी टांगारु होणच पसंत केल तर. हम्म.
बर दिनेशदा वरील ४ नं चा मुद्दा हा आपल्या भावी जोडप्याबद्दल तर नव्हे ना???
८ नं चा मुद्दा आता आपणच समजुन घेतला पाहिजे अस माझ मत आहे
चला माझा टिपी बास झाला लिहा वृतांत पटकन. :-)
वरच्या मी केलेल्या टिपी मधील संबंधितानी दिवे, दिव्यांची माळ,कंदील,हॅलोजन सगळ घ्याव. :-)




Nandini2911
Monday, January 21, 2008 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयत्या वेळेला घोळ घालून मी आता जीटीजीला येत नाही असं जाहीर करून,,, रिक्षावाल्याला चारच्या आत जुहूला पोचव तुला पन्नास रूपये देते असं सांगून,,, नाटक सुरू व्हायच्या आधी तीस सेकंद आत प्रवेश करून आणि मग उपस्थित पाय पसरून बसलेल्या प्रेक्षकाच्या समोरून कांदा फोड खेळत गाठलेली खुर्ची. अशी माझ्यातर्फ़े या जीटीजीला सुरुवात झाली,
अज्जुकाचं नाटक बरंच चांगलं होतं.. आमची अक्कल कमी असल्याने आम्ही जास्त त्य विषयावर बोलणं बंद करतोय. :-) पण एकंदर नाटकाचं लेखन आणि अभिनय मनाला भाववून गेले. \

त्यानंतर प्रूथ्वी कॅफ़े मधे बसून कोण आलय आणि कोण नाही याची चौकशी केली. आगाऊपणा कुठे करावा याला लिमिट नसल्यामुळे.. मी बाकीच्या सर्वाना ओळखलं पण तुम्ही कोण असा प्रश्न ऍडमिनला केला. :-) तरी तेच एकटे मायबोलीचा टी शर्ट घालून आले होते.
बाकीचे नेहमीचे यशस्वी कलाकार इंद्रा, नील, रीना आनंद मनी आणि वहिनीसाहेब (हा भावी आयडी आहे याची नोंद घ्यावी.) इत्यादि उपस्थित होतेच.. दिनेशदाची पहिल्यादाच ओळख झाली. आमची गोंधळ ऐकत ते शांत बसले होते. :-) रीना तिथे होती हे सांगायला नकोच. मग आम्ही स्वातीला (आजा रे परदेसी मै तो कबसे खडी इस पार हे गाणं म्हणत.) यथेच्छ चिडवून घेतलं तिनं सापुची मिठाई न आणण्याचा गृहकृत्यदक्षपणा दाखवला. त्यानंतर चहा, भेळ उसळ मिसळ इत्यादिची ऑर्डर झाली. शर्मिलातानी ऍदमिनना बरेच प्रश्न विचारले, मायबोलीच्या भवितव्याबद्दल आम्ही गहन चर्चा केली. (हे वाक्य विनोदी नाहिये,.. )
मायबोलीचा एकंदरीत प्रवास ऍडमिनकडून ऐकताना खरंच खूप मजा आली. विषेश त्याच्या होम पेजचा किस्सा.. :-)

गुलमोहरमधे कुणी लिहिलं नाही तर मला डुप्लिकेट आयडी घेऊन लिहावे लागले असते असे ऍडमिन म्हणाले. यावरून ते असे डुप्लिकेट आयडी घेऊन लिहत असावेत का? असा संशय माझ्या मनात आला.. म्हणून मी लगेच त्याना तुम्ही काही लिहत का नाही असा प्रश्न विचारला,,, त्यानी वेळ मिळत नाही हे उत्तर दिले... बरोबर.. डुप्लिकेट आयडी वगैरे रिकाम्या लोकाचेच खेळ.. :-)


त्यानंतर अज्जुका मेकप उतरवून (कृतीसाठी बोचणारे किस्से वाचावेत) आली. तिने चहाची चव बिघडली असं आम्हाला सांगितलं अर्थात आमचा चहा झालेला होता. मग तिने कॉफ़ी मागवली. भेल फ़ास्ट देना अशी तिची ऑर्डर ऐकून वेटर दावत गेला (आणि बहुतेक दुसर्‍या कुणासाठी बनवलेली भेळ ) तो तत्परतेने घेऊन आला.. तरी तिने हे वेटर आपल्याला ओळखत नाहीत आधीचे ओळखीचे होते वगैरे म्हटले.. पण एकंदरीत वट बघणॅबल होती.

