Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 06, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » पर्यावरण » पर्यावरण रक्षणासाठी माझे योगदान » Archive through October 06, 2007 « Previous Next »

Hkumar
Saturday, September 08, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पर्यावरण रक्षण' या विषयावर बडबड करणारे पुष्कळ असतात.प्रत्यक्ष क्रुती करणारे मात्र थोडे! 'अमुक तमुक केले पाहीजे' (दुसर्यांनी किंवा सरकारने!) हे म्हणणे फ़ार सोपे. पण ' मी काय करतो' हे जास्ती महत्वाचे. या सन्दर्भात एडमंड बर्कचे वाक्य फ़ारच मार्मिक आहे. ' आपण फ़ारच थोडं काही करु शकतो असं म्हणून जो काहीच करत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो'.
तेव्हा या बीबी वर ' मी काय केले ' याचे लिखाण करावे ही विनंती. आपली क्रुती इतरांना प्रेरणादायी ठरेल.
एखाद्या क्रुतीशीलाची वाट पाहतो आणि मग माझ्यापासून सुरवात करतो.


Ravisha
Sunday, September 09, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला विषय आहे;पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवळ बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व जास्त नाही का?
माझ्या मते पर्यावरण म्हणजे वृक्षारोपण...
माझे खूप काही योगदान आहे असे म्हणता नाही येणार पण जिथे जिथे ह्याबद्दल चर्चा आणि कृती अपेक्षित आहे तिथे माझा खारीचा वाटा असतो....
मी स्वतः माझ्या सहवासातल्या व्यक्तीच्या वाढदिवसाला किंवा काही विशेष समारंभाला पुष्पगुच्छाऐवजी एखादे रोप देणे पसंत करते (आणि ते नंतर नीट वाढत आहे न ह्याचीही दखल घेते)
आमच्या घरीही अर्थात (देशात आणि परदेशात दोन्हीकडे) जास्तीत जास्त झाडे जोपासली जातील ह्याची काळजी घेतली जाते...
बाकी ओघाने सांगेनच :-)


Jagu
Monday, September 10, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्यावरण रक्षणा मध्ये झाडे लावणे खुपच चांगला उपाय आहे. पण त्याच बरोबर इतर प्रदुषणांवरही आपल्याला जमेल तसे उपाय करायला हवेत. म्हणजे जंतू, धुर, याद्वारे हवेत पसरणारे प्रदुषण, तेल, कचरा, पाण्यात मिसळल्या मुळे पाण्यात (समुद्र, तलाव) होणारे प्रदुषण.

मला बाग कामाची लहानपणा पासुनच आवड आहे. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी जागा भरपुर असल्याने माझा छंद मला अजुन जोपासता येतो. त्यामुळे मी नेहमी फुलझाडे, फळझाडे, भाज्या, शोभेची झाडे लाउन त्यांची मशागत करते.

मी मरीन डिपार्टमेंट च्या पोलुषन कंट्रोल विभागात काम करते. त्यामुळे काही अंशी अप्रत्यक्षपणे माझ्या कडुन समुद्र रक्षणाचे काम होते.


Ashwini_k
Monday, September 10, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता गणपती येणार. त्यासाठी मुर्ती जर आपण ecofriendly material पासून बनवलेली आणली तर विसर्जनानंतर ती पटकन विरघळते व तलाव, नदी, समुद्र यांचे प्रदूषण आपण कमी करू शकतो. तसेच, सजावटीतही थर्माकॉल वगैरे वापरू नये. अशा मुर्ती हल्ली available आहेत. त्या plaster of paris सारख्या खूप सुबक नसतीलही पण देवाने दिलेला निसर्ग राखण्यासाठी आपण केलेला कणभर प्रयास गणपतीबाप्पाला नक्कीच आवडेल.

माझ्याकडे गणपती येत नाही पण ecofriendly गणपती बनवण्याचा उपक्रम राबवणार्‍या संस्थेशी मी attached आहे.


Hkumar
Monday, September 10, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रविशा, जगु व आश्विनी.
या विषयाला अनेक पैलू आहेत. मी 'वाहनजन्य प्रदूषण' हा भाग गांभिर्याने घेतला आहे. मी बहुतेक कामे चालत अथवा सायकलने करतो. तसेच सार्वजनिक वाहनांचाच अधिक वापर करतो. स्वताचे वाहन कमीत कमी वापरतो. गेली ३ वर्षे मी परदेशात असून माझ्याजवळ कोणतेही स्वताचे वाहन नाही. याचे कारण म्हणजे the best way to educate people is to be an example . स्वताच्या वाहनाशिवाय जगता येते हे स्वताला सिद्ध करून दाखवले अर्थातच इतरांच्या द्रुष्टीने वेडा ठरून!


Hems
Monday, September 10, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्यावरण संतुलनाचा '3R' मंत्र आहे ना .. Reduce..Reuse..Recycle तो मी आचरणात आणते. या तीन R s ना उतरत्या क्रमाने प्राधान्य द्यायचं.
यामध्ये पाणी, petrol यांचा कमीत कमी वापर करणे, यापासून ते अगदी बाजारात खरेदीला जाताना स्वतच्या पिशव्या नेणे अशा सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा समावेश करता येतो. अक्षरशः कराल तेवढं थोडं आहे !
माझ्या घरी मी compost bin तयर केली आहे. landfill मध्ये भर न घालता उलट मातीची प्रत सुधारावी हा हेतू.
आमच्या इथे, सिलिकॉन व्हॅलीत ( अजून ) पाणी, वीज यांचं नियमन केलं जात नाही government कडून... मला वाटतं त्यांनी तसं करावं. :-) हो खरंच!! त्यामुळे तरी इथे लोकंना थोडी बचतीची जाणीव येईल म्हणून. मी स्वतः तर या सार्‍याचा वापर अत्यंत जबाबदारीने करतेच पण महत्वाचं म्हणजे मी माझ्या मुलांनाही तसच शिकवलं आहे. मला वाटतं शाळांमध्ये हे पर्यावरण संतुलनाचं शिक्षण आणि महत्व वाढवलं पाहीजे. पुढची पिढी अधिक जागरूक झाली पाहिजे.


Hkumar
Wednesday, September 12, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कागद बचतीबाबत मी खूपच जागरूक आहे. संगणकावरून printouts कमीत कमी काढतो. माझ्या प्रिंटर मध्ये मी सर्व पाठकोरे कागद घालून ठेवले आहेत. उठसुठ printouts काढणे हा संगणक या संकल्पनेचाच पराभव आहे!

Ashwini_k
Wednesday, September 12, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कागद किंवा प्लास्टिक हे शक्य तेवढे recycle करावे कारण recycling process मध्ये virgin product तयार करण्याच्या process पेक्षा कमी greenhouse gases emission होते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण एकप्रकारे मदतच करतो. कागद तयार करण्यासाठी नविन झाडेही कमी तोडावी लागतील.

Mvrushali
Thursday, September 13, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेम्स,तू घरि compost bin कशी केलीस,जरा लिहू शकशील का?आम्ही अपार्टमेंट मधे रहातो,मला कसं करता येईल इथे?तू compost cultureवगैरे काहि घातलंस का?

Storvi
Thursday, September 13, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेम्स मी compost bin चा विचार केला पण मला त्यात काही doubts आहेत. ह्याचा वास येत नाही का? आपण घरत जेवढा organic matter ताकुन देतो तेवष्याने किती compost तयार होते? basically, is it worth the effort? मी असेही वाचले आहे की काही cities मध्ये तुमचे green waste घेउन ओम्पोस्त करुन तुम्हाला देतात पण हा पर्याय San Jose मध्ये नाही. तुम्हाला शेजार्यांकडुन release वगैरे घ्यावा लागला का?

बागेत lawn असेल तर फ़ार पाणी खातात. आम्ही आमचे lawn कढुन टकून फ़ुलझाडं लावली आहेत. ती सुधा कमी पाणी लाअगणारी आहेत. शिवाय त्यांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा केला आहे. this is the most efficient way to water a plant. झाडांच्या भोवती mulch वापरले आहे, त्याने पाणि वाहून जात नाही आणि mulch हळू हळू जमीनीत परत जाऊन जमीन सकस होत रहाते. केमिकल्स न घालाता weeds चाही उपद्रव कमी होतो.


Bee
Friday, September 14, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अधूनमधून माझ्या घरी झुरळ निघतात. अशा वेळी मी त्यांना चपलीने किंवा झाडूने चेचून अमानुषपणे मारत नाही तर केरसुनीच्या सुपात उचलून बाहेर जिथे झाडी आहे तिथे टाकतो. त्यामुळे एक तर माझ्या कडून त्यांची हत्या होत नाही. ते पळून कुठेतरी घर करत असतील. नाहीच असे झाले तर पक्षी वगैरे चोचीत त्यांना उचलून पायाखाली चेचून आपले भक्ष बनवितात. मला हा प्रकार ecofriendly वाटतो.

बाकी पाणी, वीज, पेट्रोल, प्रदुषण ह्यांची टंचाई इथे कधी दिसत नाही त्यामुले मी त्या फ़ंदात पडत नाही. पण देशात मात्र ह्या गोष्टी जपण्यासाठी नक्कीच लोक प्रवृत्त झाले आहेत. व्हावेच लागते अशी वेळ आली आहे..


Maanus
Tuesday, October 02, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक जाहीरात. .. ..

reuse plastic

Jo_s
Wednesday, October 03, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानूस छान जाहीरात. थोडक्यात बरच काही

Hkumar
Wednesday, October 03, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच जाहिरात! पण आपण सर्वांनी क्रुती करणे अधिक महत्वाचे.

Maanus
Wednesday, October 03, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The simple things I do at work & home to save paper.

1. Avoid printing
2. Avoid printing
3. If required, print using back to back option
4. If back to back is not possible print 2 pages on 1 page
5. Use the blue trash bin to recycle papers.
6. Avoid taking new glass every time I go to pantry, just take one in morning and re-use till EOD.
7. Use multi-size kitchen paper roll instead of one single big size roll.
8. Turn off monitors while leaving for the day.

I don’t know why people need to take new dish everytime they are going to take new food items at buffet. Is there any reason for that? The only reason I can think of is, the serving utensils may make contact with the food you have already ate.

Overall US is the biggest consumer and at the same time largest producer of trash, however they have two separate trash bins. (black) Non-recycle items and (blue) recycle items.

We don’t have any such concept.


Farend
Wednesday, October 03, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातही आता ओला कचरा वेगळा गोळा करतात बहुतेक.

चांगली जाहिरात आहे, विचार करायला लावणारी. सद्ध्या अमेरिकेत सुद्धा supermarket वगैरे मधे हजारो मैल प्रवास करून येणार्‍या भाज्या न घेता, आपल्या घराजवळ पिकणार्‍या भाज्याच वापराव्या म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत. हे सगळीकडे सर्व सीझन मधे शक्य नाही, पण जेथे जमेल तेथे.


Hkumar
Friday, October 05, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेपर napkins ची खरे तर गरज आहे का? हात धुवून खिशातील रुमालाने पुसणे किती चांगले!

Shonoo
Saturday, October 06, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचार करून पाहता बर्‍याच गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत.

डेल चे, लँडस एंड, एल एल बीन, पॉटरी बार्न, विलियम सोनोमा यांचे कॅटलॉग येत असतील तर ते बंद करणे

घरात हॅलोजन बल्बच वापर कमी करावा. ट्युब लाईट सारखे दिवे मिळतात ते लावावे सगळि कडे.

रोजच्या पेक्षा एक जरी मनुष्य जास्त असला तर लगेच डिस्पोजेबल ताटं, वाट्या, चमचे वापरू नयेत. अनेकांकडे महागडे डिनर सेट वर्षातून एक दोनदाच वापरले जातात. एरवी पाहूण्यांना डिस्पोजेबल मधे वाढायचं अन महागडे डिनर सेत तितक्याच महागड्या चायना कॅबिनेट किंवा हच मधे ठेवायचं! अगदी नाईलाज असेल तर कागदी प्लेट वापराव्या अन प्लास्टिक्चे चमचे काटे वगैरे कटाक्षाने रिसायकल करावेत. फोम ( थर्मा कोलचे प्रॉड्क्टस अगदी कमी वापरावेत.)

घरच्या वापराकरता कोक( किंवा तत्सम ) कॅन आणण्यापेक्षा मोठ्या बाटल्या आणाव्यात.

ऑफिस मधे चहा कॉफी करता स्वत:चा एक कप ठेवावा.

ग्रोसरी ला जाताना शक्यतो स्वत:च्या बॅगा घेऊन जावं. बरेच ठिकाणी घरच्या कचर्‍यात प्लास्टिक बॅगा रिसायकल होत नाहीत. त्या ग्रोसरी दुकानातल्या रिसायकल मधे टाकाव्यात. घरी, ऑफ़िसमधे रिसायकलींग ची सोय असेल तर त्यांचे नियम कटाक्षाने पाळावेत.

Craigs list, Recycle.org अश ठिकाणी आपल्या जुन्या वस्तूंची जाइरात करून त्या देऊन टाकाव्यात. आपल्याला लागणर्‍या बर्‍याच वस्तू अशा ठिकाणून घेता येतील.

घरच्या लॉन करता केमलॉन वगैरे दरवर्षी वापरायची काहीच गरज नसते. Scotts fertilizer वगैरे पण पर्यावरणाच्या दृष्टीने खास चांगले नाहीत. त्यापेक्षा मल्च, कॉम्पोस्ट याच्यावर भर द्यावा.

कुठलिही नवी वस्तू घ्यायच्या आधी आपली गरज तपासुन पहावी. Need अन want मधे फार फरक असतो. मार्था स्टुअर्ट अन ओप्रा विन्फ़्री यांच्या कह्यात जाऊ नये. किती घरांमधून आइसक्रीम मेकर, स्लो कुकर, ब्रेड मेकर, अन असल्या अनेक 'अर' धूळ खात पडले असतील.

माझी पणजी एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा मुम्बईला आली, तिच्या वयाच्या नव्वदीच्या आसपास. तेंव्हा आमच्या घरी रोज कचरेवाली येऊन कचरा घेउन जाते याचं तिला भयंकर दु:ख वाटत असे. तेंहा आम्ही तिला हसत असू. तिने एका सर्वसाधारण अमेरिकन घरातला कचरा पाहिला तर तिला काय वाटलं असतं?

पॅकेजिंग हा सर्वात मोठा शाप आहे विसाव्या शतकाचा




Hkumar
Saturday, October 06, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB वर लिहिणार्यांना एक विनंती. ' अमुक तमुक करावे' अशा भाषे ऐवजी 'मी असे करतो (करते) ' असे लिखाण यावे. आपली क्रुति इतरांना प्रेरणादायी ठरेल.

Chafa
Saturday, October 06, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Earth Day च्या निमित्ताने झालेला Go Green अशा अर्थाचा Oprah चा शो पाहिला होता. त्यात सहज करता येण्याजोग्या अतिशय उत्तम छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होता.

बँकेच्या ATM व्यवहारानंतर जर आपण पावती घेणे थांबवले तर वर्षाला २ बिलियन फूट इतका कागद वाचेल. मी आता ती पावती तर घेत नाहीच पण गॅस स्टेशनवरही पेट्रोल भरल्यावर पावती घेत नाही.

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांबद्दल. या बाटल्यांऐवजी
Sigg किंवा Nalgene सारख्या कंपनीची अतिशय उत्तम, कायम वापरता येणारी eco-freindly बाटली वापरावी. मी Sigg ची क्लासिक सिल्वर घेतली. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators