Prady
| |
| Tuesday, February 28, 2006 - 9:00 pm: |
| 
|
हल्लो नीलू मी सध्या अमेरिकेत असते.मला असा वाटतय की आनन्द म्हनजे केळकर आजोबान्चा नातु असावा.केदार दिघे नाही माहिती. तु १९८९ म्हणजे कापशिकर आणी सोनाली ताम्हणकर वगैरेन्च्या वर्गात होतीस का.सगळे रेकोर्ड तोडले होते त्या लोकानी. करमरकर माडम आहेत अजुन शाळेत. करमाळकर रिटायर झाल्या. डिसेम्बर मधे खेड्कर माडम पण रिटायर होणार होत्या.सगळे चान्गले शिक्शक एक एक करून रिटायर होताहेत.
|
Neelu_n
| |
| Wednesday, March 01, 2006 - 11:22 am: |
| 
|
हाय प्रज्ञा, हो ग सोनाली आणि कापशीकर आमच्या बॅचलाच पण मी ब वर्गात होते. हे मात्र खरे आपल्या वेळेचे शिक्षक खुपच चांगले होते. त्या खुप ओरडायच्या त्या कोण मॅडॅम करमरकर की करमाळकर. तुला तिथे असुन कशी काय बरीच माहिती आहे शाळेची? तुझ्या बॅचला अर्चना पाटकर होती का? तिची बहीण अपर्णा आमच्या बॅचला होती बघ बोर्डात आली होती. केळकर आजोबा कोण? तु अमेरिकेत ठीक पण इथे मुम्बैत कुठे घर तुझे? अग जानेवारीत केदारचे वडील वारले तेव्हापासुन इथे कोण फिरकलच नाही. तो आनंद पण मुलुण्ड आणी ठाण्याच्या बीबी वर असतो. तिथे ये ना तु.
|
Anandneha
| |
| Wednesday, March 01, 2006 - 3:53 pm: |
| 
|
hi neelu kay sangte ahes tila mazya baddal..by the way kelkar ajooba mhanje maze ajoba. te shaleche secratery hote....hi pradnya tu kontya batch la hotis
|
Neelu_n
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:15 am: |
| 
|
आनंद, आलास का? प्रज्ञा तुमच्याच बॅचची आहे. तुझे आजोबा शाळेचे secretary होते का. ती ओळखते बहुतेक तुला? तिला मी मुलुण्ड्च्या बीबी वर यायचे आमंत्रण देत होती.
|
Anandneha
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:51 am: |
| 
|
हाय निलु प्रज्ञा माज़्या बेच ला होति का?? प्रज्ञा तू केळकर कोलेज मध्ये होतिस का???
|
Prady
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:28 pm: |
| 
|
हाय आनन्द आणी नीलु, नीलु मी अपर्णा आणी अर्चना दोघीनाही ओळखते. अपर्णा भेटली होती मधे. अर्चना ला खूप वर्षात नाही भेटले. अर्चना एक वर्ष ज्युनियर होती पण आम्ही एकत्र जाधव सरान्च्या क्लासला जायचो एलिमेन्टरी आणी इन्टरमिजेईट च्या.त्यामुळे ओळख. आनन्द मी अ वर्गात होते. काही वर्षा मला वाटता तू पण होतास आमच्या वर्गात.मी बान्दोड्कर सायन्स ला होते. नीलु माझ सासर आणी माहेर दोन्ही मुलुन्डलाच आहे. आणी अगा मी जाऊन आले मुलुन्डच्या बीबी वर पण तिथे बहुदा सगळे प्रस्थापीत लोक आहेत. आणी मला दिवे आणी भूत वगैरे सगळा डोक्या वरून गेल म्हणून काही मेसेज नाही टाकला. आणी हो खूप ओरडायच्या त्या करमाळकर पण खूप सुन्दर शिकवायच्या. करमरकर कदाचीत माहीत नसतील तुला.तुम्ही दहवीत असताना काही दिवस त्या लीव वकेन्सी वर होत्या आणी नन्तर काही वर्षानी त्या शाळेत फ़ुल टाईम एम्प्लोई झाल्या. अजून आहेत मला वाटता त्या शाळेत.करमाळकर माडाम रिटायर ज़ाल्या.
|
Anandneha
| |
| Saturday, March 04, 2006 - 4:40 am: |
| 
|
हाय प्रज्ञा मी ब वगतात होतो
|
Neelu_n
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:19 am: |
| 
|
अग प्रज्ञा प्रस्थापित वगैरे असे काही नाही. काही काही जण खुप दिवसांनी येतात पण सर्व त्यांचे स्वागतच करतात. तु आलीस तर सर्वांना आनंदच होइल. आणि ते दिवे घेणे म्हणजे आपण कोणाची मस्करी केली तर जास्त मनावर घेवु नको असे सांगायचे असेल तर तो खास मायबोलीकरांचा शब्द आहे. आता रोजरोज दिवे घ्या दिवे घ्या सांगुन कण्टाळले की कोण मेणबत्त्या देतो, कोण कंदील मज्जा ग. तु ये तर खर.. तु कधी त्यांच्यातील एक होवुन जाशील ते तुला कळणार पण नाही. आनंद हाय.. मराठीत लिहल्याबद्दल धन्यवाद अरे केदारची काय खबरबात. तो आलाच नाही पुन्हा इथे. त्याच्या आइ कशी आहे.
|
hi sagle gayabe zalat ki kay
|
Prady
| |
| Friday, August 25, 2006 - 1:05 pm: |
| 
|
इथे बर्याच दिवसात कुणी फिरकलेलं नाही पण शाळेतली सगळीजणं जमली आहेत तिथे ऑरकूटवर. चारशेच्या वर मेंबर आहेत. इथे अत्ता पर्यंत आलेले आपण तसे बरेच आधीच्या बॅच मधले आहोत. तिथे जमलेली मंडळी त्या मानाने गेल्या पाच सहा वर्षातली. पण बघा एकदा जाऊन. बर्याच नवीन गोष्टी कळतील. आणी एक ह्या बीबी ला ज्याने जन्म दिलाय त्याने नेमकं वामनरावांचं स्पेलींग चुकवलं आहे. Wamanrao असं लिहीतात. इतकी वर्षं शाळेत काढलेल्यां कडून ही चूक अपेक्षीत नाही.
|
Anandsuju
| |
| Monday, October 16, 2006 - 3:10 pm: |
| 
|
हाय प्रज्ञा कशी आहेस? आज बरेच दिवसानी ईथे येणे झाले.. बाय द वे ऑरकुट वर आपल्या शाळेची कम्युनिटि काय आहे, तुझ्याकडे असेल तर मला लिन्क दे ना. my gmail id is anandkelkar1@gmail.com
|
Sayuri
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:54 pm: |
| 
|
वाह! 'वामुमावि'चं नाव इथे बघून खूप आनंद झाला. आता शाळा म्हणे दुसरीकडे शिफ़्ट झाली आहे ..तिकडे दूर हायवेपाशी. आपल्या शाळेची इमारत (त्यावरच्या मधाच्या पोळ्यांसकट ) अजून आठवते!
|
Anandsuju
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:04 am: |
| 
|
हाय सयुरी... तु पण वामनरावची विद्यार्थी का? तुझे ईथे स्वागत आहे..
|
Prady
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:08 pm: |
| 
|
हाय सायुरी तु पण वा. मु. मा. वी. ची का. छान! कुठल्या बॅचची तु. आनंद तुला invite पाठवू का orkut चा. आणी जर मेंबर असशील तर search communities मधे जाऊन वा. मु. च नाव टाक. पाचशेच्या वर लोकं आहेत. आपल्या बॅचचे विनय थिटे, चेतन चिंदरकर आणी नमिता कुबल आहेत. बाकी सगळी अलिकडची जनता आहे.
|
Prady
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:48 pm: |
| 
|
मधाची पोळी हो गं मला पण आठवतय. आम्ही सातवीत होतो तेव्हा वरच्या हॉलमध्ये भरायचा आमचा वर्ग. आणी एक दिवस खालून कुणीतरी बॉल मारला तर त्या माशांचं मोहोळ उठलं आणी शाळेत सगळी कडे माशाच माशा. जो तो जीव मुठीत धरून धावत सुटला. मग काय उरलेला दिवस शाळेला सुट्टी.
|
Anandsuju
| |
| Friday, October 27, 2006 - 8:14 am: |
| 
|
प्रज्ञा मला इनव्हिटेशन पाठव कारण मी सर्च करुन थकलो आहे
|
Prady
| |
| Friday, October 27, 2006 - 1:07 pm: |
| 
|
आनंद तुझ्या scrapbook मधे लिंक दिली आहे. नाही जमलं तर माझ्या प्रोफाईल मधे आहे ती community .
|
Anandsuju
| |
| Saturday, October 28, 2006 - 4:26 am: |
| 
|
येस प्रज्ञा तु पाठवलेली लिक मला मिळाली, धन्स...
|
Neelu_n
| |
| Friday, November 03, 2006 - 5:26 am: |
| 
|
आहे का कुणी इथे. सयुरी पण वामनरावचीच का? प्रज्ञा मी तुला ऑरकुटात ऍड केलय बघ. ती मधाची पोळी आहेत अजुन. तो प्रसंग घडला तेव्हा आमचाही वर्ग चालु होता. मुले काय पळत सुटलेली. तेव्हा सर्वात वर स्टेज होता तिथे पण वर्ग भरायचे ना.
|
Prady
| |
| Sunday, November 19, 2006 - 3:51 pm: |
| 
|
अगं नंतर त्या हॉलमधेच पार्टीशन टाकून खोल्या केल्या ना. स्टेजची पण खोली केली तिथे जाधव सरांचे चित्रकलेचे वर्ग व्हायचे. आधी तिथे किर्तने मॅडम स्कॉलरशिपचे वर्ग घ्यायच्या. ए त्यावेळी शाळेत एक कवटे नावाचं प्रकरण आलं होतं माहिती आहे का कुणाला. सायुरी तु कुठल्या बॅचची.
|
Cutepraj
| |
| Wednesday, May 09, 2007 - 5:13 am: |
| 
|
नमस्कार मंडली, मी पण वामुमावि ची.पण तुम्हाला सगळ्यान खुप junior आहे मी. मी ९६ ल दहावी पास झाले.
|
हाय प्राजक्ता काय म्हणते आहेस मी ९१ मध्ये पास झालो.......
|