|
Pama
| |
| Wednesday, December 14, 2005 - 6:43 pm: |
| 
|
sadabahar AiBanaoto sauQaIr jaÜXaI yaaMcao inaQana. KUp vaaT Jaala. maaJao far AavaDto AiBanaoto hÜto
to.
|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 6:46 pm: |
| 
|
अरेरे फार लवकर गेले मग, कॉमिक अन गंभीर दोन्ही भुमिकात जीव ओतायचे. देव त्याना शांती देवो. 
|
Manee
| |
| Wednesday, December 14, 2005 - 6:47 pm: |
| 
|
हो, फारच वाईट झालं. फक्त सत्तावन्न वर्षांचे होते ते. 
|
Paragkan
| |
| Wednesday, December 14, 2005 - 8:19 pm: |
| 
|
छ्या .... 
|
Amitpen
| |
| Thursday, December 15, 2005 - 1:51 am: |
| 
|
अरेरे!!...खरोखर वाईट वाटलं....जुने चांगले लोक गेले कि त्यांची जागा घ्यायला कोणीच नाही असं वाटतं....
|
Chinnu
| |
| Thursday, December 15, 2005 - 3:03 am: |
| 
|
खुप चांगला माणुस तो! रस्त्यात थंबवुन बोललो तरी आढेवेढे न घेता बोललेत कधी काळी!
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 3:11 am: |
| 
|
मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीतला एक चांगला कलाकार गेला.. सुधीर जोशिंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..
|
.... .... .... ...
|
Priya
| |
| Thursday, December 15, 2005 - 12:53 pm: |
| 
|
रामानंद सागर यांचही निधन झालं १३ डिसेंबरला.
|
Storvi
| |
| Friday, December 16, 2005 - 12:59 am: |
| 
|
.. .. ..
|
Moodi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:35 am: |
| 
|
आपले तरुण नेते श्री प्रमोद महाजन हे आज आपल्यात नाही राहिले, फारच दुख्:दायक बातमी आहे ही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
|
Aappa
| |
| Wednesday, May 03, 2006 - 12:28 pm: |
| 
|
There can not be a sad day for the nation today. Mr. Mahajan was one of the probable candidate to lead the country in near future.Besides his family, its a Big Big loss to the Nation.
|
फ़ार वाईट झाले! 
|
Tulip
| |
| Wednesday, May 03, 2006 - 6:46 pm: |
| 
|
काळजाला चटका लावून गेला इतक्या उमद्या नेत्याचा हा दुर्दैवी मृत्यू. बारा दिवस इतकी शर्थीची झुंज दिली पण .... very sad!
|
Svsameer
| |
| Wednesday, May 03, 2006 - 7:58 pm: |
| 
|
खरंच दुर्दैवी घटना. राजेश पायलट, माधवराव शिंदे आणि प्रमोद महाजन अश्या सारख्या तरुण राजकारणी नेत्यांचा अकाली, अपघाती मृत्यु हे भारताचे कधी ही न भरून येणारे नुकसान आहे. महाजन याना माझी विनम्र श्रद्धांजली.
|
Storvi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 9:00 pm: |
| 
|
SVS exactly हेच विचार आलेले माझ्याही मनात..
|
Its really very bad news
|
Badbadi
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:18 am: |
| 
|
.. .. .. .. धाकट्या भावाकडून मारलं जावं?? he was a very good administrator.. ठाकरेंना convince करणं सोपं नव्हतं
|
Deemdu
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:18 am: |
| 
|
महाजन गेले फारच वाईट घटना. एक चांगला नेता देशानी गमावला आणि तेही इतक्या क्षुल्लक कारणासाठी त्यांच्यावर आलेल्या संकटातून महाजन वाचतील अस वाटत होतं, पण अखेर देवाने त्यांना नेलेच. प्रमोद महाजन यांना श्रध्दांजली
|
शेवटी नको ती बातमी येवुन थडकलीच! त्यान्ना फार जवळुन कधी बघितल नाही पण ते सामान्य कार्यकर्त्यापासुन सामान्यजनान्पासुन फार दूर हेत असही कधि भासल नाही. गरीबीतुन वर आल्यामुळे निर्माण होऊ शकणारा द्वेष, अहन्कार, चिडचिड त्यान्च्यात कधी दिसलीच नाही. आणि परिस्थिती सुधारली तरी नाही सोडली त्यान्नी मध्यमवर्गीय सन्स्कृतीची कास की नाही अपुर्णता ठेवली कुटुम्बाची कर्तव्ये निभावण्यात. गचाळ, ढोन्गी, सन्धिसाधू, स्वार्थी, मतलबी राजकारणात स्वःच्छ हाताचाचा नेता अशी प्रतिमा राखण्यात व तसे जगण्यात कमालीच यशस्वी झालेले त्यान्चे व्यक्तिमत्व मुशीतुन काढलेल्या झळाळत्या सोन्यासारखे होते. आणि म्हणुनच का हो दुर्मिळही होते? आणिबाणितल्या तुरुन्गवासाचाही उपयोग शिक्षण व सन्घटनेच्या प्रगतीच्या सन्धी शोधण्यात होऊ शकतो हे सिद्ध करणारे असन्ख्यजण तेव्हा होते, त्या सर्वान्चे मेरुमणी म्हणुन शोभले ते. सन्घाबरोबरच्या दुहेरी सदस्यत्वाच्या वादामुळे केवळ सत्तेतुनच नव्हे तर राजकारणातुनही बाहेर फेकल्या गेलेल्या त्यान्च्या विचारधारेतील राजकीय पक्षास १९८४ च्या लोकसभेच्या दोन जागान्पासुन लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनविण्यामागचे समन्वयकाचे काम बजावणारे, रामजन्मभूमी आन्दोलनात तनमनधनाने स्वतः उतरुन इतरान्ना प्रोत्साहित करणारे, अनेक राज्यात अनेकान्शी युत्याप्रतियुत्या करीत सन्घटनेचे कार्य रुजवणारे, आणि असे करुनही कायमच प्रसिद्धीच्या झोतापासुन स्वतःला दूर ठेवणारे अशा अनेक रुपात त्यान्चा परिचय घडतो. स्वकर्तुत्वाने त्यान्नी आभाळायेवढी उन्ची गाठली पण त्यान्चे पाय जमिनीवरच खम्बिरपणे रोवलेले होते. पन्तप्रधानपदाच्या शर्यतीत ते स्वतःहून कधीच नव्हते, वाजपेईन्चे लक्षुमण होते ना ते? पण सर्वजण मनोमन त्यान्नाच पन्तप्रधानपदाचा बीजेपीचा पुढिल उमेदवार मानत होते! आणि येवढे उत्तुन्ग व्यक्तिमत्व असतानाही ती बातमी यावी ना? आम्ही म्हणतो की पेशवाईतील काका मला वाचवाच्या किन्काळ्या अजुनही आमच्या काळजाला घरे पाडत असतानाच भाऊबन्दकीची काळीमा फासणारी ही कृर निती कोण कशी काय शिकले? कोणी शिकवली? पेशवाइतला ध चा मा करणारा काळीमा आम्ही अजुन विसरलो नसतानाच हा कठोर आघात का व्हावा? शेवटी प्रत्येक श्रेष्ठ पुरुष हा नेहेमीच एकटाच असतो! नव्हे नव्हे त्याने एकटेच रहायला लागत! अन्यथा ओझ्याच्या गाढवाप्रमाणे, त्या श्रेष्ठ पुरुषाकडुन अवाजवी अपेक्षान्चे ओझे वाहुन नेण्याची खबरदारी घेणारेच असन्ख्य क्षुद्र जीव ओझ्याच्या गाढवाप्रमाणेच त्या श्रेष्ठ पुरुषाचे जगणे हराम करतील.. नव्हे त्याने एकटेच रहायला हवे होते... सर्व समाजाकरीता, कुटुम्बाकरीता, आणि तरीही सगळ्यान्पासुन दूऽऽर... कोठे तरी रानावनात रहाणार्या साधू सन्तान्प्रमाणे! म्हणजे तरी त्यान्च्या जीवावरचे सन्कट टळले असते! आत्यन्तीक श्रेष्ठत्वापुढचे लाचार, ओन्गळवाणे, हिडीस, घातक असे कनिष्ठत्व सिद्ध झाले! पण या पद्धतीने? हा दैवदुर्विलास हे! शेवटी नको ती बातमी येवुन थडकलीच! झालेली हानी, निर्माण झालेली पोकळी भरुन येणे अवघड हे! पण निसर्गाला पोकळी अमान्य हे आणि एक सैनिक धारातिर्थी पडल्या वर जसा दुसरा त्याची जागा घेतो, तसेच जे कोणतरी त्यान्ची जागा घेऊ पहातील त्यान्ना प्रोत्साहन देवुन त्यान्ची साथ करणे हीच महाजनान्करता श्रद्धान्जली ठरेल! प्रमोद महाजन यान्च्या स्मृतिस विनम्र अभिवादन करुन हे चार शब्द त्यान्ना समर्पित.
|
|
|