|
Mansmi18
| |
| Monday, March 05, 2007 - 8:11 pm: |
| 
|
नमस्कार नुकतेच पन्डित वसन्तराव देशपान्डे यन्चे "सूरत पिया कि सुध बुध बिसरायी" हे सुन्दर गाणे एइकले. कोणाला महित आहे का हे कुठल्या रागावर आधरीत आहे?
|
सूरत पिया कि सुध बुध बिसरायी>> अरे ते छिन बिसराई असे आहे. (सुध बुध नाही). राग मलाही माही. वंसतराव आवडत असतिल तर लागी करेजवा कटार हे पण ऐक. दिल खुश होईल.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:54 pm: |
| 
|
सुरत पियाकि न छिन बिसरायी हरहर दम उनकी याद आयी साजन बिन मोहे कछु ना सुहावे बिगरी को मेरे कौन बनावे नैननमे न कोऊ और समाये तरपत हुँ दिन, कछु रैन निभावे अखिया असुवन नीर भर लाये सुरत पियाकि न छिन बिसराये असे शब्द आहेत CBDG रागाबद्दल मलाहि खात्री नाही. यातले प्रत्येक कडवे वेगळ्या तालात आहे. शिवाय नाटकात एका जादा कडवे आहे. एकदा आशा खाडिलकरने रेडिओवर याला जोडुनच मालकंसमधला तराणा गायला होता. लागी करेजवा कटार बुँद ना गिरी एक लहुकी ना रहि कछु निसानी सावरियाँ से हो गये नैना चार हे त्यातल्या ठुमरीचे बोल. एकदा टिव्हीवर फ़ैयाझ आणि आरती अंकलीकर या दोघीनी मिळुन सुंदर रंगवली होती हि ठुमरी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:56 pm: |
| 
|
आज संगीत सरिता मधे ऐकले कि, पडोसन मधले ईक चतुर नार, हे मन्ना डे, किशोर आणि मेहमुदने गायलेले गाणे, झिंझोटि रागावर आधारित आहे. या गंभीर रागात, ईतकी सुंदर हास्यरचना !!!
|
Dhumketu
| |
| Wednesday, March 07, 2007 - 4:40 am: |
| 
|
" साबरमती के संत तुने " आणी " आज गोकुळात रंग खेळतो हरी " ही गाणी कुठल्या रागात आहेत?
|
Gajanan1
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:12 pm: |
| 
|
साबरमती के सन्त... बहुतेक पहाडी सारखे वाटत आहे. मधुवन्ती रागाबाबत माहिती मिळेल काय? मधुवन्ती व पटदीप मध्ये एका स्वराचा फ़रक आहे.
|
Gajanan1
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:16 pm: |
| 
|
सुरत पियाकी मध्ये प्रत्येक कडव्यात वेगळा राग आहे. सुरत पियाकी.. राग सोनी नैनन मे.... मालकन्स बाकी कडव्याचे राग माहीत नाहीत.
|
Mansmi18
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:09 pm: |
| 
|
दिनेश, गजानन, केदार धन्यवाद. मला काही रागातले तन्त्रिक कळत नाही पण उगाच माहिती असवी असे वाटते. मला फ़क्त भैरवी आणि शिवरन्जनी ओळखता येतात. भैरवी म्हणजे "लागा चुनरि मे दाग", "दिल का खिलोना हये टूट गया", "दो हन्सो क जोडा बिछड गयो" वगैरे वगैरे. आणि "शिवरन्जनी" म्हणजे "तेरे मेरे बीच मे" आणि "मेरे नैना सावन भादो". आणि एकदा रेडिओवर ऐकले होते कि "खिलते हैन गुल यहा" हे गाणे "भीमपलास" या रागात आहे. परत एकदा माझी चुक सुधरल्याबद्दल धन्यवाद. क्रुपया तुम्हाला आठवतील तसे पोस्ट करत राहा. जाता जाता, "काहे छेड छेड मोहे" हे देवदास मधले आणि "केतकि गुलाब जुही चम्पक बन्फुले" हे बसन्त्बहार मधले गाणे एकच रागात आहे. तो कुठला राग?
|
>>"केतकि गुलाब जुही चम्पक बन्फुले" हे बसन्त्बहार मधले गाणे एकच रागात आहे. मला रागदारी संगीताची फारशी माहिती नाही, पण सदरचे गाणे "बसंतबहार" या जोड रागात आहे असा माझा अंदाज आहे. बसंतबहार, बसन्तीकेदार, अडाणाबहार, भैरवभटियार यांसारखे जोडराग पं रामभाऊ मराठे फार सुरेख गायचे! असो! तात्या. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=34&post=929345#POST929345
|
Pooh
| |
| Friday, March 23, 2007 - 11:34 am: |
| 
|
This website looks pretty good. http://www.swarganga.org/marathisongs.php
|
Gajanan1
| |
| Saturday, March 24, 2007 - 4:09 pm: |
| 
|
Pooh, link is toooooo gooood.
|
Dineshvs
| |
| Sunday, March 25, 2007 - 5:07 pm: |
| 
|
तात्या रामभाऊना जोड रागांचा बादशाह म्हणत असत. याच रागात मराठीत जलधरसंगे नभ भरले ते ( मृच्छकटीक ) बसंतकि बहार आयी ( मंदारमाला ) अशी नाट्यगीते आहेत.
|
Mansmi18
| |
| Sunday, April 01, 2007 - 3:47 am: |
| 
|
पूह धन्यवाद अतिशय सुन्दर साइट
|
सुरत पिया की: साजन बिन मोहे राग मिया मल्हार "नैनन और न कोउ समाये" असे आहे. "हसन गंगा सुदी फैलाये" अशीही एक ओळ आहे.
|
Hi All, Yes the www.swarganga.org is a very nice site. For fans of Classical Music - www.parrikar.org www.satyasheel.com (Under Ford Foundation, you can post a request and the record is made available!) Regards, ~Mihir
|
sapt surano lay shabdanno ya ganyache lyrics hawe ahet. kunakade astil tar plzzzzzzz mala email kara qqplus2@gmail.com
|
Gajanan1
| |
| Friday, July 06, 2007 - 5:38 am: |
| 
|
राग यमन कल्याण मधील चान्गल्या चीजान्ची यादी, cd ची माहिती मिळेल काय...
|
Gajanan1
| |
| Wednesday, July 11, 2007 - 3:58 am: |
| 
|
राग काफ़ीमधील गाण्यान्ची यादी हवी आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 11, 2007 - 4:51 pm: |
| 
|
काफ़ि रागातली काहि गाणी कालि घोडी द्वार खडी _ चष्मेबद्दुर, येसुदास आणि हेमंती कासे कहु मनकि बात _ धूल का फूल, सुधा मल्होत्रा किसने जादु डाला _ अफ़सर, सुरैया बैरन नींद ना आये _ चाचा जिंदाबाद, लता रातोंको चोरी चोरी बोले _ मुहोब्बत जिंदगि है, आशा आणि माझे सगळ्यात आवडते गाणे बिरजमे होली खेलत नंदलाल _ गोदान, रफ़ि
|
Ekmulgi
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:43 pm: |
| 
|
does any1 have any Bagrshree compositions on Sitar?? if ys, can you post the link thank you
|
|
|