Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तुमची जाहिरातबाजी ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » स्पर्धा » तुमची जाहिरातबाजी « Previous Next »


****************************************************
जाहिरातबाजी

जाहिरात्बाजी अर्थात MAd ads ! इथे तुम्हाला काही ' unique ' प्रॉडक्टस दिले आहेत.
तुम्हाला त्यापैकी कोणत्याही प्रॉडक्ट ची जाहिरात बनवायचीय. ते प्रॉडक्टस असे :

१. एक नविन किटकनाशक औशध, 'कोला फ़्लेवर' मधे!( ब्रॅन्डनेम तुम्हीच सुचववले तर उत्तम)
२. slimming pills ! रोज एक गोळी सडसडीत होण्यासाठी!

३. कुठलाही प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवणारे 'पन्डीत अवतारबाबा महाराज'

स्पर्धेचे नियम

१. जाहिरात web & print media साठी आहे असे धरून बनवायची आहे. म्हणजे वर्तमानपत्रात किंवा वेब वर किन्वा मासिकात छापून येते तशी. त्यात चित्रे, मजकूर अथवा दोन्ही असू शकेल. फ़ोटो चालणार नाहीत.
२. चित्राकरता ५० kb limit आहेच. चित्र स्वतः काढलेले असावे. graphics softwares वापरुन किन्वा स्कॅन चालेल. एका जाहिरातीत १ च असे चित्र चालू शकेल.
३. मजकूर ६ ते ८ ओळी चालू शकेल, याला 'किमान' ची मर्यादा नाही!
४. यात एखादा संवाद, घोषवाक्ये, प्रसंग असे काहीही असू शकेल.
५. एका आयडी ला प्रत्येक प्रॉडक्ट साठी एकदाच भाग घेता येईल.
६. स्पर्धेचा निकाल poll द्वारे लावला जाईल.

चला तर तुम्हीच व्हा जाहिरात बाजीगर.. किंवा असं म्हणू, जाहिरात 'बाजीराव / मस्तानी' :-)

****************************************************

Cool
Monday, August 28, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


काय म्हणता आज काल लिहिण्यासाठी काही सुचत नाही
इतरांच्याच काय स्वतःच्याही कविता पचत नाही

प्रश्न तुमच्या बायडीचा असो वा डुप्लीकेट आय्-डी चा
सर्व प्रश्नांचे एकच उत्तर 'पन्डित अवतारबाबा महाराज'

ऐश्वर्याच्या पायापासुन अमिताभच्या दुखर्‍या पोटापर्यन्त
बारमधे उधळणार्‍या नोटांपासुन राखीच्या चावर्‍या ओठापर्यन्त

साहेबांचं घड्याळ असो वा 'राज'च नवनिर्माण
विलासी खुर्ची असो वा पाटलांच 'बार' पुराण

सर्वांना एकच मार्गदर्शक 'पन्डित अवतारबाबा महाराज'
उद्याच्या समस्यासाठी आजच भेटा, एकदा याल येतच रहाल

भेटण्याचे ठिकाण येरवडा प्रादेशीक रुग्णालय
(कवी मंडळींसाठी वि. सू. बाबांना दुःखी कवितांची ऍलर्जी आहे)






Rupali_rahul
Monday, August 28, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिटकोला

रोजच्या डासांच्या आणि घरातील उपद्रवी किटकांच्या त्रासाने वैतागला आहात. उपाय एकदम सोप्पा घेउन या एक नवीन किटकनाशक. ज्याचा स्वाद असा की ते शिंपडल्यावर डास, झुरळ, किडे, मुंग्या यांना वाटेल की आपण पित आहोत एक कोल्ड ड्रिंक पण थोड्याच वेळात त्यातील विष आपला असर दाखवुन ते मरतील घरात येउन.

सगळ्या किटकांवर एकच उपाय
हिटकोला सारखं दुसर कुणीच नाय.


Vinaydesai
Monday, August 28, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पिल' चीज क्या है आप यही जान लिजिये,
बस दिन मे एक बार,
बस दिन मे एक लेनेकी, ठान लिजिये,

फिगर आपकी भी तो शेंग, चवळीकी बनेगी,
मुष्किल नही है कुछ भी,
मुष्किल नही है कुछ भी अगर 'slimcon' लिजिये....
:-)



Anilbhai
Monday, August 28, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी का हुन?

Kshipra
Monday, August 28, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vinay, 'pila chija kyaa hai' sahi. :-)

Aaftaab
Wednesday, August 30, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घुटका! घुटका!! घुटका!!!
सर्व कीटकांपासून हमखास सुटका
कीटकनाशक वापरा नवीन 'घुटका' ..
(आता नवीन आकर्षक 'कोला' फ़्लेवरमध्ये)

शीतपेयाची मजा आणि कीटकांना सजा!
तुम्ही एक घुटका घ्या आणि कीटकांना फ़टका द्या!!

(वैधानिक इशारा ००० तुमच्या शरीराला आधीच कोलांची सवय असल्याने तुम्हाला काही अपाय होणार नाही. पण कीटक मात्र लगेच दम तोडतील.)






Seema_
Wednesday, August 30, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

d1


चित्रात लिहिलेल दिसत नाही आहे म्हणुन हे explanation .
जाहीरातीत अर्थातच अस असणार नाही.

गेट न. ५ स्वर्ग
गेट न. १३ नरक

दोन किटक ( डास ) वरती भेटतात.........

mr खाजवले : ओये चावली!तु इकडे?कोला पिवुन तर तुझी प्रतिकारशक्ती फ़ार वाढलेली ना ?
ms चावली : जळ्ळ मेलं... ठंडा कोला समजुन Kill Kola प्याले ,
आणि एक क्षणातच इकडे आले .


खाली चौकोनात

HIT मतलब Kill Kola
आता लवकरच अमृत flavour मध्येही



Soultrip
Friday, September 01, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pesti-Cola: Ye hee hai right choice farmer-bhaai! .. Aa haa!!

पेस्टी-कोला: ये ही है राईट चॉईस farmer -भाई! .. आ हा!!

Soultrip
Friday, September 01, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाशील रोज एक गुणकारी गोळी s-pill ची,
होशील गं सत्वर तू शेंग चवळीची!
जिंकशील गं तू स्पर्धा Miss-Universe ची!!
होशील गं तू नायिका Bollywood ची!!!


Vinaydesai
Friday, September 01, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फोटो - हिमेसभाई,
फोटो - लालू यादव,
फोटो -God वर मराठीत बोलणारी गोरी बाई,
फोटो - अध्यक्ष बुश

अपाय अनेक पण एकच उपाय
किटकोल्याला पर्याय नाय,
बत्तीस किटाकनाशकाना भारी,
किटकोल्याची बाटली न्यारी,
एक बार पी जाओगे,
तो किटकको 'ढुंढते रह जाओगे'


Manishalimaye
Saturday, September 02, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका आहे संयोजक--- please निरसन करा. उत्तराची अपेक्षा करते.
एका आयडीला एकाच वेळी एकाच जाहिरातीत एकदम दोन प्रोडक्ट्सची जाहिरात करता येईल काय?
मनिषा


Rupali_rahul
Saturday, September 02, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे slim-pill slim-pill काय आहे?
हे
slim -pill slim-pill???

जेव्हा तुंदिलतनु
देह कोणत्याच
कपड्यांत मावेना

जेव्हा डाएट करुनही
वजनाचा काटा
सतत वॉर्निंग देई

पोटाचा व्यास
कमरेचा आकार
सतत वाढत जाई


अशाच वेळी
लक्षात ठेवा तुम्ही

slim-pill, slim-pill
slim-pill, slim-pill


रोज खा एक गोळि slim-pill ची
तुम्हाला म्हणतील लोक शेंग चवळिची


हे सौदागर हिंदी पिक्चरच्या "इलु इलु" गाण्याच्या धर्तीवर वाचावं...


Milya
Sunday, September 03, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघ, मारेल डास
ह्याला कोल्याचा वास

झुरळ माशी नि ह्या ढेकुणा
विकत घेई पुन्हा, 'पेप्स्कोना'

पेप्स्कोना -
कुमकुम ते करीना
गल्लीतली मीना ते अंबानीची टिना
सार्‍याच गृहीणी वापरती एकच किटकनाशक
पेप्स्कोना, पेप्स्कोना, पेप्स्कोना

पेप्स्कोना - ये किल करे मोअर


(वरचे जिंगल नको मारुस हाक च्या चालीवर म्हणावे)

Sanyojak
Monday, September 04, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा,
एका वेळी एकाच प्रॉडक्ट ची जाहिरात अपेक्षित आहे.


Deepstambh
Monday, September 04, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबा (आपल्या मुलास) : काय झालं?
मुलगा (वजनकाट्यावर उभ्या असलेल्या आईकडे बोट दाखवुन) : आई रडत होती..
बाबा : थोडी टाचणीवटी दे तिला.. तू झालास तेव्हा तुझी आजी तिला तेच द्यायची..

(बाबांच्या चेहर्‍यावर क्लोजप) हे पहा.. टाचणवटीसोबत एक टाचणी मोफत.. फुगलेल्या शरीराला थोडं 'टूच्चं ' केलं की फोडलेल्या फुग्याप्रमाणे आतली हवा 'फुच्चं ' करुन बाहेर.

नंतर तिघेही रींगा रींगा रोजेस करुन गोल गोल फिरत जिंगल गातात..

फुगलेल्या शरीराला 'टूच्चं ' आतली हवा 'फुच्चं '..
फुगलेल्या शरीराला 'टूच्चं ' आतली हवा 'फुच्चं '..
टा टा टा टाचऽऽऽऽऽणवटी.. वटी.. वटी.. ( echo )...






Psg
Monday, September 04, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दीप्या, काय सही उपाय आहे!

Deepstambh
Monday, September 04, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद पूनम.. :-)

ज्यांनी काही दिवसांआधी रेडीओवर लागणारी DSK ची 'घराला घरपण देणारी माणसं' जाहिरात ऐकली असेल.. ते खालील ओळी गुणगुणु शकतात... :-)

रोज रोज कुरतडत खातात जिन्नसं..
(टिणीणीऽऽ टिणीणीऽऽ..)

अंगावर पडल्यावर घाबरतात माणसं..
(टिणीणीऽऽ टिणीणीऽऽ..)

रिकामी होतात भरलेली कणसं..
(टिणीणीऽऽ टिणीणीऽऽ..)

पण गळ्यात पडतात सासू आणि वन्स..
(सायलेन्स)
जेव्हा मारतात.. किटकांना मरण देणारं कोमिक्स...
किटकांना मरण देणारं कोमिक्स...




Meenu
Monday, September 04, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दीप जोरात आहे .. कधीपासुन सुरु झालं production ?

Sanghamitra
Wednesday, September 06, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एखादी मध्यवयीन (म.व.) मॉडेल चिमटीत झुरळाला पकडून उभी आहे. झुरळ थरथरतेय.(म्हणजे मिशा हलतायत.) झुरळाचा क्लोजप. मॉडेल म.व. असल्याने नुसती साडी ब्याकग्राऊंडला दिसली तरी चालेल.

म.व. मॉडेल : " बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे? "
झुरळ : " मला कोलड्रिंक प्यायचेय. "
म.व. मॉडेल (खुनशी हसत) : " बरं झालं तुझे आणि माझे काम एकदमच होईल. "

झुरळाला कोलॅप्सो देते.
झुरळ एका हातात कोलॅप्सो चा ग्लास धरून नाचत नाचत खाली पडते.

म.व. मॉडेल : " पाहिलंत त्यांनाही सोप्पं आणि आपल्यालाही. वर शेवटच्या इच्छेचं पुण्यही.
आणि हो, नको असलेल्या पाहुण्यांनाही सर्व करता येते.
त्यामुळे..

पाहुणे हे पिउन
पडतील आपापल्या घरी जाऊन. "

कोलॅप्सो टिंग टॉंग.

- संघमित्रा


Vinaydesai
Wednesday, September 06, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाढी पासून साडीपर्यंत,
आणि धोतरापासून पितरापर्यंत,
सगळ्या समस्या सुटतील... काय?
अवतारबाबांचे धरा.... पाय.

फक्त एक फोन करा,
अवतारबाबांचे पाय धरा,
व्हाल तुम्ही समस्या मुक्त,
अवतारबाबांचे व्हाल भक्त,

खाजगी भेटीसाठी त्वरा करा,
हजारच्या नोटेने बुकिंग करा..


Sanyojak
Wednesday, September 06, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!!

तुमची जाहिरातबाजी
Deepstambh : 'slim pill- tachanavti' 1 29% 10
Vinaydesai : Jahirat 1 15% 5
Deepstambh : Jahirat 2 12% 4

विजेता : दीपस्तंभ
अभिनन्दन!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators