|
Sanyojak
| |
| Sunday, August 27, 2006 - 12:27 am: |
| 
|
पर्याय २ (करूण) : तुडूंब, उत्तुंग, अथांग, भणंग
|
तुडूम्ब गर्दी जणू सागर अथान्ग गर्दीतही एकटा मी एक भणंग
|
गाठण्या ते शिखर उत्तुंग केव्हाचा धडपडतोय तो पंख छाटलेला पक्षी भणंग..
|
Ashwini
| |
| Monday, August 28, 2006 - 10:18 pm: |
| 
|
तुझ्या अथांग कृपेचा उत्तुंग कटाक्ष टाकून माझं भणंग आयुष्य टाकलस तुडूंब भरून
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 6:39 am: |
| 
|
तुडूंब, उत्तुंग, अथांग, भणंग विलासाने तुडुम्ब भरलेल्या आयुष्यात कुठेतरी सलते अथांग निराशा उपभोगाच्या हरेक उत्तुंग क्षणी बाहेर पडतो एक भणंग उसासा..
|
Chandya
| |
| Tuesday, August 29, 2006 - 2:53 pm: |
| 
|
ह्या अथांग आकाशातील उत्तुंग दिनकरा तुझ्या तुडुम्ब भरलेल्या प्रकाश कोठारातील काही आशेचे किरण टाकशील का ह्या माझ्या भणंग झोळीत जेणे करुन दिपवून टाकेन मी...... ह्या निराशेचे डोळे
|
Gautami
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:52 pm: |
| 
|
तुडूंब भरला हा रस्ता ज्यात खड्डे आहेत अथान्ग भणंग पुणेकरान्ची आहे सहनशक्ती उत्तुन्ग.
|
Hems
| |
| Tuesday, August 29, 2006 - 4:40 pm: |
| 
|
बरसले आभाळ अथांग वाढली नदी उत्तुंग गाव पाण्यात तुडुंब अन गावकरी भणंग!
|
तुडुंब गरदी प्रिंन्सला बघती वृत्तवाहीन्यांनी जमविला दर्शकांचा अथांग सागर वाढल्या टी. आर पी. च्या अपेक्षा उत्तुंग, मदतीच्या अपेक्षेत-श्रीनिवास मुंबईत भणंग एकला.......
|
छान सुंदर गावी त्या जन हसत खेळत नदी वाहे एक संथ मुले खेळत पोहत दृष्ट लागली कोणाची काळे आभाळ पडले नदी भरली तुडूंब पाणी गावात शिरले शांत नदी ती कोपली काय तिचा रागरंग पाणी पाणीच चौफेर जणू सागर अथांग जीर्ण मंदीराची मूर्ती झाली ती ही आज भंग कसा पाण्याखाली गेला लाल कळस उत्तुंग पूर ओसरला काल उरले दुःखाचे तरंग झाली संसाराची माती किती गाव ते भणंग
|
Aaftaab
| |
| Thursday, August 31, 2006 - 8:30 am: |
| 
|
अथांग शांत सागर किनार्यावरचं ते चिमुकलं गाव वाळूत खेळणारं बालपण पाण्यात डुंबणारं तारुण्य आणि निवांत पहुडलेलं वार्धक्य सारं काही आनंदी होतं.... तेव्हढ्यात कुठूनशी आली एक उत्तुंग लाट गगनाला भिडू पाहणारी वार्याशी स्पर्धा करू पाहणारी... आणि तशीच अजून एक... जणू मृत्यूची नांदीच अशा कितीतरी लाटा सर्वनाशाने तुडुंब भरलेल्या... कर्दनकाळासारख्या येऊन आदळल्या त्या किनार्यावर, त्या चिमुकल्या गावावर नव्हे त्या बालपणावर, तारुण्यावर, वार्धक्यावर आणि... आणि सगळच संपलं... एक जिवंत हसरं चित्र विस्कटून गेलं राहिले... फक्त तो सागर, आणि तो भणंग किनारा!!
|
Soultrip
| |
| Friday, September 01, 2006 - 9:23 am: |
| 
|
ऊत्तुंग आकाश कवेत घ्यायचं होतं, अथांग सागराला नमवायचं होतं, तुडुंब आनंदानं दिक्काल व्यापायचा होता, नियतीच्या एक फटकार्यानं आता हा भणंग .. कसंबसं खुरडायचं बघतोय!
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:11 pm: |
| 
|
स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! करूण : Limbutimbu 32% 6 Deepstambh 16% 3 Ashwini,Chandya,Hems,Aaftaab 11% 2 विजेता : लिंबूटिंबू अभिनन्दन!
|
|
|