|
नुकत्याच लागलेल्या बारावी रिझल्ट नंतर काही ठरावीक कॉलेजेस आणि कोर्सेस साठी मुलामुलींची होणारी झुंबड पाहिली आणि दरवर्षी सारखच अस्वस्थ व्हायला झालं. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स मधल्या कोणत्याही एका faculty मधे प्रवेश घेतल्यावर त्या नंतर फार कमी मुलेमुली चाकोरीबाहेरच्या करिअर्स कडे वळतात. पालकांचा दबाव हेही एक कारण असू शकते. पण फक्त तेच एक कारण असते का? जागरुक पालकही बरेचदा मेडीकल, इंजिनियरींग चक्रातच अडकताना दिसतात. नव्या संधी अथवा मार्गांबद्दल पालकांना वा मुलांना माहितीच नसते असे खरेतर होऊ नये. वर्तमानपत्रे, मासिके वगैरे ह्या निकालाच्या कालावधीत नियमाने विशेष पुरवण्या काढत असतात. करिअर विशेषांकच निघतात. इतरवेळी सुद्धा दैनिकांच्या आठवड्यातून किमान एकदा तरी पुरवण्या निघतातच ह्या विषयावर. मग तरीही असे का व्हावे? मुले एकेका वर्षी एकेक fad जणू डोक्यात घेतात. गेली दोन वर्षे सायन्सच्य मुलांच्या डोक्यात बायोटेकचे आणि इतरांच्या डोक्यात BMM चे वेड आहे. मग saturation होते. शिवाय टॉपर्स सोडले तर इतर average मुलांची खरच कधीकधी केविलवाणी अवस्था होते. बरेचदा माहितीचा इतका मारा होतो की त्यातून काय निवडायचे ह्याबाबतही गोंधळ उडतो आणि ' महाजनो येन पंथस्य...' उक्तीनुसार रुळलेल्या वाटाच निवडल्या जातात. तसे होता कामा नये. महाराष्ट्राबाहेरच्याही करिअर्स मुलामुलीनी दुर्लक्षू नयेत. काळाची ही गरज आहे. ह्या नव्याने उघडलेल्या thread वर त्या अनुषंगाने विचार व्हावा. नुसता विचार नाही तर feedback माहितीही दिली जावी. नव्यांना मार्गदर्श आणि इतरांना माहिती ह्या हेतूने. नवे मार्ग चोखाळतानाच त्या मार्गावरच्या संधी, खाचखळगे वगैरेचीही माहिती व्हावी. चांगल्या करिअर्स दुर्लक्षील्या जाऊ नये हा ह्या चर्चांचा हेतू असावा.
|
आपल्या देशात नैसर्गिक वनसंपत्ती मुबलक आहे. पण त्याचा फायदा बहुतेकवेळा देशाबाहेरच्या औषधी किंवा प्रसाधन कंपन्या उठवताना दिसतात. शिवाय त्यांना फक्त फायद्याशी मतलब असतो. वनसंपत्तीची बेसुमार तोड होऊन ती नाहीशी झाली तरी त्यांना काही देणे घेणे नसते. पण आपणच जर डोळसपणे ह्या वनौषधीच्या क्षेत्रात काही करायचे असेल तर? सर्व जग आज नैसर्गिक वनौषधींच्या वापराकडे चुंबकाप्रमाणे खेचले जात आहे. परंपरागत उपचार हवेत पण ते आधुनिक शास्त्राला मान्य असावेत. आधुनिक प्रसाधने परंपरागत तंत्राशी जुळायला हवीत. ह्याची सांगड घालून हर्बल मेडिसिन्स, हर्बल कॉस्मेटीक्स, नैसर्गिक सुगंधी तेले, नॅचरल फूड, फ्लेवर्स, नॅचरल कलर्स ह्या सर्वांच्या निर्यातीत तसेच ह्या क्षेत्रातील प्रशिक्षित, कुशल, सक्षम व्यक्तीस देशविदेशातून आज प्रचंड वाव आहे. पुढच्या दहा वर्षांत तर हे मार्केट अक्षरश्: explode होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. वनौषधींचा वापर कसा करावा ह्याबाबत बरेचदा उत्सुकता असूनही माहिती नसते. परदेशात रहाणार्यांनाही ही माहिती आपल्याला असती तर खरच बरं असं वाटत. डॉ. उर्जिता जैन ह्या वनौषधींच्या क्षेत्रात आदराच व मानाच स्थान मिळवून आहेत. त्यांनी नुकतेच अनेक छोटे व मोठे कोर्सेस ह्या वनौषधींच्या क्षेत्रात करिअर करता यावी ह्या हेतूने सुरु केले आहेत. त्या बद्दल माहिती अशी ... हर्बल सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी मधे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस बारावी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स ( बॅचलर ऑफ़ हर्बल सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी ) , डिप्लोमा इन हर्बल सायन्स, पोस्ट ग्रॅज्युएशन इन हर्बल सायन्स असे हे कोर्सेस आहेत. हर्बल कॉलेज हे हर्ब्स ने परिपूर्ण क्षेत्रातच हवे. फळ्यावर गुळवेलीचे नुसते चित्र काढून त्याबद्दल शिकता येत नाही. छोट्या छोट्या कमलकर्णिकेसारख्या फळांनी लदलेल्या अनेक अर्जुन वृक्षांखाली अर्जुनाविषयी जाणणे किंवा बहरलेल्या पळसाजवळ, बहाव्याजवळ, विजयसार, करंज, रिठा, आवळा, हिरडा, बेहडा अशा अनेक वृक्षांशी गप्पा मारत त्यांची माहिती करुन घेण्याचा अनोखा अनुभव मुलांना घेता यावा ह्या हेतूने डॉ. जैन ह्यांनी कॉलेजची स्थापना त्यांच्या चैतन्य वनातच केली आहे. धुळ्यापासून जवळ सोनगिर येथे हे वन आहे. सुसज्ज हॉस्टेलही त्यासाठी आहे. जर कुणाला फक्त सहा दिवसांचा निवासी कोर्स करायचा असेल ( देशी वा विदेशी कोणाही करता उपलब्ध ) तर तसाही कोर्स डिझाईन केला आहे. संधी: ह्या कोर्स नंतर विविध क्षेत्रात नोकर्या तर उपलब्ध आहेतच पण जर तरुणांना रिसर्च लॅब काढायची असेल, कॉस्मेटीक्सची उत्पादने, विक्री, वितरण, निर्यात, लघूद्योग, हर्बल सायन्स शिकवण्याचा शिक्षकी पेशा, ब्युटीशियन्सना त्यांचे कौशल्य व तंत्रज्ञान सुधारुन त्यांचे स्वत्:चे प्रॉडक्ट्स बनवता येतील. हा कोर्स आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठ्ही खुला आहे आणि त्यांच्या साठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत. चिनी, जपानी आणि युरोपियन विद्यार्थ्यांचे वाढते आकर्षण ह्या कोर्स ला लाभत असताना भारतीय विशेषत : महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी केवळ कोर्सची माहिती नाही म्हणून मागे पडू नये असे वाटते. इन्स्टीट्युट ऑफ हर्बल सायन्स आणि डॉ. उर्जिता जैन वनौषधी केन्द्रातर्फ़े काही छोट्या कार्यशाळाही घेतल्या जातात. ज्यात केस, त्वचा, दात, डोळे ह्यांचे सौंदर्य आणि स्वास्थ्यरक्षण आणि संवर्धन, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन, पर्यावरण, प्रदुषणमुक्ती, सुगंधी तेले त्यांचे उत्पादन आणि वापर, ऍरोमा थेरपी चे फ़ॉर्म्युले, मसाज वगैरे, मड थेरपी, लीच थेरपी, रुद्राक्ष थेरपी शिकणे वगैरे गोष्टी ही ह्यांत अंतर्भुत आहेत. संपर्कासाठी पत्ता -- चैतन्यवन कॉलेज ऑफ हर्बल सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, सी - १०२, इस्टर्न कोर्ट, १ ला मजला, तेजपाल रोड, स्टेशनजवळ, ( विलेपार्ले ) ,पूर्व मुंबई ४०००५७ फोन : २६१०४८१८ / २८५०१६९७ फॅक्स : २६१३२३२५ ईमेल : instituteofherbalscience@indiatimes.com .
|
Bee
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:37 am: |
| 
|
शर्मिला, छान. ही चर्चा views and comments मध्ये अधिक शोभून दिसेल असे वाटते. मी नंतर ह्यावर लिहिन..
|
Dineshvs
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:54 pm: |
| 
|
मी अगदी पहिल्यापासुन डॉ. उर्जिता जैन यांचे कार्यक्रम बघत आलोय. लेख वाचत आलोय. या सर्व वृक्षवल्लींची नुसती ओळख करुन घेणे सुद्धा, आनंददायी ठरेल.
|
मला घरी बाग करायचि आहे..कळ्ल नाही कुथे लिहु ते म्हनून इथे तकतेय. मी सदाफ़ुलिच्य अन्द चमेलिच्या झाडाने सुरवात केलीय. घरच्या घरी लावता येतील अशी भाज्या फ़ळ कुणी सान्गेल का?
|
|
|