| 
   | 
| | Sakhi_d 
 |  |  |  | Thursday, July 19, 2007 - 6:20 am: |       |  
 | 
 "वेडात मराठे वीर दौडले सात" ह्या गाण्यात  /  कवितेत ज्या सात वीरांचा उल्लेख केलाय त्यांची नावे माहित आहेत का?
 
 
 
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Thursday, July 19, 2007 - 9:31 am: |       |  
 | 
 एक म्हणजे सरसेनापती प्रताप्राव गुजर बाकीचे कोण माहित नाहीत. बहुतेक त्यांची नावे मिळणारही नाहीत.
 प्रतापरावानी बहलोल खानास अभय दिले होते आणि हे वृत्त कळताच राजेनी त्याना फ़ैलावर घेतले होते. त्यामुळे ते आपल्या सोबत साथीदार घेवुन त्या बहलोल खानाच्या मोठ्या सैन्यात घुसले अशी माहिती मला आहे.
 आता त्यानी ६ च साथीदार घेतले का किंवा असे कसे हे माहीत नाही पण कदाचित त्यानी छोटी तुकडी घेवुन मोठ्या सैन्यावर हल्ला चढवला असेल.
 केदार जरा इकडे लक्ष दे रे
   
 
 |  | त्यात खरे नाव एकच. प्रतापराव गुजर. बाकीच्यांची नावे कोणालाही माहीती नाहीत. बहुतेक ते शिलेदार असावेत.
 
 कडतोजी (प्रतापराव ही पदवी आहे) गुजर हे राजांचे सेनापती. त्यांनी बहलोलखानाला एकदा पराभुत केले. बहलोलखानाने माफी मागुन अभय मागीतले वर परत स्वराज्यावर आक्रमन करनार नाही असा करार केला. कडतोजींनी तो करार महाराजांकडे पाठवुन दिला. महाराज रागावले व म्हणाले की गनिमास काय म्हनुन सुला केला, सुला करनारे तुम्ही कोण? उद्या जर परत गनिम चालुन आला तर काय करनार. बहलोलखानास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हास तुमचे तोंड दाखवु नका.
 हे पत्र प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांनी आधी सांगीतल्याप्रमाने बहलोलखान परत १ लाख सैन्य घेऊन काही महीन्यांनी चालुन आला. प्रतापरावास आश्चर्य वाटले. त्यांचा तळापासुन (तळ म्हणजे खरा सैन्याचा तळ नसावा तर ते मुशाफीरी ला गेले असावेत त्यामुळे त्यांचाकडे कमी सैन्य वा मोजकेच शिलेदार असावेत असा कयास) जवळच बहलोलखानाचे सैन्य होते.
 
 प्रतापराव आपल्या शिलेदारांसोबत त्या १ लाख सैन्यावर चालुन गेले व धारातिर्थी पडले. त्यावर हे गाणे.
 
 अग तु तिकडे लुकींग फॉर मध्ये पण हाच प्रश्न विचारलास मी तिकडे पण ऊत्तर (हेच ) लिहीले आहे.
 
 
 |  | 
   |