|
Sanyojak
| |
| Sunday, August 27, 2006 - 12:24 am: |
| 
|
पर्याय १ (विनोदी) : नितळ, मृगजळ, अवडंबर, ऋषीतुल्य
|
ऋषीतुल्य चहासंगे प्यावे गोड मृगजळ नको अवडंबर जीभेचे तळ समोसा नितळ
|
ऋषीतुल्य व्यक्तीचे का खल्वाट नितळ? पाल्हाळाचे अवडम्बर का, खळाळते मृगजळ?
|
Arch
| |
| Monday, August 28, 2006 - 7:08 pm: |
| 
|
ऋषीतुल्य(?) नेत्यांचे का माजवले अवडंबर? आश्वासनांचे मृगजळ कसे असेल नितळ?
|
Chandya
| |
| Monday, August 28, 2006 - 9:32 pm: |
| 
|
नितळ न त्वचा तुझी तू तर सौंदर्याचे मृगजळ कशासाठी करिशी वेडे हे नटण्याचे अवडंबर
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 6:19 am: |
| 
|
चंद्या अरे एक शब्द आलाच नाही.. नितळ, मृगजळ, अवडंबर, ऋषीतुल्य ऋषीतुल्य पायांना वाहन NIKE चे मृगजळ उन्हात टोपी ADIDAS ची, नितळ डोळी म्हणे चष्मा RAY-BAN चा अवडंबर जाहीरातीचे, वेष साधुपुरुषाचा!
|
करायला चालले मुंबईचे शिकागो तसे हे नितळ राजकारणी पण माजवती त्याचाही अवडंबर सामान्यास हे सारे भासी मृगजळ तरी त्यांना मानी हे ऋषीतुल्य.
|
नियम १ मुळे घोटाळा झाला.. त्यात म्हटल्याप्रमाणे मला दोन कविता कराव्याच लागतील (विनोदी, आणि करूण किंवा उपहास आणि करूण इत्यादी)... (एक घडताना कठिण तर दोन काय करणार...) तेव्हा मी बाद... 
|
************************* नियम १ प्रत्येक BB वर दिलेल्या पर्यायांपैकी कुठलेही २ पर्याय घेवून कविता अथवा चारोळी करणे आवश्यक आहे. नियम २ कंसातला पर्याय जसा असेल तशीच कविता चारोळी अपेक्षीत आहे. उदा कंसात विनोदी लिहीले असेल तर पुढे दिलेले ४ शब्द घेवून विनोदी कविता करावी. ************************* विनय.. माझ्या समजुतीप्रमाणे.. नियम १ : चार पर्याय (विनोदी, उपहास, करुण, चालू घडामोडी) पैकी कोणतेही दोन पर्याय घेणे. नियम २ : एखाद्या पर्यायाच्या बीबीवर दिलेले चारही शब्द वापरुन कविता करणे. आता नक्की काय ते संयोजकच सांगु शकतील, पण दोनच शब्द वापरले तर काव्य सहज तयार होईल.. चारही शब्दांचे बंधन असेल तर जास्त मजा येईल..
|
Hems
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:20 pm: |
| 
|
अवडंबर सभोवती मोहांचे दिलखेचक हे सुखाचे मृगजळ पण मी पडलो ऋषितुल्य म्हणुनि मृगाजिनालाच म्हणतो नितळ !!
|
Sanyojak
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:01 am: |
| 
|
दीपस्तंभ, तुम्ही वरती दोन्ही नियमांचे जे स्पष्टीकरण लिहीले आहे ते तसेच अपेक्षीत आहे. चारही शब्दांचे बंधन आहेच. त्यामुळेच मजा येणार आहे. धन्यवाद!!
|
Lalu
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:28 am: |
| 
|
नियम १ प्रमाणे मग 'प्रत्येक ID ला २ च कविता / चारोळ्या लिहिता येतील' असे आहे का? म्हणजे समजा मी इथे कविता लिहिली तर उरलेल्या ३ पैकी एकावरच लिहिता येईल? हे track ठेवायला अवघड नाही का? त्यापेक्षा 'कोणताही पर्याय घ्या, कविता लिहा, एका ID ने एका पर्यायासाठी एकदाच लिहावे. आणि त्या पर्यायासाठी दिलेले चारही शब्द आले पाहिजेत' हे सोपे. cbdg
|
मी असा अर्थ लावला होता की चार शब्दातील दोन शब्द घेवुन एक कविता / चारोळी करायची! असे प्रत्येक गृप करता! नशिब मी सवई प्रमाणे चारी शब्द वापरुन बघितले आणि सगळीकडेच पोस्टुन आलो! लालु, मान्य, चारी शब्द, आशय सान्गितल्याप्रमाणे, पण कोणताही किन्वा कितीही पर्यायान्साठी कविता करा अस हव हे! बायदिवे चालू सन्वत्सराचे नाव घोळकरीनाम सन्वत्सर अस हे का? DDD
|
Aaftaab
| |
| Wednesday, August 30, 2006 - 5:22 am: |
| 
|
ऋषीतुल्य सोमरस नको तयाचा अट्टाहास बीयर, शम्पेन, व्हिस्की, ताडी, फ़ेणी, हातभट्टी, जे मिळेल ते पी अमृत नितळ निर्मळ पण आहे भारी दुर्मिळ फ़ॅन्टा, कोक, पेप्सी, अक़्वाफ़िना नाहीतर बिस्लेरी, जे मिळेल ते पी तहानेचे अवडम्बर करू नको कासावीस असा होऊ नको अरे, मृग'जळा'तही 'जीवन' आहे वेड्या, जे मिळेल ते पी जे मिळेल ते पी
|
Daad
| |
| Wednesday, August 30, 2006 - 5:30 am: |
| 
|
नव्हते अवडंबर, परि होते साधे सुंदर जीवन नीतळ "ऋषितुल्य" तुझ्या बापाने फोडण्या: आधी कन्यादानाचे मृगजळ
|
दिसता लाभाचे तिला नितळ मृगजळ माजविले तिने कणवेचे अवडंबर श्वानही झाले आता रुषीतुल्य सोज्वळ आणि आले आता योगी बनुन झुरळ हा रुषीतला रु कसा काढु? ----मनिषा
|
Sanyojak
| |
| Wednesday, August 30, 2006 - 8:17 am: |
| 
|
नियम १ प्रमाणे मग 'प्रत्येक ID ला २ च कविता / चारोळ्या लिहिता येतील' असे आहे का? >> लालू तसे नसून २ किंवा २ पेक्षा जास्ती कविता करणे आवश्यक आहे. म्हणजे स्पर्धकाला निरनिराळ्या विषयात कविता करता येईल. मनिषा ऋषीतला ऋ असा काढा. `Ru` धन्यवाद!
|
सन्योजक, अजुन पर्याय येणारहेत का? (म्हन्जे कीबोर्ड सरसावून तयारीत र्हातो, कस?) आभारी हे!
|
आता मला ऋषी यायला लागले. धन्यवाद संयोजक "मला ऋषीतला ऋ दिल्यबद्दल" मनिषा
|
Daad
| |
| Wednesday, August 30, 2006 - 11:41 pm: |
| 
|
अजुन एकदा विवेचन! * (कोणतेही पण) कमीतकमी दोन पर्याय प्रत्येक आय्-डी ने घ्यायचे आहेत * घेतलेल्या प्रत्येक पर्यायानुसार त्याचे सर्व शब्द वापरुन एक कविता किंवा चारोळी पोस्ट करायची * एक आय्-डी एका पर्यायाला एकच एंट्री पाठवू शकतो ..............बरोबर?
|
|
|