Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2006

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे » Archive through January 29, 2006 « Previous Next »

Rakhalb
Wednesday, December 21, 2005 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की स्वर अनुभवण्यासाठी केवळ कानाचा उपयोग पुरेसा नाही. स्वरान्ची योजना आणि अनूभूति experience ) ही brain मध्ये सुद्धा व्हायला लागत असली पाहीजे.
असे म्हणणयाचे कारण की गाणे म्हणताना तुम्हाला कदाचित जाणवेल कि गाण्यातील एखादा शब्द त्याच्या स्वरावर उच्चारला की त्याच्या पुढचा शब्दशी associated स्वर आपोआप स्फुरतो आणि तो शब्द त्या स्वरावर गळ्याद्वारे उमटतो. याचा अर्थ, गायक त्या स्वरान्ची अनूभूति मेन्दूने देखील घेतो. गायकाच्या सन्दर्भात कानाचे कार्य त्यानन्तर येते.


Gajanandesai
Thursday, December 22, 2005 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rakhalb हो बरोबर आहे तुमचे. कानाशिवाय आपल्याला ऐकण्याची अनुभूती येऊ शकते. तसेच डोळ्यांशिवाय आपल्याला प्रकाशाची अनुभूतीही येऊ शकते. गंधज्ञानाचेही तसेच. योग्य अशा विद्युत लहरींनी मेंदूतील संबंधीत केंद्रे उद्दिपीत करून हे शक्य आहे असे वाचल्याचे आठवते. हे सगळं आपण मेंदूतच अनुभवत असतो.
कान, नाक, डोळे इत्यादि इंद्रीये मेंदू पर्यंत या संवेदना नेण्याचे कार्य करतात. आणि म्हणूनच ती जेवढी सशक्त / निरोगी तेवढे संवेदनांचे आकलन अचूक होते.
CBDG


Rakhalb
Thursday, December 22, 2005 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ek utkrushta website aahe, jyaa ver bharamsaaTh hindustani classical music (audio aani video donihi) hosted aahe. Barech rare ase music piece aahet. Hi website tyaa ver asalelyaa gaaNyaanchyaa ownercheech aahe, tyaa mule copyright vagairey chi bhaangad naahi.
Hope you all enjoy it.

http://homepage.mac.com/patrickmoutal/macmoutal/rag.html

VaakhaaNaNyaa saarkhi ek goshta mhanje haa vyaasanga karnaaraa maaNus moolchaa French aahe, aani Banaras laa raahun tyaane javal-javal 20 varshe Sitar che shikshaN ghetale aahe.

Ithala sangraha kasaa vaatala tey kalavaa.

Maya1234
Friday, December 23, 2005 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

knowck knowck !!

ithe fakta marathitun lihilela ch prashna wachla jato ka..??
jar tase asel tar me majha prashna punha vicharte - ithe aslelya znyani lokanna mahit ahe ka..ki ashashtriaya sangita sathi riyaz kartana..aawajat gamak kase anayche??

Abhimj
Monday, December 26, 2005 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार
गीत रमायणातील गाणि कुठल्या रागात आहेत व कुठल्या तालात आहेत ह्या बद्दल कोणाला माहिती आहे का?


Rakhalb
Tuesday, December 27, 2005 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maya1234, I found some interesting information on practicing gamak on this website:
http://www.carnatica.net/ragasystem.htm

Hope this helps.

Girishmusic
Tuesday, December 27, 2005 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माया १२३४, तुम्ही एक गाणे ऐकले आहे का?
'आखो मे क्या जी, रुपहला बादल..
बादल मे क्या जी, किसी का आचल..
?? या गाण्यात, लताच्या आवाजात एक आलाप आहे. त्या आलापाप्रमाणे प्रत्येक स्वर डबल लावण्याचा रियाज कर. हळुहळू गमक येईल आवाजात. बेस्ट लक!!


Maya1234
Wednesday, December 28, 2005 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you guys !!

hmmm....me e tumhi sangiitalya pramane riyaaz karun pahin..

riyaaz cha vishay nighala mhanun ajun ek prashna - aawajala ghumar yenyasathi kuthla riyaaz karawa..?

thanks

maya

Dineshvs
Tuesday, January 03, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशवाणीने, रेडिओवर सादर झालेल्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग सीडीच्या रुपात विक्रीस आणले आहे. पंडित पलुस्कर, पंडित ओम्कारनाथ ठाकुर, सिद्धेश्वरी देवी, पन्नालाल घोष, व्ही जी जोग, एम एस सुबलक्ष्मी, असे अनेक कलाकार आपल्यासाठी परत अवतरले आहेत. या दिग्गज कलाकारांच्या संगीताबद्दल काहिहि लिहिण्याचा मला अधिकार नाही. पण दोस्तानो अवश्य संग्रहि ठेवावा असा खजिना आहे हा. जवळच्या आकाशवाणी केंद्रावर चौकशी करा.

Rakhalb
Wednesday, January 04, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, dineshvs ! तसेच, चांगला online संग्रह इथे सापडेल:
www.parrikar.org . परंतु ही website commercial music साठी नसून रसग्रहण आणि रागांच्या चिकित्सेसाठी आहे.

Dineshvs
Wednesday, January 04, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गायनाचार्य पलुस्करांची जी गाणी एच एम व्ही ने प्रसिद्ध केली होती, ती म्हणजे रेकॉर्डसाठी गायलेली तीन तीन मिनिटांची होती. ते गायन ईतके चमकदार होते, कि त्याना तबियतीने गाताना ऐकायची फ़ार ईच्छा होती.
या संचात रेडिओ संगीत सम्मेलनातले गायन असल्याने, फ़ारच सुंदर आहे ते. शिवाय गझलांमधे ऑडियन्सची हकनाक वाहवा असते तशीहि नाही.


Zakki
Wednesday, January 04, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी इच्छा आहे, की फक्त पहाटेचे राग, सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग नि रात्रीचे राग अश्या वेगवेगळ्या सीडीज असाव्यात. तश्या कुठे मिळतील? तर तसे संगीत कुठे मिळेल का? मला भीमसेन, जितेंद्र अभिषेकी, संजीव अभ्यंकर, जसराज, किशोरी आमोणकर यांची गाणी आवडतात. जुगल गायकी, सि. आर. व्यास हे फारसे आवडत नाहीत. माझ्याजवळ काही सिडी नि टेप्स आहेत त्यात यमन नि तोडी एकाच टेपवर!


Dineshvs
Thursday, January 05, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मी वर लिहिलेल्या आकाशवाणी संगीतात तशीच योजना आहे.
सकाळचे भैरव, तोडी, बिलावल, भटियार
दुपारचे सारंग आणि त्याचे प्रकार
संध्याकाळचे मारवा, पुरिया
आणि बाकिचे रात्रीचे असे राग निवडुन स्वताचे कलेक्शन करणे जास्त चांगले.
नेटवर एक फ़्रीरिप नावाचे सॉफ़्टवेअर आहे, ते वापरुन CD वरुन MP3 करता येतात. आणि मग असे संग्रह करणे सोपे जाते.


Zakki
Friday, January 06, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. आता कधी काळी आळस झटकून तसे काही तरी करीन म्हणतो. शास्त्रीय संगित ऐकून डोके शांत होते म्हणतात. बघू जमते का.

Moodi
Friday, January 06, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मी ८ वीत असताना पुण्याचा जे प्रभात band वाले होते ना त्यांचे मेव्हणे आमच्याकडे रहायला होते, अतिशय उत्कृष्ट आवाज अन तेवढीच छान रागदारी गायचे, त्यांच्या cassets आहेत कुणाकडे तरी, आमच्या जुन्या टेपबरोबर त्यांची गाणी असलेल्या cassets चोरीला गेल्या. ते आता कुठे आहेत माहीत नाही पण वातावरण भारावुन टाकणारे अन शांत करणारे गायचे ते.
कुठल्या प्रकृतीकरता कोणता राग आहे ते आहे माझ्याजवळ सापडले की लिहीन.


Dineshvs
Friday, January 06, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही ईथे असताना आपली भेट होवु शकली नाही. पण तरिहि तुम्हाला कुठल्या गाण्यांच्या सीडीज वैगरे हव्या असतील तर मला जरुर कळवा. थेट पाठवु शकेन किंवा कोणी येणारे असेल तरी पाठवीन.
आणि तुम्ही म्हणता तसे खरेच खुप शांत वाटते. यावर अनेक जणानी संशोधन आणि लेखनहि केलेय.
कर्नाटक संगीत पद्धतीत वेळेचे बंधन नाही, पण आपल्याकडे अगदी मैफ़ीलीतहि हे बंधन पाळले जाते.
अगदी भाव माहित नसला तरी, मनात तो राग तोच भाव उत्पन्न करतो.


Anilbhai
Friday, January 06, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आळस झटकायला कुठला राग आहे :-)

Ravysaraf
Wednesday, January 25, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh,
Is there any specific AIR center on which all the releases of AIR would be available? I am staying in Bangalore, hence the question.

Dineshvs
Wednesday, January 25, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, आळस झटकायला बागेश्री ऐकुन बघा. यातली द्रुत चीज ऐका. हमीर, बहार, केदार, कलावती, बसंत, शंकरा हे पण मन प्रसन्न करणारे राग आहेत.
मल्हाराचा, सुर मल्हार सोडुन कुठलाहि प्रकार ऐका.

Ravysaraf ते पणजीत ऊपलब्ध आहेत. तुम्ही मला ईमेल करता का, मी पाठवु शकेन.


