Jagmohan
| |
| Friday, September 21, 2007 - 10:38 pm: |
| 
|
नमस्ते, कुणाला फ़ेटा कसा बांधावा हे माहिती आहे काय? असल्यास व्हिडीओ अपलोड करुन शिकवता येइल काय? जगमोहन
|
Maanus
| |
| Saturday, September 22, 2007 - 1:54 am: |
| 
|
हम्म्म्म फेट्याचे वस्त्र साधारण धोतराच्या लांबीचे असते. खाली मांडी घालुन बसा, पहिले त्या कापडाची निट घडी घाल. मग एक टोक मुठीत पकडुन घडी घातलेले कापड कोपर्यापर्यंत ने. असे खाली वर करत निट roll करायचा. मग एक मोकळे टोक दातात पकडुन तिरक्या दिशेने डोक्यावर नेऊन एक दोन rounds मारायचे. मग उलट्या दिशेने एक दोन rounds असे करत करत सगळे केस cover करा. शेवटी तोंडातले टोक side ला कुठेतरी खुपसायचे. झाले. हा झाला साधा सरळ गावातला फेटा. आता तुर्यावाला वैगेरे कसा बांधतात मला नाही माहीत. त्यासाठी तुला कोणतरी लग्नकार्यांशी संबधीत माणूस शोधावा लागेल.
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:18 am: |
| 
|
माणसा, सपशेल चूक. धोतर सर्वसाधारणपणे ४ किंवा साडेचार मीटरचे असते. क्वचित ११ वार धोतराचे उल्लेख आहेत मराठा कालखंडात पण ते क्वचितच. फेटा हा ६-७ वाराचा तर कमीतकमी असायला लागतो. आणि धोतरापेक्षा पात्तळ कापडाचा अन्यथा गुंडाळलं बरोबर जात नाही. फेटा किंवा मुंडासं किंवा पगडी किंवा रूमाल किंवा पागोटं बांधताना हाताची विशिष्ठ हालचाल असते ज्याने कापड डोक्याच्या मध्यबिंदूशी (पुढे आणि मागे) उलटवले जाते. एकदा सुरू केल्यावर वेढ्यांची दिशा कधीही बदलली जात नाही. एका बाजूने वेढे चढत चढत जातात तर दुसर्या बाजूने उतरत जातात. फेटा असेल तर एक बाजू सपाट आणि एक बाजू पिळाची असते. कापड कडक स्टार्चचं असेल तर तुरा मस्त येतो.
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:19 am: |
| 
|
आणि हो कापडाची घडी घालत नाहीत बांधायच्या आधी. उभ्या निर्या करतात. तुरा यायचा तर घडी घालून कसं चालेल?
|
Maanus
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:37 am: |
| 
|
तेच ग... निर्या... मला शव्द आठवत नव्हाता. thanks त्याला निर्या म्हणतात हे देखील आजच कळाले.
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 4:59 am: |
| 
|
माणसा... मित्रा.... घडी घालणे आणि निर्या... तेच गं नव्हे रे!! असो..
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 5:00 am: |
| 
|
आणि हो... फेटा हा १६-१७ वारांचा असल्याचे उल्लेख पण खूप आहेत. चांगला भरदार फेटा होतो हा..
|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:06 am: |
| 
|
तेच ग... निर्या... मला शव्द आठवत नव्हाता.>>>........ माणसा तु बरच काही विसरला आहेस. परवा काय जात्याला म्हणे तर दगडी मिक्सर असतो दळण्याचा. लेका भारता येवुन गावी रहा वर्षभर त्याशिवाय तुझ्या लक्षात नाही येणार सगळ. माझी ही इच्छा आहे यार फ़ेटा बांधने शिकण्याची. तुरे वाला फ़ेट्यासाठी कापड स्टार्च करतात.लग्नाच्या वेळी नीट पहायला हव होत. छे. कोल्हापुरात बिंदु चौकात बरीच दुकाने आहेत जिथे फ़ेटा भाड्याने मिळतो. कोणी जावुन तिकडे पाहुन शिकता येत का पहा.
|
Dineshvs
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:14 am: |
| 
|
हम दिल दे चुके सनम मधे स्मिता जयकर, विक्रम गोखले ला फ़ेटा बांधताना दाखवलेय. सरदार सहसा परक्यासमोर फ़ेटा बांधत नाहीत, पण त्यांचा फ़ेटा आपल्यापेक्षा नीटस बांधलेला असतो. पण ती झाली शहरी स्टाईल, त्यांच्याकडच्या खेड्यात आपल्यासारखाच फ़ेटा बांधतात. हेराफ़ेरी मधे, ओम पुरी ने बांधलाय तसा. आणि झकास, तुला, फ़ेटा बांधता येत नाही ?!!!!
