Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » मराठी गाणी » आद्याक्षराप्रमाणे » « Previous Next »

Mbhure
Wednesday, December 06, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छन्नी हातोळ्याचा ग्घाव, करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे, त्यास मानुस हे नाव
(त्यास मानुस हे नाव, त्यास मानुस हे नाव)

चिमुकल्या लेकैरायचा छळ पंडितान केला
आळंदीच्या बालकाले बालपना नको झाला
पुढे वाढलं वाढलं ज्ञानराजाच वैव्हव . १

मानखंड ना संताप सारा गाव उलटला
वह्या तरता पान्यात पुन्हा गुरु पालटला
तुका देवा ईतुके वाटे, एक महान वैस्नव .. २

आळ चोखोबा घेतला, चोप दिला बडव्यानं
इट्टलाचा हार चोरट्या, सांग लपवला कोन?
त्याच चोखोबाच्या घरी जेवे वैकुंठीचा देव … ३

(खई दैवाचे तडाखे त्यास मानुस हे नाव)
छन्नी हातोळ्याचा ग्घाव, करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे, त्यास मानुस हे नाव
(त्यास मानुस हे नाव, त्यास मानुस हे नाव)

चित्रपटः देवकी नंदन गोपळा
गायकः सुधीर फदके
संगीतः राम कदम
गीतः ग. दि. माडगुळकर





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators