Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लंडन, २५ नोव्हें. २००६ ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » लंडन » लंडन, २५ नोव्हें. २००६ « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, November 28, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल माझी tuter सोबत appointment होती.
तोवर इथे काहिच लिहुन झाले नाही?आणि रात्री नेमका.. conferance call pc to pc.. सुरु असताना माधुरीचा फोन आला... तेव्हा इतक्या tension मध्ये होते की बोलताच नाही आले...
असो
तर सगळ्यांचे खुप खुप आभार.. खुप छान वाटले सगळ्यांना भेटुन..
कांद्याचे आभार त्याने पुढाकार घेतल्याबद्दल..
आणि त्यंनतर्चे सगळे.. पार पाडल्याबद्दल माधुरी उर्फ़ मंजु चे खुप खुप आभार..
आणि सारखे हसवत ठेवल्याबद्दल.. मिलिंदाचे आभार..
अमोल.. ने खरतर observar. चे काम केले.. पण.. kp च्या म्हणन्यानुसार ते मी माझ्याकडे घेतले होते.. .. पण कोणीतरी ऐकणाराही हवा असतो.. म्हणुन अमोल चे आभार(त्यात किती सहन शक्ती आहे हे मला.. दिसुन आले. .. ..
तसेच मिसेस. मिलिंदा.. उर्फ़ अदिती आणि इअतर बच्चे कंपनी यांचीपण.. तशीच शक्ती दिसुन आली...
आणि.. पुढचा " वर्‍हाड जाउन आले लंडन्ला "
चा व्रुंतांत चार भागात वाचा..
१. भाग पहिला... by लोपा
२.भाग दुसरा by कांदेपोहे
३.भाग तीसरा by मिलिंदा
४.भाग चौथा with photo by माधुरी


}

Lopamudraa
Tuesday, November 28, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग पहिला...

