Anilbhai
| |
| Tuesday, November 28, 2006 - 2:58 pm: |
| 
|
GTG कधी आहे मग. 
|
Supermom
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:06 pm: |
| 
|
फ़्लोरिडावासीयांनो, मला एक प्रश्न आहे. ख्रिसमसच्या long weekend मधे disney world ला जाणे वेडेपणाचे ठरेल का? आम्ही विचार करतो आहोत. पण काही लोकांचे म्हणणे असे की तुडुंब गर्दी असेल. या लोकांपैकी कोणीच ख्रिसमस मधे तिथे गेलेले नाही आम्ही यापूर्वी L.A. disneyland ला ख्रिसमस मधे गेलो होतो पण तेव्हा दोघेच होतो आणि आता बरोबर दोन मुले वय वर्षं पाच आणि माझी आई वय वर्षे बहात्तर असा crowd आहे. तर कोणी सांगेल का?
|
Anilbhai
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:22 pm: |
| 
|
दोघे मायबोलीकर तेथे असणार आहेत. आश्विनी आणि अनिलभाई. मलाही काही कल्पना नाही तेव्हा आता गेल्यावरच कळेल. मी ऐकले आहे की ख्रिसमसला इकडचे लोक घरी बसतात. आलात तर भेटायला जरुर आवडेल. 
|
Savani
| |
| Tuesday, December 19, 2006 - 10:01 pm: |
| 
|
SM आम्ही फ़्लोरीडा ला नाही गेलो. पण LA ला ऐन ख्रिसमस च्या दिवसात गेलोय. आणि खरच शुद्ध वेडेपणा ठरला. इतका प्रचंड crowd होता की दीड दीड तास रांगेत उभं रहायला लागत होतं सगळीकडे. आणि मग अश्याने उत्साह मावळायला लागतो आणि मग बघणं कमी होतं. so I would say pls think abt it b4 going with kids and all
|
सुपरमॉम फास्ट पास घे. गर्दीत उभराहायची गरज नाही. पण तो ७९ डॉलर ला असतो. रेग्युलर तिकीट ४७ की ४८ आहे.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, December 20, 2006 - 1:46 am: |
| 
|
बरीच मंडळी जमतेय म्हणायची. अश्विनीच्या येण्याच्या तारखा साधारण माहिती आहेत. दोनदा विचारूनही भाईंनी आपल्या येण्याच्या तारखा सांगीतलेल्या नाहीत. तेव्हा भेटण्याची इच्छा असूनही भेटीचा योग आहे की नाही माहिती नाही. (भाई, अजूनही कळवा मधे कधी भेटण्यासाठी वेळ मिळाला तर). सु. मॉ. या दिवसात मरणी गर्दी असते. फास्ट पास चा उपयोग नाही. तिथेही भरपूर लांब रांगा असतात. या टुरिस्ट अट्रॅक्शन कडे जाणारे रस्ते देखील तुडुंब भरले असतात. तेव्हा शक्य झालं तर हा सीजन टाळलेला बरा. अत्यंत वाईट स्थिती म्हणजे बाथरुमच्या रांगा पण तेव्हड्याच लांब आणि तिथे फास्ट पास नाही!!! तेव्हा लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती बरोबर असतील तर ही भानगड पण विचारात घ्यावी लागते. तसंच बरोबर खायचे पदार्थ ठेवावेत. शाकाहारी लोकांना सॅलड आणि फ्रेंच फ़्राईज सोडून फारसं काही मिळंत नाही. आणि विकत घ्यायचं म्हंटलं तरी परत त्याच रांगा!!!! येणार्यांना घाबरवण्याचा उद्देश नाही. पण पार्कात जायचं तरी लवकरात लवकर पोचलेलं बरं. मग फ्लोरिडात वेकेशन झालं की घरी जाऊन परत एक वेकेशन घ्यावं लागतं, श्रमपरिहाराचं!!
|
Supermom
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:48 am: |
| 
|
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मृ, तू तिथेच असल्याने expert opinion मिळालं. बेत cancel करावासा वाटतोय नवरोजींना पटवते जायला नको म्हणून.त्यांची फ़ार इच्छा आहे सासूला disneyworld दाखवायची.
|
Savani
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:45 am: |
| 
|
केदार, पण ह्या सुट्ट्यांच्या दिवसात फ़ास्ट पास चा देखिल विशेष उपयोग होत नाही. बाकी मृ ने लिहिलेच आहे.
|
Anilbhai
| |
| Wednesday, December 20, 2006 - 12:09 pm: |
| 
|
म्रु, मेल चेक कर.
|
Arunima
| |
| Friday, February 02, 2007 - 5:44 pm: |
| 
|
Mrinmayee कशी आहेस ग? तुझ्या इथे नाहि न झाला tornado चा काहि परिणाम.
|
Mrinmayee
| |
| Friday, February 02, 2007 - 9:27 pm: |
| 
|
हाय अरुणिमा! आवर्जून विचारल्याचं कौतुक वाटलं! आम्ही अगदी ठीक आहोत. पण वलुसिया काउंटी आणि जवळपासचा काही भाग झोडपला गेला. उध्वस्त घरं बघवंत नव्हती. १४ लोक गेले.
|
Deshi
| |
| Friday, February 02, 2007 - 10:09 pm: |
| 
|
वलुसिया काउंटी >>>मला ऊगीच North west Frontier वा गुजरात ला असल्याचे वाटले नाव वाचुन. तिकडे काही नाव आहे साकडीया, चोरडीया तसे वलुसिया.
|
Arunima
| |
| Friday, February 02, 2007 - 10:48 pm: |
| 
|
अग आपणच चौकशी करायची एकमेकांची इथे नाहि का? बर वाटल तुम्हि सगळे ठिक आहात हे वाचुन. अजुन कोणी रहातय का त्या area मध्ये इथे येणार? हो ग काय भयंकर द्रुश्य(? कस लिहायच) आहे ना.
|
Udayg
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:48 am: |
| 
|
Hi, I am planning to move to Miami, Florida. Can anybody please suggest/recommnend apartments complexes. Preferably जिथे मराठी लोक असतील :-). Thanks.
|
हे सदर आता नवीन जागी हलवण्यात आलेले आहे. /node/1832
|