|
Wakdya
| |
| Monday, December 18, 2006 - 4:03 am: |
| 
|
९ डिसेंबर रोजीच्या GTG च्या फोटोंमधिल हा एक वेचक आणि वेधक फोटो इथे टाकीत आहे. कार्यबाहुल्ल्यामुळे वृत्तान्त टाकण्यास उशीर होत आहे तरी क्षमस्व.
|
Wakdya
| |
| Monday, December 18, 2006 - 4:07 am: |
| 
|
सदरहू मायबोलिकरांचे फोटो या पुर्वीही त्यांनीच इथे टाकले असल्याने त्यांची पुर्वपरवानगी न घेता वरील फोटो टाकला आहे. तरी बाकि फोटो इथे टाकावेत की कसे या बद्दल GTG मधे सहभागी व्यक्तींनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
|
Wakdya
| |
| Monday, December 18, 2006 - 1:11 pm: |
| 
|
९ डिसेंबरच्या GTG ची मेल मला मिळाली तेव्हाच जमेल की नाही याबद्दल शाशंक होतो त्यामुळे येइन असे कळविले नवते. शनिवारी दुपारीच पुण्यात कामासाठि जायचा आखलेला बेत रद्द होऊन प्रत्यक्षात सव्वापाच वाजेस्तोवर मला कार्यालयातच बसावे लागले. तेथुन पुढे बालगंधर्वला पोचेस्तोवर बरोबर सहा वाजले होते. आत पार्किंगला खुप गर्दी होती. मी गाडी लावुन नेहेमीच्या जागी येवुन उभा राहीलो, तर दूरवर एक लाल टीशर्ट घातलेला एक उंच गोरा माणुस तशाच उंचीच्या एका युवकाशी संवाद साधताना अंधुकसे दिसले. संध्याकाळच्या वेळी अंधुक प्रकाशात थोडे कमीच दिसत असल्याने ते ओळखीचे वाटले तरी नेमकी ओळख पटेना तेव्हा आजुबाजुला असलेली गर्दी आणि गाड्या न्याहाळत राहिलो. थोड्याच वेळात माझ्यासमोरुन फदि आला व आल्या आल्या त्याने माझे त्याच्याकडे असलेले हेल्मेट परत दिले. मला ते वेगळे वाटले. घरी गेल्यावर उलगडा झाला की आधी हेल्मेटची काच काळसर होती, आता ती पारदर्शक पांढरी आहे. असो. हेल्मेट मिळाल्यावर ते आणि माझे अशी दोन दोन हेल्मेट स्वेटर आणि धोकटी अशा बाबी सांभाळत उभा होतो तोच मगाचचे ते अंधुकसे दिसलेले दोघेजण जवळ आले, त्यांनी त्यांची ओळख करुन दिल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे ते उंच गोरे गृहस्थ म्हणजे वविचे सुत्रसंचालक होत आणि तो युवक म्हणजे राकू होय. त्यानंतर जीएसची गाडी आल्याची खबर मिळाली, मधेच रॉबिनहूड यांनी हजेरी लावली, बराच वेळ झाला तरी जीएस आला नाही, बहुतेक पार्किण्गच्या चक्रव्युहात अडकला असावा. तोच एका व्यक्तीने येवुन "मी ड्युप्लिकेट आयडी" असे सांगत व मी झक्कींचा पुतण्या आहे अशी ओळख करुन दिली. मी थोडावेळ विचार केला, पण असली कोडी सोडविणे मला सहज जमत नसल्याने तो नाद सोडुन देवुन जे जे होत होत ते बघत राहीलो. थोड्याच वेळात जीएस आला. जीएस ला देखिल झक्कींच्या पुतण्याने तशीच ओळख करुन दिल्यावर मला शंका आली की रॉबिनहूड रॉबिनहूड नसुन अनिलभाई असावेत, मी तशा अर्थाने म्हणले देखिल की हे अनिलभाईंसारखे दिसतात. इकडे आरती येवुन गृपमधे मिसळली तसेच गंधारही आला. परंतू बहुतेक बनचुक्या आयडीजचे दगडी चेहरे पाहून व यांच्यावर "झक्कींचा पुतण्या" या ओळखीचा कसलाच परीणाम होत नाही, बहुदा असे वाटल्याने शेवटि झक्कींच्या पुतण्याने त्यांची खरी ओळख सांगितली, ते होते आॅडमिन. मी यायच्या आधी गृहपाठ न केल्याबद्दल स्वतःलाच दोषी ठरवले व आॅडमिनला तत्काळ ओळखण्यात केलेल्या कसुरी बद्दल हळहळत राहिलो. (तरी मला वाटलेच होते वगैरे विचार मनातल्या मनातच ठेवले). खुप वेळ म्हणजे जवळपास तासभर उभा असल्याने कोण बसण्याचा विषय काढल्याच्या संधीचा फायदा घेवुन मी आधी तत्काळ बैठक मारुन घेतली. तेवढ्यात रॉबिनहूडना खरे झक्की आठवुन "ते कुणाकुणाला भेटले लिम्ब्या की वाकड्या" असा प्रश्न विचारु लागले तेव्हा मी माझी ओळख त्यांना पुन्हा करुन देवुन मी झक्कींना भेटलो, पण झक्की अजुन कुणाकुणाला भेटले ते मला माहीत नाही असे सांगितले. पण एकंदरीत रॉबिनहूड यांना "लिंबु प्रकरणाबद्दल" भलतीच उत्सुकता आहे असे जाणवले. असो. थोड्याच वेळात मी माझा कॅमेरा काढला व आॅडमिनना व इतरांना फोटो काढण्याबद्दल परवानगी विचारुन त्यांचे जमले तसे फोटो काढले. जमले तसे म्हणण्याचे कारण हा कॅमेरा माझ्या हाती नुकताच आलेला, तो वापरण्याचे कसब अजुन अंगी बाणलेले नाहीच शिवाय त्याच्या तांत्रिक खुबीही नीटशा कळलेल्या नाहीत, त्यात अंधार पडु लागल्याने फ्रेम मधे केवळ ढोबळ आकार दिसुन येत व फोकसिंग किंवा लेन्स च्या आॅडजेस्टमेंतचा तपशील काहीच दिसत नव्हता तेव्हा अंदाजाने क्लिक करीत राहिलो. थोड्यावेळाने सर्वजण उठुन संभाजी पार्क मधे गेलो तेव्हा कुल, क्षिप्रा, प्रसाद, चंपक, गिरी इत्यादी सामिल झाले. मधेच कुल आणि आरती पलीकडे जावुन भेळपुडे घेवुन आले. मधल्या बांधिव शेडमधे सर्वजण तसेच जमिनीवर बसले व भेळिचा आस्वाद घेता घेता गप्पा रंगल्या. मधेच आॅडमिन व इतरांच्या फर्माईशीवरुन प्रसादने एक विडंबन काव्य तासासुरात ऐकवले. कोणिच कसे टीशर्ट घालुन आले नाही असा विषय जेव्हा निघाला तेव्हा हनुमानाप्रमाणे चंपकने आपले जाकीट बाजुला करुन आतील टीशर्ट्वरील छातीवर दिसणारा मायबोलीचा लोगो दाखवु लागला तेव्हा त्याचा काढलेला फोटो वर दिला आहे. आॅडमिन हे व्यक्तिमत्व मला तरी बर्यापैकी मायाळु, कनवाळु व बॅलन्स्ड वाटले. किंबहुना कसल्याही अहंगंडाचा नामोनिशाण नसलेले असे ते भासले. कुलची तब्येत सुधारल्याचे मी त्याच्याशी बोलताना नमुद केले. आरती आणि क्षिप्रा, २००३ मधे बघितलेल्या, बावरलेल्या, बोलू की नको अशा अविर्भावात असलेल्या आणि आत्ता बघितलेल्या, आत्मविश्वासाने युक्त, हसत खेळत वागणार्या, केवढा फरक पडत असतो सातत्याने माणसात, नाही का? रॉबिनहूड नाशिकहून आलेले होते, कितीही झाले तरी त्यांची सरकारी वरिष्ठ अधिकार्याची शोधक आणि भेदक नजर लपत नव्हती, पण एकंदर व्यक्तिमत्व जॉली वाटले. माझ्या डाव्या हाताला गंधार, सुत्रसंचालक आणि राकु होते. गंधारचे तांबुस पण कोवळे गोरेपण पाहुन क्षणभर डोळे दिपल्यासारखे झाले आणि गोरे पणातही कितीक छटा असु शकतात ते उमजले. सुत्रधार यावेळेस सुत्रधाराच्या भुमिकेत नसल्याने, तसे शांत बसुन होते मात्र मधे मधे "फाको" करण्याचे विसरत नव्हते. राकु आपला "गरीब सज्जन शांत" विद्यार्थ्याप्रमाणे बसुन होता, नेमकेच हसणे, नेमकेच बोलणे असा त्याच्या खाक्या मला वाटला. र्ओबिनच्या शेजारी, माझ्या समोरच जीएस आणि गिरीराज बसले होते. नव्याने नंतर आलेल्या प्रसादला त्यांनी रॉबिनची ओळख आॅडमिन अशी करुन दिली ती बराच वेळ टिकली. रॉबिन इमाने इतबारे "आॅडमिन" अंगी बाणवुन भाष्य करीत होते पण मला तरी ते गावपंचायतीच्या सभेच्या अध्यक्षासारखे भासले. जीएस आणि गिर्या मात्र उकळ्याफुटल्याप्रमाणे हसत होते. (माझ्या फोटोत तरी तसेच आले आहेत) फदी बिचारा खरच शांत स्वभावाचा, तो फारस काही बोलत नव्हता. आॅडमिननी सगळ्याम्च्या त्यांच्या आयडीने विचारपुस केली, कोण कुठे काय करतो वगैरे. मी सात साडेसातलाच निघणार होतो पण जवळपास नऊ वाजेस्तोवर तिथेच थांबलो, पण शेवटी निघालोच. कारण माझा परतीचा पंचवीस किलोमीटरचा थंदीतुन प्रवास मला वाकुल्या दाखवित होता. मि निघालो तरी बाहेरील फुटपाथ वर पुन्हा एकदा रिंगण करुन मैफिल जमली होती, दुरुनच ते रिंगण डोळे भरुन पाहुन घेवुन मी परतीच्या प्रवासाला लागलो. त्या रिंगणाचा देखिल एक फोटो काढायला हवा होता असे आता नंतर वाटत राहिले आहे. कृपया शुद्धलेखनाच्या चूका सांभाळुन घ्याव्यात.
|
Anilbhai
| |
| Monday, December 18, 2006 - 1:55 pm: |
| 
|
जीएस ला देखिल झक्कींच्या पुतण्याने तशीच ओळख करुन दिल्यावर मला शंका आली की रॉबिनहूड रॉबिनहूड नसुन अनिलभाई असावेत, मी तशा अर्थाने म्हणले देखिल की हे अनिलभाईंसारखे दिसतात. >>
ही लिंक कशी काय लागली?.
|
Asami
| |
| Monday, December 18, 2006 - 6:31 pm: |
| 
|
photo नाहि का पाहिलात भाइ ?
|
Wakdya
| |
| Tuesday, December 19, 2006 - 3:04 am: |
| 
|
जीएस ला गाडी पार्क करुन यायला लागलेला वेळ, आॅडमिनची कॅफे एरिया कडुन एंट्री, आणि जीएस व आरतीचे आपण आॅडमिनच्या गावचेच नाही असे वागणे यावरुन तत्काळ शंका आली की समोरील पुतणे म्हणजेच अजयराव असावेत, पण तस कस म्हणता येइल? तेव्हा मला तुम्ही आठवलात व कदाचित तुम्ही देखिल आॅडमिन बरोबर आला असावात असे वाटले. रॉबिनहूडही दाढी दिक्षित असल्याने तेवढे साम्यस्थळ मला लिंक लावायला पुरेसे होते. तुमचा फोटो आठवत होता पण आॅडमिनचा फोटो काही केल्या नजरेसमोर येत नव्हता, तोच गृहपाठ करायचा राहुन गेला, असो. बाकी कुणीच नाहीत का टाकणार वृत्तांत?
|
वाकड्या, छान प्रांजळ वृत्तांत. पण अमुच्या अत्युच्च दर्जाच्या विनोदी वाक्याना तुम्ही चक्क 'फाको' असे संबोधलेत.. अहो प्रत्यक्ष भेटीत अस्मादिकांच्या कुठल्याश्या एका लेखाची तारीफ केलीत आणि आता लेखी हे असे ? असो. आमच्याही लेखी आणि तोंडी विनोदाच्या दर्जात अंमळ तफावत असावी असे वाटते . ('भिकार' आणि 'अतिभिकार' अशी नसली म्हणजे झाले). कदाचित जमिनीवर बसून ते विनोद मारण्याचा प्रयत्न केल्याने, वर खुर्चीवर बसून लिहीलेल्या लिखाणाची उंची गाठता आली नसावी ! ता. क. : हे आपले मी विनोदाने ('अत्युच्च दर्जा' फेम) म्हणजेच सहज गमतीने लिहीले आहे. खात्रीसाठी कृपया मधे घातलेल्या स्माईली पहाव्यात व तक्रार करत नाहीये ह्याची नोंद घ्यावी. वृत्तांताबद्दल धन्यवाद.
|
Wakdya
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:03 am: |
| 
|
>>>>>कदाचित जमिनीवर बसून ते विनोद मारण्याचा प्रयत्न केल्याने अहो, यातच तुमच्या सगळ्या शंकांचे उत्तर दडले आहे. मला सातत्याने भिती वाटत होती की मधेच तुम्ही सुत्रधाराच्या भुमिकेत जाऊन, उठून सर्वांना "खडे हो जाएऽऽ खडे ह्हो" असे म्हणुन मग आगे मागे, इकडे तिकडे, रिंगणात पळविता की काय. त्या भितीमुळे माझे तुमच्या आणि इतरांच्याही विनोदाकडे अंमळ जरा दुर्लक्षच झाले. त्यातुनही मला विनोद जरा उशिराच कळतो, असो. आता तुमच्या कडुनही "भारी" वृत्तांत येवु द्या
|
Anilbhai
| |
| Tuesday, December 19, 2006 - 6:41 pm: |
| 
|
तरीच मला कोणितरी विचारत होते, ईंडिया ट्रिप कशी झाली म्हणुन. असो आता आलो की तुला नक्की भेटेन. अनिलभाई म्हणुन. 
|
>>>>>> पण एकंदरीत रॉबिनहूड यांना "लिंबु प्रकरणाबद्दल" भलतीच उत्सुकता आहे असे जाणवले. वाकड्याऽऽ माझ बी निरीक्षण हे........! तुमच जीटीजी झाल्यापासुन या रॉबिनची पोस्टापोस्टी बरीच कमी झाली हे! कोण काय कानपिचक्या दिल्या का? DDD
|
|
|