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:38 am: |
| 
|
मला येतो मला येतो... सगळी कृती बरोब्बर माहितीये पण फक्त सध्या सराव नाहीये. ८ दिवस बांधून बघितलं की बसेल हात.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:05 am: |
| 
|
दिनेशदा मी कोल्हापुरचा आहे तर मग मला यायलाच हव का? अहो ज्यावेळी हे शिकण खुप सोप होत त्यावेळी भाकरीचा चंद्र कसा मिळेल ह्याकडे सगळ लक्ष.त्यामुळे बर्याच गोष्टी राहुन गेल्या शिकायच्या. आता वाटत हे शिकायला हव. तसच दांडपट्टा पण शिकणेही राहुन गेल.
|
Maanus
| |
| Saturday, September 22, 2007 - 5:20 pm: |
| 
|
भाकरीचा चंद्र झकास, बरेच (चुकीचे) वाचन सुरु आहे असे दिसतेय... जरा कंप्युटर आणि पुस्तकातुन बाहेर निघ दुर्गा नाहीतर प्रियदर्शनीवर जाऊन बसत जा. नाहीतर रोज संध्याकाळी F.C. road वर चक्कर मारायची. तिथली हिरवळ बघुन मन प्रसन्न होते. त्यात आजकाल पुण्यात बनियन ची fashion आलीय. Rotaract (not Rotary) ची कुठे branch असेल घराजवळ तर तिथे जा. पहीले I.M.D.R. मधे दर रविवारी आम्ही भेटायचो, rotaract south ची मुल. आता सध्याची मुल कुठे भेटत असतील माहीत नाही, बरा timepass होतो तिकडे. हे बघ इथे गनेशखिन्ड मधले बरेच लोक आहेत, त्यान contact करुन तुझ्या जवळ पास कोनती branch आहे ते कळेल http://www.orkut.com/Community.aspx?cmm=8625856 wow, I was reading a past rotaracter profile on orkut and this is what she says about herself. I have been an ardent student of arts & commerce,which has had a natural effect on my upbringing and my visualization which has broadened my insight.I firmly believe that I am in the capacity to take on any task because the world ahead of me offers more than anyone can take. The borders have become hazy and yet the differences exist. I understand the implications of being a global citizen and yet treasuring and preserving the local flavor. "I firmly believe" this is confidence.
|
Ajjuka
| |
| Sunday, September 23, 2007 - 4:48 am: |
| 
|
चुकीचे? का रे माणसा? एवढा का खार खाऊन आहेस सुर्व्यांवर?
|
Zakasrao
| |
| Sunday, September 23, 2007 - 5:42 am: |
| 
|
झकास, बरेच (चुकीचे) वाचन सुरु आहे असे दिसतेय... >>>>>> अरे माणसा सध्या काहीच वाचन सुरु नाही. वेळच नाही. भाकरीचा चंद्राच म्हणशील तर आम्हाला बहुतेक दहावीत होती ती कविता अभ्यासाला. आणि मला क्रिटिकल कविता कळत नाहीत. ही एकदम साधी सोपी सरळ आणि बरीच वास्तववादी होती. त्यामुळे त्या अख्ख्या कवितेतील फ़क्त हेच लक्षात राहिलय. सध्या माझ अस झालय की मला वाचायला वेळ जरी मिळाला तरी सिरिअस काही वाचु वाटत नाही. मधे थोडा वेळ मिळाला तर द. मा. चे "मिरासदारी" वाचले. असो हे जरा फ़ारच मुळ विषयापासुन भरकटतय. मग फ़ेटा बांधणारा आहे का कोणी मायबोलीवर?? लिम्बुला विचारले पाहिजे. ओ लिम्बु भो जरा हिकड लक्ष द्या बघु.
|
Bee
| |
| Sunday, September 23, 2007 - 8:39 am: |
| 
|
झक्कास ऐरवी मारे गद्य पद्य रसग्रहण चालले असते त्या सुर्य्वांच्या कवितेत असे काय आहे न कळण्यासारखे.. ती धावीला होती कविता. बहुतेक माणसाला ती कविता नसेल. बाकी अज्जुका खार खाणे हा वाकप्रचार कित्येक वर्षानंअर ऐकला हो.. मला वाटलं हा फ़क्त विदर्भातच वापरला जाणारा शब्द आहे.
|
Ajjuka
| |
| Sunday, September 23, 2007 - 11:44 am: |
| 
|
अरे बी सगळं काही फक्त विदर्भातलंच आहे रे. आम्ही ते उलीससं चोरलंय. फेटा पण खरातर विदर्भातलाच आहे पण ही कोल्हापूरची मंडळी उगाचच भाव खातात. हो की नाही.. आता तूही विदर्भातला तर शिकव बर झकासला फेटा... झकोबा, खरंच शिकायचंय का? वेगवेगळे प्रकार शिकवणारी काही माणसं शोधली होती मधे पण ३-४ जण तरी असल्याशिवय ते लोक शिकवायचे नाहीत.
|
Maanus
| |
| Sunday, September 23, 2007 - 12:23 pm: |
| 
|
हल! हे काय झाले. अरे ते फेट्याच बघा! ह्या इथे काही videos आहेत, पण ते सीख लोकांच्या style चे आहेत. http://www.sikhnet.com/s/tyingturbans/
|
Bee
| |
| Monday, September 24, 2007 - 1:53 am: |
| 
|
का गं अज्जुका अशी उपरोधिक बोलतेस? जाऊ दे.. लग्गेच राग येतो तुनासनी
|
Manjud
| |
| Monday, September 24, 2007 - 8:50 am: |
| 
|
हा c & s मधला BB आहे की V & C मधला?
|
Zakki
| |
| Monday, September 24, 2007 - 3:43 pm: |
| 
|
तर याचा नि 'फेटा चीज' या खाद्यपदार्थाचा संबंध आहे का काही?

|
Manjud
| |
| Tuesday, September 25, 2007 - 5:37 am: |
| 
|
फेटा चीज .... ते काय श्रीखंडाच्या चक्क्यासारखं बांधतात का?
|