Zakki
Thursday, January 26, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकले होते की मध्यरात्री मालकंस ऐकला की भुते वश होतात. नाना फडणीसांनी तसे केले होते म्हणे. खर्रक्काय? नि तो नुसता ऐकायचा की म्हणायचा? म्हणजे काय, कधी काळी काही कारणाने जागा राहिलो मध्यरात्री तर दूऽरवर जाऊन गाडीत बसून म्हणूनहि बघेन. माझ्याकडे आहेत मालकंसच्या दोन तीन टेप्स.


Dineshvs
Thursday, January 26, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या लग्नात जी सनई वाजवली जाते ना ( ट ट ट टा, टा ट टा ) ती बहुदा मालकंस मधली असते.
सा ग म ध नि, एवढेच सुर लागतात.
माझ्या राशीला भुते दिसत नाहीत आणि भुताना मी दिसत नाही, त्यामुळे त्याचे काहि सांगता येत नाही.

अखियन संग अखिया लागे आज

हे रफ़ीचे गाणे म्हणायला छान आहे. समोर भुत आले कि म्हणावे, अनायासे याच रागातले आहे.


Moodi
Thursday, January 26, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश..... झक्की......

गाणी बरीच आहे. झक्की तुमचा मनुष्य गण असेल ना तर भुतोबा नक्कीच येतील भेटायला. मग होवुन जाऊद्या एक जोरदर महेफील.


Anilbhai
Thursday, January 26, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यापेक्षा
मन तडपत भुत दरशनको आज
गा. लवकर भेटतील भुत
:-)

Storvi
Thursday, January 26, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न, मालकंस आणि भुतं वश होण्याचा काय बरं सम्बंध असावा? :-O

Zakki
Friday, January 27, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद. आता तो राग मी म्हणण्याऐवजी कुमार गंधर्व, भीमसेन नि संजीव अभ्यंकर यांच्या टेप्स लाऊन बघतो. जमले तर बरेच. पण तसा माझा देव गण आहे, त्याचा काही प्रॉब्लेम येईल का?

Moodi
Friday, January 27, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मग आता तुमचा भुताला भेटण्याचा चानस गेला कारण तुमचा देवगण. भुत मनुष्यालाच झपाटत अन दिसत, देवाला नाय.

Zakki
Friday, January 27, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गण बिण काय असते माहित नाही. काही माननीय अपवाद सोडले तर बर्‍याच लोकांच्या मते मी मनुष्यच आहे. आणि मला भूत ' वश ' करून घ्यायचे आहे, नुसते भेटायचे नाही.

Paragkan
Friday, January 27, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, १२ तारखेला जाताय ना? बरीच भुतं भेटतील कि तिथे. :-)

Zakki
Saturday, January 28, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परागकण, ते काय पुण्या मुंबईचे GTG नाही, भुते भेटायला!!!

पुणे मुंबईकर,


Shriramb
Saturday, January 28, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ravysaraf,
दूरदर्शन केन्द्रात ( आर टी नगर) डीडी आणि आकाशवाणीच्या संग्रहित ध्वनिफीती मिळतात असं ऐकलं होतं. चौकशी करा.

Gajanandesai
Saturday, January 28, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL झक्की,

BTW, मुंबई पुण्यात जाऊन तुम्ही कुणाला वश झालात की नाही?


Zakki
Saturday, January 28, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजाजन देसाई,. तुम्हाला वश झालो. पण तुम्हाला कमीत कमी गोष्टींची गरज असते असे तुमच्या प्रोफाईल वरून कळते. तर, सुखात रहा एव्हढेच म्हणतो.

Zakki
Sunday, January 29, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागेश्री राग सकाळी, दुपारी ऐकला तर चालते का? शिवाय त्या रागातील काही प्रसिद्ध हिंदी किंवा मराठी गाणी असल्यास कृपया सांगा. धन्यवाद

Dineshvs
Sunday, January 29, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागेश्री मधली गाणी, ब्लफ़ मास्टर, जुना बरं का, मधले लताचे

बेदर्दी दगाबाज जा
तु नाही बलमा मोरा

मन्ना डेचे
जारे बेईमान, तुझे जान लिया जान

मराठीत, बाल गंधर्वांचे
पुष्पपराग सुगंधित, शीतल किती
अति मंद चले, बघ वायु हा

किंवा त्यांचेच

आता राग देई मला, शांततेचा

हा राग स्वभावाने खट्याळ, चंचल आहे, म्हणुन यातील रचनाहि अश्याच असतात.
यात मोठा ख्याल क्वचितच मिळेल, पण बंदिशी आणि गाणी आहेत.


Zakki
Monday, January 30, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. पण परवाच जुना bluffmaster, netflix मधे परत केला. मी पाहिलाच नाही. शिवाय वरील कुठलीच गाणी माझ्या ओळखीची नाहीत. फक्त बेदर्दी दगबज जा. असो, मी पण बघीन कुठे मिळाली तर. नाहीतर शास्त्रीय संगीताततली दोन आहेत माझ्याकडे. तीच ऐकतो. पण सकाळी किंवा दुपारी ऐकली तर चालतात का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators