|
Chafa
| |
| Monday, August 21, 2006 - 8:18 pm: |
| 
|
एकेकाळी बिस्मिल्ला साहेबांची शहनाई लावली नाही, तर लग्नच लागल्यासारखे वाटत नसे. >> अजूनही मला तसच वाटत, दिनेश. >>> आर्च, मलासुद्धा! मागे कोणीतरी लग्न म्हणजे पंजाबी म्युजिक हवेच असं म्हटलेलं तेव्हा फक्त डोक्यावर हात मारुन घेतला. सनई म्हणजे बिस्मिल्ला खाँ एवढं पक्कं समीकरण असणं हाच त्यांचा कलेचा अत्युच्च पुरस्कार!
|
मागे कोणीतरी लग्न म्हणजे पंजाबी म्युजिक हवेच असं म्हटलेलं तेव्हा फक्त डोक्यावर हात मारुन घेतला. <<<मीच म्हंटले असेन रे चाफ़्या पण त्यात डोक्याला हात लावण्या सारखं काय आहे ? मंगल वाद्यां मधे जशी शेहेनाई - येते तसे चौघडे - तुतारी - ढोलक ही सर्व प्राचीन काळा पासून प्रचलित वाद्येही येतात . ते कधी वाजवायचे याचे timings वेगळे असते इतकेच . तेंव्हा पंजाबदा ढोल हवा आणि शेहेनाई ही हवीच !! असो ,Tp बद्दल क्षमस्व ! उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना श्रध्दांजली .!
|
दिवाळीत सुद्धा बिस्मिल्लाह खान यांची शहनाई लावली नाही तर दिवाळी वाटतच नाही.. माझी सुद्धा बिस्मिल्ला खान ह्यांना श्रद्धांजली
|
Kandapohe
| |
| Monday, August 21, 2006 - 11:08 pm: |
| 
|
भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, तानसेन पुरस्कार पुरस्कृत शहनाईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जरी त्यांचा स्वर्गवास झाला असला तरी यापुढेही घराघरात मंगल प्रसंगी त्यांची सनई नक्की वाजेल व तिच त्यांना खरी श्रद्धांजली म्हणता येईल.
|
Mahesh
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:08 am: |
| 
|
धर्माच्या नावावर झगडे करणार्यांना हे दिसत नसेल का ? भारतात कलेच्या उपासकाचा धर्म / जात न पहाता सर्वजण त्या व्यक्तीला सारखाच आदर आणी मान देतात. आदरणीय बिस्मिल्लाखान यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
|
Lalitas
| |
| Monday, August 28, 2006 - 9:08 am: |
| 
|
हृषिकेष मुखर्जी यांचे निधन... एक सिध्दहस्त दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला. अनाडी, अनुराधा, असली नकली, सांज और सवेरा, आशिक, सत्यकाम आणि आनंद - त्यांचे गाजलेले चित्रपट! आनंदमुळे राजेश खन्ना व अमिताभ बच्चन पुढची याशाची पायरी चढले. गुड्डी, अभिमानसारख्या सामजिक व रंगबिरंगी, गोलमाल, चुपके चुपकेसारख्या हलक्या फुलक्या करमणुकप्रधान उत्कृष्ट कलाकृती दिल्या. हृषीदांना भावपुर्ण श्रध्दांजली!
|
Dineshvs
| |
| Monday, August 28, 2006 - 4:07 pm: |
| 
|
माझीहि त्याना भावपुर्ण श्रद्धांजली. हे चित्रपट आजहि निखळ आनंद देतात. पण मी आशिक बघितला नाही बहुतेक.
