Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 26, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » पुणे GTG ११ ऑगस्ट २००७ » Archive through August 26, 2007 « Previous Next »

Wakdya
Tuesday, August 14, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाच तास म्हणजे आम्ही बरेच काही मिसलो असेच म्हणायला हवे.
श्री संदीप सावंत नक्की येणार असे माहित असते तर कदाचित मी अधिक वेळ थांबायचे ठरवले असते व सौ ला बसने पाठवुन दिले असते, असो. त्यांना भेटायचा योग नव्हता हेच खरे.

दिनेशजी, फोटो बद्दल मनःपुर्वक धन्यवाद, फोटो अतिशय सुंदर आला आहे.

अज्जुका खुपच बोलकी आणि मनमिळाऊ आहे असे जाणवले. अर्थात आपापल्या क्षेत्रातील व्यासंग आणि बरेच जग बघितलेले असल्याचे स्पष्ट जाणवत होते. असंख्य लोकांशी संपर्क व संभाषण केल्याचा अनुभव असल्याने गप्पांना रंग चढला होता.

मी मधेच लौकर निघुन जात असल्याने आमचे बील कसे भरायचे असे विचारल्यावर अज्जुकाने मला त्याची काळजी तू करू नकोस असे सांगितले.
या माझ्याच विचारणेवर, मी टिपिकल विनोद करायचा सपशेल फसलेला प्रयत्न केला होता ज्यामुळे घरी गेल्यावर सौ ची बोलणि ऐकावी लागली. संभाषणात मला साधे साधे विनोद देखिल करता येत नाहीत किंवा ते अस्थानी ठरतात असे तिचे म्हणणे पडले. तसेही मी जास्त बोलण्याच्या फंदात पडत नाही व बाकीच्या माझ्याहून अधिक अनुभवी व्यक्तींचे संभाषण श्रवण करण्यावर माझा भर असतो.


Maanus
Tuesday, August 14, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ohhh! म्हणजे मुडी पुण्यात आहे होय...

आता champak राव कुठे आहेत माहीत आहे का कुणाला. तो पन online दिसला नाही.


Robeenhood
Tuesday, August 14, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पक सध्या नेवासे येथे घरी आहे व किरकोळ आजारी आहे. काळजीचे कारण नाही. गावी नेटची सोय नसल्याने तो मायबोलीवर दिसत नाही...

Maudee
Thursday, August 16, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात GTG झालं होय....
माहिती असतं तर नक्की आले असते मी...

अल्टीमा तू गेली होतीस का?


Ajjuka
Saturday, August 18, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं ४ ५ दिवस आधी टाकलं होतं इथे. अचानकच ठरलं आणि ठरल्यावर लगेच टाकलं. माझ्या कडे ज्यांचे mail addresses or mobile numbers आहेत त्यांना कळवलंही होतं. तुझ्यापर्यंत नाही पोचलं.. माफ कर!
असो. सविस्तर वृत्तांत आज रात्रीपोत्तूर!!


Zakasrao
Wednesday, August 22, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सविस्तर वृत्तांत आज रात्रीपोत्तूर!! >>>>>.
अज्जुका तु काय उत्तर किंवा दक्षिण धृवावर आहेस काय? कधीपासुन तुझी रात्र उजाडत आहे? :-)
लिहि पटकन.
दिनेशदा मला वाटल एकदम सविस्तर लिहाल पण तुम्ही शॉर्टकट मारला.
वाकड्याजी तुम्ही फ़ार लवकर गेलात. त्यानंतर तर अजुन धमाल होती.
मी तिथे पोहोचलो ना :-)
आणि आलेले अजुन काही लोक लिहिणार होते ना ते का लिहित नाहित??


Ajjuka
Wednesday, August 22, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू लिही की. माझं नेट जरा डळमळलं होतं आणि त्यात rehearsals , प्रयोगाची धावपळ इत्यादींमुळे मी indoor फार कमी होते त्यामुळे नाही जमले. आता उद्या!!

Dineshvs
Thursday, August 23, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास तु होतास का ? मला नाही दिसलास तो !
लोक हल्ली काय खरे आयडीज ( अनेकवचन ) डिसक्लोज करेनासे झालेत बाबा !!! फोटो टाकायची पण चोरी ना !!!


Zakasrao
Thursday, August 23, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही दिसलास तो >>>>>
ये कुछ समझा नहि मै.
तुमच्या बाजुला जो होता तो झकास.
आणि तो मीच होतो. :-)


Dineshvs
Thursday, August 23, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो तू नव्हतास, असे अनेकजणानी शपथेवर सांगितले.


