|
Moodi
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:22 am: |
| 
|
प्रत्येकवेळा त्यांच्याबद्दल वाचताना सारखे डोळे भरुन येतात. सूडाने नेमके काय साध्य होते? पश्चाताप? दुख? की विकृत समाधान? भाऊबंदकी कधी हद्दपार होणार समाजातुन? ज्या आईने हे बघितले तिला काय वाटत असेल..... परमेश्वर महाजन अन मुंढे कुटुंबीयाना या दुखाःतुन सावरण्याची ताकद देवो. महाजनांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.
|
आजचे स्वगत्: घात हा घातच असतो तो कुठुनही होतो, त्याला दिशेचे बन्धन नाही! तो कशानेही होतो, त्याला शस्त्राचे बन्धन नाही! तो कुठेही होऊ शकतो, त्याला स्थळाचे बन्धन नाही! तो कधिही होऊ शकतो, त्याला काळाचे बन्धन नाही! तो कशासाठीही होऊ शकतो, त्याला उद्देशाचे बन्धन नाही! तो कुणाचाही होऊ शकतो, त्याला नात्याचे बन्धन नाही! आणि, असला अनिर्बन्ध असतो म्हणुन घात शेवटी घातच असतो..... तो अनिर्बन्ध असतो, त्याला क्षमेचेही बन्धन घालुन चालत नाही!
|
Charu_ag
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:38 am: |
| 
|
मला तर अजुन खरचं वाटत नाहीये. एवढा उमदा माणुस. शत्रुलाही वार करताना विचार करायला लावेल अस व्यक्तीमत्व. पण इथे तर सख्खा भाऊच. विश्वासच बसत नाहीये. अस व्हायला नको होत.
|
एवढ चांगले व्यक्तिमत्व असताना काय बरे कारण असेल की सख्या भावाने खुन करावा? खाहीच कलत नाही नात्यातील complications ? दुखद झाले.
|
Abhijit
| |
| Friday, May 05, 2006 - 7:03 am: |
| 
|
अजून एक वाईट बातमी.. महान संगीत दिग्दर्शक नौशाद यांचे निधन. अंदाज, दुलारी, कोहीनूर, मुगल-ए-आज़म, बैजू बावरा, मदर इंडीया, लीडर, गंगा जमुना, राम और श्याम, मेरे मेहबूब, पाकीज़ा. अविस्मरणीय संगीत.. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा आणखी एक शिल्पकार हरपला... :-( माझी विनम्र श्रध्दांजली.
|
Dineshvs
| |
| Friday, May 05, 2006 - 2:49 pm: |
| 
|
नौशादजीना माझी श्रद्धांजली. अगदी विनम्र माणुस. अभिजीत. पाकिजा चे संगीत गुलाम मोहोम्मदचे, नौशादने फक्त पार्श्वसंगीत, आणि त्यासाठी वापरलेल्या ठुमर्या केल्या. अर्थात तरिही तो श्रेष्ठ होताच.
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 3:22 pm: |
| 
|
नौशाद गेले अन अभिजात संगीत हरपले. भावुकता अन तरलता याची विलक्षण जोड अन समज होती त्यांच्या संगीतात. रागदारीची सखोल जाण होती.त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
|
|
|