|
Mepunekar
| |
| Saturday, September 02, 2006 - 6:02 pm: |
| 
|
ह्रुशिकेष मुखर्जिना माज़ी भावपुर्ण श्रद्धांजली...मला त्यांचे सगळेच चित्रपट specially आनंद, मिली, खुबसुरत,गुड्डी, अभिमान आजहि परत परत बघायला आवडतात
|
ऑस्ट्रेलियन प्राणीमित्र स्टीव्ह चे अपघाती निधन! देव त्याच्या आत्म्यास शान्ती देवो! ह्रुशिकेश मुखर्जी!
|
हो रे लिंबु मलाही आवडायचा स्टीव्ह. एकदम फ़्री असायचा तो मगरींबरोबर. हे लिंबु हृषिकेश मुखर्जींना sad face का दिला आहेस ते थोडच बघणार आहेत. तुला जे काय वाटत ते लिह.
|
स्टिव च्या करामती बघायला आम्हा सर्वांना आवडायचे.., सगळ्या बालगोपाळानी त्याच्या धाडसी करामती बघाव्या अस मला मनापासुन वाटायचे म्हणुन. मुलाच्या वाढदिवसाला.. मी crocodile hunter च्या video casst सगळ्याना दिल्या होत्या.., काल tv वर ही बातमी आल्यावर मुलाला एकदम गहीवरुन आले..!!!दिवसातुन जेव्हा जेव्हा ही बातमी दाखवली तेव्हा तेव्हा त्याने पाहीली ह्रुषिकेश मुख्र्जी...जहापनाह.. जिंदगी उपरवालेके हातमे हा आनन्द मधला dialg आठवला ईश्वर त्यांच्या अत्म्याला शांती देवो..!!!
|
कवी सुधांशु यांच्या मृत्युची बातमी आताच दूरदर्शनवर सांगितली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
|
माजी कसोटीपटु पॉली उम्रीगर यांचे काल कर्करोगाने निधन झाले माझी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
|
Zakki
| |
| Wednesday, November 08, 2006 - 1:19 pm: |
| 
|
माझीपण त्यांना श्रद्धांजली! मी त्यांचा खेळ पाहिला आहे, तडफदार! फटकेबाज! विशेषत: हजारे, मर्चंट यांच्यासारख्या अति जपून खेळणार्यांच्या पुढे मांजरेकर, उम्रीगर, बुधी कुंदरन, यांचा खेळ प्रेक्षणीय असे.
|
Svsameer
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:38 am: |
| 
|
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक दाजी भाटवडेकर यांचे आज गिरगावातील राहत्या घरात निधन झाले.
|
महान संगीतकार O.P. नय्यर यांचे निधन ओपी नय्यर - आशा ची ती अजरामर गाणी , घोड्याच्या टापांचा ताल , पंजाबी लोकसंगीता वर अधारीत एक से एक गाणी कायम लक्षात रहातील ! त्यांना मन : पूर्वक श्रध्दांजली ..
|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 4:26 pm: |
| 
|
माझीहि त्याना श्रद्धांजली. तब्येत राखुन होते ते, शेवटपर्यंत. रागदारीतले काहि कळत नाही, असे सांगुन त्यानी बरिच रागदारी गाणीहि दिली होती. देखो बिजुरी डोले, अकेली हु मै पिया, बैरी बदरवा बरसो रे, तु है मेरा प्रेमदेवता, बेबसी हदसे जब गुजर जाये, हि त्याची उदाहरणे.
|
Saavat
| |
| Monday, January 29, 2007 - 2:55 am: |
| 
|
पुकारता चला हूँ मैं, गली गली.....
|
Bee
| |
| Monday, January 29, 2007 - 3:29 am: |
| 
|
एक चांगला संगीतकार गेला. ओपींना माझी भावपुर्ण श्रद्धांजली..
|
Svsameer
| |
| Wednesday, February 21, 2007 - 12:59 am: |
| 
|
डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे निधन कुर्डूवाडी येथील अपघातानंतर गेले सोळा दिवस मृत्यूशी झंुज देत असलेले 'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे सोमवारी रात्री येथील काटीकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. --म. टा. वृत्तसेवा
|
|
|