त्यानंतर स्वातीचे हे आले. त्याना बसण्यासाठी म्हणून स्वाती उभी राहिली. तेही उभेच. एकूण एक खुर्ची रिकामी आणि दोघे त्याच्या अलिकडे पलिकडे उभे असलेले दृश्य होतं... मग शेवटी सुर्यकांत बसले. स्वाती उभी राहिली. (वरती ग्रूह कृत्यदक्ष म्हटलय आता वेगळा शब्द सुचवा,) स्वातीला उखाणा घ्यायला लावायचं असं मी ठरवलं होतं पण ते विसरले... नंतर लक्षात आलं होतं पण तवर स्वाती उखाणेवाल्या घेऊन भुर्र गेली होती..

यानंतर सर्वात नाट्यमय घटना म्हणजे आमच्यासमोर बसलेला बाक मोडला. (बाकावर कोण बसले होते हे मी नाय सांगणार...) आता आपल्याला निघा असं सांगण्यात आलेलं आहे असा त्याचा अर्थ काढून आम्ही कॅफ़ेच्या दारापर्यंत आलो. तिथे एक फोटो सेशन झाले. हे फोटो स्वा आणि स्वाकांत काढत असल्याने मला ते फोटो कसे येतील याची जरा धास्ती आहे. त्याचं लक्ष कॅमेराकडे कमी आणि एकमेकाकडे जास्त. इतक्यात रीनाने अज्जुकाला अंड्यावरच्या कांद्याची रेसीपी सांगितली, म्हणे....

मग ऍडमिनला मी असेच भेटत रहा असं सांगितलं त्यानी मला असंचे लिहत रहा असं सांगितलं (याचा अर्थ मायबोलीवर धुमाकूळ घालायला मला ओFइशेअल परमीशन आहे असा मी काढलेला आहे... तेव्हा बचके रहना असा संदेश मायबोलीकरानी एकमेकाना द्यायला हरकत नाही... )

मग अज्जुका ऍडमिन स्वाती इत्यादि शहाणे लोक घरी गेले. आम्ही सांताक्रूझ स्टेशनकडे जाणारी बस पकडली. त्याच्या शेवटच्या सीटवर बसून मी गॉसिपचा एक बीबी चालवला. रितेश देशमुखबद्दल रीनाचे अज्ञान दूर केले. माझे बंगलोरमधे कॉंटॅक्ट्स आहेत हे परत एकदा तिला सांगितलं...

मधेच दिनेशदानी (अर्र याचं नाव वर लिहायचं राहिलय बहुतेक, तर तेही आलेले होते. माझं तिकीट त्याच्याकडे होतं. तिकिटाचे पैसे मी त्याना दिले. पण त्यानी ते परत केले.. परत करताना ते पैसे डबल झाल्याचं माझ्या लक्षात आल्याबरोबर नीलने ते अर्धे पैसे स्वत्:चे असल्याचे जोरात सांगितलं.. किती हा अविश्वास...

हा.... तर बसमधे दिनेशदानी कुणाला घरी जायची घाई नसेल तर आईस्क्रीम खाऊ असा प्रस्ताव मांडला.. मग स्टेशनजवळच्या एका फ़ॅमिली बारमधे आमचा मोर्चा वळला. बसमधल्या लोकाना घबरवायचे काम रीनाने चोख बजावले होते.. (आज मुंबईत ऑलिंपिक होतं ना.. ) त्यामुळे बरेच लोक आम्हाला याचि देही याचि डोळा बघून घेत होते.
बारमधे.. आपलं ते हे हॉटेलमधे परत एक फोटोसेशन झाले. यावेळेला एक स्ख़ॉच दे..(बटर सायलेंट) वगैरे ऑर्डर दिल्या... इंद्राने वॅनिला कप बघून आम्हालाच कसे कसेसे झाले आणि दिनेशदानी अजून एक कप इंद्रासाठी मागवला. तो बहुतेक रीना आणी निलने संपवला. तिथून आम्ही आपापल्या घरी गेलो.. (बहुतेक जण तरी,. काही जण स्वातंत्र्य सप्ताह साजरा करत असल्यामुळे कुठे गेले ते माहित नाही.. )

अत्यंत हसत खिदळत खिंकाळत आरडत ओरडत हा जीटीजी पार पडला. ऍडमिन आल्यामुळे त्याना प्रत्यक्ष भेटल्यामुळे खरंच खूप अविस्मरणीय ठरला.. त्यात मी ऍडमिनना मी लिहिलेलं वाचता का? असा प्रश्न विचारून घेतलाय... (उत्तर सांगणार नाय म्हणजे काय ते समजून घ्या...)
रेहान केव्हा पूर्ण होणार या स्वातीच्या प्रश्नाला मी शिताफ़ीने उत्तर द्यायचं टाळलं याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी...

या जीटीजी मधे मी आणि रीनाने बॉयफ़्रेंड आणी नवरा याबद्दल आमचे विचार प्रखडपणे मांडलेले आहेत. (मुद्दा नंबर एक दिनेशदा.. :-))

तर मी निबंधातले बहुतेक मुद्दे धरून वृत्तांत लिहिलेला आहे म्हणून मला सर्वात जास्त मार्क द्यावेत ही अपेक्षा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. )


Manee
Monday, January 21, 2008 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे, नाही का कुणीच वृत्तांत लिहायला...
उपास, मीच रे ती. पण पार्ले बीबीवर यायचे त्याला लाखो वर्ष लोटली. :P

तर बर्‍याच बर्‍याच दिवसांनी (महिन्यांनी) मायबोलीच्या GTG ला गेले आणि नेहमीप्रमाणे प्रचंड धमाल करून घरी परतले.

नेहमीच्या प्रथेप्रमाणे ठरल्यावेळी न पोचता जरा उशीरानेच सांताक्रूज़ला पोचले. नील, ईंद्रा, आनंद, रीना आणि स्वाती आधीच येऊन उभे होते. उशिर झालेला असल्याने रिक्षा मारल्या आणि वेळेच्या आधी पाचच मिनिटे पृथ्वीला पोचलो. तिथे दिनेश आणि ऍड्मिन उभेच होते वाट पहात. काहीही बोलायचा अवधी न मिळता आम्ही सगळे आत पळालो.

"माझ्या वाटणीचं खरखुरं"... माफ करा पण नाटकाबद्दल मी काही लिहित नाही, जाणकार लिहितीलच.

नाटक संपल्यावर समस्त जनतेचा मोर्चा कॅफेकडे वळला. "मी बाहेरच्या बाजूला बसते कारण मला लौकर जायचय" स्वातीने तिथे पोचल्याक्षणी घोषणा केली. (अधून मधून तिचे महत्त्वाचे* फोन चालूच होते बरका). फॉर अ चेंज, फिरक्या न घेता ओळख परेड आटपली. आणि नंतर सगळ्यांच लक्ष ऍड्मिनच्य बोलण्यकडे लागलं. मायबोलीची जन्मकथा, तिच्यात होत गेलेले बदल, जुन्या मायबोलीचे सध्या सुरु असलेले रुपांतर, भविष्यातील योजना आणखी बरच काही... मायबोलीच्या सुरस आणि रम्य कथा... त्याच दरम्यान अज्जूका आणि त्यानंतर सूर्यकांत (स्वातीच्या 'बाई मी जाते, बाई मी जाते'चे कारण) यांचे आगमन झाले. जवळजवळ दिड ते दोन तास गप्पा, चर्चा, थट्टा-मस्करी चालू होती. आणि...

कडाड काड काड.....
समोरच्या बाकड्यावर बसलेले मायबोलीकर आपण राष्ट्रगीताला उठून उभे राहतो तसे चटकन उठून उभे राहिले. पाहतो तर तो बाक आधाराची फळी मोडून चक्क तिरका झाला होता. आता तो कशाने मोडला हा संशोधनाचा विषय आहे. वजनदार मायबोलीकरांचं वजन त्याला सहन झालं नाही की जागा न मिळाल्याने मागे उभ्या असलेल्या ईंद्रा आणि आनंद यांनी काही केलं हे अजून कळलेलं नाही. ('दोन तास झाले.. उठा आता' असही म्हणालं कुणीतरी )
त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथून काढता पाय घेतला. ग्रूप फोटो वगैरे झाले आणि मग अज्जूका, ऍड्मिन आणि शर्मिलाचा निरोप घेऊन आम्ही उर्वरीत आठजण स्टेशनच्या दिशेने निघालो. (स्वातीने कधी कलटी मारली ते कळलं नाही.)

रांगेचा फायदा सर्वांना... स्टेशनला पोचल्यावर सगळ्यांना आईस्क्रीम देणार असं दिनेशदांनी सांगितल्यामुळे अगदी अवाक्षरही न काढता आम्ही सगळे बसच्या लांबलचक रांगेत उभे होतो. बसमधे ऐश्वर्या कशी वाईटच दिसते पासून आज मुंबैत ऑलिंपिक होतं नै.. पर्यंत अनेक गहन विषयांवर चर्चा झाली. मागच्या सीटवर आम्ही एवढा गोंधळ घातला की स्टॉपला आमच्यापुढे उतरायची कुणी हिम्मत नाही केली. (हे मुद्दा क्र. ३ ध्यानात ठेऊन) हॉटेलमधे गेलो तर रीना आणि नील बराच वेळ मेनु कर्ड पाठच करत होते बहुधा. ऑर्डर पण देत नव्हते आणि मेनुकार्डही. मग सायलेंट बटरच्या धसक्याने सर्वांनी पटापट ऑर्डर दिली. तेवढ्यात नंदिनी अगम्य भाषेत फोनवर कुणाशीतरी बोलत होती. "मला कळलं.. मला कळलं. ती म्हणाली वरची भांडी घसून ठेव, खालची भांडी घासायला मी येते." इति अर्थात..(ओळखा पाहू) अजून एकेक घेणार का? या दिनेशदांच्या विचारण्याला केवळ उशीर झाला असल्यामुळे सर्वांनी नकार दिला. (खरं खरं सांगा)

टाटा, बाय बाय, पुन्हा भेटू करेपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. कळवा आणि ऐरोलीवरून आलेलं पब्लिक कधी घरी पोचलं कुणास ठाऊक.


जाता जाता...
* पृथ्वीची भेळ अप्रतिम आणि चहा वाईऽऽऽऽऽट होता. (खरच )
* सेलिब्रिटी झाल्याचा फील यावा एवढ्या वेळेला कॅमेर्‍याचे फ्लॅश पडत होते.
* माझ्या वहिनीला मी जबरदस्ती घेऊन गेले होते आणि नंतर ती एक क्षणही कंटाळली नाही.
* त्या मोडक्या बाकावर नंतर एका बाजूला नील आणि दुसर्‍या बाजूला आनंद बसून त्याचा अंत पहात होते. (बिच्चारा)
* नंदिनीचा होणारा नवरा हाच रीनाचा होणारा बॉयफ्रेंड असेल अस सुचवून दिनेशदांनी एका दगडात दोन पक्षी मारले (की दोन दगडात एक पक्षी??)
* बटरस्कॉच मधलं बटर सायलेंट असणं जास्त फायद्याचं असतं हे नीलने सर्वांच्या ध्यानात आणून दिलं.
* वर्षाविहाराआधी भर उन्हाळ्यात एक वर्षाविहार (अर्थात घामाच्या धारांत भिजलेला) करण्याचं ठरवलं.
* तुमच्यामुळे एवढा चांगला ग्रुप मिळाला असं रीनाने सांगितल्यावर ऍड्मिनने क्रेडिट घ्यायला ठाम नकार दिला. तुमच्यामुळे लग्न ठरलं म्हणणारे उद्या घटस्फोटाचं खापर फोडायला आले तर... (भिती अगदीच अनाठायी नाही.. दिवे.....)


Manee
Monday, January 21, 2008 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदू, झकास आहे वृत्तांत!
अंड्यावरच्या कांद्याची रेसीपी>>> की कांद्यावरचं अंड की तव्यावरची कोंबडी

अगं जरा आधी पोस्टला असतास तर मी लिहायचे एवढे कष्ट घेतले नसते.




Ajjuka
Monday, January 21, 2008 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा... अरे च्यायला शिव्या घाला पण नाटकाबद्दल लिहा रे. कसलं जाणकार आणि कसलं काय. जे वाटलं ते लिहा ना.
माझा वृत्तांत खूपच तोकडा असणारे. एकतर स्वतःच्याच नाटकाबद्दल मी काय लिहिणार! आणि दुसरं म्हणजे मी जीटीजी ला उशीरा पोचले. नाटकानंतर meet the team असं चर्चासत्र होतं. तिथे हजर असणं मला भाग होतं. त्यामुळे ते संपवून मी सगळ्यांच्यात उशीरा पोचले. तेव्हा माझा वृत्तांत छोटा असणार. तो उद्या लिहिते. आज दिवसभर पृथ्वी लाच होते नाटकनामा attend करत त्यामुळे आता वृत्तांत उद्या.
पहाटे तीन वाजता लिहितेय म्हणजे festival नंतर मैफल जमली होती हे आलंच..


Sharmilaphadke
Tuesday, January 22, 2008 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाटक आवडलं. विशेषत्: मनस्विनी लता रविन्द्रची नाटकाची संहिता जबरदस्त होती. मनस्विनीच्या लिखाणात नेहमीच आढळणारा जेन्युईननेस किंवा प्रांजळपणा ह्यातही प्रकर्षाने जाणवला. खरंतर विषय काही फार वेगळा नाही. एक यशस्वी अभिनेत्री. तिचा कसले कसले गंड जोपासत बसलेला नाटककार दिग्दर्शक नवरा. तो सुद्धा यशस्वीच म्हणायचा पण 'मला हे करायचं नव्हतं पण तरी हे मला कराव लागतय' चा एक त्याला स्वत्:लाही असमर्थनीय वाटणारा गंड मनात. तद्दन कमर्शियल नाटकं करताना आपल्यातली खरंखुरं नाटक करायची ताकद आता ओसरलीय, मुळात ती होतीच जेमतेम पण आहे ती हा आव आणत बरंच आयुष्य रेटत नेलेलं. त्या मुखवट्याला भुलणारे त्याचे शिष्यगण आजूबाजूला वावरत ठेवताना त्याला त्यांच्यातल्या अजून जिवंत असणार्‍या खर्‍याखुर्‍या मुळेही असुरक्षीतता. मग त्यांना तुमचं नाटक मी करतो सांगत त्यांच्यातल्या खर्‍याखुर्‍याला मारुन, दडपून टाकण्याचा खेळ खेळायचा. लिहीलेल्या नाटकातले ताकदीचे शब्द बदलून टाकायचे, आशय पातळ करुन टाकायचा आणि हे असले खेळ खेळताना स्वत्: कमर्शियलच्या सुरक्षित कुंपणा आड रहायचं.
एक खेळ आपल्या यशस्वी बायकोबरोबरही खेळायचा. पण ती त्याच्या भोवतीच्या शिष्यांइतकी कमकुवत नाही. हे सगळे खोटे खेळ ओळखून असलेली आणि स्वत्:ही खेळू शकत असलेली. फक्त तिचा मुळातला पाया स्थिर त्यामुळे आजूबाजूला काय चाललय चं भान मनात राखून ठेवू शकणारी.
आपल्या मनात जे काही चाललय, त्याच्या मागे असलेलं एक सत्य, त्याच्याही आड दडून असलेलं स्वत्:लाही न उमगलेलं असं काहीतरी खरंखुरं नशेच्या म्हणा किंवा गील्टच्या म्हणा अमलाखाली जेव्हा मनावरचा पडदा भेदून बाहेर यायचा प्रयत्न करतं तेव्हां आपणंच ते बाहेर पडू नये पडलं तर आपल्याला दिसू नये चा कसा प्रयत्न करत रहातो चा हा मला आवडलेला आणि असा दिसलेला 'आपल्या वाटणीच खरंखुरं' चा प्रयोग.

अज्जुकाचे काम सहज मोकळे होते. तिचा वावर सुखद होता. संवाद म्हणण्याची लकब, प्रोजेक्शन (जे पृथ्वीसारख्या रंगमंचावर उघडं पडू शकतं) चांगलं होतं. एकदोनदाच मला एक्सप्रेशन्स स्टीफ़ वाटली. राखून ठेवल्यासारखी. अर्थात परत इथे पृथ्वीचा अगदी निकट असा रंगमंच आहे ह्याचे भान ठेवून मुद्दाम अंडरप्ले करताना बर्‍याचदा असं होऊही शकतं. जितेन्द्र जोशी आणि अक्षय पेंडसेही अगदी सहज आणि मोकळे. दिग्दर्शकाचं काम करणार्‍याचं नाव विसरले. त्यानेही सुंदर केलं पण बर्‍याचदा जितेन्द्र जोशीच्या सहजपणापुढे तो कमी पडला.


Dineshvs
Tuesday, January 22, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या प्रथेप्रमाणे मी वेळे आधीच पोहोचलो. अज्जुकाशी फोनाफोनी झाल्यामुळे, आमची बाहेरच गाठ पडली.
शर्मिला आली होतीच. आमच्या दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. माझ्याकडे तिकिटे सोपवुन अज्जुका तयारीसाठी गेली. पृथ्वीच्या परिसरात अनेक वर्षापासुन जाणेयेणे आहे, पण तिथे मराठी नाटकं होत नसल्याने, कधी जाणे झाले नव्हते. प्रायोगिक नाटके, छोट्या रंगमंचावरच करावी, असा नियम असल्याप्रमाणे, सगळेच रंगमंच छोटे का आहेत, हे नकळे. आणि बहुतेक ठिकाणी, प्रेक्षक नको तितके जवळ असतात.
पण त्या आधी पण आम्हाला एक नाट्यप्रयोग बघायला मिळाला. तेंडुलकरांच्या एका कथेचे द्विपात्री सादरीकरण, पृथ्वीच्या बाहेरच झाले. ( अज्जुका, कलाकारांची नावं, प्लीज )

मह मला Admin दिसले. बाकिचे कलाकार यायला वेळ होता. तिथे तिसर्‍या घंटेनंतर आत सोडत नाहीत, म्हणुन मला काळजी वाटत होती. सोनाली कुलकर्णी, मकरंद देशपांडे वगैरी दादा माणसे, हजर होती.

शर्मिलाने वर नाटकाबद्दल लिहिले आहेच. नाटकातली अज्जुका आपल्या अज्जुका एवढीच मोकळी वाटली. ती अभिनय वगैरे करतेय असे वाटलेच नव्हते. खरे तर मी तिला पहिल्यांदाच अभिनय करताना बघितले होते आणि ती पण अनेक वर्षानी प्रत्यक्ष रंगमंचावर वावरत होती.

सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम होता. एकदोन वेळा प्रकाशयोजनेचा घोळ झाला.
काहि गोष्टींचे संदर्भ मला लागले नाहीत. ( उदा. भिंत कोसळणे, आलेख काढणे वगैरे ) नाटका नंतर चर्चासत्र होते, तिथे या शंका दुर झाल्या असत्या, पण आम्हाला गप्पा मारायची घाई झाली होती.

सगळ्या तरुण मायबोलीकरांचा सळसळता उत्साह बघुन, मला परत तरुण झाल्यासारखे वाटले. अगदी पहिल्या भेटीत, मायबोलीकर कसे जुन्या ओळखीचे वाटतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

Admin ने केलेली चर्चा, हा सगळ्या GTG चा उत्कर्षबिंदु होता. मायबोलीच्या भविष्याबद्दल त्यानी केलेली तरतुद, त्यांच्या भावी योजना, हे ऐकुन खुपच छान वाटले. या परिवाराचे आपण सदस्य आहोत, याचा परत एकदा अभिमान वाटला.

बाकिच्या गमतीजमती नेहमीच्याच. आमच्याबद्दल जावईबापु आणि वहिनीसाहेब काय म्हणताहेत, ते त्यांच्याकडुन कळले तर छान.

आणि त्या मोडलेल्या बाकावरची, एक वजनदार व्यक्ति मी होतो. Admin मात्र काठावर बसले होते.



Ajjuka
Tuesday, January 22, 2008 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|एकदोनदाच मला एक्सप्रेशन्स स्टीफ़ वाटली. राखून ठेवल्यासारखी. |
हे मात्र १००% खरं. मला स्वतःलाच मी पर्वा प्रयोगात स्टीफ असल्याचे जाणवत होते आणि त्याचं मी काही करू शकत नव्हते. पीच पण चुकीचा लागला कधी नव्हे तो. तेही लक्षात आलं पण खाली येउ शकत नव्हते. (दुबेजी नव्हते प्रयोगाला हे बरंय नाहीतर नंतर शिव्यांचा भडीमार!! पीच नही संभलता अभितक!) अजून अभिनयासाठी संपूर्ण सरावले नसल्याचे लक्षण, दुसरं काय! आणि कारण म्हणून नाही पण त्या खोकल्याने confidence ची वाट लागली. टेन्शन यायला लागलं की आता खोकला येणार! मग सीन कसा करायचा... शी! आणि मग सगळंच हुकायला लागलं. सराईत अभिनेत्री नसल्याचे हे तोटे. हे सांगून पळवाट मिळवण्याचा हेतू नाही. मला अजून या काही गोष्टी जमत नाहीयेत याची ही कबुली आहे.
चर्चेत तुम्ही सगळ्यांनी यायला हवं होतं. छोटीशीच झाली पण काही चांगले मुद्दे मांडले गेले.
'अज्ञान दाखवतो पण आम्हाला कळलं नाही!' अश्या एका प्रतिक्रियेवर सतीश मन्वरने (नाटकाचा दिग्दर्शक) खूप छान उत्तर दिले.
"४ व्यक्तिरेखा तुम्हाला कळल्यात? सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकात घटना या पातळीवर काय घडतं हे कळलंय?"
"हो!"
"मग यापुढे जाऊन जे आहे तो अनुभवण्याचा आणि personal interpretation चा भाग आहे. कळणं न कळणं हा भाग irrelevent आहे. अज्ञान असं म्हणायची गरज नाही उलटं तुम्ही जेवढें पोचलंय त्याच्यापेक्षा जास्त समजून घेण्याची इच्छा घेऊन इथे आलात त्याअर्थी ही प्रोसेस सुरू झाली. तुम्हाला विचार करायला भाग पडलं हे खरं तर खुप चांगलं आहे."

दिग्दर्शकाची भूमिका करणारा विनोद लव्हेकर.

दर्दी चे कलाकार निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ. ते दोघंही फार मस्त कलाकार आहेत. फारच सहज. मोहित टाकळकर ने दिग्दर्शित केला होता प्रयोग. तुम्हाला बघायला मिळाला ते बरं झालं. मी दुपारी त्यांची चक्री ऐकत होते ५-१० मिनिटे. फार मजा आली तेव्हाच. प्रयोग तर फारच सही झाला असणार.

तर अश्या सगळ्या चर्चेनंतर मी उशीराने आपल्या माबोकंना भेटले. तोवर सगळ्यांचे खाणे पिणे उरकलेले होते. आणि काही विनोदांच्या फैरी झडून गेल्या होत्या. पण सगळ्यांनी मला मोठ्या मनाने आपल्यात सामावून घेत अनेक विनोदांचे मूळ सांगितले. :-)
भूक लागल्याने भेळ, कॉफी अश्या पदार्थांवर ताव मारत मारत एकिकडे मी गप्पाही मारत होते. आधी ओळख परेड झाली. मग सगळं नेहमीप्रमाणे, मात्र नसलेल्यांच्यावर टिका हा महत्वपूर्ण कार्यक्रम यावेळेला झालाच नाही.
कांद्यावरचं अंडं, अंड्यावरचा कांदा, डोक्यावरच्या अंड्यावर कांदा अश्या अचाट आणि अतर्क्य प्रकारांची रीनाने ओळख करून दिली. म्हशीवर बसलेल्या नंदीनी व रीना ही गोष्ट मी आजवर figurative speech अश्या अर्थाने समजत होते तर ते तसे नसून त्या खरच बसल्या होत्या असा साक्षात्कार मला झाला.
वहिनीसाहेब बिचार्‍या घाबरून गेल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.
नंतर जावईबापूंचे आगमन झाले. ते पण सगळ्यांना घाबरले असं क्षणभरासाठी वाटल. पण नंतर त्यांनी ते लपवले तरी किंवा त्यांची भिती नष्ट झाली (आपले रक्षण करण्यास स्वाती समर्थ आहे असे वाटून!) :-)
एवढ्यात बाक मोडला. मग सगळे उठले. हळूच कुणी पाह्यलं नाही असं सगळ्यांनी पाहून घेतल. आणि चेहर्‍यावर "आम्ही नाही, आम्ही नाही कुठे काय कुठे काय! " असे भाव घेऊन उभे राह्यले. इथले सगळे म्हणजे पुरुषमंडळी बरंका!.
यानंतर अजयला माबोकंच्या वतीने दिनेशदांच्या हस्ते भेटवस्तू दिली. फार मस्त गणपती आहे. निवड स्वातीची. ती उत्तमच आहे हे अजून एका उदाहरणासहीत स्पष्ट झाले. त्याचा म्हणजे भेटवस्तूचा फोटो दिनेशदा इथे प्रसिद्ध करतील अशी आशा आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही अजय यांच्या घरी जाल तेव्हा तुम्हाला ते ओळखू येईल.. :-)
असे होत होत आम्ही पृथ्वी च्या बाहेर आलो. कॅमेर्‍यांचे फ्लॅश लखलखणे चालू होतेच. त्याची परत एक फेरी झाली. तेव्हाच प्रिमियर ला जेवढे फ्लॅश चकचकतात त्यातले अनेक कॅमेरे नुसतेच लखलखतात आत फिल्म नसतेच अशी मौलिक माहिती नंदीनीने पुरवली. आणि मी शंकेने सगळ्या क्यामेर्‍यांकडे पाहू लागले. मग म्हणलं काही हरकत नाही.. नाहीतरी डिजिटलच आहेत. आणि त्यात आत काय असतं किंवा नसतं हे माहितच नसल्याने मला तेव्हा शंका आली नाही.
हळूहळू सगळे मार्गस्थ होऊ लागले. अजय, दिनेश वगैरेंची मनुशी(मनस्विनी) ओळख करून दिली. मग हाय हॅलो बाय असं झाल्यावर सगळे पृथ्वीवरून बाहेर पडले आणि मी पुढच्या नाटकाच्या लायनीमधे उभी राह्यले.

यापुढे एक ठरलंय की एकुणातच मराठी किंवा हिंदी प्रायोगिक नाट्यवर्तुळात घडणार्‍या इव्हेंटस बद्दल जेवढे शक्य होईल तेवढे मी इथे शेअर करीन. काल फेस्टिव्हलचं शेवटचं नाटक पाह्यलं 'ते पुढे गेले!' त्याबद्दल लिहायचंय. येत्या १ ते २ दिवसात नक्की टाकते.


Manjud
Tuesday, January 22, 2008 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मिसलं........ मी मिसलं..

इन्द्रा, नंदिनी, मनी, शर्मिला, दिनेशदा आणि अज्जुका.... फारच छान वृत्तांत. नसलेल्यांवर तुम्ही टीका चर्चा केली नाहीत ते फारच छान झालं. एकूणच ह्या GTG ची बकरी रीनाच होती हे वाचून बरं वाटलं. मला वाटलं की ऍडमिन रीना आणि नंदिनीला बघून '१८ वर्षशिवाय मायबोलीवर प्रवेश नाही' ही अट घालतील की काय. पण क्रेडीट देऊन रीनाने ऍडमिनना खूश केलेलं दिसतंय.

अज्जुका, तुझ्या सगळ्याच इव्हेंट्सच्या आठवणींची आम्ही वाट बघतोय.


Indradhanushya
Tuesday, January 22, 2008 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मायबोलीकार आणि मायबोलीकरांचा GTG


Ajjuka
Tuesday, January 22, 2008 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो इंद्रा जियो!
जियो इंद्रा जियो!


Manjud
Tuesday, January 22, 2008 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा!! भेटवस्तू खासच..... गूड चॉईस स्वा..... हे आम्हाला स्वकांतवरून कळलेच म्हणा.

Neel_ved
Tuesday, January 22, 2008 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळे मिटुन दुध ( कि वाईट्ट चहा?) पिणारी मांजर बघितली आहे का कोणी?

मंजु, पण स्वाकांतच्या चॉईसचे का? दिवे घ्या :-)


Dineshvs
Tuesday, January 22, 2008 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्सं होय

coffee

Dineshvs
Tuesday, January 22, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणराजाला करु मुजरा. ..

Admin

Prajaktad
Tuesday, January 22, 2008 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिकाराचे दर्शन घडवल्याबद्दल आभार...गणपती सुरेख आहे..स्वा ची चॉइस चांगली आहे.. gtg ची सगळी वर्णन छान..

Amruta
Tuesday, January 22, 2008 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GTG मस्तच झालेल दिसतय. लगे रहो.

Manee
Wednesday, January 23, 2008 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वहिनीसाहेब बिचार्‍या घाबरून गेल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.>>>
छे... तिला कमेण्ट्स पास करता येत नव्हत्या त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. पहिल्याच भेटीत कुणी असभ्य म्हणायला नको.
त्या सगळ्या कमेण्ट्स तिने नंतर मला ऐकवून दाखवल्या.

दिनेशदा, ईंद्रा.. मस्त फोटो!


Ajjuka
Wednesday, January 23, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या सगळ्या कमेण्ट्स तिने नंतर मला ऐकवून दाखवल्या.
त्या सगळ्या इथे प्रसिद्ध कराव्यात ही णम्र विणंती!
खि खि खु खु..

BTW दिनेशदा हा कुणाचा फोटो काढलायत नक्की तुम्ही? :-)


Zakasrao
Wednesday, January 23, 2008 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!
मस्तच आहे गणपती :-)
सगळ्यांनीच छान लिहिल आहे.
मनी आणि नन्दिनी
म.म्जु तुझी १८ वर्षाची कॉमेंट





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators