|
Meenu
| |
| Friday, September 01, 2006 - 4:55 am: |
| 
|
ह्याचे 'डुप्लिकेट आयडी' ऐसे नाव मुखवट्याचेच हे वजनदार विंग्रजी नाव नको दावु कुणा तुझे खरे रंग रुप राव ... कधीतरी पण रहा उभा आरशासमोरी बघ तुलाच पटते का तुझी ओळख खरी लोकांपासुन लपताना कदाचीत तुच तुला विसरशील ... नाही भिती खरंच तुला कुणी ओळखण्याची पण नक्किच आहे शक्यता ईथेच घसरण्याची तारतम्य सोडुन उगा दुसर्या दुखावण्याची ... त्यापेक्षा कसं आपण साधं सरळ व्हावं आतुन अन बाहेरुन खरं खरं व्हावं प्रामाणिकपणानीच जग जिंकावं ...
|
>>>>> प्रामाणिकपणानीच जग जिंकावं ... प्रामाणिकपणानीच जग जिन्काव मनी असल स्वप्न, का बर धराव? असेल मनी विश्वास, आपलच खर कराव नसेल जरी मनी, रुळल्या वाटेला धराव नवे नाते, नवा मुखवटा कधी कधी तर आरसाही खोटा प्रेमातही हिशेबी रहाव हिशेबाला प्रामाणिकता म्हणाव कधी हिशेबात आलीच खोट दुसर्याकडे बोट कराव सगळीच नाती, बान्धुनी मोट एकाच मापात तोलाव अशा या रितीला, जगण म्हणाव आणि कधी जमलच तर रुटीन मधे चेन्ज म्हणुन वापरुन पहावा धूळ झटकून माणुसकीचाही मुखवटा माळ्यावर अडगळीत टाकलेला चौका चौकात उभ्या लाचारीला चाचपीत खिशातली चिल्लर दुरुनच फेकावे रुपया दोन रुपये आणि मनी धन्य व्हावे उदारतेच्या मुखवट्याचे मनातच हिशेब मान्डावे त्या मुखवट्यात थोडावेळ फसुन मनी धन्य धन्य व्हावे मग शोधावा एक मुखवटा देवघरात टान्गलेल्या तसबिरी आड दडलेला हळद पिन्जरीने माखुन काढावे देवाला एक फुल वहावे फुलही देवाचेच, जरुर विसरावे सगळ्याच मुखवट्या आड दडलेले "मी पण" मात्र जपत रहावे
|
लिंबु सहीच रे आता लिंबु तु पण म्हणाव लागेल. पण छानच.
|
Saconchat
| |
| Friday, September 01, 2006 - 7:35 am: |
| 
|
मी पण जपत रहावे असे सगळेच म्हणतात पण हा मी आहे तरी कोण? आरशात दिसणारा 'तो' म्हणजे मी की सकाळ सायंकाळ लहान मोठा होणारा सावलीत ला मी? पैशाचा मागे सतत धावनारा मी की धावता धावता देउळ दिसले की तेवढ्या पुरती देवाची आठवण काढनारा मी? नूसत्या कल्पनेने साता समुद्रा पलिकडे पोहोचणारा मी की त्या सह्याद्रि चा पायाशी, स्वतःचे थिटेपण स्वतःच सिद्ध करणारा मी? कोणी माझी ओळख करुन देइल का, हा कोण आहे मी?
|
Devdattag
| |
| Friday, September 01, 2006 - 10:08 am: |
| 
|
जेंव्हा ही कविता लिहली तेंव्हा वरची कविता नव्हती.. पण जस्ट लिहिली आहे म्हणून टाकतो.. माझी कविता नियमात बसत नसल्याने वरील कवितेचीच शेवटची ओळ घ्या... मात्र मीपण जपत रहावे ही गतकाळची झाली बात आता होऊन मांजरे म्हणती चाटू परस्परांची पाठ कधी फुकाचे लोणी दिसता जरी भुश्याची गोणी असता सुरू करुया पूच्छ हलवणे कधीही नसे जे ताठ चाटू परस्परांची पाठ कुणी असे का सगे सोयरे मनी तिढ्याचे असे दायरे जरी दुगाण्या झाडल्या कुणीही तरीही त्याचे होउ भाट चाटू परस्परांची पाठ सदा मानूनी शर्यत जीवन कंस कधी कधी होउ रावण कुणी मग जो पूढे चालला त्याची लावून टाकु वाट चाटू परस्परांची पाठ 'चाटू परस्परांची पाठ' ह्या शिर्षकाची आणि अशाच अर्थाची एक कविता काही वर्षापूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या वार्षिकात आमच्या सरांनी टाकली होती, त्यावरूनच ही कविता सुचली
|
Soultrip
| |
| Friday, September 01, 2006 - 11:26 am: |
| 
|
चाटू परस्परांची पाठ म्हणतोस, .. नाहीच जमणार मला हे! आप-मतलबी दुनियेत पराभूत होत .. कबर माझी मी खणतो!!
|
कोणी माझी ओळख करुन देइल का हा कोण आहे मी कोणी सांगेल काय मला, खरंच कोण आहे मी? कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप काका, मामा, दादा, पण हे तर माझे, निव्वळ डुप्लिकेट आयडी. मग खरा कोण? ठरवतो मी खुपदा विश्वासुन बुध्दीवर, हे करु, ते करु,ठरवतो राहुन शुध्दीवर, पण बिनचुक करुनही सगळं असं कसं चुकतं सारं कसं फसतं? कळत नाही मग मला माझं हे न चुकताही चुकणं जाणवत आहोत की काय कोणाच तरी खेळणं माझं सगळच कसं नियंत्रित-चालणं, बोलणं, हसणं? पण हे चालवुन कसं घ्यायचं, तो हलवेल तसं आपलं हलणं. पण....पण..... खेळण्याला कुठे असते मनाप्रमाणे हलण्याची मुभा बालक हलवेल तसंच हलण्याची असते त्याला सजा तरिही हा प्रश्न उरतोच पण मग मी कोण स्वतंत्र बुध्दी असलेला माणूस की त्याच खेळण अमानुश? नियतीच बाहुला? तो दोर्या हलवणारा आणि त्याप्रमाणे नाचणारा मी फक्त एक बाहुला हो बाहुलाच स्वत:च काहीच नसणारा. तरीही स्वत:वर गाढ विश्वास असणारा--एक अंधश्रध्द.
|
मनिषा, गुड विद्या, तुला थॅन्क्यू!
|
Saconchat
| |
| Friday, September 01, 2006 - 12:26 pm: |
| 
|
मनिशा सुंदर लिहिलयस. माझा हा कविता करण्याचा पहिलाच प्रयत्न होता
|
Ashwini
| |
| Friday, September 01, 2006 - 10:07 pm: |
| 
|
स्वतःवर गाढ विश्वास असणारा तरीही एक अंधश्रद्ध का असावा? हा विश्वासच तर तेवत ठेवतो हृदयातल्या श्रद्धेचा अखंड दिवा श्रद्धेचं बळ फार महान असतं तेच दगडातून बीज रूजवतं दगडाच्याच मूर्तीलाही अन् देवत्व बहाल करतं श्रद्धा कुणावर का असावी ज्याचा त्याचा प्रश्न आहे एक मात्र खरं शेवटी श्रद्धेविना सारं व्यर्थ आहे पहाटे देवपूजा करणं म्हणजे श्रद्धा अनाथाच्या मुखी घास घालणं ही श्रद्धा कुठेतरी कुणीतरी आपल्यासाठी आहे याचं भान सतत असणं ही श्रद्धा श्रद्धेला नाव नाही श्रद्धेला गाव नाही त्याच्या अस्तित्वाचा गंध आसमंतात जाणवणं म्हणजे श्रद्धा रणांगणावर डोळे मिटणारा सैनिक त्याच्या पोरक्यांसाठी स्वप्न पाहातो ती श्रद्धा आणि रात्रीच्या कुशीत शिरताना उद्या उज़ाडेल याची खात्री असणं ही सुद्धा..
|
Limbutimbu
| |
| Saturday, September 02, 2006 - 5:22 am: |
| 
|
>>>> काल आमच्या मित्राचा तम सकाळीच दाटून आला >>>> नेहमीप्रमाणे तो आपली पोस्ट V & C वर टाकून आला देवा, लक्षात ठेवलय! (मुद्दामहून एक दीस उशिरा सान्गतोय) DDD अश्विनी, शेवटच्या दोन ओळी, लै खास! एकदम पन्च! 
|
Psg
| |
| Saturday, September 02, 2006 - 7:34 am: |
| 
|
मस्त चाललय हे STY . प्रत्येक कविता वाचनिय! लगे रहो कवी लोक्स!
|
Kedarjoshi
| |
| Saturday, September 02, 2006 - 2:09 pm: |
| 
|
उद्या उजाडेल याची खात्री असतेच जगाचे काय होईल याची चींता असतेच दिवस नविन उजाडतो नविन प्रश्न घेउन येतो आज काय तर इराक युद्ध उद्या असेल इराण युद्ध घटना ह्या सार्या माणूसकीला काळीमा फासनार्या ' माणूस ' असन्याची शरम वाटनार्या वाटा सार्या वेगवेगळ्या तरिही ' एका ' कडेच जातात मग का गोरे - काळे आपाआपसात भांडतात?
|
Milya
| |
| Sunday, September 03, 2006 - 6:08 pm: |
| 
|
आपापसात भांडतात ती माणसे नव्हेतच ती पशुच धर्मासाठी झगडतात ती माणसे नव्हेतच ती पशुच मी तावातावाने म्हणालो बाजुलाच आमचा कुत्रा, 'मोती' बसला होता अनेक करामती दाखवुन थोडा थकला होता माझे बोलणे ऐकुन म्हणाला... बाबारे चुकुनही असे म्हणू नकोस माणसाला पशुची उपमा देउन आमचा अपमान करु नकोस पाहिले आहेस कधी दोन कुत्र्यांना धर्मावरुन भांडताना पाहिले आहेस कधी दोन मांजरांना एकमेकांनाच मारताना पाहिले आहेस कधी गाढवांना पाठीत खंजिर खुपसताना पाहिले आहेस कधी बैलांना दुसर्याच्या शेतात घुसताना पर्वाच तू तुझ्या मित्राला सांगत होतास मोती आमचा किती हुश्शार आहे मी सांगेल ते काम करायला एका पायावर तयार आहे मोती आमचा शूर, खाल्ल्या मिठाला जागतो त्याला सर्व कळते अगदी माणसासारखा वागतो बाबारे तुला मी परत एकदा विनवितो... मी माणुस नाही म्हणूनच खाल्या मिठाला जागतो मी माणुस नाही म्हणूनच तू सांगशिल तसा वागतो तेव्ह शिव्या दे, मार मला, खायला देऊ नकोस पण परत कधी चुकुन सुद्धा 'माणुस' म्हणू नकोस परत कधी चुकुन सुद्धा 'माणुस' म्हणू नकोस
|
परत कधी चुकुन सुध्दा माणुस म्हणु नकोस. अगदी अगदी काय लिहु खुप...... शब्द संपले माझे.
|
वा वा... फारच मस्त सुरू आहे... शेवटचे दोन दिवस राहिले... येऊ द्या अजून!! (मनिषा ची comment आहे, कविता नाही असं गृहित धरलं तर 'परत चुकून सुध्दा माणुस म्हणू नकोस' या ओळीपासून पुढची कविता हवी..
|
माझी comment च आहे खरंच मनापासुन द्यावीशी वाटली म्हणुन दिलेली.
|
" परत कधी चुकुन सुध्दा 'माणुस ' म्हणु नकोस, अर्ज आहे समज विनंती आहे म्हण पण माणुस म्हणु नकोस." असं म्हणताच मी--- तो चक्क हसला. म्हणाला, "घाबरलास? का रे?" मी म्हटलं, "सगळ- सगळ होण सोप आहे इथे, पण माणुस? अ हं. अरे माणुस म्हटला की अंगात माणुसकी हवीच! ती कुठुन आणु? ती concept च out-dated झाल्ये हल्ली असलीच तर असते एखाद्याकडेच ती सुध्दा 'लिमिटेड माणुसकी'. नाही तर मग नाहीच मग उपयोग काय माणुस असण्याचा?" तो म्हणाला, "अरे कोणी सांगितलं तुला हे? जरा समोर बघ, डोळे उघडे ठेऊन बघ. आपल्या अंगावरच्या फाटक्या लक्तरात जखमींना लपेटणार्यांकडे काय होत दुसरं? माणुसकीच ना? पावसात अडकलेल्यांना बिस्किटं देणार्यांचा काय धर्म होता? माणुसकी हाच ना? खड्यात अडकलेल्या कोण कुठच्या प्रिंन्ससाठी प्रार्थना करणारे काय जपत होते माणुसकीच ना?" मी म्हटले, "पण.. पण आरे...पण" तो म्हणाला, "पण पण काय करतोस? जरा स्वत: वरती विश्वास ठेवुन बघ. समोरच्यावरही विश्वास ठेवायला शिक. बहरलेल्या बागेत थोडं तणं असणार म्हणुन काही बागेच सौदर्य कमी होत नाही साक्षात देवांनाही शाप आहेत माणसाच काय सांगतोस! स्वत: पासुन सुरवात कर्---- तू साद घालुन तर बघ, दशदिशांतुन येईल प्रतिसाद. अनुभुती घेऊन बघ." मग पतर कधी चुकुन सुध्दा असं म्हणणार नाहीस, कारण माणुस म्हणवुन घेण्यातच गौरव वाटेल तुला" मनिषा
|
Devdattag
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:26 am: |
| 
|
>>देवा, लक्षात ठेवलय! (मुद्दामहून एक दीस उशिरा सान्गतोय) लिंबुभाऊ, तुम्ही मानता म्हणजे तुमचा डुप्लिकेट आयडी आहे, बुरखा नाही.. .. (मुद्दामुन ३ दीस उशिरा सांगतोय)..
|
>>>> म्हणजे तुमचा डुप्लिकेट आयडी आहे, बुरखा नाही छे छे छे, हे असे गैरसमज तुम्हाच काही लोकान्चे हेत ते फक्त दाखवुन दिल! (हे मुद्दामहून लगेच सान्गतोय) चला, आता पुढच्या कविता येवुद्यात! 
|
|
|