माधुरीच्या सहन शक्तीचा अंत पहात.. आम्ही एकदाचे तीच्या घरापर्यंत जाउन पोहचलो.. रस्त्यात उगाचच नवर्‍याला वाटले आपण चुकिच्या दिशेने जात आहोत आणी आम्ही पुढच्या ROUND ABOUT ला मागे फ़िरलो.. पण.. आम्ही शेवटी कितिही रस्ता चुकलो तरी मंजुचे घर आज गाठायचेच असे ठरवले असल्याने दोन तास उशिरा का होइना वेळेवर पोचलो..
तीथे kp महाशय आधिच येउन थांबले होते..!!!
आणि त्यांनी खुप कांद्यापोह्याचे कार्यक्रम attend. केले असण्याच्या शक्यतेने त्यांनी हे नाव धारण केले असावे असे मुकुंद भैय्यानी ( mr.maadhurii ) declare केले..
पण मला तर वाटले..(मनात) खुप कांदे पोहे खावेत ही ईच्छा अपुर्ण राहिल्याने kp ने हे नाव धारण केले असावे..
तर त्यांनतर मिलिंदाचा फोन आला. तो त्याच्या station वर आलाय.. आणि काही वेळात ठिकाणावर( destination उगाच मराटइत या शब्दाचे अनेक अर्थ निघु शकतात.)पोहचणार आहे.. त्याच प्रमाणे असा फोन अमोल कडुनही अला... त्याचे फोन येतच राहिले पन माधुरीचा नश्त्याचा आग्रह आम्ही अजिबात मोडला नाही आणि पोटभर कांदेपोहे खाउन.. निघालो..!!!
तीथे गेल्यावर परत मिलिंआदाने सांगितले.. आम्ही पिझ्झा हट जवळ आहोत, तीथे गेल्यावर परत फोन लावला.. तर आम्ही पिझ्झा हटच्या बाजुला mexican restaurant मध्ये आहोत म्हणुन सांगितले.. मग माधुरी आणि kp ने ते मेक्सीकन सगळे खालुन वरुन धुंडाळल्यावर आम्ही त्याच्या समोर उभे आहोत असे मिलिंदाला परत फोन लावल्यावर त्याने सांगितले..!!!
दिसला मग एकदाचा मिलिंदा.. आणि अमोल.. ( तेव्हा मिसेस मिलिन्दा.. इराला फ़िरवुन हसत खेळत ठेवत होत्या..).
आमोल ला.. पाहिल्यावर वर या bb वर कोणीतरी तीथे जाउन कट(कारस्थान रचा).. करा म्हटले होते.. ते फ़ार मनावर घेउन आला वाट्टे असच वाटल.. (प्रतिद्ना करुन टिळा लावुन देव पुजा वैगैरे करुन आला होता)पण नंतर ती नविन मुलांची इस्टाइल असावी अस वाटल..
नतर काय सांगु माझा नवरा या सगळ्यांना सामिल झाला.. आणि australiya ची टीम batting ला आल्यावर
भारतीय खेळाडुचे काय हाल होतात ते वर्णन करायला मला शब्दच नाहीत..
दे दनादन.. मिलिंदा त्या निळ्या अक्षरात टोमणे लिहितो तेव्हा वाचुनच तो जोरदार बसतो... तीथे निळ्या अक्षरात लिहिल्यासारखे बोलणारे चार चार जण होते..!!!
मधुनच kp जरा side change करायचा पन त्याला.. तीथल्या तीथे.. हिशेब चुकता करायला लागला.. या कामी विकास ने पुढाकर घेतला होता...
मी,आदिती,मंजु आम्ही आपले.. ते षटकार चौकार अडवायच्याही भानगडीत पडलो नाही
त्यावर हसुन मनमोकळी दाद मात्र देत होतो...!!!
आमच्या हास्यानेच बहुदा.. त्या दिवशी तीथल्या वेट्रेसेस ने चार पाच ग्लास तरी फोडले..!!
इरा आणी नेहाने मधुन मधुन आवाज काढुन.. आमची बाजु घ्यायचा प्रयत्न केला...पण तो हाणुन पाडला गेला...
एकुणात काय खुप धमाल झाली...
मंजु फोटो दाखव लवकर..!!!


Athak
Tuesday, November 28, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूड गूड अशीच धमाल करत रहा ..... फोटु किधर छे ? :-)

Bhramar_vihar
Tuesday, November 28, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथुन वाहुन जाइल हा. कुठेतरी हलव त्याला!

Ammi
Tuesday, November 28, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lopa jahir mafi...meeting meeting far khelat aahe ga..
kharach mi oberver mode madhe hoto..mazyat aajun sahanshakti aahe..
welat wel kadhun vrutant lihilela distoy..hehhe
pudhache vrutannt yeu dya mandali..
mail check keli nahiye aajun
maza laksha kpyachya soneri datakade hota..

TI NAVIN MULANCHI STYLE ASAWI>> kasla bhari...style kasli aaliye tyat..lol

Chinnu
Tuesday, November 28, 2006 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केप्या, मी मागेच पोस्टले होते, तुला(की तुझ्या दाताला?) पाहता पाहता लोकं फ़क्त Observer mode मध्ये जातील म्हणुन! वृतांत खरच हलवा, वाहुन जाईल. सन्मे आपल्या मुंबईतच भेटु या ग कधीइ.

Mukman2004
Tuesday, November 28, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,
अग आता आले मी घरी.. आल्याआल्या तुझा व्रुतांत पाहिला..
खुप छान लिहिला आहेस... :-)

मिलिंदा पण हा कुठे तरी नीट हालवला पाहिजे नाहितर वाहुन जाईल.. gtg चा bb आहे ना तिठे ठेव ना please
लोपा, great!!!

माझा part 4 आसल्यामुळे मला वेळ आहे म्हणजे.. :-)

फोटो पाठवते सगळ्याना..


Mukman2004
Wednesday, November 29, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सध्या प्रचंड busy आहे ग. मला रोज ९:३० वाजत आहेत घरी यायला.. :-(
फ़ोटो नक्की ह्या weekdend ला टाकते...

अरे kp, milinda, ammi लिहा ना रे..


Jayavi
Thursday, November 30, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा......... म्हणजे जोरदार धमाल केलेली दिसतेय. माधुरी फ़ोटो इथेच टाक ना....... म्हणजे आम्हाला पण बघता येतील. आणि हो..... नावासकट टाक हं.

लोपा, मस्त लिहिलंय गं!

वारंवार अशीच धमाल करत रहा :-)


Kandapohe
Friday, December 01, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज वेळात वेळ काढून वृत्तांत लिहावा असे ठरवले होते आणी अनायसे थोडा वेळ पण मिळाला.

खरे तर कुठून सुरुवात करावी सुचत नव्हते. असो.

तर जीटीजीचे ठिकाण, वेळ, येणारे पब्लिक अशा अनेक कारणांमुळे अनेक बीबीवरील लोकांची उत्सुकता ताणलेला युकेमधील जीटीजी सफलसंपूर्ण झाला. माझे रोज वेळ ठरवा, जागा सांगा असे सगळ्यांना हलवून झालेच होते. इथे अनेक वर्ष वास्तव्य करून असलेल्या मंडळींनी खरे तर पुढाकार घेणे अपेक्षीत होते पण कुणीतरी घ्यायला हवा म्हणून मी तो पुढाकार घेतला. (भरपूर वेळ असेल तर सार्थकी लागायलच हवा ना?

तर अश रीतीने सर्वांचे (मी, लोपाचा गड्ड्या झब्बु aka कुटूंब, माधुरीचे कुटूंब, मिलींदाचे कुटूंब, अमोल व अचानकपणे सामील होणारी संघमित्रा) लेस्टर स्क्वेअरल १२ वाजता जमून मेक्सीकन हॉटेलात जेवायचे ठरले.

आदल्या दिवशी रात्री संघमित्राचा 'मी तापाने आजारी आहे, येवू शकणार नाही' असा फोन आला. सकाळी मी १०.३० च्या सुमारास निघालो तेव्हाचे बातमी आली होती की लोपा अजून माधूरीकडे पोचली नाहीये. मी ११ च्या सुमारास जेव्हा East Croydon या ठिकाणी पोचलो तेव्हा बाहेर तूफानी वारा व पाऊस होता. माधुरीने मला घरीच ये असा सल्ला दिला. तिने सांगीतलेल्या सुचना पाळत मी तिच्या घरापर्यंत पोचेपर्यंत माझ्या सेलफोनचा बॅलन्स संपला. प्रचंड भिजलेल्या अवस्थेत मी त्यांच्या घरी पोचलो. मुकुंद लोपाला (म्हणजे तिच्या नवर्‍याला) ऑनलाईन सुचना देण्यात गुंग होता. साधारण ४५ मिनीटे गेल्यावर लोपा आणी मंडळी आली. तो पर्यांत अमोलचा पोचल्याचा, मिलींदाचा निघाल्याचा निरोप आला होता. बिचार्‍या अमोलचा लेस्टर स्क्वेअरला पुतळा झाला असणार. अर्थात ठिकाण अतिशय प्रेक्षणीय (हुशार वाचकांच्या लक्षात आले असेलच) असल्याने त्यानी तो वेळ आनंदात घालवला असेल यात काही वाद नाही.

लोपा आल्यावर परत एकदा ओळख परेड झाली. जय मात्र जाम पकला होता. विवेकशी ओळख झाली व लगेच जाणवले की तो पण आपल्यातलाच आहे. बिचार्‍याला बरेच दिवसांनी बोलायल मिळाले होते त्यामुले भरघोस बोलुन घेत होता. लोपा मात्र गप्प होती. (फॉर अ चेंज) लगेच मधुरीने आग्रह करून करून कांदापोहे खायला घातले. २ प्लेटा कांपोच स्वाद घेवून आम्ही व्हिक्टोरियाकडे निघालो. लेस्टर स्क्वेअरला थोडी शोधाशोध केल्यावर मिलींदा, अदिती, इरा व अमोल सापडले. अमोल एकदम मंगल पांडे हेअरकट ठेवलेला आहे.

चिकीतो नावाच्या हॉटेलात खुर्चीला चिकटल्यावर झाल्यावर लक्षात आले की फारच चिंचोळी जागा आहे आणी गरम पण होत आहे. पण नंतर गप्पा सुरू झल्या आणी सगळ्या अडचणी कळेनाशा झाल्या. सहकुटुंब जीटीजी असल्याने अमोल, मी आणी काही अंशी विवेकची सुद्धा कुचंबणा झाली (मेक्सीकन हाटेलात बसून करोना नाही ह्याला काही अर्थ आहे का?) होती. कुणाल काही ड्रिंक म्हणल्यावर अमोलचा चेहरा बघण्यसारखा झाला होता. रंपा पोटात गेल्याशिवाय तो बोलत नाही असे दिसले. :P जोक जाऊदे पण तो एकंदरीत गप्प होता.

अदिती व मिलींदाने सगळ्यांची ऑर्दर शांतपणे घेवून वेटरला सांगीतली. त्याबद्दल खरच त्यांचे आभार मानायला हवेत. कारण मेन्यु वाचून काहीच कळत नव्हते. काही मंडलींनी आधी मेक्सिकन खाल्लेले अस्ल्याने सगळ्यांचे फावले. बरीटो नामक पदार्थ चवीला बरा असतो, नाचोस ने नाचायला लागत नाही, फजीता खाल्ल्यावर फजीती होत नाही अशा अनेक फा. को. केल्या व एकदाची ऑर्डर देण्यात आली.

मी फोर्स्ड बॅचलर असल्याने थोड्याफार काड्या टकण्याचे काम केले. मिलींदा व मुकुंद सेफ बोलत होते, पन विवेक मात्र संधीचा फायदा घेत होता. त्याचे परीणाम त्याला घरी गेल्यावर कळले असतीलच. पण एकंदरीत बायकांमुळे गरीब झालेला नवरा हा विषय रंगला. मधेच माधुरी बद्दल 'ती समजूतडार का डीसेंट आहे' असे खोटे बोलल्यामुळे नेहाने ५ मिनीट डोक्याला हात लावला व ते असत्यवचन अगदीच न पटल्यामुळे भोकाड पण पसरले. मिलींदा निळ्या अक्षरात टोमणे मारत होताच. मी एकटाच पुणेकर असल्याने त्याने मला कोपर्‍यात घेतला. :-) पण सगळेच सुटले होते. आमच्या हा गोंधळ बघताना हाटेलच्या बाइने मात्र न पिताच ग्लास फोडले.

मिलींदाने सर्वांचे बिल दिले. बाहेर आल्यावर सगळे खुश होते पण मी काँट्रीब्युशन किती द्यायचे असे विचारले त्यावर मिलींदाने मी कोब्रा आहे त्यामुळे असा सोडणार नाही असे सांगीतले. हे ऐकल्यावर लोक ATM च्या दिशेने पांगले. :-) मग निरोप समारंभ झाला.

एकुणात जीटीजी हास्यकल्लोळात गेला. परत कधी भेटू माहीत नाही पण पुण्याला आलात की भेटू, मुंबईत भेट रे, परत लंडनला आलात तर अशीच मजा करू वगैरे म्हणत सर्वांनी एक मेकांचा निरोप घेतला. अशा रितीने नैसर्गीक आपत्तीला न जुमानता जीटीजी सफळ संपूर्ण झाले.

(दिवे घ्यालच)


Limbutimbu
Saturday, December 02, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवे कशाबद्दल?
आयला येवढ्या थन्डी पावसात सोसाट्याच्या वार्‍यातही एकत्र जमलात ना? तेही येवढ्या दूऽऽऽरच्या परक्या देशात? गुड! :-)
लेको पण माझी आठवण काढलीत की नाही? की आठवणित पण अनुल्लेख?

बर तर बर, भल्लुक मान्त्रिक आला होता का जीटीजीला? :-)


Pendhya
Saturday, December 02, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍशेस सिरिज मधली ऍडलेडची टेस्त मॅच बघतांना, ईथे लिहितोय. Collingwood आणी Pieterson पेटलेत.

वा! मस्त मजा केलीत तुम्ही सगळ्यांनी.
अजुन निळ्या देवनागरीतल्या लिपीतील वॄत्तांत, आणी माधुरीचा वॄत्तांत यायचाय. फ़ोटो लवकर टाका, आणी जया म्हणाली त्याप्रमाणे, नावासकट.


Kandapohe
Saturday, December 02, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवे कशाबद्दल?>>>
ज्यांना दिले आहेत त्यांन बरोबर समजेल का दिले आहे ते. :-)

Mukman2004
Saturday, December 02, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.....लेको पण माझी आठवण काढलीत की नाही? की आठवणित पण अनुल्लेख?....... लिंब्या, आम्ही तुलाच काय पण कुणाला बी सोडले नाहि आमच्या कचाट्यातुन :-)

सगळ्याची आठवन काढुन काढुन gtg पार पाडला.. ज्यांना कुनाला त्या दिवशी उचक्या लागत आसतिल ते आमच्या मुळेच.. ;) :-)

हो खरच तुफ़ानी पावसात आम्ही सगळे जमलो मजा आली..
फ़ोटो टाकतेच.. मिलिंदा तुझे येउ दे त आता निळ्या शाई तले..

...मधेच माधुरी बद्दल 'ती समजूतडार का डीसेंट आहे' असे खोटे बोलल्यामुळे नेहाने ५ मिनीट डोक्याला हात लावला व ते असत्यवचन अगदीच न पटल्यामुळे भोकाड पण पसरले. .........
........... ते त्या मुळे नाही काही उलट माझी आइ किती समजुत्दार आहे तुम्ही तिला उगिच नाव ठेवत आहात म्हणुन सहन न झाल्यामुळे ती रडली बर का... :D


Robeenhood
Sunday, December 03, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, मिलिन्दा संबळ वाजवीत गाणं म्हणतच होता..

वाकडच्या या लिम्बू देवा,
जी टी जीला या या...
न्यू जर्सी ही पलिकडं,
लंडन हे अलिकडं..
न्यू जर्सीच्या हटकेश्वरा
जी टी जीला या या...
एकाक्षरी शंकासुरा,
जी टी जीला या या...
व्ही ऍन्ड सी च्या आग्यावेताळा,
जी टी जीला या या...
पुण्यातल्या त्या टीव्हीश्वरीनो,
जी टी जीला या या...
बे एरियातल्या 'दिवे'करणी,
जी टी जीला या या...
जी टीपीतल्या सरदारजींनो,
जी टी जीला या या...



Lopamudraa
Monday, December 04, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी नाव चुकलास. ना..!!!...
आता माधुरी फोटो आणि उरलेला.. मजकुर..!!!


Kandapohe
Monday, December 04, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा विकासला दिवा दे माझ्यातर्फे. त्याचे नाव चुकवले म्हणुन. :P

Limbutimbu
Saturday, December 09, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> जी टी जीला या या...
माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्र उभ राहील की मिलिन्दा कशी सम्बळ वाजवतोय!
अन होरे, ते उघड्या अन्गावर फट्टाक्कीनी आसुड कोण मारुन घेणारे? DDD

माधुरी, तुला थॅन्क्यू! तूच खरी मायबोलीकरीण, कुणालाच विसरली नाहीस! :-)




Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators