|
Bee
| |
| Wednesday, July 05, 2006 - 9:44 am: |
| 
|
रैना, केसरबाईंची सीडी आता विकत मिळते.
|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:51 pm: |
| 
|
हे मात्र माहित नव्हतं बी. Thanks . पुढच्या भारतवारीत शोधेन आता.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:52 pm: |
| 
|
माई रि, हे गाणे आधी मदनमोहनच्या आणि नंतर लगेच्च लताच्या आवाजात आहे माझ्याकडे. काय जान ओतलीय दोघानी.
|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 5:01 pm: |
| 
|
खरंय दिनेश- दोघांचेही सुंदर आहे- पण तुम्हाला कुठले जास्ती आवडते? मला मदनमोहन नी गायलेले जास्त आवडते.. त्यांच्या आवाजातला दर्द वेगळाच वाट्तो आणि जास्त अस्सल वाटते.. ते ऐकून असे वाटते की खरंच संगीतकारांच्या तोंडुन त्यांचेच गाणे ऐकण्यात मजा असणार
|
Manmouji
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:15 am: |
| 
|
please मला कुणितरी त्याचा राग सांगणार का?
|
Aaftaab
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:56 am: |
| 
|
रैना तुझ्या राजन पारीकरविषयीच्या प्रश्नान्ची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो १. मी त्यान्च्या जवळजवळ सर्वच मताशी सहमत आहे. त्यान्चा व्यासन्ग त्यान्च्या लिखाणातुनच कळतो. जसराजबद्दलही ते जे म्हणतात ते खरच आहे. माझे गुरुजीही तेच म्हणायचे प्रत्येक राग एकच पद्धतीने सादर करतात जसराज. राग गम्भीर असो, शान्त असो वा चन्चल असो, ते सगळ्याच रागान्मध्ये साधारण सारख्याच मुरक्या, खटके वगैरे घेतात.. रागाचा खराखुरा शास्त्रीय विस्तार करण एका बाजुला, त्यान्चा मुख्य हेतु श्रोत्याना रिझवण्याचा जास्त असतो.. अर्थात ह्याला त्यान्च्या काही मैफ़िली अपवाद असतीलही. (चुभूद्याघ्या) २. रामरन्ग यान्च्याबद्दल राजननेच लिहिले आहे की ते एक उत्तम शिक्षक आणि विद्वान जाणकार आहेत. त्यान्च्या मैफ़िलि वगैरे अशा जास्त झाल्या नसतील रेडिओवरच्या सोडुन.. शुभा मुदगल ही त्यान्ची शिष्या आहे.
|
Raina
| |
| Thursday, July 06, 2006 - 9:36 am: |
| 
|
Thanks Aftaabमला मान्य आहे की जसराज नेहमी Playing- for- the -gallery -type चे गातात्- पण दुस-या टोकाचे म्हणजे प्रभ अत्रे वगैरे.. त्या शास्त्रशुद्ध आणि काटेकोर गातात यात वाद नाही- पण ते गायन नेहमी रंजक होतेच असे नाही.. असो..कलाकराने अभिजात आणि लोकप्रिय याची सांगड घालायलाच हवी असे वाटते.. त्या पारिकरांची हेटाळणी युक्त टिका जरा खटकते.. म्हणजे जरा जसराजांच्या गायकीबद्द्ल आपले नक्की काय मुद्देसूद आक्षेप आहेत ते मांडायला हवे त्यांनी. असो त्यांच्या लेखनात नेहमी ते The naked emperor of SanRaefel येतात ते कोण आणि त्याचा संदर्भ काय हे ही विचारायचे होते http://www.sawf.org/Newedit/edit10012001/musicarts.asp
|
Supriyaj
| |
| Thursday, July 06, 2006 - 6:14 am: |
| 
|
माई री मै कासे कहु? रैना, thanks a lot for the lyrics and remembering a beautiful song १९७० मधला लताचा आवाज.. आणि त्याच्या आधीचा मदन मोहन चा अप्रतिम दर्दभरा आवाज.. कुणाला हे गाणे ऐकायचे असेल तर खालील लिन्क वर टिचकी मारा. http://www.musicindiaonline.com/l/17/s/movie_name.642/
|
Dineshvs
| |
| Thursday, July 06, 2006 - 5:21 pm: |
| 
|
रैना, मला मदनमोहनचे उच्चार थोडे खटकतात. लता हि फार तंत्रशुद्ध गायिका आहे, हे ईथेहि पटते. मनमौजी, बहुदा ते मिश्र रागावर आधारीत असणार, कारण कुठेतरी त्याच्या रागाचा उल्लेख झालाच असता.
|
Bee
| |
| Friday, July 07, 2006 - 4:05 am: |
| 
|
मला शास्त्रीय संगीताच खूपच नाही कळत पण शुभा मुद्गल ऐकताना खूप बरे वाटते. जीना इसिका नाम है मध्ये शुभा मुद्गलांची मुलाकत awesome होती. नुसत आवाजच चांगला नाहीतर लताप्रमाणे ती गातेही छान. मात्र चित्रपटांसाठी कधी गायली का माहिती नाही. पंडीत रविशंकर साठी लताची काही गाणी आहेत का? तीपण रागावरचीच असतील नक्की. मला वाटते 'ये दिन कैसे बीते, कैसे बिती रतीया' हे गाणे पंडीत रविशंकरचेच आहे लतानी गायलेली. हे गाणे अनुराधा मधले आहे. त्यातील सगळीच गाणी रविशंकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत असे वाटते. दुसरा चित्रपट गोदान. हा गोदान प्रेमचंदजींच्या कथेवरचाच आहे का? मला हे दोन्ही चित्रपट एकदा तरी बघायचे आहेत पण होते असे की सीड्या मिळत नाहीत कुठे.
|
Gajanan1
| |
| Saturday, July 08, 2006 - 6:54 am: |
| 
|
शुभा मुद्गल ऐकताना खरेच बरे वाटते. त्यान्चे अलि मोरे अन्गना हे गाणे कुठे मिळेल? कामसूत्र चित्रपटला त्यानी दिलेले सन्गीतही सुन्दर आहे.
|
Gajanan1
| |
| Saturday, July 08, 2006 - 12:30 pm: |
| 
|
वो जब याद आये.. बहोत याद आये.. पारसमणी राग यमन कल्याण
|
Dineshvs
| |
| Sunday, July 23, 2006 - 4:25 pm: |
| 
|
डॉ अलका देव मारुलकर, यानी सांगितल्याप्रमाणे माई री मै कासे कहु बैंया ना धरो ओ बलमा आणि हम है मताए ओ कुचा या तिन्ही गाण्यात चारुकेशी रागाची झलक आहे. मदनमोहनने, शुद्ध रागावर आधारीत गाणी कमी दिली, पण त्याने अनेक रागांचा खुबीने उपयोग करुन घेतला. एरवीहि हिंदी सिनेमाच्या गाण्यात शब्दाना ( त्या काळी तरी ) जास्त महत्व असल्याने, बहुतांशी गाणी रागात असण्यापेक्षा, रागावर आधारित असत.
|
Raina
| |
| Monday, July 24, 2006 - 9:01 am: |
| 
|
धन्यवाद दिनेश- राग माहित नव्हता.. मागे एकदा- सुमारे ८ वर्षापूर्वी अलका देव मारुलकरांचा मदनमोहनच्या पुण्यतिथीला टिळक स्मारक मध्ये सादर केलेला मदनमोहनच्या गाण्यावरील कार्यक्रम आठवला. तुम्ही पण तोच कार्यक्रम पाहिला का? मदनमोहन चा संगीतप्रवास फार सुरेख सादर करतात त्या.. त्या कार्यक्रमाला सुधीर गाडगीळांनी मध्येच येउन कारण नसताना जरा पुणेरी दाद दिली होती- "चांगला प्रयत्न आहे" प्रयत्न हया शब्दात समस्त पुणेरी खवचटपणा ठासून भरलेला ! असो.
|
Dineshvs
| |
| Monday, July 24, 2006 - 1:04 pm: |
| 
|
सध्या विविधभारतीवर सकाळी साडेसात वाजता त्या कार्यक्रम सादर करतात. आज सांगितल्याप्रमाणे यु हसरतोंके दाग, मैने रंगली आज चुनरिया आणि जाना था हमसे दुर तिन्ही पिलु रागात आहेत. मी स्वतः अलका देव मारुलकरांची मैफ़िल ऐकली आहे. तयारीच्या गायिका आहेत त्या. बहुतेक सगळ्या शास्त्रीय गायकगायिकाना लताबद्दल नितांत आदर आहे. अर्थात लतालाहि तो आहेच. लता ईतका गोड आवाज शास्त्रीय गायिकांचा क्वचितच असतो. रियाजामुळे तो तसा रहात नाही, तरिही लता कुठेहि गायकित कमी पडत नाही. अनेक रागदारी गाण्यात लताची तयारी दिसतेच, पण तिचे एखादा राग संपुर्ण गायला हवा होता. या कार्यक्रमात अलकाताईनी लताची गाणी स्वतःच्या आवाजात सादर केली. लताच्या गाण्यावर माझे कान पोसलेले असल्याने, एखाद्या श्रुतीची चुकदेखील माझ्या लक्षात येते, आणि कमी वकुबाच्या गायिका, जेंव्हा तिची गाणी गातात, तेव्हा तर मला संताप येतो. पण या कार्यक्रमात तसे झाले नाही. जर ऊणीव होती ती वाद्यवृंदाचीच, स्वरांची अजिबात नव्हती. शिवाय तेच गाणे मुळ रुपात लगेच ऐकवण्यात आल्याने, खात्रीहि करुन घेता येत होती. बाकि सुधीर गाडगीळबद्दल, नो कॉमेंट्स
|
Raina
| |
| Tuesday, July 25, 2006 - 1:58 am: |
| 
|
गजानन- ही लिन्क "अली मोरे अंगना" साठी. http://ww.smashits.com/music/pop/songs/750/total-hits.html अगदी खरे. अलका देव मारुलकरांचा आवाज शास्त्रीय गायिकांच्या मानाने गोड आहे.. आणि लताबाईंच्या खास मदनमोहन जागा अन जागा त्या प्रयत्नपूर्वक घेतात. मला तो कार्यक्रम एवढ्या साठी आवडतो की खूप माहितीपूर्ण आणि मुळातून मदनमोहन च्या संगीतातील सौंदर्यस्थानं चांगल्या रितीने समजावून सांगतात त्या. पण original गाणी ऐकली की असे वाटते की दुसरे कोणी तर सोडाच पण खुद्द लताबाईंनाच परत तसेच कधी गाता येणार नाही. मारुलकर बाईंचे "मै तेरी नजर का सुरुर हू" खास आहे. ती - "तेरे पास रहके भी दूर हु" मधील "रहके" ही जागा त्या फार सुरेख घेतात. (लता version of "मै तेरी", 'जब जब तुम्हे भुलाया' च्या आधीचे. Film जहाआरा.)
|
Manmouji
| |
| Tuesday, July 25, 2006 - 4:30 am: |
| 
|
दिनेश धन्यवाद. मी तीन दिवस ऐकला तो कार्यक्रम पण ' ते ' गाणे काही लागले नाही.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 25, 2006 - 4:13 pm: |
| 
|
रैना, त्या गाण्यात आशानेहि साथ दिलीय कि लताला, अगदी टुमरीसारख्या मुरक्या आणि हरकती आहेत दोघींच्या त्या गाण्यात.
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 9:22 am: |
| 
|
दिनेश, पंडीत रविशंकरांनी दिग्दर्शीत केलेले आणि लतानी गायलेले 'कैसे दिन बिते..' हे गीत कुठल्या रागात आहे.. मला आश्चर्य वाटते, लताचे एकही नाट्यसंगीत नाही..
|
Raina
| |
| Wednesday, July 26, 2006 - 9:52 am: |
| 
|
दिनेश. हो ना. लता-आशा दोघी लाजवाब ! बी- कैसे दिन बीते- राग खमाज
|
|
|