|
Swa_26
| |
| Wednesday, July 11, 2007 - 11:16 am: |
| 
|
दि. ८.७.०७.... रविवार... नेहमीप्रमाणेच उजाडला ती सकाळ नेहमीप्रमाणेच होती, पण ही संध्याकाळ मात्र नेहमीची नाही... नव्हती!! त्याचे कारण म्हणजे नेहमी नेटवरून गप्पागोष्टी करणार्या मायबोलीकरांना मी आज भेटणार होते. संध्याकाळी ५.३० ला शिवाजी पार्क येथील उद्यान गणेशाच्या प्रांगणात भेटण्याचे ठरले होते. मी तशी तिथे बर्याच उशिरा पोचले. पण मी येण्यापुर्वीच तिथे एक मोठे टोळके जमा झालेले दिसले आणि त्यात आनंद ( anadnsuju ) दिसला. त्याला मी ओळखत असल्याने हाच मायबोलीचा group हे ओळखले. भ्रमरध्वनीवरुन माझ्या येण्याची खबर तर तिथे पोचलीच होती पण अस्मादिक तिथे पोचताच "आली, आली" असा कल्लोळ झाला आणि जवळ्पास सगळ्या शिवाजी पार्काला आमच्या आगमनाची वार्ता कळली... पण जवळ गेल्यावर मात्र सगळ्यांना उर्ध्व दिशा दिसु लागली, जणु आपण नाहीच त्या गावचे!!! यानंतर मी उशिरा आल्याबद्दल एक मिनि रॅगिंगचा, प्रकार झाला, म्हणजे आपापले ID वेगवेगळे सांगणे वगैरे.. पण त्यानंतर मी कधी त्यात सामिल झाले ते माझ्याहि लक्षात आले नाही. त्यातही, मनी ( manee ), मोनिका ( monakshi ), आणि विनय ( vinaydesai ) अश्विन ( ash_ananya ) यांचाच गोंधळ जास्त होता... मिलिंद (bhramar_vihar ), नील ( neel_ved ), योगेश ( yogi050181 ), आनंद ( anand_maitri ) आणि नंदिनी ( nandini2911 ) हे जरा शांत शांत वाटत होते आणि आनंद ( anandsuju ) तर अगदी गप्प गप्पच होता... स्वाती ( gaargii )) मात्र जोड्याने (उभयता) हजर होते. गुरुकाका ( gurudasb ) आणि गजानन ( Gajanandesai ) यांना मात्र भेटता आले नाही, मी उशिरा पोचल्याने... गजानन ( Gajanandesai ) यांनी आणलेल्या लाडुंचा फडशा पाडुन झालेला होताच आणि आता सगळ्यांनी GTG च्या परंपरेला स्मरुन वड्याच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. त्यानंतर वडे भजी आणि २ बाटल्या यांचा समाचार घेत खर्या ID सह ओळखपरेड झाली. लाडकिने ( laaDaki ) बाटलीतील थोडे पाणी आपल्याजवळ आठवण म्हणुन ठेऊन घेतलेय. झकासरावांच्या नावाच्या दुकानात त्यांची चौकशी करायला जाणार होतो पण... घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत असल्याने बेत रद्द करावा लागला.. निलुताय आणि भावनाबेन यांनी टांग दिल्याने त्यांना पण भेटु शकले नाही... अशा प्रकारे हा माझा पहिला वहिला GTG संपन्न झाला.
|
गुड स्वाती! पहिला वहिला वृत्तान्त पण थोडक्यात छान हे! 
|
हम्म्म स्वाती, चांगली सुरुवात... होशील पारंगत हळुहळु पण तो पार्कातला लिंबुटिंबु नाही भेटला का??? आणि आनंद, मिलिंद, नंदिनी हे शांत होते?????? मला आत्ता खरच भोवळ येईल...
|
रूप्स. आहेच मी शांत सज्जन आणि पापभिरू मुलगी
|
Ladaki
| |
| Wednesday, July 11, 2007 - 11:53 am: |
| 
|
हो ग नन्दिनी तु खुपच शांत, सज्जन आणि अगदिच पापभिरु मुलगी आहेस 
|
Krishnag
| |
| Wednesday, July 11, 2007 - 11:55 am: |
| 
|
स्वाती, छान आटोपशीर वृत्तान्त! सरावाने अजून सराईत होशील वृत्तान्त लिहण्यात!!
|
Neelu_n
| |
| Wednesday, July 11, 2007 - 11:56 am: |
| 
|
रुपाली एकदम अनुमोदन. नंदिनी गेल्या GTG ला पण शांत होती. ती फक्त इथेच दंगा करते. तिचे एकाSSSSधवेळी मान्य केले तरी आनंद आणि शांत हे समीकरणच अज्जिबात जमत नाहीय. काहीतरी नक्कीच घोळ आहे. स्वाती तुला आनंद म्हणून दुसरा कुणीतरीच पुढे केलेला दिसतोय.. तो आनंदमैत्री असेल कदाचित. तो बिच्चारा काहीच बोलत नाही कधी. बाकी वृतांत छान लिहलायस. आणि दु:ख करु नकोस.... पुढच्या GTG ला भेटुच. तु फोटो टाकते असे काहितरी बोललेलीस ना???
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 11, 2007 - 12:28 pm: |
| 
|
स्वाती छान लिहिलस की. आनंद,भ्रमर आणि नन्दु हे शांत होते???????????? ते इन्द्र नसल्यामुळे मुड नसेल त्याना. BTW कोथरुड मध्ये पण एक दुकान आहे पौड रोड ला. झकास असच नाव आहे.बहुतेक non veg मिळत असेल. तिथेही जावुन यामाझ नाव सांगा आणि पैसे देवुन पोटभरुन खावुन या. ये ताय फ़ोटो GTG चे नाहीत तिच्या गावचे टाकते म्हणली आहे ती.
|
Swa_26
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:45 am: |
| 
|
अरे, झकास, निलु, रुप्स.... अरे मी ते सगळे उपरोधाने लिहिलंय रे!!! vice-versa आहे ते सगळे!!! म्हणुन आनंद एकदम गप्प गप्प असे लिहिलंय...
|
Monakshi
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:05 am: |
| 
|
स्वाती एकदम मस्त, आवडेश.
|
छान छान.. दणक्यात झाला तर हा gtg .. आता उरलेला दंगा वविला करायचा आहे बरं का?
|
मोना, अब तेरी बारी है!! आणि रुप्स, पार्कातल्या लिंब्याने आधीच लाडु मागुन घेतला होता!
|
स्वाती.. पहिला वहिला GTG छान लिहिलास.. व वि चा भला मोठा वृ. येउदे.. पुढच्या GTG ला भेटुच >> निलु.. 
|
Monakshi
| |
| Friday, July 13, 2007 - 9:55 am: |
| 
|
दोस्तांनो आणि दोस्तीणींनो, GTG चा थोडक्यात आढावा लिहित आहे. पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा क्रुपया सांभाळून घेणे. यात कोणाची नावे लिहायची राहून गेली असल्यास क्रुपया माफ करावे. यामध्ये माझा त्या व्यक्तिला त्रास देण्याचा किंवा तत्सम कसलाही वैयक्तिक विचार नाही. GTG 2 शिवाजी पार्क, दिनांक ८ जुलै, २००७. अख़ेर तो रविवार उजाडलाच. इतके दिवस गाजत असलेलं GTG शेवटी काही तासांवर येऊन ठेपलं. ८ जुलैची सकाळ उजाडली तीच मुळी एक प्रसन्न वातावरण घेऊन. रोजच्याप्रमाणे सगळी कामे आटोपत होतेच पण एक प्रकारची उत्सुकत, कुतुहल, किंचित भीती मनात दाटून आली होति. इतके दिवस ज्यांच्याशी पोस्टा-पोस्टी करत होते, काही त्यांचं एकत होते काही माझं सांगत होते ते सर्व मायबोलीकर कसे असतील? ते भेटल्यावर आपण कसे react होऊ इत्यादी विचार मनात रुंजी घालत होते. अगदी घड्याळ्याच्या काट्यावर नजर ठेऊन माझी कामं चालू होती. मनात म्हणत होते की काही प्रॉब्लेम नको यायला.
|
Monakshi
| |
| Friday, July 13, 2007 - 10:03 am: |
| 
|
पण एक प्रॉब्लेम हळूहळू तयार होत होता. नवर्याला सकाळपासूनच feverish वाटत होतं. दुपारपर्यंत त्याला ताप आलाच. गोळी घेऊन झोपला ख़रा पण मग माझी द्विधा मनस्थिती झाली. जावं तर ह्याला असच सोडून कसं जायचं, न जावं तर परत सर्वांना कधी भेटणार? पण संध्याकाळपर्यंत त्याला जरा बरं वाटलं आणि मग आमची स्वारी तय्यार होऊन घराबाहेर पडली.
|
Monakshi
| |
| Friday, July 13, 2007 - 10:21 am: |
| 
|
बस मिळायला उशीरच झाला. पावणेसहाच्या दरम्यान माटुंग्यालाच होते. भ्रमाचा भ्रमणध्वनी माझ्यकडे होता त्याला फोनले तर म्हणाला, "चारच टाळकी जमलीयेत, ये सावकाश." म्हटलं चला, बरं झालं नाहीतर पहिल्याच भेटीत लेट लतीफचा शिक्का बसायचा माथी. पार्कात पोचल्यावर पदयात्रा चालू झाली. (मी आलेले ते मीनाताईंच्या पुतळ्याजवळ आणि मला जायचे होते ते उद्यान गणेश प्रांगणात म्हणजे दुसरे टोक). सगळी जमलेली टोळकी निरखीत चालले होते, भ्रमर म्हणालेला की तो मायबोलीचा T-shirt घालून येणार आहे पण त्याने दगा दिला. एके ठिकाणी एक घोळका दिसला. मला शंका आली की हेच आपले इप्सित स्थळ. पण म्हटलं खात्री करुन घ्यावी. त्यातल्या एकाला विचारले, "मायबोली का?" तर तो भ्रमरच निघाला. तेवढ्यात आनंदने ( anandsuju ) पिंक टाकलीच, "एवढा गोंधळ आहे म्हणजे मायबोलीकरच हे कुणीही ओळखेल." थोड्यावेळाने दोघी पोरी नाचत बागडत येताना दिसल्या. एक जोडपही मायबोलीची विचारपूस करत येत असताना दिसलं. बर्यापैकी कंपू जमल्यावर ओळखपरेडला आरंभ झाला.
|
Monakshi
| |
| Friday, July 13, 2007 - 10:50 am: |
| 
|
गुरुदासकाका ( gurudasb ), विनय देसाई ( vinaydesai ), आनंद ( anand_maitri ), आनंद केळकर ( anandsuju ), मिलिंद ( Bhramar_Vihar ), निलेश ( Neel_Ved ), मंजिरी ( Manee ), नंदिनी (हिचा ID द्यायची गरज आहे का?), लीना ( ladki ), स्वाती ( gargi ), mrunal_22 ) (ह्यांचे नाव मला आठवत नाही), अस्मादिक आणि गजानन देसाई ( gajanandesai ) ह्या सर्वांशी ओळख़ी झाल्या. गजानन ही व्यक्ति पाहून मी उडालेच. मला खरंच गजानन म्हणजे साठीचा, टक्कल पडलेला, VRS घेतलेला, पोरं US मध्ये सेटल झालेला आणि आता रिकामा वेळ मिळतो म्हणून मायबोलीवर बागडणारा असा एक वयस्कर ग्रुहस्थ वाटला. प्रत्येकाने आपले नाव, ID आणि पोटापाण्याची सोय यांबद्दल सांगितले. यथावकाश अश्विन ( ash_ananya ) (हा बहुदा श्रीवर्धन बीबीवर असतो) आणि जयसूर्या, आपलं त्रिखंडपालक, राजाधिराज श्रीमान योगीमहाराजांचे आगमन झाले. सगळ्यांच्या गप्पाटप्पा, तू काय करते मी काय करते, नंदिनीला तीच्या कादंबरीवरुन आणि रेहानरुन चिडव असे प्रकार चालू होते. अनेक टांगारुंना संपर्क करुन ते येत नसल्याची खात्री झाल्यावर त्यांना शिव्या देण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला. गजाननच्या लग्नाचे लाडू खाऊन झाले. मध्येच भ्रमराने त्याचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजेच पैसे गोळा करणे उरकून घेतला.स्वातीने ( Swa_26 ) येतेय येतेय म्हणून सर्वांना लटकवून ठेवलं होतं. (नंतर असं कळलं की ती स्वत:च बिचारी कुठेतरी लटकली किंवा अडकली होती). ती आल्याबरोबर सर्व तापलेल्या जनांना त्यांच्या तोंडात काजूकतली कोंबून तीने थंडगार केलं
|
म्हंजे नवर्याला ताप आलेला तर! आणि तु आल्यावर आम्हाला
|
Monakshi
| |
| Friday, July 13, 2007 - 10:57 am: |
| 
|
यथावकाश आमचा मोर्चा पार्कातल्या वडेवाल्या काकूंकडे वळला. वडे भजी ह्यांच्यावर आडवा हात मारत स्वातीला शिक्षा म्हणून सर्वांना त्यांच्या ID ने ओळखायला सांगितले. (बिचारी, उशीरा आली म्हणून काय काय भोगावं लागलं). पोटोबा भरल्यावर मात्र सर्वांनाच घराचे वेध लागू लागले. त्यातून वरुणराजाची क्रुपा होईल असं वाटत होतं. वविचं planning ठरवून सर्वांनी एकमेकांचे निरोप घेतले. अश्या ह्या GTG च्या सुखद आठवणी मनात घेऊन मी परतीचा मार्ग धरला.
|
छान मोनिका!! यापुढील सर्व GTG च्या वृत्तांताचे काम तुझ्यावर सोपवण्यात येत आहे!!
|
|
|