Maanus
Thursday, August 23, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या बाजुला जो होता तो झकास

डाव्या का उजव्या?


Ajjuka
Friday, August 24, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचं संशयकल्लोळ खेळून झालं?
काय पण जरा लिहायला उशीर लागला तर टवकारले सगळे!! :-)
आता लिहिते मी वृत्तांत.

११ ऑगस्ट च्या आधी ३ ते ४ च दिवस अचानक हे GTG ठरले. भेटणे यापलिकडे काहीच निमित्त नसलेले हे GTG . इथे, ऑर्कुट वर स्क्रॅपसमधे आणि sms करून याची जाहीरात केली. झकासशी जीटॉक वर गप्पा मारता मारता डोक्यात आलेली कल्पना इतकं साधं सोपं या GTG चं स्वरूप / कारण होतं पण काही मायबोलीकर महा कावळे त्यांना यात 'शहाला काटशह!' असे बालिश हेतू जाणवले आणि त्यावरची त्यांची कावकाव झकास आणि माझ्या कानापर्यंतही पोचली. काहींनी तर अप्रत्यक्षपणे पण पोचतील असे टोमणेही मारले की 'तुम्ही कसलं GTG करणार, आता हे कशासाठी इत्यादी इत्यादी... कावकावच ती मंजुळ कशी असेल पण आम्ही तरीही त्यातून आमचे मनोरंजन करून घेतले आणि मग संपूर्ण दुर्लक्ष केले.. यामुळे झालं असं की भेटीच्या आमंत्रणातला जिव्हाळा आणि खरेपणा जाणवून एकुणात ८-१० लोक आले. इतक्या आयत्यावेळी ठरूनही एवढे लोक आले हे छानच की.
जी एस ला आयत्यावेळेला बंगलोर ला जावे लागले, गिरी नव्या बायकोला घेऊन शिर्डीला गेला होता, फदी, कूल, मिहिर इत्यादी सगळे VALLEY OF FLOWERS ला गेले होते त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. सांगायचे मुद्दे २, एक म्हणजे GTG ची लोकसंख्या अजून वाढली असती ती अश्या कारणांनी कमी झाली आणि दुसरे असे की आपल्याला खूप सुंदर फोटो बघायला मिळणारेत फदीकडून. तर असो!
तर ठरल्याप्रमाणे ५:३० ला एक बाई शर्वरी हॉटेल च्या इथे पोचल्या. हातात हेल्मेट घेतलेले एक सद् गृहस्थ त्यांच्या पत्नीसह तिथे पोचले. दोघे एकमेकांकडे थोडेसे संशयाने (बहुतेक हे पण GTG वालेच असावेत अश्या.. बाकी कुठल्या नाही.. कावळेगिरी करू नका लगेच..) बघत असतानाच ५:३५ वाजता मी तिथे पोचले चक्क FC Rd वर हॉटेलच्या समोर ४ फूट लांब आणि २ फूट रूंद एवढी जागा रिकामी दिसली. आधी माझी स्वयंचलित दुचाकी (आता कस मनो.... नाही दुसर्‍या एका ठिकाणी असल्यासारखं वाटलं..!) घुसवली आणि मग समोर पाह्यले. पहाते तर काय त्या बाई आणि ते गृहस्थ दोघेही माझ्याकडेच पहात होते. ते गृहस्थ वाकड्या होते हे आधी भेटल्याने मला माहित होते. आणि त्या बाई या दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसून ती मनिषा लिमये होती. तेव्हढ्यात मायबोलीवरचा एक खूप जुना मेंबर हेमंत फाटक तिथे पोचला. एकमेकांशी आयडीने ओळखी करून देत आम्ही हॉटेलमधे शिरलो. मी, मनिषा, हेमंत, श्री व सौ वाकड्या आणि वरच्या फोटोमधला छोट्या (हा चिरंजीव शार्दूल म्हणजे ज्युनियर वाकड्या नसून सौ वाकड्यांच्या बहिणीचा मुलगा आहे.) असे सगळे आम्ही स्थानापन्न झालो. अजून कोण कोण येणारेत, कोणाला कळवलंय, चहा की कॉफी, काही खाणार का असं सगळं एका वेळेलाच बोलणं चालू होतं. एव्हाना ६ वाजत आलेच होते. तेवढ्यात राज्याचा फोन आला आणि शोधक नजरेने पाहणारा एक इसमही आम्हाला दिसला. हाच तो राज्या असे आम्ही ठरवले. त्याला आम्ही कुठे बसलो आहोत हे फोनवर सांगितले. अगदी थोड डावीकडे, उजवीकडे असं करत. तेव्हा तो इसम खरोखरंच राज्या आहे हे सिद्ध झाले आणि तो आमच्यात येऊन बसला.
गप्पा, खिदळणे, ओळखी, चहा, एसपीडीपी अशी सगळी वळणे घेत संध्याकाळ पुढे जात होती. राज्याचा फोन सतत खणखणत होता. शेवटी एकदाचा फोनवरचा शोध संपवून यशवर्धन तिथे पोचला. परत एकदा 'ओळख बरं आम्ही कोण ते!!' ची फेरी झाली. एव्हाना चिरंजीव शार्दूल यास आमचे बोलणे फारच मूर्खपणाचे वाटून त्याने आपला कंटाळा दाखवायला सुरूवात केली. मग त्याला Icecream ची लाचलुचपत देऊन थोडावेळ शांत करण्यात आम्ही यशस्वी झालो.
तेवढ्यात समोर पाह्यलं तर What a pleasent surprise!! दस्तुरखुद्द दिनेशदा!!
मग त्यांची बाकी सगळ्यांशी ओळख करून दिली. 'अच्छा म्हणजे ज्यांना मी सतत पाककलेतले प्रश्न विचारते ते हेच तर!! फुलापानांची माहिती असलेले हेच ते!' अश्या सगळ्या प्रतिक्रिया समूहात उमटल्या.
परत गप्पा!!
पण आता शार्दूल ने अगदीच मानायचे नाही ठरवले होते आणि अंधाराचं निगडीपर्यंत गाडी हाणत जायला नको तेव्हा वेळेत निघूया असं वाटल्याने वाकडेराव, सौ वाकड्या आणि शार्दूल यांनी २ मिंटं- ५ मिंटं करत शेवटी काढता पाय घेतला.
त्यांचा पाय बाहेर पडतो न पडतो तोच झकासचे आगमन झाले. आणि हो झकास आणी वाकड्या हे एकच आहेत असं अजून ज्या कावळ्यांना वाटतंय त्यांनी हे समजून घ्यावं की ती दोन वेगळी माणसं आहेत.
तर झकास आला. परत ओळख परेड झाली. राज्याचा फोन अजूनही खणखणत होता. कोणीतरी गूढ व्यक्ती (जी फक्त राज्यालाच माहित होती) येणार येणार असं कळत होतं. अशी ती व्यक्ती एकदाची येऊन पोचली. ही व्यक्ती म्हणजे अगदी नवाकोरा मायबोलीकर राजेश देशमुख. त्याला 'ओळख बरं!' अस म्हणून त्याच्यावर राज्य देण्यात काहीच अर्थ नव्हता. बिचारा आधीच जरा भांबावला होता. मग आम्हीच त्याला सगळ्यांची ओळख करून दिली.
गप्पा, खाणे, चहाच्या फेर्‍या, एकमेकांचे मायबोलीचे आणि आपापल्या कामाच्या इथले अनुभव, किस्से, गॉसिप्स असं सगळं चालू होतं. साधारण ७:३० च्या सुमाराला मायबोलीची 'संवादू' (खेळाडू च्या धरतीवर) आरती म्हणजे Itsme हजर झाली. मग परत एकदा गप्पा, चहा इत्यादी!!
आता म्हणाल तेच तेच काय सांगताय काय गप्पा मारल्यात ते तरी सांगा... तर त्याबद्दल एवढंच सांगता येईल की विषय अनेक होते आणि मायबोलीशी निगडीतही खूप होते. म्हणजे नसलेल्यांच्याबद्दल कुचूकुचू करणे, मायबोली आपल्याला कशी जवळची आहे, पूर्वी मायबोली कशी होती आणि आत्ता कशी आहे!! असे सगळं. गॉसिपही अर्थातच... डोळे नका मोठ्ठे करू लगेच, आम्हाला माहितीये कोण किती गॉसिप करतं ते...
साधारण साडेआठ च्या दरम्यान आता निघूया अस सगळे म्हणू लागले. नवराही पुण्यात पोचला होता तोवर. मग मी त्यालाही तिकडेच बोलावून घेतले. तो आल्यावर मग परत ओळख, फोटो असे होऊन हेमंत, मनिषा आणि आरती निघाले. बाकिच्यांच्यात परत एक चहाची फेरी झाली.
सगळ्या चहा, खाण्याच्या फेर्‍यांचे दायित्व दिनेशदांनी घेतले.
शेवटचे बिल देऊन मग आम्ही तिथून उठून हॉटेलच्या बाहेर येऊन गप्पू लागलो. गप्पा काही संपेनात. पण वेळेचं यंत्र वरचढ ठरलं. आणि १० च्या सुमारास आम्ही दोघांनी(मी आणि नवरा) तिथून exit मारली.

तर अशी ही छोट्या सुंदर सुखी GTG ची छोटी सुंदर टिकाऊ कहाणी. वाचा आणि आनंद घ्या..
डिन्ग डॉन्ग!!!


Monakshi
Friday, August 24, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मस्तच गं. ते तेव्हढे फोटो टाकले असते तर जरा तुमची ध्यानं पहाता तरी आली असती. :-) दिवे घ्या हो GTG वाले.

आता पार्ल्यात करुया एखादं GTG . काय बोलतेस? :-)


Ajjuka
Friday, August 24, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो दिनेशदा आणि बहुतेक राज्याच्या कॅमेर्‍यात आहेत. मला काही हरकत नाही इथे टाकायला फोटो.

पार्ल्यात करू की त्यात काय. पण तेवढी मंडळी आहेत का मुंबईत?


Dineshvs
Friday, August 24, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, आता कसं सगळं बैजवार झालं.
GTG असेच मनमोकळे असायला हवेत ना.
मी तिथे असताना, अजय, सचिन, सई, योगेश असे सगळ्यांशी बोललो. सगळे मायबोलिकरच आहेत, पण आयत्यावेळी त्याना जमले नाही.
दुसर्‍या दिवशी आम्ही परत सगळे भेटलो.
पार्ल्यात एखादी निवांत संध्याकाळ मिळतेय का बघ. दोन GTG मधे दिवसांचे आणि स्थळाचे किती अंतर असावे, याचे नियम अजुन आलेले नाहीत, तेवढ्यात संधी साधु या.


Ajjuka
Friday, August 24, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुढच्या ८ ९ दिवसांसाठी मी पुण्यात. आणि भयानक थकलेली असणार..
८ पैकी ५ दिवस संपूर्ण दिवस शिकवायचंय.
२ दिवस Mass Comm चे विद्यार्थी (भयाण असतात हे जर संस्था नामचीन नसेल तर... त्यांचं एकच qualification वर्षाला दीडदोन लाख भरण्याची आईबापाची ऐपत असणं..)
३ दिवस शास्त्रीय नृत्याच्या मुली... बापरे!!
माझीच परीक्षा आहे. नेहमीची नाटकवाली पोरं असली की बरं असतं!!


Zakasrao
Saturday, August 25, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगवली उगवली अज्जुकाची रात्र उगवली. :-)
अज्जुका वृ. छान आणि आटोपशीर.
मला अजुन कोण कोण काय समजतं देव जाणे आता काही लोकांच्या मते मीच लिम्बु,काहीच्या मते मी NJ वरचाच कोणी तरी आणि आता वाकड्या पण. वा!
माझ्याकडे त्या Mission Impossible वाल्या सारखे सगळे मुखवटे आहेत की काय? त्यामुळे मला आता गुप्तहेर खात्यात भरती व्हावस वाटतय.
की मी मागच्या जन्मी बहिर्जी नाइक यांच्या सोबत काम असेल काय? :-)
असो काहीजणाना तरी कळाल की झकास युनिकच आहे ते.
बाकी लोकाना पण हे कळण्याची सुबुद्धी देव देवो. :-)
राज्या आणि यश लिहिणार आहात की नाही रे तुम्ही?
मी बघु जमल तर लिहीन.


Rajya
Saturday, August 25, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका छान गं :-)

एव्हढं छान लिहीता आलं नसतं मला

पण सगळं कसं बिनधास्त मांडलय.

दिनेशदा फोटो टाका हो :-)
मलाही फक्त चारच फोटो मेललात. ३० ते ४० फोटो तर सहज असतील, सगळे फोटो मेल केलेत तर बरं होईल.


Rajya
Saturday, August 25, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, अज्जुकाने एव्हढं छान लिहीलय आता कुणाकडुन काय अपेक्षा करु नको.

मी पण लिहावं म्हणतोय, बघु सलग ३ दिवस सुट्टी आहे उद्यापासुन, जमेल अस वाटतंय:-)


Ajjuka
Sunday, August 26, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकोबा,
इथे पूर्वी बहिर्जी नाईक असाही आयडी होता म्हणे तो तूच का?
ही ही ही ही ही ही
आता अजून confusion आणि कावळ्यांना खाद्य! :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators