Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 28, 2007

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » मराठी गाणी » विषयाप्रमाणे » लावणी » Archive through January 28, 2007 « Previous Next »

Lalu
Wednesday, January 10, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी लावणी गीतांचा संग्रह.

या दिनेश नी अंताक्षरी वर लिहिलेल्या लावण्या -


टुमदार कुणाची छान, नवति भरज्वान
पुसा रे आली कुठुन,
स्वरुपाचे तुटती तारे, कडा रे कड विजवा पडती तुटुन

पान खाऊन, ओठ करी लाल
अंगावरी शाल, झळकती तुरे
गजगति चाले हळु हळु, उरी गं जोबन
उमटती फ़ुले
वय अटकर, बांधा लहान
हरपलो पाहुनी भुक तहान
अशी नाजुक तनु कोणाची, पुसा रे आली कुठुन

गायक विश्वनाथ बागुल
--------------------

श्रीरंगा सारंगधरा
मी लाजुन धरते करा
चला नेते माझ्या घरा
उडवु रंग रंग रंग

माझ्या महाली लाजु नका
तुम्ही वाट्टेल तेवढं झुका
धरा लगाम, ओढुनी पक्का
अगदी तंग तंग तंग

म्हणे पठ्ठे बापुराव कवि
अनुभवी नवलाची कोवि
भरोश्याची आहे का तरी
करु नये भंग भंग भंग

गायिका किर्ती शिलेदार
-------------------

ईथे मांडिला ईष्कबाजीचा
अन शृंगाराचा डाव
मोल पुरेसे मोजा, आणिक खुषाल लावा हात

माल मांडला नवा नवा
गाल नरम जणु गरम खवा
या ओठांचा शराबपेला
भरला काठोकाठ

नारिंगाची रसाळ गोडी
हवी कश्याला ती जोडी
काय हवे तुज बोल राजसा
नको उद्याची बात

गायिका किर्ती शिलेदार

वरच्या तिन्ही लावण्या स्वरसम्राज्ञी, नाटकातल्या.


Lalu
Wednesday, January 10, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
सोळावं वरिस धोक्याचं गं सोळावं वरिस धोक्याचं

रात रुपेरी खुलली गं, अन मला पोर्णिमा भुलली गं
अंगावरती सांडु लागलं, टिपुर चादणं रुप्याचं

ओढ लागली संगतीची, अन नजरभेटीच्या गमतीची
आज मला हे गुपित कळलं, जत्रंमधल्या धक्क्याचं

पिसाट वारा - - - -
तोल सुटावा अशी वेळ हि, परि चालणं ठेक्याचं


Lalu
Wednesday, January 10, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मनीषा लिमये ने अंताक्षरी वर टाकलेली लावणी.

माझ्यासाठी दिली राहुटी इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव||

मी मस्तानी हिंदुस्तानी बुंदेली पेहेराव
झिरझिरवाणी निळी ओढणी वाळ्याचा शिडकाव||

तुम्ही मराठे नव्हे छाकटे अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई तुमची द्वाही चारी मुलखी नाव||

उभी अंगलट तांबुस फिक्कट नयनी दाटला भाव
बोलावाचुन ख्यातीवाचुन अर्जीभाव||

काल दुपारी भर दरबारी उरी लागला घाव
मीपण चळले तुम्हा भाळले आता नाही निभाव||

दिठी दिठीचा नजरमिठीचा होऊद्या टकराव
या पायासी मज दासीसी मिळेल का कधी वाव||


Lalu
Wednesday, January 10, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश नी दिलेल्या अजून काही -

राम राम घ्या
दुर करा जी भवतीचा घोळका
दिलवरा दिल माझे ओळखा

प्राणप्रियकरा अरे दिलवरा राज अंबीरा
बांधला भरजरी साफ़ा जरी मी वरुन
रुळतात केस हे भाळावरुन
बघताच तुम्हा डोळे आले भरुन
नसत्या पदराकडे धावतो, हात गडे सारखा

हि पैरण मेली चोळीहुन काचली
हालचाल कटीची शेल्याने जाचली
पाऊले महाली कशीबशी पोचली
सोंग घेतल्या कधी साजणे बनेल हो जाळ का

आशा भोसले, सिनेमा सांगत्ये ऐका, पडद्यावर जयशी गडकर.
-----------------------

काल रात सारी मजसी झोप नाही आली
जीव झाला थोडा थोडा अंग वर खाली

पति दुर देशी माझे रुप माझे मजसी ओझे
मध्यानीच्या पारी दारी एक थाप आली

कशी आत घेऊ चोरा, कशी उघडु मी दारा
पाच माळ्यावरती माझी कोपर्‍यात खोली

काच कवाडाची होती, पतंगास कळली ना ती
भरारुन तोचि होता येत गं महाली

काचेवरी त्याची झेप, तिच मला वाटे थाप
अशी तुझी मैत्रीण बाई, पाखरास भ्याली

गायिका मधुबाला जव्हेरी, सिनेमा सांगत्ये ऐका, पडद्यावर हंसा वाडकर.

----------------------------

हि नव्या नवतीची खुडुन कवळी पानं
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
हि चिकणी सुपारी फ़ोडली चिमनी दातानं
अन डाव्या डोळ्यानं खुडुन घातला,
नजरकाताचा हो खडा
अन राजसा घ्यावा गोविंद विडा

विडा घेऊन अलगद हाती, हात अदबीन केला पुढति
हिरवा शालु, हिरवी चोळी, भरला हिरवा चुडा

या विड्याचा रंग गुलाबी, धुंद करील हि नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी, भरुन आणला घडा

नाचनाचुनी होताना दंग, अर्ध्या रातीला येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया, शिणगाराचा सडा

कृष्णा कल्ले आणि सुलोचना चव्हाण, सिनेमा केला ईशारा जाता जाता
पडद्यावर लिला गांधी आणि उषा चव्हाण
--------------------------

लाखामधुनि सख्या तुम्हाला, अचुक मी हेरलं
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या
बांधा एक डोरलं, सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

हि ऐन भराची उमर लई मोलाची
हि ईक्कल माझी सोन्याच्या तोलाची
हे घुंगरु बांधण्या कितीदा खाली वाकु,
किती किती लाज मी पदराखाली झाकु
हो चाळामधुनि वीजपाखरु, मनात थरथरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

दोघात रंगला नजरबंदीचा खेळ
हारजीतीचा बसला ना मेळ
हो बक्कळ झाल्या भेटी आता
एक काम उरलं, सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

सुलोचना चव्हाण, सिनेमा केला ईशारा जाता जाता
पडद्यावर लिला गांधी.


Deemdu
Thursday, January 11, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐन दुपारी यमुनातिरी खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना कुठुन अचानक आला कान्हा
गुपचुप येऊ पाठीमागुन
गुपचुप येऊ पाठीमागुन
माझी वेणी ओढली

समोर ठाके उभा आडवा
हातच धरला
( अंगाला हात लावायच काही काम होतं का? )
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मी ही चिडले
मी ही चिडले, इरीस पडले वनमाला तोडली

झटपटीत त्या कुठल्यावेळी
करंगळी हो निळसर काळी
का हृषीकेशी मम देहाशी निजकांती जोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

-------------------------------------------

पहीली :- एक दाताचा दो मातांचा तीन आगळ्या गोतांचा
चार भुजांचा देव कोण ग पाच थुलथुलीत हातांचा

दुसरी :- अग कोण लाभला गुरु एव्हढा प्यालीस अक्कलकाढा गं
शाहिरकीच्या उजळणीतला हा तर पहीला पाढा गं
एकदंत श्री गजाननाला कोण ओळखत नाही ग
सती पार्वती पहिली माता दुसरी गंगा माई ग
सत्वरजातून देव वेगळा ही शास्त्राची वाणी ग
चार भुजांसह सोंडही त्याची असते हातावाणी ग

पहीली :- नकोस हरखुन जाउ मी हा सवाल नव्हता केला ग
रीत पाळली स्मरण गणाचे केले आरंभाला ग

दुसरी :- सवाल करते ऐक वैरीणी उघडून पडदा कानाचा
सभेदेखता गर्व उतरीते तुझ्या अर्ध्वट ज्ञानाचा
शंकर दर्शन करण्यासाथी नारद गेले कैलासा
ढग बिजलीचा जोडा दिसला मंदीरात त्या सांग कसा?

पहीली :- हलाहलाते प्याल्यापासून कंठ शिवाचा होय निळा
अंगावरती बसे अंबिका हात घातला तिने गळा
निळकंठाच्या गळ्यात नाचे चपल हात ग गौरीचा
ढगात बिजलीपरी नारदा असेल दिसला बहरीचा

सवाल पुसते एक तुला मी उत्तर त्याचे सांग भले
नातर काढून फेक चाळ ते तुझ्या कलेचे चांगभले
तुझ्या जोगता सवाल बाई अगदी सरळ साधा ग
वडिलमंडळी समक्ष हरीने कशी चुंबीली राधा ग?

दुसरी :- धूळ उडाली अशा मिशाने राधा डोळे चोळी ग
फुंकरीचे मग निमित्त काढून जवळी ये वनमाळी ग
ओठ पापण्या यांची मिळणीसहज साधली मौजेची
म्हातार्यांना काय दिसावे वेळ आंधळी सांजेची

भलत्या संगे लढू नको ग आत्महत्या हा तुझा गुन्हा
खतावाचुनी गवत वाढते गवताहुनही वाढ कुणा?

पहीली :- कलावतीला कशास पुससी पूस कुणाही संता ग
गवताहुनही अमाप वाढे मनामनातील चिंता ग

दुसरी :- शंभर डोळे असून अभागी कोण अकारण रडतो ग
डोळ्यांसाठी खून कुणाचा सांग सिवारी पडतो ग?

पहीली :- पंखा पंखा वरती डोळा मोर अकारण रडतो ग
डोळ्यामधुनी निघे बियाणे घाव उसावर पडतो ग

दुसरी :- भिडेल त्याचा पडेल तुकडा असा बाण ग रामाचा
नेम साधता जीव जोडतो असा बाण ग कोणाचा?

भेदिल त्याला समूळ छेदिल बाण असा ग रामाचा
नेम साधता जीव जोडतो असा बाण ग कामाचा

पहीली :- ऐका. पाच शेपट्या चार आचळे बावीस होते पाय
रणांगणावर उभी राहीली सात शिरांची गाय
त्या गाईचे दूध न सरले युगे संपली दोन ग
सांग कवी च्या कन्ये मजसी ही गायत्री कोण ग?

दुसरी :- तुझं तुला तरी ह्याचं उत्तर येतय का?

पहीली :- अर्जुनाच्या रथाला चार घोडे
रथात तीन महापुरुष, श्रीकृष्ण सारथी, अर्जुन रथी, रथाच्या ध्वजाशी मारुती
चार घोड्यांचे सोळा, तीन पुरुषांचे सहा पाय झाले बावीस
चार घोड्यांच्या चार शेपत्या एक मारुतीरायाची
घोड्याला स्तन नाहीत अर्जुनाला नाहीत, कृष्ण आणि मारुतीराया यांची स्तन संख्या चार
या अर्जुनाच्या रथानेश कुरुक्षेत्रात गीतातत्त्वाचे दूध जन्माला घातले ते अजून पुरते आहे

कृष्ण सारथी, रथी धनंजय, ध्वजावरी हनुमान
कुरुक्षेत्रीच्या रथा दिले मी गाईचे उपमान
त्या गाईचे दूध न सरले गीता त्याचे नाव
जाणकार ते समजून घेतील माझ्या मनीचा भाव




मल्हारी मार्तंड





Lalitas
Thursday, January 11, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंचा आल्यात पाडाला
हात नगं लावूस झाडाला, माझ्या झाडाला

माझ्या कवाच आलंय ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय पाणी
काय बघतोस राहून आडाला

मी झाडाची राखणवाली
फिरवीते नजर वर खाली
फळ आंबुस येईल गोडाला

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला

गायिका: आशा भोसले



Lalitas
Thursday, January 11, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फिदा झालं माझ्यावर कुणी
त्यानं घेतली मला पैठणी

गळसरी पुतळी झोकात
देखणी अशी मी लाखात
उभी राहिले चौकात
आम्ही जातीच्या वाघिणी

माझा पदर जरीपटक्याचा
माझा नखरा बाई झटक्याचा
देते इशारा घोक्याचा
आम्ही जातीवंत नानिणी

का अमुच्या नादी लागती
का बिजली धरू पाहती
काय ग होईल तयांची गती
गिळू नका अस्फूट हिरकणी

गायिका: आशा भोसले


Deemdu
Thursday, January 11, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१.
काल रात सारी मजसी झोप नाही आली
२. कळीदार कपुरी पान
३. करी दिसाची रात
४. मी तर जाते जत्रंला
५. आल्या नाचत नाचत मेनका रंभा
६. किती जिवला राखायाचं राखलं
७. देरे कान्हा चोळी लुगडी
८. आल्या आल्या जाऊ नका
९. छबीदार छबी
१०. मला हो म्हनतात लवंगी मिरची
११. चंद्र आणखी प्रिती ह्यांचे काय असावे नाते
१२. पदरावरती जरतारीचा
१३. मला इशाकाची इंगळी दसली
१४. मला लागली कुनाची उचकी
१५. मला आणा व्क हिर्‍याची मोरनी


Lalu
Thursday, January 11, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deemdu, thanku thanku thanku!! :-)

ह्या दिनेशनी दिलेल्या अजून काही -

दिर दिर तानोम तानाना देरे ना
दिर्दिर तानोम तनाना देरे ना
ता ना देरे ना ता ना देरे ना ता ना देरे ना
दे रे ना दे रे ना तन देरे ना देरे ना तन
दिक्रांत देरेदेरे दिक्रान्त देरे देरे
दिर दिर तानोम तानाना देरे ना
दिर्दिर तानोम तनाना देरे ना


असा नेसुन शालु हिरवा, आणि वेणीत खोचुन मरवा
जाते कुणीकडे, कुणाकडे सखे सांग ना
का गं बघतेस मागेपुढे

अरे वाटेत गाठुन पुसशि, का रे निलाजर्‍या तु हसशि
जाते प्रियाकडे, सख्याकडे तूला सांगते,
त्याची माझी रे प्रीत जडे

तुजपरी गोरी गोरी चाफ्यावाणी सुकुमारी
दुपारचे वर उन जळते ग वर उन जळते
टकमक बघु नको, जाऊ नको तिच्यामागे
वर उन जळते, ते तिचे तिला कळते

का गं आला असा फणकारा, कंकणाच्या करित झणकारा
जाते कुणीकडे, कुणाकडे सखे सांग ना
का गं बघतेस मागेपुढे

दुर डोंगरी घुमते बासरी, चैतर बहरला मनामधि
पदर फडफडत, उर धडधडत, प्रीत झळकते मनामधि

मी रे भल्या घरातील युवति, लोक फिरतात अवतीभवती
जाते, सख्याकडे प्रियाकडे खरे सांगते,
म्हणुनि बघते मी मागे पुढे


लता, सुधीर फडके आणि मास्टर कृष्णराव, अशी तीन रत्ने या गाण्यासाठी एकत्र आली होती. शिवाय पडद्यावर हेलन आणि गोपीकृष्ण होते CBDG , सिनेमा किचकवध. यावरचा नाच अगदी लावणीटाईप नसला तरी, चालीचा बाज आणि शब्दकळा, मला लावणीचीच वाटते.

कृष्ण तुझा बोले कैसा, ऐक गं यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो तुच राधे
परतुनी मला दे

दिवसभरी पाठी लागे, पाठ सोडी ना गे
कितीकिती समजुत घालु, किती भरु रागे
पोर जरी उपजे परी हे पोर नव्हे साधे

कटीस मिठी मारी गोंडे मागतो रडुनी
निरी धरुन येऊ बघतो, वरि हा चढुनी
बाळपणी जाईल वाया, जन्म अश्या नादे

दिले यास साखरलोणी, दिल्या दुध लाह्या
नवी दिली चेंडु लगोरी, सर्व जाई वाया
बरी नव्हे सवई असली, तुच यास सादे

सिनेमा धरतीची लेकरे, सुधीर फडके आणि आशा, पडद्यावर चंद्रकांत आणि नर्गिस बानु.


Lalu
Thursday, January 11, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या अनुक्रमे भूषण आणि गजानन देसाईंनी दिलेल्या

[अग ए, बोल की. तुमच्या तोंडाला कुलपं का घातली?]
बाजारात जाताना, घराकडे येताना लईबाई मला छळतो, गं
[असं वयं]
हां हं, बाजारात जाताना, घराकडे येताना लईबाई मला छळतो, गं
[अगं कोन]
कस सांगू, कस बोलू [अगं सांग ना]
अगं ह्यो ह्यो ह्यो ह्यो ह्योऽ
ग त्यो [ह्यो वै]
नाही गं, अगं ह्यो ह्यो ह्यो ह्यो ह्योऽ[ह्यो वै]
नाही गं, ह्यो मेला माझ्याकडं, हां ह्यो मेला माझ्याकडं
कवापासुन कसा बगतोयं
कवापासुन कसा बगतोयं
मेला मेला माझ्याकडं, कवापासुन कसा बगतोयं

ऐन दुपारी भर बाजारी, अगं सगळ्यादेखत करी शिरजोरी
कच्ची कैरी मी घेते तर हा खुद्कन गाली हसतोय
अन् होय तिथं पाडाचा आंबा मागतोय . १

[ह्यो वै]
तो नव्ह, ह्यो मेला माझाकडं कवापासुन कसा बगतोयं

मी रानात जाता बोर तोडता कसा ग कळतो ह्याला पत्त्या
अगं कस गं कळतो ह्याला पत्त्या
मज गाभुळलेली चिंच दावतो, लोचट लुब्रा लाळ घोटतो
सदा माझ्या मागमाग, मागमाग फिरतोय .. २

[ह्यो वै]
तो नव्ह, ह्यो मेला माझाकडं कवापासुन कसा बगतोयं

चित्रपटः देवकी नंदन गोपळा
गायिकाः आशा भोसले
संगीतः राम कदम
गीतः ग. दि. माडगुळकर
------------
अमर भूपाळीमधली ही अजून एक

तुझ्या प्रितीचे दुःख मला दावू नको रे
वधूनी जाई प्राण घेई (जगी) ठेवू नको रे

याचे ममतेचा लोभ मला कळ्ळा आता
कोण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता
तिथे चालत जाईन आप अंगे स्वतः
जाऊन सांगा की रानभरी(?) होऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रितीचे...

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
होऽऽऽऽ
(जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झडप घेऊन देतो प्राण दीपकाचे वरी २)
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्न टाकून पदरात गार घेऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रितीचे...


Dinesh77
Thursday, January 11, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु ताई,
किचकवध मधील त्या लावणी मधे आणखी एक रत्न होते. ग.दि.मा. अप्रतिम शब्द रचना!!

ग.दि.मां ची आणखी एक लावणी

काय सामना करु तुझ्याशी नारी जात तू दुबळी ग
हुकुम पाळिता पुरुषजातीचा सरे जिंदगी सगळी ग
जी जी जी जी
बालपणी तुज धाक पित्याचा तरुणपणी तुज हवा पती
वृद्धपणा तव पुत्राहाती स्वतंत्र बुद्धी तुला किती
जी जी जी जी

अरे नको वाढवण सांगु शाहिरा पुरुषजातीचे फ़ुकाफ़ुकी
स्त्रीजातीच्या अकलेपुढती तुझी बढाई बढेल किती
जी जी जी जी
सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला तडा
असेल ठावी कथा जरी ती बोल मग पुढे घडाघडा
जी जी जी जी

अग तुच सांग ग कोणासाठी सावित्री ते दिव्य करी
सावित्रीची कथा सांगते पुरुष प्रीतीची मातबरी
जी जी जी जी
पती वाचुनी कसे जगावे हाच तियेला प्रश्न पडे
इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ ग चतुर सारिके बोल पुढे
जी जी जी जी

पुरुषावाचुन जन्मे नारी या पृथ्वीचा कोण पती
पित्यावाचुनी जन्मा आली काय थांबली तिची गती
जी जी जी जी

अग अज्ञानाने नकोस बोलु आभाळाची सुता धरा
गती कशाची सुर्याभवती फ़िरे नार ती गरागरा
जी जी जी जी
पुरुषासाठी नार जन्मते पुरुषासाठी जन्म तिचा
वृक्षावाचुन जन्म पांगळा फ़ुलारणार्‍या वेलीचा
जी जी जी जी

अरे सांग शाहिरा नारीवाचुन पुरुषही झाला कधी पुरा
पुराणशास्त्री ढुंडुन पाही ढुंड गगन की वसुंधरा
जी जी जी जी
तार्‍यामागे शुक्र नांदतो वार्‍यापाठी उभी हवा
पृथ्वीभवती चंद्र फ़िरतसे वेश घेउनी नवा नवा
जी जी जी जी

हवा कशाला कलह सांग हा आपसातला खुळ्यापरी
हारजितीची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी
जी जी जी जी जी

चित्रपट: वैजयंता


Lalitas
Friday, January 12, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छुन छुन बोलतीया हातामधी घाट
प्रीत माझी चालतीया जेजुरीची वाट

मार्गसर आला बाई बाळपण गेलं
अंगामधी अंग असं चोरटं आलं
डोईमधी मरवा साज संग हिरवा
मोतियाचा गजरा भरजरी दाट

काल माझा राया झाला साखरपुडा
देवाच्या नावानं रे भरलाय चुडा
लाजरी बुजरी पोर झाली नवरी
पापणीनं धरलाय अंतरपाट

नजरेच्या पाखरा मारू नको खडं
काळजात धडधड येऊ नको पुढं
लागाबांधा तोड रं, नाद माझा सोड रं
मल्हारीची नार मी, हट, सोड माझी वाट

गायिका: आशा भोसले
इतर माहिती माझ्याजवळ नाही


Lalitas
Friday, January 12, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरबार जुना हो हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगीअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा

नख लागे बेतानं खुडा
केशरी चुना अन् कात केवडा
लई दिसानं रंगल विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा

थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरुन बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची
हळूहळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा

चित्रपट: कलावंतीण
गायिका: शोभा गुर्टू
गीत: जगदीश खेबुडकर
संगीत: राम कदम


Dineshvs
Sunday, January 28, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, शेवटी कलापुरची शान राखलीस कि.

लगबग लगबग थुई थुई नाचत आली
लगबग लगबग थुई थुई नाचत आली
नाचु किती, लाजु किती, कंबर लचकली
अहो ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली

हे ज्वानीचं चाललय गुर्‍हाळ
माज्या गावात जमलय दलाल
काहिल भरली, उकळी फ़ुटली
लईजन हराकली

ह्या सुटल्या गाड्या कश्या वं
कुणी डागल्या तोफा जश्या गं
गाडीचा अड्डा, सुंगधी कट्टा
दुनिया हबकली


%&%&%&%&

धुंद रुपेरी रात लाजरी
मध्यान रातीची घटका
माघाचा महिना, हुडहुडी जाईना
कधी गं होईल सुटका
आता उबेला शेकोटी हुडका, करा सुटका
अहो लई थंडीचा पडलाय कडका

सुरत सावळी मोलाची
मदन राजाच्या तोलाची
व्हटात हसु, नकट्या नाकावर
राग प्रीतीचा लटका, करा सुटका

चालताना पाय पडतोय गं
डावा डोळा हा उडतोय गं
केला ईशारा अचुक हेरुन
शालुला भुललाय पटका, करा सुटका

आता मला न्हाई र्‍हावत गं
पायजे असेल ते गावत ग
चैन पडेना, हा भेटीसाठी
जीवाला लागलाय चटका


%&%&%&%&%&%

रंगमहाली झगमगाट हा
खरच नाई बरा
अहो राया जरा दिवा बारिक करा

टचटचली मधाळ ज्वानी
आले घेऊन गुलाबपाणी
शिणगाराच्या सुरईमधनं
खुषाल पेला भरा

रात लब्बाड, हाय बरं का
हितं कोणी ना आपला परका
उजेड असुनी जवळी घेता
न्यारीच तुमची तर्‍हा

कसं समजुन सांगु बाई गं
अंधाराला भेदभाव नाही
डोळं मिटुनी उरलासुरला
डाव होवुदे पुरा


%&%&%&%&%

झाली बहाल मर्जी सख्याची
साडे दिली शंभर रुपयांची

साडी डाळिंबी नेसुनी घेईन
माझी मलाच आईन्यात पाहिन
अशी चालुन, अशी उभी राहिन
चारचौघात नाही सांगायची

त्यांची माझी प्रीत चोरटी
गुज झाकुन ठेवीन पोटी
हसु ओढुन धरीन ओठी
दृष्ट लागल, आया बायांची



Dineshvs
Sunday, January 28, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमाशापटात, खुपदा शेवटी एक गाणे असे. कि ज्यात सगळ्या सिनेमाची कथा गुंफलेली असे. सांगत्ये ऐका, सिनेमातले हे असे गाणे,
गायलय मधुबाला जव्हेरी आणि साकार केलय हंसा वाडकरने.


डोळ्यादेखतची हि कथा, नव्हं भुलथापाची
गोष्ट माणसातल्या सापाची अन त्याच्या तापाची
माणसात सापबी असतात व्हय ?
नारी जातीच्या तापाची अन संतापाची

बघा हवस तुडवते पगडी कुणाच्या पापाची
केले तुका अन झाले माका, कसे झाले ते सांगत्ये ऐका

शंभु महादेवाच्या डोंगराशेजारी
गाव चिमुकलं, नाव राजुरी
तिथला वतनदार पाटिल भारी माजुरी
आग नाही त्याच्या तोर्‍याला
कुणी राहिना उभा त्याच्या वार्‍याला
त्याचा रस्ता उगा का धरा ?
बारा गावात नाव त्याचं मोठ
नाव मोठ नि लक्षण खोटं

आईबापान नाव ठेवलं महादेव
पन याच्या अकलेची नंदी म्होरं धाव
कपट एवढाच पोटामधे भाव
त्या महादेव पाटलाची नार गुणवति
नावानं जानकि, वागणुकीनं सति
तिला मिळाला असला कवडसा ? पति
काय असतील त्या असो दैवाच्या गति
पाटलाच्या गावाला भिती, पर
उभ्या गावाला आईच्या ठायी, जानकि होती हा जी

त्या राजुरीच्या गावन्दारी, ? होता एक जवान शेतकरी
हंसा नामे त्याची अस्तुरी
रुपाची खाण, तिच गोरपान, केतकिचं पान, बांधा अटकर
अंगावरं नाही दागिनं, नेसं पटकुरं
भोकरावानी टप्पोरं डोळं, केस लांब काळं
गालावर तीळ, चाल हंसाची
बोलनं तिच लई छान, हरपवी भान
हसणं जनु तान मालकंसाची

साखाराम अन हंसाची जोडी नवसाची राजहंसाची
एक दुसर्‍याच्या भोळा भक्त, काटा एकाला दुसर्‍याला रक्त
काय दोघांचं दोघात जमतं
मीठभाकरीत दोघबी खुषी जनु कोठ्यात कबुतरं जशी

एकदा सखारामाची अन पाटलाची
झाली हकनाक बाचाबाची
तेढ पडली एकामेकाची
त्यात बैलाची शर्यत ठरली
बैलं पाटलाची जर का हरली
काय गावात ईज्जत उरली
सखारामाची खिल्लारी जोडी
होती जिताया अवघड मोठी

महादेव पाटिल मनामधि भ्याला
त्याने एक मनसुबा केला
सखारामाच्या काटा काढण्याला
त्यानं गाठला एक अडाणी मैतर
सावळा तांडेल दरोडेखोर
त्या सावळ्या दरोडेखोरानं रातचं जाऊन
दिली पेटवुन सख्याची खोप
घरासंग पेटला गोठा, गवताचा साठा
केवढं पाप हा जी

सखाराम जळुनी गेला, हंसाला नुरला वाली
जानकि माय गावाची, वेदीवर साखर घाली
मानुन लेक धर्माची, वाड्यावर हंसा नेली

देवाची अशी पद्मिन, आली चालुन पाटलाच्या हाती
भडकला रोग मदनाचा, कि त्याच्या माथी, हा जी


जानकीची हंसा मानलेली मुलगी
तिच्या संगे पाटिल करु लागे सलगी
तरीहि नाहि काही कळलं हंसाला
तिला वाटलं आईसारखा बाप मिळाला
नीच पाटलान डागाळली तिला
आता गुराखी कसाई झाला


निसर्गानं होती आपली कामगिरी केली
बी धरणीवर पडली ती वरि अंकुरा आली
हंसापोटीची आलेली गोष्ट, सावळ्यानं वळखली
वैर्‍याची लेक वैर्‍याघरी जन्मा आली
जन्म घालुन पाप पाटलाचे, हंसा तात्काळी
देवाघरी गेली

पुढं ऐका योगायोगाच्या गोष्टी
ती बरमदेवाची आगळी सृष्टी
पंधरा वरSअं निघुन गेली
हंसाची पोर वयामधे आली
गंगा पापानं गढुळ झाली
लेक हंसाची तमाशेवाली

म्हादु पाटलाचा कृष्ण हो पोर
त्याच्या दृष्टीला पडे हि पोर
दृष्टभेटीत जडली हो प्रीती
भावाबहिणीत पापाच्या भिंती



Robeenhood
Sunday, January 28, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे दिनेश, काय पाठान्तर आहे!
असेच एक कथा गुम्फनारे गाणे एक गाव अन बारा भानगडी मध्येही आहे....
पण प्रत्यक्ष तमाशात असे काही नसते. त्याऐवजी वग गातात म्हणजे सूत्रधारासारखे झीलकरी एक दोन कडव्यात पुढचं कथानक थोडं थोडं गात जातात आणि वग त्याचा कथात्मक विस्तार असतो....


Robeenhood
Sunday, January 28, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका लावणीचे विस्मरण झालेले दिसते,
सख्या चला बागामंदी रंग खेळू चला...
ही सामना चित्रपट आणि घाशीराम कोतवाल नाटक दोन्हीतही होती...


Dineshvs
Sunday, January 28, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, ती पण लिहिन. मला वाटते ते पारंपारिक लावणी आहे. दोन्ही ठिकाणी चपखल बसलीय.
सिनेमात संजीवनी बिडकर होती, गायली होती उषा मंगेशकरने.
नाटकात, रजनी चव्हाण, जयमाला काळे, यापैकी जी काम करत असेल, ती सादर करत असे.
प्रत्यक्ष तमाशाला मधे फारच वाईट दिवस आले होते. खुपदा हिंदी सिनेमातली गाणी वैगरे म्हणावी लागत त्याना. पुढे सुरेखा पुणेकर, मधु कांबीकर वैगरे कलावतीनी प्रतिष्ठा मिळवुन दिली खरी, पण तो प्रेक्षक सगळ्याना कलावतिना लाभला नाही. हनुमान थिएटर, अजुनही प्रेक्षकांची वाटच बघतेय.
बाकि प्रत्यक्ष तमाश्यात असे गाणे नसे हे खरे, पण सिनेमात अशी रित होती. अगदी पिंजरा मधेहि असे गाणे होते,

कशी नशीबानं थट्टा आज मांडली

सुधीर फडके आणि उषा मंगेशकर.


Zakki
Sunday, January 28, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का हो,
खालील गाणी लावण्या आहेत का?


भर उन्हात बसली धरून सावली गुरं
नाही चिंता त्यांची तिन्हिसांजपातुर,
चला दोघे मिळून चढू टेकडीवरं
अन चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदऽऽ
जाळीमधी पिकली करवंदं

तसेच

लटपट लटपट तुझ चालणं इ. इ.

तसेच
सांग, सांग सांग सांग, काय व
नाव सांग सांग सांग नाव सांग
जा र्
गोडवाणि नग हसू, इ. इ.
तसेच
ह्यो ह्यो ह्यो पावणा, सखूचा नवरा, तुझ्याकडे बघून हसतोय् ग,
काहीतरी घोटाळा दिसतोय. ग
आणि
आला ग बाई, आला ग बाइ, आलाग
आला आला आला आला
पाडाला पिकलाय् आंबा
नीट बग
पाडाला पिकलाय आंबा!
अरे घेऽऽ.
पाडाला पिकलाय् आंबा

धन्यवाद




Paragkan
Monday, January 29, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ......

झकास चालू आहे. लिहीत रहा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators