आमिर खाननी स्वत्:चा ब्लॉग सुरु केला आहे. तो तिथे दर २-३ दिवसांनी लिहितो. सध्यातरी लगानबाबत चालु आहे. लवकरच त्याचि वेबसाईट पण येइल. बघा- http://www.lagaandvd.com/blog.php
|
Meenu
| |
| Tuesday, June 26, 2007 - 7:40 am: |
| 
|
मला नाही वाटत की खरा आमिर खान ते पोस्ट करतोय. लोक कशावरही विश्वास ठेवायला लागलेत. त्याला तसं करायचच अस्तं तर त्यानी त्याची भरपुर जाहीरात केली अस्ती आधी.
|
नाही नाही खरा आमिर खान लिहितो आहे. ती वेबसाईट लगान डिविडि वाल्यांची आहे. त्या DVD च्या उद्घाटन समारंभाला मागच्या आठवड्यात आमिर, आशुतोश होते पेपरमधे फ़ोटो पण आले होते. शिवाय मला हे इंडिअन एक्सप्रेस मधुन कळलय. त्यामुळे तो खरा आमिर आहे हे नक्की. कारण वेबसाईट पण ऑफ़िशीअल आहे.
|
आमिर ने नुकतीच making of Lagaan ची DVD रेलिज केली आहे , परवा news मधे त्याचा interview दाखवला . ब्लॉग material त्याचेच असेल हे नक्की , actual टाईप करणारा वेगळाच असेल पण .
|
हे बरोबर असु शकते. आमिरला कम्पुटरबद्दल फ़ारस माहिती नाही हे त्यानी लिहिलच आहे तिथे. ऑर्कुट काय हे सुध्दा माहित नाही त्याला. ऑर्कुटवर त्याच्या नावानी कोणितरी दुसराच लिहितो आहे. काल आमिरने 'भुवन'च्या रोलबद्दल लिहिले होते. ते अतिशय वाचनिय आहे. आमिर आपल्या रोल्ससाठी किती अभ्यास आणि विचार करतो हे दिसुन येते. उद्या बहुतेक 'गजनी' बद्दल लिहिणार आहे.
|
गजनी फ़िल्म पुढच्या वर्षी जुन मधे रिलिज होइल हिरॉइन असिन(तमिल), आणि जिया खान. व्हिलन ठरलेला नाही. मुळ चित्रपटाचा क्लायम्याक्स (३०मिनिटे) बदलण्यात आला आहे. आमिर हा चित्रपट घेणार नव्हता मात्र सुर्या या मुळ चित्रपटातिल हिरोने आमिरच बेस्ट चॉइस आहे हे पटवुन दिल्यानंतर त्याने तो स्विकारला. आज आमिर रेहेमानच्या स्तुडिओत बसुन ब्लॉग लिहित होता. प्रसुन जोशी( रंग दे बसंती फ़ेम) गीत लिहित आहे
|
ब्लोगवरिल चले चलोचा व्हिडिओ चांगला आहे. आजच पुणे न्युजलाईनम्धे आमिर,राहुल बोस, शाहरुख, शेखर कपुर यांच्या ब्लॉग्सविशयी न्युज आली आहे
|
आता आमिरने स्वत्:ची वेबसाईट पण सुरु केलिय. www.aamirkhan.com या वेबसाईतवर तो chat साठी पण येउन गेलाय ३-४वेळा. पहिल्या दिवशी न भुतो न भविष्यती गर्दी होती. मी वेबकॅम बघु शकत होतो पण गर्दीमुळे चॅट्रुममधे नाही जाता आलं
|
Panna
| |
| Tuesday, November 20, 2007 - 3:40 am: |
| 
|
चिन्या, दुसर्या दिवशी तो जेव्हा online आला होता तेव्हा मी होते चॅट ला!! पण इतकी गर्दी होती की नुसती लोकांची "च्याव-च्याव" ऐकू येत होती अजुनही तुफ़ान गर्दी असते तिकडे. पण त्याच्या ब्लॉग वरचे पोस्ट वाचण्यासारखे असतात!
|
Santoshd
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:34 am: |
| 
|
कोणीतरी NIIT,SSI साठी प्रोजेक्ट केलेला दिसतोय, कींवा सहजच आवडम्हणुन वेबसाईट बनवलेली दिसतेय, फ़ीनीशींग टच छान आहे वेबसाटचा :-)
|
Amruta
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:34 pm: |
| 
|
आमिर खानची मुलाखत.. http://www.esakal.com/features/amir-int/index.html
|
आजकाल त्याने ब्लॉग लिहिण कमी केलय. खालील बातमी वाचुन आनंद झाला- चित्रपटाच्या सेटवर अपघात होऊनही पुरस्कार स्वीकारल्याबद्दल लतादीदींनी आमीर खानचे आभार मानले. आमीरबद्दल त्या म्हणाल्या, ""आमीर सहा-सात वर्षांचा असल्यापासून मी त्याला पाहतेय. हृदयनाथनंतर माझ्या गायनातील चूक पकडणारा आणि ती माझ्या तोंडावर स्पष्टपणे मांडणारा हा माझा छोटा भाऊ आहे. "लगान' चित्रपटामधील माझ्या एका गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले होते, परंतु आमीरला ते न आवडल्यामुळे त्याने पुन्हा माझ्याकडून ते गाऊन घेतले. तो स्वतः खूप चांगला गायक आहे, हे मला त्याचे "गुलाम'मधील "आती क्या खंडाला...' हे गाणे ऐकल्यानंतर कळले.'' लतादीदींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे आपणास आज बालपणीच्या दिवसांची तसेच कुटुंबीयांची आठवण झाल्याचे आमीरने सांगितले. या पुरस्कारास पात्र ठरण्याएवढी कामगिरी अद्यापपर्यंत आपल्या हातून झाली नसल्याची नम्र भावनाही या वेळी त्याने व्यक्त केली. डॉ. लागू यांनी या पुरस्कारातून मिळालेली ५० हजारांची रक्कम पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणगी म्हणून दिली. लतादीदींच्या अलौकिक स्वरामुळे आपला देश आता विश्वाचे देवघर बनलाय, या शब्दांमध्ये शंकर अभ्यंकर यांनी लतादीदींच्या कार्याचा गौरव केला. "गजनी' चित्रपटाच्या सेटवर बुधवारी अपघात झाल्याने आमीर खानच्या मांडीचा स्नायू दुखावला. डॉक्टरांनी त्याला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता; मात्र हा सल्ला डावलून आमीर पुरस्कार सोहळ्यास नुसता उपस्थित नव्हे; तर तो दोन तास व्यासपीठावर बसून होता. ""एकच पाय काय, आपल्या दोन्ही पायांना दुखापत झाली असती तरी लतादीदींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्हीलचेअरवर बसून येथे आलो असतो,'' असा उल्लेख त्याने या वेळी केला
|