|
हे गजवदना हे गजवदना, हे गजवदना शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना तू करुणेचा विशाल सागर तू तेजाने भरले अंबर तुच अग्नि, तू वायु, धरा अन चराचरांतून तुझी चेतना मूर्तरूप तू चैतन्याचे धाम अकल्पित कैवल्याचे श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि होत रहावी तुझी प्रार्थना आनंदाचे गांव सदोदित तुझ्या कृपेने हृदयी निर्मित आनंदाच्या गावकर्यांची श्री गणराया तुला वंदना - प्रसाद
|
Kshipra
| |
| Sunday, August 27, 2006 - 9:12 am: |
|
|
रिध्दी वल्लभा सिध्दी वल्लभा प्रारंभी नमितो देवा आशिर्वच मजला द्यावा अणुगर्भी करिसी वास तृणदर्भी तुझी रेघ दीनांचा तुचि नाथ ठायी ठायी भगवंत दिसे तोचि भाग्यवंत तोचि खरा बुध्दीवंत कर्माचा स्वामी मीच स्थिर बुध्दी देई हीच वळो माझी दृष्टी आत माझे ठायी तुझा अंश मोहमाया करिती दंश तया वारी एकदंत - क्षिप्रा
|
Peshawa
| |
| Monday, August 28, 2006 - 10:06 pm: |
|
|
गंपा आल्ये गंपा आल्ये आल्ये ले आल्ये गंपा आल्ये उंदिल पायशी तुंदिल पोत मोदक सोंदेत कानचे सुप बघा बघा साले दुलत आल्ये! आल्ये ले आल्ये गंप्पत्ती आल्ये! गेउन हातात माझी ही झांज! गुलालात लंगून नाचनाल मी आज दिच्यांग तिच्यांग गंप्पत्ती आल्ये! आल्ये ले आल्ये गंप्पत्ती आल्ये!
|
Jayavi
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:44 am: |
|
|
श्री गणेश वंदना गजानना तुज वंदन करीतो भरुनी अंजली सुमनांची आशिर्वच दे अम्हा मोरया चरणी पार्थना ही अमुची लडिवाळ हे रुप गोजिरे प्रसन्न भासे सदा साजिरे माता अंबा दृष्ट काढिते सदैव अपुल्या पुत्राची आशिर्वच दे अम्हा मोरया चरणी पार्थना ही अमुची अपार लीला तुझ्या गणेशा सवे रंगसी रिद्धि सिद्धिच्या नाथ गणांचा तूच शोभतो चिंता वाही जगताची आशिर्वच दे अम्हा मोरया चरणी पार्थना ही अमुची वरदविनायक, करुणागारा सारी विघ्ने नेसी विलया सिंदूरवदना, मयूरेश्वरा करीसी दैना दु:खाची आशिर्वच दे अम्हा मोरया चरणी पार्थना ही अमुची पार्वतीनंदन, हे जगवंदन तिन्ही लोकीचा त्राता भगवन भवसागर हा तरण्या देवा नाव हाक तू भक्तांची आशिर्वच दे अम्हा मोरया चरणी पार्थना ही अमुची जयश्री
|
जय गणराया श्री गणराया मन्गल मूर्ति मोरया अश्टविनायक मन्गलदायक तु विघ्नहर्ता तु सुखकर्ता मन्गल मूर्ति मोरया
|
गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा जय जय श्री गणेशा वक्रतुण्ड एकदन्त कपिल गजकर्णक, गजकर्णक, गजकर्णक गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा लम्बोदर विकट विघ्ननाशा धूम्रवर्णा, धूम्रवर्णा, धूम्रवर्णा गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा भालचन्द्रा विनायका गजानना गणाधीप, गणाधीप, गणाधीप गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा
|
|
|