|
प्रमोद महाजनांची हत्या : पुढची चर्चा 'इथे' करा
|
Svsameer
| |
| Thursday, June 01, 2006 - 9:38 pm: |
| 
|
ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचे गुरुवारी सकाळी पुणे येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माधव गडकरी
|
Moodi
| |
| Thursday, June 01, 2006 - 9:55 pm: |
| 
|
माधव गडकरींच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. एक व्यासंगी अन सच्चे पत्रकार आपल्यात नाहीत आता.
|
एका कठीण कालखन्डात, अडीच रुपयाचे एक लिटर दुध आणायचे की सव्वा रुपायाच अर्धा लिटर दुध आणि रविवारचा पस्तीस पैसे वाला लोकसत्ता आणायचा या प्रश्णात नेहेमीच दुसरा पर्याय निवडला जायचा! तेही केवळ गडकरी यान्चे लेख वाचण्यासाठी! एकाच प्रश्णाचा विविध अन्गान्नी विचार करायला जे काही शिकलो ते त्यान्च्याच लेखातून! कितीही गम्भीर किन्वा उत्कट, श्लिल किन्वा अश्लिल, सामोपचार किन्वा "समजावणीचा", गहन किन्वा विनोदी, विषय कोणताही असुदे, वैचारीक परिवर्तनासाठी आवश्यक सन्तुलीत पण स्वतःच्या मतान्वर ठाम असा भाषेचा बाज त्यान्च्याच लिखाणातून शिकता आला! कोपरखळ्या, आडुन आडुन घालुन पाडुन बोलणे, व्यक्तिगत हल्ले चढविणे असे "दुर्गुण" त्यान्च्या लेखनात कधिच आढळले नाहीत! त्यान्चे लेखन समृद्ध असे कारण ते मान्डत असलेल्या विषय वा मताच्या पुष्ठर्थ ते अनेकानेक उदाहरणे, दाखले देत असत, त्यान्चा व्यासन्ग फार मोठा असल्यानेच हे शक्य होत असे आणि त्यान्चे लेख केवळ वाचनीयच नव्हे तर भरघोस आशयसम्पन्न असत! ते ज्या ज्या वृत्तपत्रात गेले, तो तो कालखन्ड त्या त्या वृत्तपत्राकरता अनोखा ठरला! आमच्या पिढीच्या त्याकाळच्या कैक युवक आणि तरुणान्ची वैचारीक बैठक घडण्यात ज्या फार कमी विचारवन्तान्चा सहभाग होता, त्यातले ते एक होते! मराठी वृत्तपत्रिय सृष्टीची फार मोठी हानी त्यान्च्या जाण्याने झाली हे! घरातीलच कोणतरी वडिलधारेच आम्हाला सोडुन गेल्याप्रमाणे भासत आहे! माधव गडकरी यान्च्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन, आणि या स्मृती आमच्या मनात चिरकाळ नान्दत राहोत अशी इश्वरचरणी प्रार्थना! ("पुष्ठर्थ" या शब्दाच्या अचुकतेबद्दल शन्का हे)
|
Bee
| |
| Friday, June 02, 2006 - 4:02 am: |
| 
|
माधव गडकरी जरी आज सदेह नसले तरी त्यांचे साहित्य मात्र ह्यानंतर आमच्यासोबत असणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
|
Shonoo
| |
| Friday, June 02, 2006 - 12:05 pm: |
| 
|
लिम्बुटिम्बु तो शब्द पुष्टि + अ र्थ पुष्ट्यर्थ असा आहे जसे निमंत्रण पत्रिकेत प्रीत्यर्थ लिहीत तसेच
|
लिम्बु छान लिहिलेस रे... श्रद्धांजली अगदी मनापासुन...!!!
|
Asami
| |
| Friday, June 02, 2006 - 3:16 pm: |
| 
|
एकदम बिनचूक लिहिलेस रे LT. एक खंदा विचारवंत गेला
|
Ninavi
| |
| Friday, June 02, 2006 - 3:25 pm: |
| 
|
लिंब्या, चांगलं लिहीलंयस. माझीही श्रद्धांजली.
|
Admin
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:33 pm: |
| 
|
List of people directly affected by Blast catagorized by hospital http://www.mumbaipolice.org/images/news_cp/blast/blast.htm
|
२४ तासाच्या आत वेब वर माहीती ती ही नावा निशी. मुबंई पोलीसांचे अभिनंदन.
|
Bee
| |
| Monday, July 17, 2006 - 10:13 am: |
| 
|
अलिकडेच मुंबईमध्ये घडलेल्या ७ बॉम्ब स्फ़ोटात जे निरागस जीव गेलेत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. असा प्रसंग ईश्वर दुश्मनावर देखील न आणो
|
Mahaguru
| |
| Friday, July 28, 2006 - 2:22 pm: |
| 
|
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन 
|
Himscool
| |
| Monday, August 21, 2006 - 6:59 am: |
| 
|
ज्येष्ठ सनईवादक भारतरत्न उस्ताद बिसमिल्लाखाँ यांचे आज पहाटे वाराणसी इथे दुख:द निधन झाले
|
............. ................ ........... .......... ........... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
|
सगळेच क्षण ज्यांच्या सनईच्या मंजुळ सुरांनी साजरे केले त्या शहनाईनवाज उस्ताद बिस्ममिला खान यांना माझी श्रध्दांजली. सनईचे ते सुर अमर आहेत. काल जेष्ठ रंगकर्मी सखराम भावे यांचेही दुखद निधन झाले. माझी त्यांना श्रध्दांजली.
|
Nalini
| |
| Monday, August 21, 2006 - 3:41 pm: |
| 
|
भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण शहनाईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना तसेच जेष्ठ रंगकर्मी सखाराम भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 3:52 pm: |
| 
|
उस्ताद बिसमिल्ला खां साहेब तसेच सखाराम भावे यांच्या स्मृतीला भावपुर्ण अभिवादन.
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 4:26 pm: |
| 
|
पुर्वी आकाशवाणी संगीत सम्मेलनात त्यानी वाजवलेले मालकंस, तोडी, हमीर, बहार असे राग ज्यानी ऐकले आहेत त्याना ते स्वर विसरणे शक्यच नाही. एकेकाळी बिस्मिल्ला साहेबांची शहनाई लावली नाही, तर लग्नच लागल्यासारखे वाटत नसे. आताच रेडिओवर त्यांचा खास कार्यक्रम चालु आहे.
|
Arch
| |
| Monday, August 21, 2006 - 5:55 pm: |
| 
|
एकेकाळी बिस्मिल्ला साहेबांची शहनाई लावली नाही, तर लग्नच लागल्यासारखे वाटत नसे. >> अजूनही मला तसच वाटत, दिनेश. बिसमिल्ला खाँ त्यांच्या सनईने अजरामर झाले आहेत.
|
|
|