Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » पुणे GTG ११ ऑगस्ट २००७ » Archive through August 14, 2007 « Previous Next »

Yashwardhan
Tuesday, August 07, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी कोण कोण जमणार आहेत?

Wakdya
Tuesday, August 07, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka तुझा निरोप मिळाला, मी यायचा प्रयत्न करीन

Ajjuka
Tuesday, August 07, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या तरी मी, झकास आणि वाकड्या एवढाच कोरम आहे. तुम्ही नक्कीच येऊ शकता. more the merrier!

शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २००७
सायंकाळी ५:३० वाजता
हॉटेल शर्वरी
फर्ग्युसन कॉलेज रोड,
तुकाराम पादुका चौक.
येत असाल त्यांनी मला मेल टाका.


Yashwardhan
Tuesday, August 07, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मेल केली आहे.. भेटु शनिवारी...

Rajya
Tuesday, August 07, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल कुठल्या आयडीवर पाठवायची आहे?

Rajya
Tuesday, August 07, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,
मेल मिळाली का?


Zakasrao
Wednesday, August 08, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा अज्जुका BB तयार केलास तर.
तुझा एक मेल ID इथे देवुन ठेव ना म्हणजे सगळेजण कोठे मेल पठव्याची अस विचारत बसणार नाहीत.
आणि तु जी वेळ लिहिली आहे ती जरा सोयिस्कर होउ दे ना.
कारण माझ्यासारखे काही शनिवर्कर पण आहेत त्याना ५:३० ला पोहोचणे कठिण जाइल. ती वेळ ६:१५ करता येइल ना. म्हणजे बर होइल.
मी काल मनिषा लिमये ला फ़ोन केल होता त्यावेळी बोललो ह्या भेटीविषयी तर ती नेमकी ह्याच शनिवारी रविवरी कोल्हापुरला जात आहे पण जर तिचा तो प्रोग्राम कॅन्सल झाला तर ती येते अस म्हणाली आहे.
आज साहेब लोक मीटींगला गेलेत तर आज तासभर चान्स मिळाल नेट वर यायला. :-)


Ajjuka
Wednesday, August 08, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मेल आयडी
ajjukaa@yahoo.co.in
ज्यांनी मेल केलीये त्यांना माझा सेल नंबर कळवते मेल मधून.
लोकहो तुम्ही सांगा ५:३० लवकर होत असेल तर आपण ६:०० ६:१५ च्या दरम्यान भेटू. भेटीचा अजेंडा केवळ भेटणे आणि ओळख, TP , गप्पा इतकाच आहे. त्यामुळे थोडा उन्नीस्-बीस हरकत नाही वेळेच्या बाबतीत. फक्त काही मायबोलीकर जमले म्हणजे किमान २ तास तरी गप्पा चालू शकतात आणि परत खाणे-पिणे इत्यादी असतेच त्यामुळे ते संपवून सगळ्यांना आपापल्याप्रमाणे Saturday Night मस्ती करायला जाता येईल अश्या पद्धतीने वेळेचं ठरवायला हवं!!

Manishalimaye
Wednesday, August 08, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi yenaar aahe nakkich...mi tulaa phone karate ga dupaari.

Ultima
Thursday, August 09, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण येणार बरं का

Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये ये नक्की ये!! तुझे स्वागतच!!
ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनीच या.
आणि हो जर निमित्त काय असा प्रश्न पडलाच असेल तर...
खूप दिवसांत मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटले नाहीये, आधी भेटलेल्यांना परत भेटायची आणि ज्यांच्याशी नेटवर बोलते किंवा नेटवर बघितलंय त्यांना भेटायची इच्छा आहे इतकेच

Yashwardhan
Thursday, August 09, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका कोण कोण येणार आहेत

Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सस्पेन्स... पेशन्स पेशन्स... ही ही ही ही
मी, झकास, वाकड्या, राज्या आणि तू एवढे नक्की
मनिषा आणि अल्टीमा बहुतेकतरी येतीलच.
अजून काही जुने प्रयत्न करतो म्हणालेत तेव्हा बघूया येताहेत का ते.


Ajjuka
Saturday, August 11, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एव्हाना घरातून निघाले असतील ना सगळे!! मी बरोब्बर ५:३० ला पोचतेय

Arch
Monday, August 13, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालं gtg ?. मग वृत्तांत कुठे आहे?

Ajjuka
Monday, August 13, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो झालं. राज्या लिहिणार होता आणि एक surprise व्यक्तिमत्व पण लिहिणार होते. मी आज दिवसभर मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्ट च्या पहिल्या फेरीच्या भयाण एकांकिका पहातेय उद्या स्किटस पहाणारे. तो शहारे आणणारा अनुभव संपला की मग लिहिते.

Arch
Monday, August 13, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय ग अज्जुका, आपल्या पुण्याच्या पुरुषोत्तम करंडची सरसुध्दा त्या मुंबईला नाही न?

Ajjuka
Tuesday, August 14, 2007 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मी other than मराठी अश्या विभागाला परीक्षक म्हणून जातेय. तो भाग खरंच भयाण आहे. INT आणि उन्मेष होतात म्हणे पुरूषोत्तमच्या तोडीच्या. पण बक्षिसांची settings खूप लागतात इथे असंही ऐकलंय. पुरूषोत्तमला १० वर्षापूर्वीपर्यंत तरी लागत नव्हती हे माहितीये मला. नंतरचं माहित नाही.

Dineshvs
Tuesday, August 14, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या रविवारी मला पुण्याला जायचे होते ते ऋचा आणि मूडी च्या बाळाना बघण्यासाठी. दोन्ही बाळांच्या आगमनाची बातमी मला होती, आणि त्याना न भेटल्याशिवाय मला करमलेही नसते.

जाता जाता सहज बघितले तर नीरजाचा मेसेज होता. ( नीरजा म्हणजेच अज्जुका, हे जाहिर करायला तिची परवानगी लागत नाही. ) या जीटीजी मागचा तिचा साधा सरळ उद्देश मला खुप आवडला. तसेही संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष भेट होवुन तीनचार वर्षे झाली होती.

पुण्यात गेलो कि जणु माझे दिशांचे भानच हरपते. साधेसे पत्तेही मला सापडत नाहीत. म्हणुन आधी जाऊन जागा बघुन आलो. माझ्या शिरस्त्याप्रमाणे वेळेआधीच तिथे पोहोचलो. चहा पिवुन बाहेर पडलो, तर समोरच नीरजा बसली होती.

मी तिथे असेन, याची तिला सुतराम कल्पना नसल्याने, चेहर्‍यावर आश्चर्य आणि आनंद एकाचवेळी जाणवला. ( जुन्या मायबोलिकरांचा मस्त अड्डा जमला होता. त्यांची परवानगी घेतली नसल्याने, यादी देत नाही )

मी इथे जे भरमसाठ खरडत असतो, ते वाचुन मी कसा दिसत असेन याचे काहि आडाखे मायबोलिकरानी बांधलेले असतात. आणि त्या कल्पनाचित्रात माझे प्रत्यक्ष ध्यान कुठेच बसत नसल्याने, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अविश्वास अगदी स्पष्ट दिसत होता.

पण थोड्याच वेळात मोकळेपणी गप्पा मारु लागलो. उपस्थित नसलेल्या मायबोलिकरांचा उल्लेख होणे सहाजिकच होते, पण हळुहळु गप्पा अनेक विषयाना स्पर्श करु लागल्या.

आणखी काहि मायबोलिकर आम्हाला येऊन मिळाले. मी स्वतः अनेकजणाना फोन करुन आमंत्रण दिले. पण सगळ्यानाच त्यावेळी तिथे येणे जमण्यासारखे नसल्याने, आम्हाला रविवारी सकाळी परत एकदा भेटावे लागले.

शनिवार संध्याकाळ मात्र अविस्मरणीय होती. गप्पाना ऊत आला होता. आम्ही तिथुन सटकावे म्हणुन हॉटेलवाले आम्हाला परतपरत बिल पाठवत होते, ते चुकते करुन आम्ही परत परत, ऑर्डर देत होतो. चहाच्या किती फ़ेर्‍या झाल्या त्याला गणतीच नव्हती. आणि थोड्याच वेळात, श्री संदीप सावंत यांचे आगमन झाले. ते मूळातच मितभाषी असल्याने, त्यांच्याकडुन फारसे काहि ऐकता आले नाही, पण आमच्या ग्रुपमधे त्यानी सहज मिसळुन, आम्हाला आपलेसे केले. शिवाय आमच्या अखंड गप्पा, सहनशीलतेने ऐकुन घेतल्या ते वेगळेच.

शेवटी हॉटेल बंद व्हायची वेळ झाल्याने आणि पावसाने हजेरी लावल्याने, आम्हाला तिथुन निघावे लागले. एकंदर पाच तास आमचा गप्पांचा फड जमला होता.

खरे सांगायचे तर अगदी साधेपणाने पण मनापासुन घातलेल्या सादेमुळे, मला तिथे जावेसे वाटले. कुठला अजेंडा नसल्याने, अगदी मनमुराद गप्पा झाल्या. औपचारिकता नावालाही नव्हती, आणि मायबोलीचा स्थायीभाव असलेला जिव्हाळा परत एकदा अनुभवता आला.



Dineshvs
Tuesday, August 14, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकि कुणाचे टाकायचे ते माहित नाही, पण या छोट्या दोस्ताचा फोटो टाकायला मात्र कुणाची हरकत नसावी.

var bagha




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators