|
Ajjuka
| |
| Tuesday, January 15, 2008 - 4:11 am: |
| 
|
जुहू येथे GTG २० जानेवारी रोजी पृथ्वी थिएटर जुहू येथे एक छोटेसे GTG आहे. खास आकर्षण म्हणजे स्वत: Admin ची उपस्थिती. नाटकनामा - ७ मराठी नाटके ३ दिवस. १९-२१ जानेवारी. The theatre, they say It has no future. Tis true, For theatre thrives in the present. या महोत्सवांतर्गत ललित, मुंबई सादर करीत आहे एक दीर्घांक ’माझ्या वाटणीचं खरं खुरं’ दिनांक: २० जानेवारी २००८. स्थळ: पृथ्वी थिएटर, जुहू. वेळ: दुपारी ४ वाजता लेखन: मनस्विनी लता रवींद्र, दिग्दर्शन: सतीश मनवर कलाकार: अक्षय पेंडसे, नीरजा पटवर्धन, विनोद लव्हेकर व जितेंद्र जोशी नाटकाचा अवधी: १ तास ३० मिनिटे सर्वांनी जरूर या! नाटकाबद्दल इथे बघा.. http://lalitmumbai.googlepages.com/mvkk जे लोक नाटकाला नक्की येणार आहेत त्यांनी मला १९ जानेवारी पर्यंत इमेल तरी करा किंवा फोन करा म्हणजे मला तिकिटे राखून ठेवता येतील. माझा सेल नं ९८१९५९९१४७ नाटकाची त्यातूनही प्रायोगिक नाटकाची ज्यांना allergy असेल त्यांनीही प्रयोगानंतर भेटायला यायला हरकत नाही. मी अज्जिबात रागावणार नाही. भेटूया मग २० ला पृथ्वी वर! आणि हो.. पृथ्वीला तिसर्या बेलनंतर आत सोडत नाहीत. त्यामुळे नाटक बघायचे असल्यास वेळेत या.. उशीर झाला तर कॅफे मधे बसून खाद्यापदार्थांची तपासणी करा!! नीरजा
|
महोत्सवासाठी मी येणार होतेच. आता गेटटुगेदर आहे असे समजल्याने तर नक्की थांबीन त्यासाठी.
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 15, 2008 - 5:34 am: |
| 
|
शर्मिल फडके, तुम्ही सौ अरूण फडके का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:28 am: |
| 
|
मी येणार आहे, ईमेल केलीय.
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:25 am: |
| 
|
ओके गुड! मेल मिळाली, रिप्लाय केलाय. बाकी कोणी नाही का अजून?
|
अज्जुका धन्यवाद मी आणि घारूअण्णा येत आहोत... घारू तुला फ़ोन करुन नक्की करेल... दिनेशजी... नक्की भेटू
|
Neel_ved
| |
| Wednesday, January 16, 2008 - 8:33 am: |
| 
|
हाय अज्जुका, मी शुक्रवारी गावाला जातोय, रविवारीच परत येतोय. त्यामुळे नाटकाला नाही येऊ श्कणार, पण ५:३० ते ६ पर्यंत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करीन.. मलाही सर्वांना भेटायचे आहेच...
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 16, 2008 - 9:30 am: |
| 
|
ग्रेट.. नील, नाटक संपून आम्ही बाहेर येईपर्यंत तू कॅफे मधे बसून TP कर! आणि हो जागा पकडून ठेव.
|
Dineshvs
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:29 am: |
| 
|
अज्जुका, आधी बुकिंग करायला हवे आहे का ? तु आधी कुणाला सांगुन ठेवु शकशील का ? , तसे शक्य असेल तर, आल्यावर कुणाकडे तिकिटाची चौकशी करायची, ते पण कळव.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 17, 2008 - 5:01 am: |
| 
|
नक्की येणार्यांचा आकडा कळला की मि तिकिटे राखून ठेवीन बॉक्स ऑफिसवर. कुठे कुणाला नी काय विचारायचे ते सांगते लवकरच. अरे हो तिकिटाची किंमत रू ७५ आहे. आत्तापर्यंत ६ तिकिटांचे कन्फर्मेशन मिळाले आहे मला. उद्या आम्ही सगळे (तालमीसाठी) भेटणारोत तेव्हा सगळी डिटेल्स कळतील मला.
|
Ajjuka
| |
| Friday, January 18, 2008 - 10:23 am: |
| 
|
तर लोकहो.. तिकिटे माझ्याकडे घेणे मग तुम्ही मला फोन करणे मग तुम्हाला मी आत बोलावणे किंवा बाहेर कुणाबरोबर तरी तिकिटे पाठवणे... इत्यादी सगळ्या गोंधळाला रामराम देऊया. सगळी तिकिटे बॉक्स ऑफिसवरच ठेवलेली असतील. तिथे माझे नाव सांगणे, तुमचे नाव सांगणे आणि पैसे भरून तिकिटे घेणे. आत्तापर्यंत कन्फर्म झालेले लोक्स.. दिनेश १ Admin २ स्वाती ६ ( As per list of MBkars ) शर्मिला फडके १ (तुमचं तिकिट मीच राखून ठेवायचंय ना? की तुम्ही आधीच काढलंय) कोणी राहिलं असेल लिस्टमधे तर प्लीज कळवा. अजून काही लोक्स बॉर्डरलाईनवर आहेत. त्यांनी मला उशीरात उशीरा परवा सकाळपर्यंत कन्फर्मेशन द्या. भेटूया मग... बर हा जो नाटकनामा असा महोत्सव आहे त्याचे सिझन पासेस पण उपलब्ध आहेत. नाटकनामाच्या तपशीलांसाठी http://www.prithvitheatre.org/whats_on.php?action_name=fetch&frm_where=drop_down&val=30 इथे पहा! उद्याची नाटके पण बघण्यासारखी आहेत. मी दिवसभर नाटकं बघणारे उद्या तिथे. जर कुणाला interest असेल तर नक्की बघा किंवा तुमच्या ओळखीत कुणाला interest असेल तर जरूर सांगा.. Spread the word!
|
Ajjuka
| |
| Saturday, January 19, 2008 - 6:48 pm: |
| 
|
एक घोटाळा झालाय. माझा फोन बिघडलाय आणि सिमचाही गोंधळ आहे. मी तिकिटं विकत घेतलेली आहेत. सध्या माझ्याकडे एक तात्पुरता नंबर आहे 9833028119. हा चालूच असेल ३:३० पर्यंत अशी आशा करते मी नाहीतर मला सरळ आत येऊन भेटा. कुणी जर मेसेज पाह्यला तर वरच्या लिस्टमधल्या कुणाला तरी प्लीज हे कळवा. माझ्याकडे ज्यांचे नंबर्स आहेत त्यांना मी समस करतेच आहे. नीरजा
|
Ajjuka
| |
| Monday, January 21, 2008 - 9:41 am: |
| 
|
अरे काय हे! अजून वृत्तांत नाही?
|
अज्जुकाचे आभार मानुन मुंबईकरांच्या लौकीकाला जागत कसे तरी पृथ्वी थेटर वेळेत गाठलं आणि आतील आवाका पाहुन चुकून रंगीत तालीमीत घुसल्या सारखं वाटलं. प्रायोगीक नाटकांसाठी असे छोटेखानी थेटर म्हणजे अगदी मोक्याची जागा... "माझ्या वाटणीचं खरं खुरं" विषय समजला पण आशयला हात लावत नाही... खर खुरं सांगायच तर नो झेप्स... अज्जुका आणि तिच्या टिमचं काम उत्तम होतं यात वादच नाही. अभिनंद! नाटक संपल्यावर पृथ्वी कॅफ़ेत GTG ला सुरवात झाली ती ऍडमिनच्या ओळख परेडने. मुंबईकरांनी आपला नेहमिचा नाटकीपणा सोडुन एका झटक्यात आपली खरी खुरी ओळख करुन दिली. रीना, नंदिनी, स्वाती, मनी, सोबत वहिनीसाहेब, शर्मिला, आनंद, नील, दिनेशजी, खुद्द ऍडमिन महाराज अजयजी आणि सोबतीला अस्मादीक होतेच. खानपानाची ऑर्डर झाल्यावर अजयजींच मुंबईत येण्याच प्रयोजन, कार्यक्रम आणि पुढील दौरा या वर चर्चा झाली. जुन्या आणि नविन मायबोलीबद्दल अजयजींशी या निमित्ताने मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. मायबोलीच्या दशकपुर्ती प्रवासाचे वर्णन ऐकण्यात सगळे मग्न झाले होते. तासा भराने अज्जुकाही तिच कामं संपवुन आमच्यात सामील झाली. मायबोलीच्या एकुण निर्मीती मुल्ल्यांबद्दल बराच खल झाला. चर्चा रंगात असताना स्वातीचा रजनीकांत आगमन झाले. मायबोलीकरांना एकत्र पहाण्याची ही सुर्यकांतची पहिलीच वेळ असल्याने त्याने LBW चा पवित्रा घेतला होता. जेष्ठ मायबोलीकर दिनेशजींच्या हस्ते मायबोली परिवाराकडुन एक सस्नेह भेट अजयजींना देण्यात आली आणि समारोप प्रंसगी भेटवस्तूचे अनावरण करण्यात आले. Group फ़ोटो काढुन एका अविस्मरणीय GTG ची सांगता करण्यात आली. Olympic 
|
Manee
| |
| Monday, January 21, 2008 - 11:01 am: |
| 
|
हे काय रे, थोडक्यात वृत्तांत. लिहा ना आणखी कुणीतरी. नंदिनीऽऽऽऽ Olympic.... 
|
Monakshi
| |
| Monday, January 21, 2008 - 11:07 am: |
| 
|
इंद्रा मस्तच रे. पण मला मिस केलं ते नाही लिहिलंस. खरंच खूप छान झालेला दिसतोय GTG . BTW हे olympic काय प्रकार आहे बुवा???
|
GTG वरुन परत येताना रीनाला पडलेला प्रश्ण... एव्हढी सगळी लोकं Olympic मधे कशाला पळतात? संदर्भ्: रविवारची मुंबई मॅरेथॉन मोना टांगारूना आम्ही मिसत नसतो... हसत असतो...
|
Dineshvs
| |
| Monday, January 21, 2008 - 12:27 pm: |
| 
|
चला मुलानो, निबंध लिहायला घ्या. खालील मुद्दे लक्षात घ्या. १ ) वरची भांडी घासून ठेव, खालची भांडी घासायला मी येते. २ ) बटर सायलेंट स्कॉच आईसक्रीम. ३ ) बसमधले दशहतवादी. ४ ) वजनदार मायबोलीकरांमुळे मोडलेला बाक. ५ ) पृथ्वीचा अमृततुल्य चहा ६ ) जावईबापू आणि वहिनीसाहेब यांची उपस्थिती. ७ ) मोदी आणि मॅरथॉन मधली बिपाशा, यांचे आकर्षण सोडुन, सगळ्यानी नाटकाला लावलेली हजेरी. ८ ) स्वातीने आळवलेले, बाई मी जाते, बाई मी जाते, हे गाणे. ९ ) ADMIN ने क्रेडिट घेण्यास दिलेला ठाम नकार. आणि अर्थातच मायबोलीची आगामी आकर्षणे.
|
Upas
| |
| Monday, January 21, 2008 - 1:10 pm: |
| 
|
अरे व्वा! मस्तच झालं की.. मनी म्हणजे तीच का जी फार पूर्वी पार्ले बीबीवर यायची.. :-) नाटकाबद्दल लिहा की..दिनेश म्हणतात तसं इतर सगळे भरगच्चा कार्यक्रम सोडून इथे आलात म्हणजे छानच..
|
Kedar123
| |
| Monday, January 21, 2008 - 1:19 pm: |
| 
|
छान च आहे व्रु. मी पण मिसल
|
|
|