|
मृण्मयी, अगं हे माझ्या लक्षात आलंच नाही... मधल्यामधे पटवापटवी... अमेय, तो मेनू माणशी एक असा मोजून आणला होता ना? म्हणून तर भाईना तो द्यावा लागला.. माणसा, अरे फोटो बघुन हसतोस काय? आमची तोंडं एवढी विनोदी कुठे आहेत? आणि बडे, तिथे केस काळे करण्यासाठी उपाय आहेत. पण पांढरे कसे करायचे? बघा, नुसता वृत्तांत वाचून हसता आहात, आला असता तर... (हे वाक्य प्रत्येकाने त्यांना हवं तसं पुरं करावं ...) 
|
Ninavi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 3:46 pm: |
| 
|
>>>> आता एक प्रश्ण: निनावी, भाईंच्या entry ला जोरदार टाळी... मृण्मयी, अगं स्टेजवर सोफा दिसला नाही तेव्हा मला वाटलं होतं की भाई NJ करांच्या ब्रीदाला जागून एकांकिकेलाही आलेच नाहीत की काय. त्यामुळे त्यांची एन्ट्री झाल्यावर नकळत टाळ्या वाजवल्या मी ( एकटीनेच). विनय आलाय हे माहीत होतं त्यामुळे त्याचं काही विशेष नाही वाटलं. अमेय, मराठीत एक शब्द आहे. ' संकोच'. 
|
Lalu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:28 pm: |
| 
|
अभिनन्दन विनय आणि भाई. नाटक छान पार पडलेलं दिसतंय. VCD पाठवून द्या. म्हणजे मला घरी स्वस्थपणे (आणि त्रयस्थपणे) पहाता येईल. निनावी, मस्त लिहिलंयस. माझ्यामुळे तुला एवढा छान कार्यक्रम बघायला मिळाला, आता ती कसली झालर का किनार लागली म्हणून काय झालं.. नेलेले लाडू स्वतःच खाल्लेस का काय पोट भरलं नाही म्हणून.
|
विनय, भाई अभिनंदन! निनावी LOL मस्तच लिहिला आहेस वृत्तांत. मूडी तू टेन्शन घेऊ नको! आणखी थोडा धीर धरून तसेच म्हणत राहा. तुला एक परदेसाई भेट मिळेल! पण क्रेडीट मुंबईकरांकडे हां विनय, VCD पण केलीय का? मग येताना घेऊन या. आम्हीही पाहू.
|
मस्त लिहीलंय दोघांनी पण! वो बसंती का फोटू निकाल्या था ना... डाल्या नहीं क्या अब तक?! 
|
Zakki
| |
| Wednesday, May 31, 2006 - 10:12 pm: |
| 
|
वृत्तांत फारच छान लिहिला आहे. कदाचित् एकांकिकेपेक्षा वृत्तांत जास्त मनोरंजक असावा असे वाटते, कारण आजकाल मला गंभीर विषय पेलत नाहीत. नथूराम गोडसे एकांकिकेचे कलाकार मी अनेक वर्षांपासून ओळखतो. सुचेता साठे या बर्याच वर्षापासून रंगभूमीवर येताहेत, त्यांचे 'ती फुलराणि' या नाटकातील फुलवाली चे काम इतके छान झाले की उपस्थित असलेल्या भक्ति बर्वे यांनी सुद्धा तिची प्रशंसा केली. गेल्या बिचार्या (भक्ति बर्वे!). गुन्हेगार नाटकाचे दिग्दर्शक शरद साठे हि माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. त्यांचे 'चौकटचा राजा' हे नाटक फारच उत्कृष्ट झाले होते. त्यातहि सुचेताचे नि तो कोण तो त्यांच्याबरोबर नेहेमी काम करणारा (नाव आठवत नाही, विनयला माहित असेल कदाचित) यांची कामे उत्तम झाली. माझ्या मित्रांनी सुद्धा (शरद साठे, सुचेता (ती पण साठेच, नाते नाही!)वगैरे) शोले नाटक छान झाल्याचे सांगितले. विशेषत: गब्बर सिंग याच्या entry ची खूप स्तुति केली. छान, छान. असेच चालू द्या!!
|
Ninavi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 11:26 pm: |
| 
|
क्ष्क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष्क्ष हा घ्या बसंतीचा फोटो.. सोबत जय आणि तोंडाला काळे फासलेला विनय.

|
Badbadi
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:03 am: |
| 
|
बसंती कडे धन्नो नव्हती का??
|
Arun
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:37 am: |
| 
|
अभिनंदन विनय, अनिलभाई आणि वाटसरू ............. निनावी (हिला हिच्या खर्या नावाने संबोधावे काय ??? ) आणि विनय : वृतांत मस्तच जमलाय. .......
|
Zakki
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:43 am: |
| 
|
तर त्या नाटकांत (ती फुलराणी, चौकटचा राजा इ.) काम करणार्या नटाचे नाव विशाल छेडा
|
निनावे( चे खरे नांव), तू सगळेच्या सगळे फोटो De-focus करायची करामत कशी काय केलीस? मला नाही जमत हे. तिकडे फोटोच्या BB वर टाक ना माहीती.. सर्वांना उपयोग होईल.... बडे, बसंतीला धन्नोचा डब्बल रोल द्यायचा होता पण.. . ... आणि आभार सगळ्यांचे, अभिप्रायाबद्दल.... 
|
Moodi
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:01 pm: |
| 
|
गजानन मुंबईकरांना का रे क्रेडीट द्यायचे? विनय जन्माने पुणेकर आहे की. 
|
Ninavi
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:13 pm: |
| 
|
>>>> (हिला हिच्या खर्या नावाने संबोधावे काय ??? ) चालेल ना. मग मी पण तुला तुझ्या खर्या नावाने संबोधेन हां!! ( अरे, तुझं खरं नाव पण अरुणच आहे, नाही का? विनय, आता मीच माझ्या कौशल्याबद्दल बोलायचं म्हणजे... 
|
Chinnu
| |
| Thursday, June 01, 2006 - 8:38 pm: |
| 
|
निनावी, विनय मस्त सफ़र घडवुन आणलीत या वृतांताने. छान वाटले वाचुन.
|
Arun
| |
| Friday, June 02, 2006 - 4:25 am: |
| 
|
तुझं खरं नाव पण अरुणच आहे, नाही का? >>>>>>> अरे व्वा. म्हणजे तुला माझं खरं नाव माहित आहे तर ..............
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 5:11 pm: |
| 
|
विनय, बसंतिचे अनेक जोक्स नंतर प्रचलित होते. ऊदा : बसंति, ईन कुत्तोंके सामने मत नाच. कैसे न नाचु, पैसे जो लिये है &^^&^ आणि धन्नोचा ज्योक तर भन्नाटच आहे, पण ईथे लिहिण्यासारखा नाही.
|
वा! बसंतीचा फोटू पण भारी! विनय, फक्त 'शांता' महाडकर शांता वाटला.>>>>> "हाय दैवा, काय झाले, लोपल्या का तारका??" ला हशा पिकला का भरपूर? 
|
जय, बसंती आणि तों. का.फा.विनय यांचा फोटू एकदम झकास! ही कुठल्या fade pack ची जाहिरात हो विनय?
|
मावळोनी चंद्र गेला तारकाला यमक जुळत नाहीय हो.... मृण्मयी, अगं निनावीने आम्हा सगळ्यांना Fade out केलं म्हणून Fade Pack काय म्हणतेस? ती काळी शाई आहे, डाकू होण्यासाठी...
|
तारकाला यमक जुळवायचय ना, मग हे घ्या.. खारका बारका चिरका सारखा..वगैरे वगैरे विनय, आता डाकू व्हायला (फक्त) तोंडाला काळी शाई लावावी लागते हे नव्हतं हो मला माहिती!
|
अगं खारका कवितेच खडबडीत लागतात... आणि वृत्तीने मनुष्य डाकू असला की फक्त शाई लावलेली पुरते.. (ती वृत्ती मी Acting करून दाखवत होतो.. नाहीतर मलाच डाकू समजशील) 
|
|
|